Aug 06, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 42 )

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 42 )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 42

पार्ट 42


थोड्याच वेळात अजित आणि त्याची आई करुणाच्या घरी पोहोचतात.....करुणाच्या घरी ऑलरेडी तिचे आई बाबा त्या दोघांची वाट बघत असतात......

जस जसे एक एक पाऊल पुढे पडत तस तशी अजित च्या मनाची धाकधुक वाढते.....

अजितची आई : येऊ का आत

करुणाचे वडील : या या.....तुमचीच वाट बघत होतो.....मला वाटलं अजित एकटा येईल....पण तुम्हाला पाहुन खुप आनंद झाला.....याना आत या

कारुणाचे वडील आदरसत्कार करत त्यांना आत घेतात...... अजितची आई पुर्ण घर न्हयाळत असते.....अजितला डोळ्याने खुनवुनच घर  छान आहे अस बोलते......

करुणाची वडील : मधु पाणी आन ग....पाहुणे आलेत....

मधु करुणाची आई :  हो हो आले....थोड्याच वेळात मधु पाणी घेऊन येते.......नमस्कार मी करुणाची आई .....मधु ........(आपली ओळख करून देताना)

कल्पना :  ( अजितची आई)  : नमस्ते .....मी अजितची आई......मी तुम्हाला आधी पाहिलंय कुठे तरी

करुणाची आई : हो ताई......तुम्ही मला राधा कृष्ण मंदीरात भेटलात........ ती आपली टक्कर झालेली....माझ्या ताटातून  फुले पडलेली........

अजितची आई : हो हो.....आठवल......म्हणजे करूणा तुमची मुलगी

मधु  : हो हो.....आमची मुलगी......

कल्पना: करूणा कुठे ......????

कसरूनचे बाबा : आहे ना आत ....थांबा बोलवतो

मधु : थांबा मी बोलवुन आणते.....(मधु  करुणाला बोलवायला आत जाते)

कारुणाचे बाबा : इथे येताना काही त्रास नाही ना झाला(काळजी पोटी विचारतात)

अजितची आई : नाही नाही काही त्रास नाही झाला.....(हसत)

थोड्याच वेळात करूणा आणि तिची आई येते.....करूणा लांबुनच अजितच्या आईला नमस्कार करते........

कारुणाचे बाबा.....: मी सहजच अजितला भेटायला बोलावलं.......मला काल कळाल की करुणाला तुमचा मुलगा आवडतो....मधुला तर आधीच माहीत होतं.......पण काळ मला कळाल.......

अजितची आई : हो अजित मला बोला....त्याला एकट्याला यायला अवघड वाटत होतं.....म्हणुन मी सोबत आले......म्हंटल आलेचे सोबत तर ओळख पण होऊन जाईल....

कारुणाचे बाबा :  बर केला तुम्ही पण आलात......तेवढंच बोलता येईल आपल्याला....आणि त्या निमिताने भेट पण झाली(हसत)...अजित बेटा.....तुझी जरा माहिती देशील मला

अजित एक नजर करूणा वे टाकतो.....ती त्याला डोळ्यानेच कळजीकरू नको म्हणुन सांगते....

अजित त्याची आणि त्याच्या घरच्यांची सगळी माहिती देतो....

कारुणाचे बाबा : ताई .....मला ह्या दोघांच्या नात्याबद्दल काही प्रोब्लेम नाही.......पण तुम्ही मोठी माणसं....आम्ही असे साधे.....उद्या काही प्रॉब्लेम नको.......म्हणुन मी अजितला आमची माहिती  सांगण्यासाठी इथे बोलावलं

अजितची आई : तुम्ही बोलावलं.....खुप बर केलं.....माणसाने आपल्या मनातलं बोल....की मन हलकं होत......कारुणाचे बाबा.......आम्ही आज ज्या पोजिशन वर आहोत....त्या आधी नव्हतो.....प्रत्येक जण मेहनत करून आले.....आणि आज माझ्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केलं.......त्याने हे सगळं नाही पाहिलं.....कारण त्याच्या वर मी केलेले संस्कार त्याने दाखवले.....प्रेम हे सगळं नाही बघत.......

तुम्ही मला बघुन बोलाल का की मी एवढ्या मोठ्या डिझायनर ची बायको आहे ते......मला नाही वाटत प्रेमाला पैशाची गरज आहे.....ह्या दोघांनी एकमेकांवर खर प्रेम केलं.....जर माझ्या मुलाने एखादी श्रीमंत मुलगी पसंत केली असती तर मला सुद्धा वाईट वाटलं.....असत......पण खरंच तुमच्या मुलीला जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला खरच खूप आनंद झाला

करुणाचे  बाबा : मला तुमच्या सारखी मानस मिळाली मी धन्य झालो....पण मुलाचे बाबा ....त्यांना नाही भेटलो आम्ही

अजित : डॅड जास्त करून बाहेर गावी असतात....त्यांना खुप कमी वेळ मिळतो.......त्यांना जसा वेळ मिळेल मी तुम्हाला भेटायला नक्की आणतो

कारुणाचे वडील: खुप छान बेटा.....ताई .....मला तुमचा मुलगा पसंत आहे.......(करूणा कडे बघत).....करुणाच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत होता....तिचे डोळे पाण्याने भरले.....तिने भरल्या डोळ्यांनी तिच्या बाबांना मिठी मारली.......मधु .....तुला काही बोलायचं का.....?????

मधू : नाही नाही.....मला सुद्धा मुलगा पसंत आहे.....आम्हला आमच्या मुलीवर पुर्ण विश्वासे....तिने अगदी योग्य केलं असेंन..... डोळ्याला पदर लावतच बोलते.......

अजितची आई उठुन करुणाच्या आईकडे जाते.....काळजी नका करू ....आता तुमच्या मुलीची जीमेदारी आमची.....मला मुलगी नाही....मी व्यवस्थित तिची काळजी घेईन.....करूणा बेटा...... इकडे ये.....

करूणा आनंदाने.......अजितच्या आईच्या जवळ जाते.....अजितची आई तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या कपाळावर ओठ टेकवते......मला पुर्ण विश्वास आहे तुझ्यावर...तु माझ्या अजितची माझ्या पेक्षा जास्त काळजी घेशील.....

करूणा : नक्की काकु......

कल्पना : काकु नाही .....आई म्हणायचं.....अजित पण मला आई म्हणुन हाक मारतो......

करूणा भरल्या डोळ्यांनी त्यांना पण इतही मारते....

कारुणाचे वडील : ताई ....आम्ही ही अशी साधी मानस....... आमचं जे काही आहे ते करुणाच आहे......मला जेवढं झेपेन तेवढं मी नक्की करेन

अजित आई : खरं सांगू देवाच्या कृपेने आमच्या कडे सगळं आहे .....फक्त एकाच गोष्टीची कमी आहे ते म्हणजे .....सुनेच्या रुपात एका मुलीची......ती पण अजितने पूर्ण.....केली.....तो आज माझ्या संस्कारावर खरा उतरला.....मला फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी एवढंच हवंय...अजुन काहीच नाही......

करुणाचे बाबा आणि आई खुश होतात.....

अजितची आई : अजित ते पॅकेट दे......(अजितची आई करुणाच्या आईच्या हातात मिठाईचा बॉक्स आणि काही गिफ्टस देते.....)पहिल्यांदा आलोय.....मनात पक्क ठरवुन आलेले तेच झालं....म्हणुन तोंड गोड करण्यासाठी ही मिठाई....आणि काही गिफ्टस......जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण ह्याना लग्नाच्या बेडीत अडकवू.......

मधू : नक्की ....आम्ही आमच्या ब्राम्हणाला विचारून ह्यांच्या साखरपुड्याची तारीख कळवते

कारुणाचे बाबा : हो हो....आणि ताई  तुम्ही आमची भेट अजितच्या बाबांबरोबर लवकर करून घ्या....त्यांना पण भेटुन होईन.......

अजितची आई : हो नक्की......त्यांना मी स्वतः घेऊन येईन.....आता निघु....पुन्हा लवकरच भेटु.......

सगळे एकमेकांना नमस्कार करतात....अजित करुणाच्या आई वडिलांचे पाया पडतो....करूणा सुद्धा अजितच्या आईला वाकुन नमस्कार करते....…आणि ते दोघे निघतात.....

@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते वीला......

अजित आणि त्याची आई घरी येतात

अजित : आई .....म्हणुन हाक मारतो.....आणि जोरात तिला मिठी मारतो....आई आज मी खुप खुश आहेस.....

आई :अरे वा बघू दे जरा चेहरा.....खुप खुश ना आता तु

अजित : खुप.... म्हणजे खुप.... आई तुला सांगु आज खरच जग जिंकल्या सारख वाटतय......मला जे हवं होतं....ते मिळालं.....मला....त्याच्यासाठी खुप खुप थॅंक्यु

आई : अरे यु वेलकम......बेटा......खर सांगु मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्या निवडी वर सुद्धा......

अजित : पण आई ....(काळजीत)

आई : मला माहित आहे तु काय विचार करतोयस ते......तुझ्या डॅड ला कस सांगायचं ते.....तुला सांगु ऐकशील माझं

अजित : हा बोलना.....

आई : तु तुझ्या डॅड ला काहीच सांगणार नाहीस.....

अजित : काय ......पण बाहेरुन कळालं तर....

आई : नही कळणार तुला ....तु फक्त माझं ऐक.... ठिके

अजित : ठिके......जस तु सांगशील तस......

@@@@@@@@@@@@@@@@

( रात्री मोहिते वीला मध्ये)

सगळे घरात जेवत असतात.....आज अजितचे डॅड सुद्धा काम  लवकर संपल्यामुळे लवकर घरी येतात......

मिस्टर मोहिते : अजित .....परवा U S वरून काही कलाइन्ट येणारे....आणि मी तुझ्या साठी एक पार्टी पण अरेंज केलीये......तु तयार आहेस ना......?????

अजित :हो हो....मी तयार आहे(आनंदात)


डॅड : अजुन एक मला तुला सरप्राईज पण द्यायचं आहे ते मी तुला त्या दिवशीच देईल

(कल्पना शक च्या नजरेने मोहितेना बघते....नक्की काहीतरी गडबड आहे ......एक तर ते मला पण सांगत नाहीये..... नक्की अजित बरोबर काहीतरी गेम खेळणारे

मोहिते सुद्धा एक किलर स्माईल कल्पनाला देतात 

डॅड :अजित तुला अजुन कोणाला इन्व्हाईट करायचं असें तर कर

अजित : डॅड मला माझ्या कॉलेज फ्रेंड्स ला बोलवायचं

डॅड : हा हा बोलावना.....तु तयार रहा....आणि हो मी तुझ्यासाठी एक स्पेशल सुट तयार केलाय.....तो एका बेस्ट डिझायनर ने तयार केलाय तो तु घाल..... ठिके

अजित : ठिके....... नो प्रॉब्लेम डॅड.......

सगळ्यांच जेवण झाल्यावर अजित ठरल्याप्रमाणे आपल्या पंटर गॅंग ला मोबाईल थ्रू इंविटेशन पाठवतो......आणि तो नेहमीच्या करूणा बरोबर चाट करतो.....

करूणा : अजित कॉल करू का......????

अजित : हा कर ना.....

थोडायच वेळात करूणा अजितला कॉल करते.....

अजित : बोला मॅडम.....आज झोप नाही येतं वाटत......

करूणा : हम्मम.....के करणार .....कशी झोप येणार....तूच सांग.....जी माझी हालत आहे तीच तुझी पण आहे .....बरोबर ना.....

अजित : हो .....आपल्या दोघांसाठी किती मोठा दिवस होता ना आजचा

करूणा : हो ना ....मला तर अजुन पण विश्वास होत नाहीये.....

अजित : हो मला पण

करूणा : ये तु तुझ्या डॅड बरोबर बोलास का नाही.....

अजितला आता काय बोलु नि काय नाय काहीच सुचत नाही

.....ते आई बोलणारे.....मी नाही....

करूणा : ओके..... जेवले सगळे.....?????

अजित : हो कधीच....आणि तुम्ही सगळे...

????

करुणा : हो आम्ही पण.....अजित .....ते तुझ्या पार्टी ला सगळे मोठे मोठे लोक येतील ना....???

अजित : हा .....त्यात काय झालं........

करूणा : ते मला सवई नाहीये....सो मला थोडं ....नर्व्हस फील होतंय

अजित : त्यात नर्व्हस होण्यासारख काये....आणि तु आज माही आली तर कस चालेन......तुला तर आता पासुनच सवई करायला पाहिजे....अशा कितीतरी पार्टी होत राहतात....तुला....हळु हळु होईल सवई.....डोन्ट वरी.....

करूणा :तु तर खुप बीझी होशील ना....तुला तर माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नसणार हो ना

अजित :अस कस....,तुला न बघुन कस चालेन......तुझा मेसेज नाही आला।ना तर चुकल्या सारख वाटत.... विचार कर जर तुला बघितलं नाहींतर कस होईल माझं

करूना :हो का....आता बस झाल......चल झोप आता....सकाळी परत ऑफिस ला जायचंय नाअजित :हम्मम्म.....ठिके आणि हो पार्टीला टायमावर ये ओके.....गुड नाईट......लव्ह यु

करूणा : हो नक्की .....

गुड नाईट .....लव्ह यु टु

(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife