Aug 06, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 41)

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 41)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 41

दोघे कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत होते.....सगळे मित्र त्या दोघांना घोळका घालुन मिठी मारतात......

मयुरेश : वा मित्रा वा......मानलं तुला आज....काय भारी प्रपोज केलंस तु आज.....

ध्रुवी : हो ना.....हे नव्हतं तु मला सांगितलं....

अजित : हे सगळ्यांसाठी सरप्राईज होत....म्हणुन नाही सांगितलं.....

संगिता : आज डबल पार्टी....

नंदु : झालं सुरू हीच....आता डबल च्या नावाखाली डबल जेवणार....(हळूच अभिषेकच्या कानात बोलतो....तसे दोघे तोंड दाबून हसतात)

संगिता : तु काही तरी बोलास वाटत.....

नंदु : मी कुठे काय....काही नाही

ध्रुवी : ये प्लिज हा ......आज भांडायच नाही ....आजचा दिवस किती छान आहे.....ना......

अभिषेक : तुम्ही सगळे गप्पा मारा....मी आणि ध्रुवी....स्नॅक्स ची सोय करतो

सगळे होकारार्थी मान हलवुन हॉलमध्ये बसतात.........अभिषेक आणि ध्रुवी.....मस्त वेफर्स आणि कोल्ड्रिंक्स स्नॅक्स म्हणुन आणतात

करूणा  तिची डायमंड रिंग बघत असते.....अजित हळूच तिच्या बाजूला येऊन बसतो....

अजित : काय झालं आवडली नाही का....

करूणा : खुप आवडली....पण एवढी महाग रिंग.....(काळजीत)

अजित : प्लिज आता तू माझ्या प्रेमाला पैशात नको मोडुस....ही रिंग मी माझ्या कमाई ने घेतलीये.....

करूणा : सॉरी परत नाही असं बोलणार(एक गोड स्माईल देत......(दोघे कितीतरी वेळ एकमेकांच्या डोळ्यात हरवुन गेलेले) समोर कोणी तरी स्नॅक्स घेऊन उभे आहे ह्याच व भान रहात नाही दोघांना

संगिता : (मुद्दाम खोकत) आता असेच एकमेकांना बघत रहाणारे का काही पोटाचा पण विचार करणारे(हसत)

संगीताच्या आवाजाने दोघे भानावर येतात......तसे सगळे त्या दोघांना हसतात....

ध्रुवी : ये काय ग संगिता.....उगाच डिस्टर्ब केलंस त्यांना....किती हरवुन गेलेले....एकमेकात....(हसत)

करूणा : करूणा लाजुन ......मान खाली घालते....आणि तिकडुन उठुन ती सरळ ध्रुवीच्या बेडरूम मध्ये जाते.....

अभिषेक : ये आज्या तु इकडे बसुन काय करतोयस.....जा जरा दोघे एकांतात गप्पा मारा....नाहीतरी आज पूर्ण रात्र आपल्याला जागेच रहायचंय

अजित सुद्धा एक घिड स्माईल देऊन करुणाच्या मागे जातो

करूणा एकटीच खिडकी जवळ उभी असते......अजित हळूच मागुन तिला मिठी मारतो.....

अजितच्या स्पर्शाने करुणाच्या अंगावर शहारे येतात....तीच हृदय जोरजोरात धडधडू लागत.....अजितचा स्पर्श तिला सुखद वाटतो.....

करूणा : अजित सोडना.....आपण दुसऱ्यांच्या घरी आहोत

अजित :हम्म माहिते मला.....पण घरात कोणी नाहीये......आणि इथे तर मुळातच कोणी  नाहीये.....

करूणा : अजित प्लिज...

अजित : अच्छा ठिके सोडतो....पण एका अटीवर....????

करूणा : अट आता कसली अट.....????

अजित : मी तुला एवढे छान छान सरप्राईज दिले त्यात तु मला रिटर्न गिफ्ट नाही दिलंस....

करुणाला त्याच्या बोलण्याचा अंदाजा येतो.....ती लाजुन तिचा चेहरा तिच्या हाताने लपवते......

अजित हळुच तिला त्याच्या दिशेने वळवतो.....तशी करूणा अजून लाजते.....

अजित हळुच करुणाच्या कानामध्ये बोलतो.....एवढं लाजुन कस चालणार.....मी तर माझं गिफ्ट घेतल्याशिवाय तुला जाऊन नाही देणार........

अजितच्या गरम स्पर्शाने तीच हृदय आता तिच्या ताब्यात नव्हतं.....करूणा हळुच तिचा हात काढते....आणि ती एक टक अजितच्या नजरेत हरवुन जाते......अजित सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये हरवुन जातो.....त्याचाच फायदा घेत करूणा तिकडुन पळुन जाण्याचा प्रयत्न करते......अजित मागुन तिचा हात पकडुन तिला जवळ खेचतो

तशी ती अजितच्या अंगावर धडकते...... अजित एक एक पाउल पूढे येतो तशी ती एक एक पाऊल मागे जाते.....मागे जाता जाता......ती भिंतीला आदळते.....आता इकडुन आपली काही सुटका नाही म्हणुन करूणा तिथेच तिची मान खाली घालुन उभी राहते......

अजित हळुच त्याचा हात तिच्या कंबरेला कंपाउंड सारखा विखळा घालतो......त्याच्या स्पर्शाने.....करूणा अगदी गरम होते........अजित त्याच्या एका हाताने तिच्या हनुवटीला हात लावुन तिचा चेहरा वर करतो......दोघे एकमेकांना एकटक बघत असतात.......अजित हळुच त्याचे ओठ करुणाच्या ओठांवर टेकवतो......त्या दोघांचे ओठ एकमेकात कितीतरी वेळ गुंतलेले असतात.....थोड्यावेळाने दोघे पण लांब होतात........करूणा लाजेने चुरचुर झालेली असते......

अजित : थॅंक्यु रिटर्न गिफ्ट साठी(मुद्दाम चिडवत)

करूणा अजुन लाजते.....आणि लाजतच त्याला मिठी मारते.......दोघे पण शांत पणे कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत असतात.....

करूणा : अजित.....

अजित: हम्म

करूणा : थॅंक्यु ह्या सगळ्या सरप्राईज साठी

अजित : यु मोस्ट वेलकम डार्लिंग......

करूणा : मला वाटलं तु विसरलास माझा बर्थड..... मी रात्रभर नीट झोपले सुध्दा नाही.....

अजित : सॉरी ....पण मला तुला सरप्राईज द्यायचं होत.....म्हणुन मी आणि ध्रुवी ने मिळून हा प्लॅन केला......

करूणा : थॅंक्यु वन्स अगेन....... अजित मला तुला काहीतरी सांगायचंय.....(खुश होत अजितचा हात तिच्या हातात घेते)

अजित : अरे वा बोलना....

करूणा : अजित कस सांगु मला ना कळतच नाही(मुदामून टेंशन देतच)

अजित : काय झालं ....घरी सगळं ठिकेना....(काळजीत)

करुणा : तेच तर अजित......घरी काहीच ठीक नाहिये....(मुद्दामून)

अजित :काय झालं ....नीट सांगशील का.......(तिच्या दोन्ही हाताना पकडतच)

करूणा : अजित  माझ्या घरी आपल्यादोघांबद्दल कळाल रे....

अजित : काय (शॉक होत) आय मिन कस काय

करूणाने घरी घडलेला सगळा प्रकार सांगितला......

अजित : मग बाबा आई  काही बोले तुला....म्हणजे घरच वातावरण कस आहे आता.......

करूणा : काय सांगु आता तुला.....माझ्या बाबांनी तुला भेटायला बोलावलंय(हसतच)

अजित : काय (शॉक होत)

करूणा : हो .....मला तर त्यांच्या बोलण्यावरून वाटत की त्यांचाआपल्या नात्याला काही विरोध नाही....

अजित : वाव.....thats ग्रेट......

करूणा  : मग तु कधी येतोस....

अजित : तु बोलीस तर मी आता येईन......(खुश होत)

करूणा : एवढी घाई नको करुस......उद्या जमेंका तुला

अजित : उद्या ठिके..... उद्या मी संध्याकाळी येतो....

करूणा खुश होतच त्याला मिठी मारते.....

करूणा : चल आता बाहेर जाऊया....सगळे वाट बघत असतीलना.......

दोघे पण थोड्यावेळाने बाहेर येतात.......

ध्रुवी : खुपच उशीर झाला ना......मला वाटलं उद्याच बाहेर येत की काय(मुदामून चिडवत)

करूणा : तु इकडे ये तुला बघतेच मी.......(आणि तिला मुदामून मारायला पळते)

नंदु : चला आता.......काही तरी गेम खेळुया........

सगळे होकारार्थी मान हलवतात.....

ध्रुवी : तुम्ही सगळे सुरू करा....मी अजुन थोडे स्नॅक्स आणते......

नंदु :  आन आन सांगिताला भुक लागली असेन

संगिता : तु अजुन सुधारला नाहीस.....मला वाटलं तु जरा तरी सुधरशील

नंदु : हहहहहह तुला बोल्याशिवाय मला करमत पण नाही.....

अभिषेक : काय रे नंदु तुला संगिता आवडते का(हळुच त्याच्या कानात बोलतो)

नंदु : ये काय पण काय ....आम्ही चांगले मित्र नाही बनु शकत का.....

अभिषेक : नाही रे तस नाही....तु सारखा सारखा तिच्या मागे लागलेला असतोस ना म्हणुन विचारलं.....

नंदु : ते सहज तिला चिडवण्यासाठी बोलतो

अभिषेक : अच्छा ठिके......

मयुरेश : काय खुसुरफुसुर चालीयेरे तुमच्या दोघांची......

अभिषेक : तुझं बर लक्ष आहे रे आमच्यावर

मयुरेश : किती वेळ झाला बघतोय....कोणी गेमच खेळत नाहीये म्हणुन लक्ष गेलं......

अजित : चला सगळे आपण गाण्यांच्या भेंड्या खेळुया.....

सगळे होकारार्थी मान हलवतात......

अजित : आपण दोन टीम बनवुया.....एका टीम मध्ये ध्रुवी ..अभिषेक....मयुरेश आणि करूणा

दुसऱ्या टीम मध्ये मी नंदु आणि संगिता .....

ठिके

हा चालेन.....तेवढ्यात ध्रुवी गरमा गरम चिकन चिली आणते.....

सगळे गाणं गात गात खाण्याचा आस्वाद घेत होते......

खुप वेळ गाण्यांच्या भेंड्या छान रंगल्या.....

संगिता : क्या बात हे अजित....आज तर तु फार छान छान गाणे गायलेस

मयुरेश : गाणारच ना......त्याची हिरोईन आज हा जे बोली त्याला.....

करूणा लाजेने ब्लश होते......

ध्रुवी : सगळे जण गाण्यामध्ये एवढे दंग झाले की कोणाला काही कळलंच नाही किती वाजले ते.....

सगळे एकत्र घड्याळाकडे बघतात.......

अभिषेक : अरे बापरे दोन वाजत आले.....आणि अजुन जेवलो पण नाही आपण

ध्रुवी : तेच तर बोलते......आता निदान जेवुन घेऊया का.....?????

सगळे एकत्र होकारार्थी मान हलवुन जेवायला बसतात.....थोड्याच वेळात सगळ्यांच जेवण आटपुन सगळे घर आवरायला घेतात......

मुलं बाहेरचा पसारा आवरतात.... आणि मुली किचनचा.........खुप मज्जा मस्ती केल्यामुळे सगळे खुप दमलेले असतात......

अजित : एक काम करा....तुम्ही सगळ्या मुली आत बेडरूम मध्ये झोपा.....आम्ही सगळे मुलं बाहेर हॉल मध्ये झोपतो.....

ध्रुवी : तुम्ही मुलं माझ्या आई बाबांच्या रुम मध्ये झोपलात तरी चालेल

नंदु : नको नको अजित बोलतोय ते बरोबरे....आम्ही बाहेर झोपतो......तेवढंच इकडच तिकडच गप्पा मारता येतात......

करूणा : अजुन गप्पा बाकीयेत तुमच्या.....?????(आश्चर्य होत बोलते)

मयुरेश : मग काय......तस कायेणा करूणा दोन तास तुमच्या लव्ह बर्ड मधेच गेला.....नंतर गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात.....म्हणुन आमचं बोलणं राहवुन गेलं

संगिता हात जोडत बोलते........धन्य तुम्ही रे......जाऊदे करूणा .....त्यांना झोपुदे.....हॉल मध्ये.......चला आपण जाऊ झोपायला......

सगळे एकमेकांना गुड नाईट बोलत झोपायला जातात.....अजित आणि करूणा एकमेकांना डोळ्याने खुनवतच बाय बोलतात

आज मात्र करुणाला काही झोप येत नसते....ती सारखी तिच्या हातात घातलेल्या रिंग कडे बघत असते.....आणि मनोमन खुश होते

संगिता : करूणा बेटा झोपा आता.......किती वेळ त्या रिंग कडे टक मक पहात रहाणार......सकाळी उठायचं नाही का लवकर......

ध्रुवी चादरीच्या आतुन हस्ते.....

करूणा : तु झोपणं.... मी झोपेन थोड्या वेळात

ध्रुवी : संगिता तु झोप बाळा ....आज काय राणीसारकरला झोप नाही येणार.... (चादरीच्या आतुन बोलते)

सगळे एकत्र हसतात.....आणि थोड्याच वेळात सगळे झोपतात.......

सकाळी जो तो लवकर उठुन..... अंघोळ..... नाश्ता करून आपआपल्या घरी निघतात

करूणा आज खुप खुश असते......कारण आज अजित तिच्या घरच्यांशी बोलायला येणार असतो........घरी जाताना ती तिच्या बोटातली रिंग काढुन बॅगे मध्ये ठेवते

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला

अजित सकाळी लवकर कामावर जातो.........पण त्याच कामात मन लागत नाही ....त्याच्या मनात सारखे विचार चालु असतात......करुणाच्या बाबांन बरोबर काय बोलु काय नको.....त्याच मन लागत नाही म्हणुन तो  त्याच्या आईला फोन करतो

कल्पना (आई ) : काय रे अजित काय झालं.....काही विसरलास का घरी.........

अजित : आई थोडं बोलायचं होत.....सकाळी उशीर होईल म्हणुन नाही बोलु शकलो

आई : हा बोलना

अजित : आई ते करुणाच्या घरी आमच्या दोघांच्या नात्या बद्दल सगळं कळलय ....तर तिच्या बाबांनी मला आज भेटायला बोलावलं

आई :मग तु काय विचार केलास.....?????

अजित : मी आज संध्याकाळी जातोय....पण मी विचार करतोय की तु पण चल माझ्या बरोबर

आई : अच्छा ठिके ना मी येते......किती वाजता येऊ......????

अजित :मी तुला घरातुन पीक करेन  तु सात वाजता रेडी रहा.....

आई : अच्छा ठिके....आणि हो एक लक्षात ठेव ....ह्या मधल तुझ्या डॅड ला  काहीच कळु देऊ नकोस

अजित :पण अस का.....????

आई :मी सांगते तेवढं ऐक माझं.......तुझ्या पेक्षा तुझ्या डॅड ला मी चांगलं ओळखते म्हणुन सांगते.....वेळ आली की मी नक्कीच सांगेन.....आणि करुणाला पण सांगु नकोस.....तिला सरप्राईज देऊ

अजित :ठिके आई .....ठेवतो

आई : हम्म

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

ठरल्याप्रमाणे संध्याकाळी अजित त्याच्या आईला पीक करतो....आणि ते दोघे करुणाच्या घरी निघतात

कल्पना (आई) : आज स्वारी खुप खुश दिसते.......तस असणारच .....सासुरवाडीला चालोय म्हंटल्यावर

अजित :काय आई तु पण....आणि हे काय घेतलं...एवढ सगळं.... अरे काही नाही.....करूणा साठीआणि तिच्या घरच्यांसाठी थोडं गिफ्ट घेतलं.....पाहिल्यांदा चालतोय ना....खाली हात बर नाही वाटत

अजित गोड स्माईल देतो

(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife