चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 47)

Untold love story (part 47)

पार्ट 47

दुसऱ्या दिवशी अजित करुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना घेऊन अचानक पोहोचतो......
करुणाचे वडील दुकानावर जाण्याच्या तयारीत असतात.....करूणा सुद्धा आता त्यांना जॉईन झालेली असते..

अजितचे डॅड : येऊ का आत.......??????(प्रेमाने बोलतात)

थोडयावेळ तर करुणाच्या वडिलांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास च बसत नाही.....ते जे बघतायत ते अजितचे वडील आहे

अजितचे वडील : मी येऊ का आत.......?????

करुणाचे वडील : हा हा याना  सर.....या ना....(आदर सत्कार करत आत घेतात......मधु ....अग मधु.... बाहेर ये....बघ कोण आलंय ते.....अग लवकर ये......तुम्ही उभे का आहात.... प्लिज बसाना.....

सगळे एक एक करून सोफ्यावर बसतात......

मधु : काय झाल.....कोणे......(मधु सुद्धा बाहेर येऊन शॉक होते)....तुम्ही......(करुणाच्या बाबांकडे बघते)थांबा...... मी पाणी आणते.....

करुणाचे बाबा : पाणी नको सरबत आन.....

मधु : हा हा ठिके.....तुम्ही सगळे बसा बोलत....मी आले

अजितची आई : आवो नका एवढी गडबड करू.....आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर बोलायला आलोय.....

मधु : हा बोलाना.....(काळजीत ) काही चुकलं का आमचं.....

अजितचे डॅड : नाही नाही.....चुकलं तुमचं नाही .....चुकलं तर आमचं....खास करून माझं........माझ्या चुकीच्या निर्णयामुळे सगळ्याना खुप त्रास झाला.....खास करून अजित आणि करुणाला....(अजित शांतपणे त्याच्या डॅड च बोलणं ऐकत असतो)म्हणुन त्याची नुकसान भरपाई करायला म्हणुन आलो.......मी जे केलं प्लिज मला माफ करा......मला माहितीये माझी चुक माफ करण्यासारखी पण नाहीये....... पण तुम्ही सगळे निदान मला समजुन तरी घ्याल......

करुणाचे वडील : आवो सर अस का बोलतात तुम्ही......तुम्ही कशाला माफी मागतायत.....आणि नाहीतरी चुका मानसंकडूनच होतात .......तुम्ही नका माफी मागु....आम्हालाच उलट अपराधी असल्यासारख वाटत.....

मधु :हो ना.....

अजितची आई :करूणा कुठे....तिला बोलवाना.....

मधु : हो आले......मी बोलावते तिला

थोड्याच वेळात करूणा येते......अजितचे डॅड समोर असल्यामुळे ती नजर खाली करून उभी असते.....अजितचे डॅड स्वतःहुन तिच्याकडे चालत येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात......

अजितचे डॅड : बेटा आज परेनंतर मी जे काही केलं....गे पैशात आंधळं होऊन केलं.....मला आता पैशाची काही कमी नाहीये....पण मी हे विसरून गेलेलो......मी पैसा.... श्रीमंती भरपुर कमवली पण माझी मानस मात्र मी गमावली.....त्याचाच फायदा घेऊन मी अजितला तुझ्या पासुन दूर करत होतो...मी परत तीच चुक करत होतो जी मी आधी माझा फॅशन हाउस वाचवण्यासाठी करत होतो......फरक एवढाच होता त्यात मी माझ्या मुलाचा सौदा केला....आणि दुसऱ्या ठिकाणे दोन प्रेम करणारे त्यांना वेगळं करत होतो...
हे सगळं मी पैशात आंधळं होऊन करत होतो......पण आता माझे डोळे उघडलेत..... आता मी माझ्या मनासारखं नाही....तर माझ्या मुलाच्या मनाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.....

अजितचे डॅड करुणाच्या वडीलांसमोर हात जोडुन उभे राहतात.....

मला तुमची करूणा.....आमची म्हानजे मोहितेंचि सुन म्हणुन आमच्या पदरात द्याल का.....माझ्या चुकीला तर माफी नाहीच नाही पण त्यांच्या अबोल प्रेमाला आपण एकत्र आणु.......(काळजीने बोलतात)

करुणाच्या आईवडिलांचे डोळे पाणावतात.......करुणाचे वडील त्यांच्या हातात हात घेऊन त्याना त्याचा होकार कळवतात.....करूणा तिच्या आईच्या गळ्यात पडुन रडते.....तेवढ्यात अजितची आई तिच्या जवळ जाते.....

अजितची आई : अस रडायचं नाही बेटा......आज आनंदाची गोष्ट आहे.....ती हसुन हसुन स्वीकार.....हे घे मी बघ काय आणलंय..... जरा खोलुन बघशील(हसतच)

करूणा लगेच तिच्या बाबाकडे बघते ....बाबा डोळ्यांनी खुनवुन खोल म्हणुन सांगतात.....

करूणा अजितच्या आईने दिलेलं गिफ्ट खोलते.....त्यात गडद हिरव्या रंगाची पैठणी असते......करूणा एकटक अजितच्या आईला बघते.......

अजितची आई : काय झालं......अशी काग बघते.....हीच साडी घालुन तुला साखरपुड्याला उभं रहायचंय.....आवडलीना साडी(हसतच)

आता करुणाचा एवढा वेळ थांबुन धरलेला बांध फुटतो....ती अजितच्या आईच्या गळ्यात पडुन जोरजोरात रडते....

अजितची आई :(तिच्या डोक्यावरून हात फिरवत)अग वेडी अस नाही रडायचं......आज आनंदाचा क्षण आहे....त्याचा आनंदाने स्वीकार कर.......

करुणाची आई पदराने डोळे पुसत बोलते.....मी तोंड गोड करायला साखर आणते....आणि ती किचन मध्ये जाते.....

सगळे आनंदाने एक मेकांना साखर भरवतात.....अजित आणि  करूणा सुद्धा एक मेकांना साखर भरवतात......

अजितचे डॅड : करुणाचे बाबा....जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ह्यांचा साखरपुडा उरकुन लग्न करून देऊया.....म्हणजे आपण आपल्या जीमेदारी मधुन मोकळ

करुणाचे वडील : तुम्हाला मला एक गोष्ट सांगायचीये....(काळजीत) जी करुणाला सुद्धा माहीत नाही

अजितचे डॅड :हा बोला......

करूणा : बाबा मी बोलु

बाबा : तु काय बोलणार बेटा....तुला तर माहीतच नाही......

करूणा : मला सगळं माहिते ..आणि अजितला सुद्धा.....आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा

बाबा : म्हणजे.....????

करूणा : तुम्हाला हेच सांगायचंय ना की मी तुमची मुलगी नाहीये.....तर तुमच्या मोठ्या भावाची मुलगी आहे ते......

करुणाचे बाबा आई एकमेकांच्या तोंडाकडे बघतात....

बाबा :पण हे तुला कस माहीत......??????(शॉक होत)

करूणा : बाबा मी जेव्हा क्लास ला जायची तेव्हा एक माणुस सारखा माझा पाठलाग करायचा....मला त्याचा चेहरा दिसायचा नाही कारण त्याने हेल्मेट घातलेलं असायचं....कितीतरी वेळा त्याने मला अडवुन मला तुझ्याबरोबर बोलायच आहे....असा बोला......पण मीच दुर्लक्ष केलं......शेवटी शेवटी मी त्याच्या पाठलागीला कंटाळले आणि मी ही गोष्ट अजितला कळवली.....अजितने एक दिवस सुट्टी काढुन त्या माणसाला भेटायला बोलावलं.....आम्ही भेटलो....एका ठिकणी...... जेव्हा त्याने त्याच्या डोक्यावरचा हेल्मेट काढला तेव्हा मी शॉक झाले हे तर आपले मोठे काका आहे....ते का माझा सारखा सारखा पाठलाग करतायत तेव्हा त्यांनी मला सांगितलं.....मी त्यांची चौथी मुलगी आहे.....आपल्या आजीला घरासाठी वंशाचा दिवा हवा होता.....काकांना लागोपाठ तीन मुली झाल्या .....आणि जेव्हा मी काकीच्या पोटात राह्यले तेव्हा सगळ्याना वाटलं की आता तरी मुलगा होणार पण शेवटी मी जन्माला आले.....मी जशी जन्माला आले तसा सगळे माझा तिरस्कार करायला लागले.....तेव्हाच काकाने आजीच्या सांगण्यावरून मला अनाथ आश्रम मध्ये सोडायचा निर्णय घेतला.....पण देवाच्या मनात काहीतरी वेगळच होत.....कारण देवाने तर तुम्हाला मुलंच दिल नव्हतं.....तेव्हा तुम्ही दोघांनी मला दत्तक घ्यायचं ठरवलं ....काका ज्या पद्धतीने मला ही सगळी गोष्ट सांगत होते त्याने मला अंदाजा आला की ......त्यांनी मला सहजासहजी तुम्हाला दिली नसेन......हो ना बाबा

बाबा मान खाली घालतात......बोलाना बाबा

मधु :आता तरी खर सांगा......(थांबा मीच बोलते)
तुला काकाने अर्धी गोष्ट सांगितली..... देवाने तर माझी कुस उजळवली नाही पण तुझ्या सारखी मुलगी माझ्या पदरात टाकली.....त्या साठी आम्हाला आमची अर्ध्याच्या वर साठवलेली जमा पुंजी त्यांना द्यावी लागली......पण देवाच्या मनात काहीतरी वेगळच होत....तु जशी आमच्या जीवनात आलीस....तस आम्हाला आमचं गेलेलं सार वैभव मिळालं......तुझे काका नेहमी आम्हला येऊन धमकी द्यायचे.....मी कितीतरी वेळा बाबाना बोले सुद्धा की सांगू न टाका करुणाला....पण त्यांना नेहमी एकाच भीती.....करुणाला जर हे सगळं कळाल तर ती कशी रिऍक्शन देईल ......त्या काळजीने ते तुला हे सांगत नव्हते.....काका नेहमी आम्हला धमकी द्यायचे.....की ते तुला आमच्या पासुन दूर न्हेणार.....पण तुझया बाबांना तुझ्या वर भरपूर विश्वास.....ते नेहमी एकच बोलायचे करुणाला कळाल तरी आपल्याला सोडुन नाही जाणार......(रडत बोलते)

करुणाचे बाबा आता रडायला लागतात.....करूणा त्यांच्या जवळ येते.....बाबा नाही.....मी कधीच तुम्हाला सोडुन नाही जाणार.....काळजी नका करू.....काका आता पण त्याच्याच फायद्या साठी मला तुमच्या बद्दल सांगत होता.....पण मला माझ्या बाबांवर पूर्ण भरोसा आहे.....हो ना बाबा.....(एवढं बोलुन करूणा तिच्या बाबांच्या गळ्यात पडून रडते.....तिकडे उभे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत)

मधु : बस बस....आता रडायचं नाही....आज किती आनंदाचा क्षण आहे......त्याला अस वाया नाही जाऊन द्यायचं

अजितचे डॅड : आम्हला ही गोष्ट कालच अजितने कळवली.......त्या गोष्टींवर आमचा काहीच हस्तक्षेप नाहीये......करूणा सारखी मुलगी आम्हला सुन म्हणुन मिळते तेच आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.....करुणाचे बाबा....कल्पना आमच्या ब्राम्हणाला भेटुन एखादा चांगला मुहूर्त काढुन तुम्हाला सांगेन.....त्या मुहूर्तावर आपण ह्या दोघांची एनगजमेंट करू
.....तुम्हाला चालेना.....??????

बाबा : हो हो......चालेना.....

अजित हळुच करुणाला डोळा मारतो.....करूणा लाजेने मान खाली घालते.....

अजितची आई :हो आणि लवकरच लग्नाचा मुहूर्त पण काढुया....एकदा का करूणा आमच्या घरी सुन म्हणुन आली तर माझी जवाबदारी संपली....काय बरोबर ना करूणा....

अजितचे डॅड: मी पण माझं सगळं काम अजितला handover करून मोकळा होईल.....(हसतच)म्हणजे एवढ्या वर्ष मी जो टाईम माझ्या मिसेस ला दिला नाही तो टाईम मी तिला देईल

कल्पना : ,(लाजतच)काही पण तुमचं

  मोहिते:अग खर तेच बोलतो......लाजतेस काय......

सगळे आनंदाने गप्पा गोष्टी करून आपापल्या घरी निघतात

(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)

🎭 Series Post

View all