Aug 05, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 45

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 45
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 45

अजित करुणाला घेऊन सुखरूप घरी येतो.......करुणाच्या घरी....तिचे आई वाडीला आणि मित्र मैत्रिणी त्यांची वाट बघत असतात.....

करूणा घरात आल्यावर तिची आई काळजीने तिची चौकशी करते

मधु (आई ):  करूणा कुठे होतीस तु......किती काळजी वाटत होती मला तुझी......अस कोणी न सांगता जात का कुठे......तुला काही झालं असत तर काय केलं असत आम्ही
(रडतच)

करूणा शांत पणे :आई मला शांतता हविये .....प्लिज मला एकटीला थोडा वेळ सोड ......

आई :आग पण(काही बोलणारच तोच बाबा बोलतात)

बाबा : मधु ....तिला जरा शांत होउदे......(मधु .....प्लिज .....समजुन घे........)करूणा तु ज तुझ्या बेडरूममध्ये .....

मधु : आवो पण ....तिला अस एकटं......(काळजीत)

बाबा : आता आलीये ना ती घरी.....मग काळजी नाही करायची.....तु जा आत करूणा

बाबांच्या सांगण्यावरून करूणा कुणाशी न बोलताच आत मध्ये जाते आणि डोर लॉक करते......

बाबा :अजित बस ना.....तुला पाणी देतो.....

अजित : नको बाबा ....मी आधी घरी जातो.......हे जे घडल त्याच रिजन मला आधी कळू द्या......(एवढं बोलून तो।करुणाच्या आई जवळ जातो)

करुणाच्या आईचा हात हातात घेतो.....आई आय प्रॉमिस यु .....मी सगळं ठीक करेन....करुणाला मी कधीच दुखावणार नाही......काळजी नका करू......

आई : (मानेनेच हो बोलते)
अजित जसा घरी निघायला निघतो तसे त्याचे फ्रेंड्स सुध्दा निरोप घेऊन निघतात.....

नंदु : अजित....मित्रा सगळे निट करे बाबा.....हे जे झालं ते लय वाईट वाटल बघ

अजित :मला समजतंय रे....आता घरी जाऊदे मला....मी करेन सगळं मॅनेज.....संगिता आणि ध्रुवी.... मला जर टाईम नाही मिळाला ......तर प्लिज तुम्ही करुणाला....कॉल करत जा.....किंवा तिला भेटायला येत जा.....तो परेनंतर मी माझ्या घरची सिच्युएशन हँडल करतो

संगिता : तु काळजी नको करुस आम्ही आहोत तुमच्या दोघांन बरोबर.....

अजित निघतो

सगळे मित्र :संभाळून जा.....काही लागलच तर कॉल कर

अजित सगळयांना करुणाची काळजी घ्या सांगुन त्याच्या घरी निघतो........
@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते वीला

अजित त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन शांत पणे बेड वर झोपतो.....आज जे घडलं त्याचा विचार करून त्याच डोकं जड झालेलं असत....... एक च्या सुमारास त्याला गाडीच्या हॉर्न चा आवाज येतो.....
त्याला अंदाज येतो की आई आनंद डॅड आलेत....तसा तो खाली येतो......

मोहिते आत येताच....:हे माय सण......कुठे होतास.....सगळे तुला विचारत होते.......मी कस कस हँडल केलं ते मलाच माहीत .....होत

अजित शांतच असतो....

मोहिते : अजित बेटा मी आज खुप खुश आहे......माझं आज स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटतय...... थॅंक्यु....थॅंक्यु सो मच बेटा...... (हसतच) कल्पना मी खुप थकलोय....प्लिज मला थोडं पाणी आन येताना(आणि मोहिते तिथुन बेडरूम मध्ये जायला निघतात.......

अजित : रागातच( मला न विचारता माझी एनगजमेंट कशी काय फिक्स केली तुम्ही.....मिस्टर मोहिते)

अजितचे डॅड तिथेच थांबुन मागे बघतात......व्हाट.....व्हाट डिड यु से.....

अजित : हो मिस्टर मोहिते.....तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर ऐकलं......(रागातच)मी परत रिपीट करतो......मला न विचारता तुम्ही माझी एनगजमेंट कशी काय फिक्स केली......

डॅड : त्यात तुला काय विचारायचं.......

अजित : म्हणजे..... हा माझ्या लाईफ चा मोठा डीसीजन आहे ....तो तुम्ही कसा काय ठरवु शकतात......ते पण मला न विचारता....

डॅड : लिसन.....मी तुझा डॅड आहे....आणि आता परेनंतर तुझे सगळे डीसीजन मीच घेतलेत.....मग हा पण डीसीजन मी घेतला तर काय झालं.....आणि जिच्या बरोबर तुझं मी एनगजमेंट ठरवलीये ....
They are rich people.....त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये फायदाच फायदा होणार

कल्पना : म्हणजे.....तुम्ही तुमच्या मुलाचा सौदा केला....???

डॅड : तु मधी बोलु नकोस(रागातच)

आई : का नको बोलु .....अजित माझा पण मुलगा आहे......त्याच्या वर माझा पण हक्क आहे......

डॅड : हक्काची गोष्ट तु करूच नकोस.....आणि काय ग काय कळत तुला बिझनेस मधल.......कोणाशी काशी डील करतात....काय बोलतात....कळत का तुला.....(रागातच)लास्ट टाईम सांगतो....आमच्या दोघांच्या मध्ये पडु नकोस

अजित : तुम्ही आई बरोबर अस नाही बोलु शकत......

डॅड : हे बघ अजित(हलक्या आवाजात) बेटा रिचा चांगली मुलगी आहे......तिची फॅमिली मेम्बर्स सुद्धा आपले जवळचे आहे.....तु तिच्या बरोबर लग्न केलं तर त्यात त्यांना पण फायदा आहे आणि आपल्याला पण.....सो तु तो विचार कर ना....आपण बिझनेस वाले मानस....आपण आपला फायदा बघायचा

अजित : ते तुम्ही बघा.....मी नाही....आणि तस पण माझं एका मुलीवर प्रेम आहे मी तिच्याबरोबर लग्न करणार....

डॅड : (रागातच)तु अस नाही करू शकत

कल्पना :का .....पण ....त्याची लाईफ आहे तो काहीपण करू शकतो.....

डॅड : मी त्याला ह्या गोष्टींची परमिशन नाही देत

अजित :तुम्ही मला जशी परमिशन नाही देत....तसच मी तुम्हाला विचारतोय.....तुम्ही हा डीसीजन कसा काय घेतला......ही माझी लाईफ आहे मी काही करू शकतो.....माझ्याबलाईफ मध्ये कोण येणार कोणाही हा फक्त नि फक्त माझा डीसीजन आहे

डॅड : हे घर माझं आहे....इथे फक्त मी सांगेन तेच होणार(जोरात ओरडतच)

अजित शांत होतो......ठिके मी जातो इकडुन.....तुमचं घर आहे ना....मग मी आणि आई जातो निघुन.....

डॅड :तु हे नाही करू शकत

आई : का नाही करू शकत......तेच तर विचारते

डॅड : अजित लिसन टु मी.....तु आज परेनंतर माझं सगळं ऐकलं.....मग आता हे पण ऐक......रिचा बरोबर लग्न केलंस तर आपल्यालाच फायदा होईल

आई :  पण हा एवढा मोठा डीसीजन त्याला स्वतःला घेऊद्याना..... त्याची लाईफ आहे तो बघेन काय करायचं ते

डॅड : तु मधी नको बोलुस......अजित प्लिज तु नीट विचार कर आपला बिझनेस जसा तशा माणसानं बरोबर आपण रिलेशन ठेवायचं....ह्यात आपला फायदा होत

आई : आता परेनंतर तुम्ही तेच केलं ..फक्त स्वतःचा फायदा बघितला.....आता पण तेच करतायत.....एक लक्षात ठेवा....माझं झालं तस माझ्या मुलाचं होता कामा नये

अजित :म्हणजे ....तु काय बोलतेस ....आई ....प्लिज स्पष्टपणे सांग.....

आई : तुला काय माहीत अजित....मला फसवुन लग्न केलं ह्यांनी माझ्याशी.....माझ्या वडिलांचा बिझनेस बघुन मला फसवलं ह्यांनी....त्यांच्यावर प्रेम करण्यात भाग पाडल....जेव्हा मला कळाल की ह्यांनी फक्त माझ्या पैशासाठी माझ्यावर प्रेम केलं तो परेनंतर खुप उशीर झालेला.....कारण तु पोटात होतास माझ्या......माझा नाईलाज होता ह्या माणसाबरोबर संसार करणं.....नाहीतर कधीच गेले असते सोडुन ह्यांना
....अजित मी तुला आता पण सांगते....ह्यांनी आता पण नक्की काहीतरी घोळ केलाय....म्हणून हे तुझं लग्न रिचा बरोबर करायला ता फोर्स करतायत.....विचार त्यांना हो की नाय.....विचार

अजित : डॅड .....खर खर सांगा.....आई जे बोलते ते खरं आहे का..........बोला डॅड.....तुम्ही का मला लग्नला फोर्स करतायत....बोला....मी काहीतरी विचारतोय(रागातच)

डॅड : हो ....आहे माझा फायदा....आहे माझा फायदा.....कळलं तुला......(रागातच ओरडतात)तु पुढचा विचार का नाही करत....फायदा नुकसान तुला का नाही दिसत......का तु असा वागतोयस....आज परेनंतर तु मला कधीच मना नाही केलंस...मग आता का करतोयस

अजित : कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे म्हणुन...... मी नाही सोडु शकत तिला......पण मला सांगा तुम्ही का मला फोर्स करतायत....मला आताच्या आता त्याच उत्तर हवय डॅड

डॅड : ते मी ....(बोलताना थरथरतात)

अजित : बोला डॅड ... काय केलं तुम्ही अस....ज्यामुळे तु।ही हा एवढा मोठा डीसीजन मला न विचारता घेतला.....का मी विचारू रॉबिन अंकला

डॅड : मी डील केलीये त्याच्या बरोबर(रागातच ओरडतात)हो....मी तुझी आणि रीच्याच्या लग्नाची डील केलीये....ते ऑन खुप आधीच

अजित : काय....कसली डील...... कोणती डील....

मोहिते शांतच बसतात.....

अजित : डॅड कोणती डील

कल्पना : अजित काहीतरी विचारतोय.....(मोहिते रागाने कल्पना कडे बघतात.....)

डॅड : तु US ला होतास त्या वेळेस माझ्या चुकीमुळे मला आपल्या फॅशन हाऊसला खुप मोठं लॉस झालेलं....एवढं मोठं की त्याची नुकसानभरपाई पण मी करू शकत नव्हतो.....मी लालचिपणात....आपल्या फॅशन हाउस च नुकसान केलं......मला कोणताच मार्ग दिसत नव्हता......कोणीच मला मदत करत नव्हतं....तेव्ह मला रॉबिन ने मदत करायचं ठरवलं....तो मदत तर करत होता....पण त्या मागचा त्याचा हेतू मला समजत नव्हता......तेव्हा त्याने मला त्याच्या मुलीचं लग्न हे तुझ्या बरोबर करून देशील ही डील सांगितली....जर ती डील मी मान्य केली नाही तर तो मला मदत नाही करणार....
अस त्याने मला स्पष्ट सांगितलं......मला आपला फॅशन हाउस वाचवायचा होता म्हणून मी ती डील मान्य केली.....आणि मला स्वतःवर खूप विश्वास होता....की तू माझं बोलणं ऐकशील......तु मला मना नाही करणार.....म्हणून तुला मी बोलो की कर लग्न....आपला फायदाच होईल

कल्पना :शी .....मला तर आता लाज वाटते तुमची.....तुम्ही डील नाही तर स्वतःच्याच मुलाचा सौदा केला सौदा.....एकदा पण मला विचारावस नाही वाटला तुम्हाला........निदान मला सांगितलं असत....तर दुसरा मार्ग काढला असता आपण......

मोहिते :मला त्या वेळेस जे योग्य वाटलं ते मी केलं.....मला नव्हतं माहीत.....त्याचा परिणाम असा होईल.......

अजित :आता माझं डोकं काम नाही करते....डॅड(शांत पणे) एक लक्षात ठेवा.....काही झालं तरी मी रिचा बरोबर लग्न नाही करणार.....माझं जिच्यावर प्रेम आहे मी तिचाच होणार....बाकी तुम्ही बघा....कस काय हँडल करता येईल ते.....(एवढं बोलुन अजित त्याच्या बेडरूममध्ये निघुन जातो)

कल्पना सुद्धा रागाने निघुन जाते

मोहिते डोक्याला हात लावुन तसेच हॉलच्या सोफ्यावर बसतात.........

@@@@@@@@@@@@@@@@@@

(वाचकाहो पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की करूणा दोन दिवस तिचा बेडरूम उघडत नाही ते ह्याच कारणाने....म्हणुन तिचे आईवडील तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात)

आज तिसरा दिवस ......करुणाच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून ती आज दार उघडते......

आई : तीन दिवस झाले तु स्वतःला आत मध्ये बंद करून ठेवलंय.... स्वतःचा नाही निदान आमचा तरी विचार करायचा.......तुझ्या काळजीमुळे बाबा  तिन दिवस झाले दुकानावर पन नाही गेले.....अस वागणं तुला तरी पटतंय का......

बाबा : मधु तु शांत बस.....करूणा बेटा.....तु ये इकडे.....माझ्या जवळ ये.......बस  इथे सोफ्यावर......(करूणा शांतपणे तिच्या बाबांच्या बाजुला बसते) हे बघ बेटा....जे झालं ते झालं....आपण त्यात काही करू शकत नाही.....अजितने आम्हाला सांगितलं आहे तो सगळं नीट करणार.....आणि आमच्यापेक्षा तूच त्याला जास्त ओळ्खतेस....... तुला तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना.......मग हे अस वागुन तु स्वतः अविश्वास दाखवतेस.....(करूणा भरल्या डोळ्यांनी बाबाकडे बघते........)

काय झालं....अग खर तेच बोलतो..... तुला सांगु ज्या वेळेस अजित आम्हला विश्वासाने सांगत होताना...तेव्हाच मला कळाल......त्याला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती.......त्याने आम्हला विश्वासात घेऊन सगळं ठीक करण्याच वचन दिल.......त्यामुळे मला तरी नाही वाटत आपण ह्या गोष्टीला  जास्त बढावा द्यावा.....आता एक काम कर जा आणि फ्रेश होऊन ये....चेहरा बघ कसा झालाय.....तु जा.....आधी.....आपण एकत्र जेऊया......ठिके

करूणा मान हळवुनच हो बोलते.......करूणा फ्रेश होण्यासाठी जात असते तेवढ्यात अजित घरा मध्ये धापा टाकत येतो....

अजित : करूणा.....(काळजीत रडक्या स्वरात)कशिएस तु.....तुला काही झालं नाही ना.....आणि तु माझा फोन पण उचलत नाही......तीन दिवस झाले......तु फोनच उचला नाही.....(करूणा एक टक भरल्या डोळ्यांनी बघते)आणि तु अशीं का दिसतेस.....चेहरा बघ तुझा कसा दिसतोय.....

बाबा काय झालं हिला.....ही बोलत पण नाही.....

बाबा : अजित ....अरे थांब.....किती त्रास करून घेतोस स्वतःला....करूणा आता बरिये....... ती आता फ्रेश व्हायला चालीये....तु बस इथे .....मधु पाणी अजित साठी.....आणि तु जा फ्रेश हो

अजित बाबांच्या जवळ बसतो : (अजित करूणा आज रुम मधुन बाहेर आलीये....तिला जे समजवायच होत ते समजावलं आम्ही....तु काळजी नको करुस......थोडा वेळ दे......तिला.....ती नक्कीच सावरेन स्वतःला....

अजित : बाबा आई ......तुमच्या दोघांची काही हरकत नसेन तर मी आता करुणाला बाहेर घेऊन जाऊ

मधु आणि दत्तात्रय एकमेकांना बघतात

मधु : जा.....घेऊन तेवढंच तिला बर वाटेनं.....नाहीतर सारखा सारखा एकच विचार करत बसेन

अजित : थॅंक्यु आई......

थोड्याच वेळात करूणा फ्रेश होऊन येते....

अजित : करूणा जा तयार हो....आपण थोड्या वेळ बाहेर जाऊया

करूणा बाबांकडे बघते......बाबा डोळ्यांनीच हा बोलतात

करूणा कोणाशी ही एक शब्द न बोलता तयारी करून अजित बरोबर निघते......

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife