Feb 24, 2024
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 40)

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 40)

पार्ट 40

मोहितेंच्या घरी

अजित ने आज खास करुणाच्या वाढदिवसानिमित्त ऑफिस मधुन सुट्टी घेतलेली असते.....तो तिच्या साठी के गिफ्ट घेऊ ह्याच्या टेन्शन मध्ये असतो......

तो सकाळीच बाराच्या दरम्यान मॉल मध्ये जातो.....आणि करुणासाठी लाल रंगाचा लॉंग गाऊन घेतो....एक छान अस वाढदिवसाच हार्ट शेपच ग्रीटिंग कार्ड घेतो.....काही रेड रोसेस घेतो.....आणि तिला परत एकदा प्रपोज करण्यासाठी एक डायमंड ची रिंग घेतो....त्याच प्रमाणे सिलिकॉन चे रेड अँड व्हाईट बलूनस....आणि काही डेकोरेशन चे समान घेतो

ते सगळं घेऊन तो घरी येतो.......आणि त्याच्या आईला आज तो मित्रांसोबत त्यांच्या घरीच रहाणारे सांगतो......अजितची आई पण जास्त प्रश्न न विचारता त्याला होकार देते

अजित आधीच त्याचा मित्र अभिषेक ह्याच्यासोबत ध्रृवीच्या घरी जाऊन डेकोरेशन करणार होता..... त्या प्रमाणे तो पाच वाजताच पोहोचला

अजित : अरे वा संगिता तु कधी आलीस....?????

संगिता :अरे आताच आली तुमच्या पुढेच.....घरात बसुन पण कंटाळा आला......म्हंटल मी पण जाऊन तुम्हाला मदत करते....तेवढाच माझा वेळ जाईल......

अजित : बर केलंस...... आलीस.....लवकर लवकर होईल सगळं डेकोरेशन

ध्रुवी : क्या बात हे अजित ....आज तर तू जामच खुश दिसतोयस..... काय बात काये.....(हातात ज्युस घेऊन येतच बोलते)

अजित : ते मी तुम्हाला करुणाला सरप्राईज दिल्यावरच सांगेन.....ते नंदु आणि मयुरेश कधी येतायत

संगिता : ते दोघे एकत्र येणारे सात वाजता......ते त्यांना आता पोलीस स्टेशन देतील ना....तस पण त्या दोघांनी मुंबई साठीच अप्लाय केलं

अभिषेक : अरे वा....नंदु झाला तयार.....मुंबईसाठी

ध्रुवी   : हो ते त्याचे काका बोले म्हणुन तो तयार झाला......

अजित : चांगली गोष्ट आहे....(ए चलाना....लवकर लवकर तो ज्युस संपवा....आपल्याला उशीर नको व्हायला......)

अभिषेक : किती घाई रे तुला.....

अजित : तु कधी प्रेमात पड .....म्हणजे कळेन तुला

अभिषेक : नको नको ते प्रेम पुराण तुलाच शोभत.... मी बराय असाच(सगळे एकत्र हसतात)

आजीत आणि बाकीचे मित्र मंडळी त्याला डेकोरेशन साठी मदत करतात......पूर्ण एक दीड तासानंतर डेकोरेशन होत....अजित आणि त्याच्या मित्रांनी घराची पूर्ण सजावट केली......

ध्रृवी: अरे वा...आज तर माझं घर .....घर वाटतच नाहीये....वा अति सुंदर....

अभिषेक : आहे की नाही कमाल..... आमची.....ह्याला  ना टॅलेंट म्हणतात..... जी सगळ्यांकडे नसते......फक्त आणि फक्त  काही लोकातच आढळते(मुद्दाम चिडवत)

संगिता :  म्हणजे आम्ही माश्या मारत होतो का......(मुदामून रागातच)

अजित : ये ये ये .....जाऊदे सोड ना.....तुम्ही सगळे तयार व्हा ना.......फक्त अर्धा तासच आहे....ती येईल कधीपण

ध्रुवी : तुम्ही दोघे आईबाबांच्या रूम मध्ये जा.....मी आणि संगिता इकडे माझ्या रूम मध्ये जातो......

(सगळे मिळुन तयारीला जातात........ कमीतकमी दहा पंधरा मिनिटांतच सगळे तयार होतात.......)

अजितने आज मस्त ब्लॅक टीशर्ट आणि डार्क ब्लु जीन्स घातलेली असते......आज तर तो खुपच उजळुन दिसतो......

आजित : ध्रुवी केक आणुन ठेव ना बाहेर........तो परेनंतर मी कँडल लावतो....

(तेवढ्यात नंदु आणि मयुरेश येतात......)

मयुरेश : आम्ही पण काही मदत करू का.....जोरात ओरडतच.....

सगळे पळतच त्या दोघांना मिठी मारतात......

ध्रुवी : कसें आहात यार तुंही दोघे.....किती मिस केलं तुमच्या दोघांना......

नंदु : आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्याना खूप मिस केलं......

अजित : यार तुम्ही दोघे किती बारीक झालात.......

नंदु : अरे भावा ट्रेनिंग खुप हार्ड असते रे......सकाळी पाच लाच उठाव लागायचं...... अख्खा दिवस थकुन जायचो......

अभिषेक :  हो मी पाहिलंय पिक्चर मध्ये.....

अजित : आता इकडे आलेचे तर जिम वगैरे लावा.......

मयुरेश : अरे जिम कसली.....आल्यापासून नुसता डबल टीबल जेवतोय....... आता जाड व्ह्यायच बाकीये

अजित : ये अस नका करू....पोलीस आहात रे......तुम्ही.....सिंघम दिसले पाहिजे ना......

(तेवढ्यात संगिता हातात त्या दोघांसाठी ज्युस आणते)

संगिता : मला विसरलात ना.....

नंदु : तुला विसरून कस चालेल.... अजूनही ताशीचे..... फुगा(हसतच)

संगिता :झालं चालू तुझं.....तुला येऊन दहा दिवस पण नाही झाले....आणि तु मला परत चिडवायला लागलास.....(मुदामून रागवत)

नंदु : सॉरी......नाही चिडवत बस.....आता सांग काशिएस तु.......

संगिता : मी मस्त....किती बारीक झालास पण तू

नंदु : आता तुला सांगितलं बारीक हो तर तू नाही झालीस.....म्हणुन मीच झालो बारीक(मयुरेशला टाळी देतच बोलतो)

(संगिता पण हस्ते)

अजित : ये चला चला मी लपतो आता तुम्ही सगळे लाईट ऑफ करा.....ती येईलच आता......

सगळे एकमेकांना नजरेने खुनवुन लाईट ऑफ करतात.....अजित ध्रुवीच्या आई वडिलांच्या रूम मध्ये लपतो

(थोड्याच वेळात करूणा येते....पण सगळी कडे अंधार असल्याने तिला वाटत लाईट गेलीये......)

करूणा : ध्रुवी.......ध्रुवी......(आवाज देते)....अग लाईट गेलीये......ध्रुवीच्या घरात आरोम कँडल लावल्याने सर्वत्र सुगंधित सुहास पसरलेला......

करूणा  थोडी हॉल मध्ये चालत येते......तशा रंगीबेरंगी लाईट चालु होतात.......आणि जोरात एका फुग्याचा ......फुटण्याचा आवाज येतो.....त्या फुग्यातून लाल गुलाबांच्या पाकळ्या तिच्या अंगावर पडतात.....(तसे सगळे हॅप्पी बर्थडे टु यु बोलतच लाईट लावतात.....करूणा प्रत्येकाला बघून आणि घराचं डेकोरेशन बघुन खुश होते......

सगळे मिळुन तिला विश करतात.....टाळ्यांच्या आवाजाने घर अगदी आनंदमय झालेलं....नंदु आणि मयुरेश ला बघुन तीच्या डोळ्यात पाणी आलं

ती नंदु आणि मयुरेश ला भेटुन खुप खुश होते

करूणा : ध्रुवी किती छान सजवलं आहेस ग.....मला पहिल्यांदा कोणीतरी अस सरप्राईज दिलय....थॅंक्यु

ध्रुवी : हे सगळं मी एकटीने नाही तर सगळ्यानी मिळुन केलं.....थॅंक्यु मला एकटीला नाही तर सगळ्याना......बोल

करूणा : थॅंक्यु ऑल

अभिषेक : त्यात थॅंक्यु काय ....मित्र आहोत....तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो ना आम्ही....आणि आता तर  सगळेच कामात बीझी झाले..... त्यामुळे अश्या प्रसंगी भेटनार नाही तर कधी भेटणार....पण तू अशी स्याड का दिसतेस....

करूणा : अरे रात्री नीट झोप नाही झाली ना म्हणुन....(ध्रुवीला शांत बस असा इशारा करतच बोलते)

अजित हे सगळं बेडरूमधुन ऐकत असतो......

संगिता : चला मग आपण केक कापुया.......अजुन ........पार्टी पण एन्जॉय करायचिये.....

संगिता किचन मधुन केक आणते.....केक बघुन करूणा खुप खुश होते.....पण तरी पण तिला अजितची आठवण येत असते.....नाहीतरी आज दिवसभर त्याने तिला ना मॅसेज ना कॉल केला

मयुरेश : चल आता लवकर काप केलं.....केक ला बघुन अजुन तोंडाला पाणी सुटल माझ्या

संगिता :काप लवकर बाई एकदाचा तो केक....नाहीतर हाच कापेन(हसतच बोलते) आणि सगळे तिच्या आजूबाजूला घोळका करतात

करूणा केक कापायला जाणार तोच तिला  त्या घोळक्याच्या मागुन आवाज येतो

अजित : माझ्या बिना केक कापणार.....

करुणाचा केक कापणारा हात तिथेच थांबतो....आणि ती कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघते......सगळे मित्र एक एक करून लांब होतात

अजितला समोर बघून तर आधी तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.....तिची हृदयाची धडधड.....चालु होते.....तिच्या दोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.....ती तिथेच उभी राहवुन अजितला एक टक बघते.....तिच्या डोळयातून आनंदाश्रू वघळवत होते

अजित :काय झालं.....अशी काय बघतेस......मी अजितच आहे

करूणा तिच्या जागेवरून उठते......ती हळुहळु एक एक पाऊल त्याच्या जवळ येते......

अजित : (तिच्या गालावरून हात फिरवत).......काय झालं....विश्वास नाहीये अजुन........

करूणा  जोरात त्याला मिठी मारते.....आणि जोरजोरात रडते.....सगळे आश्चर्य चकित होउन बघतात......

अजित ला पण थोडं चुकल्या सारख फील होत

अजित : अग अशी काय रडतेस...आज तुझा वाढदिवस आणि त्यात तु .....

करूणा रडायची थांबते.......आणि एक टक त्याच्या कडे बघते....

अजित : हॅप्पी बर्थडे माय लव्ह.......

करूणा : (रडतच)कसला बर्थडे ....सकाळ पासुन एक मेसेज नाही तर एक कॉल नाही.....किती वाट बघितकी ....मी....मला वाटलं तु विसरलास.....माझा बर्थडे.......किती अस्वस्थ झालेले मी......

अजित : अग मला सरप्राईज द्यायचं होत तुला........म्हणुन तर असा वागलो मी

करुणा : हे सरप्राईज ......अस कसल सरप्राईज....... काळजी वाटत हाती रे.....मन पण नाराज झाल माझं......

अजित : (कानाला हात लावतच) सॉरी ....परत नाही असं वागणार.............माफ कर मला(हसत)

करूणा परत त्याला मिठी मारते

आजीत : आता केक कापुया....पण त्या आधी तुला मी आणलेला हा ड्रेस घालावा लागेन......

करूणा : ड्रेस....कोणता....?????

अजित : थांब आणतो.....(अजित रूम मधून तिला गिफ्ट रॅप केलेला बॉक्स आणुन देतो....)तु हा ड्रेस घालुन केक कट करायचा

करूणा : तु हे कधी आणलस.......

अजित : ते सगळं सोड तु.....तु फक्त हा ड्रेस घालुन ये....

करूणा न काही बोलता....कपडे चेंज करायला जाते.........

थोड्याच वेळाने करूणा कपडे चेंज करून बाहेर येते

करुणाला त्याने दिलेल्या ड्रेस मध्ये बघुन अजित एकटक तिला बघत होता...

संगिता : आता तिला असाच बघत रहाणारेस....का काही बोलणार पण (संगीताचा आवाज एकुण अजित भानावर येतो)

सगळे मित्र एकमेकांना टाळी देत अजितवर हसतात

करूणा : चला आता केक कापुया.....उगाच उशीर नको व्हायला

सगळे एकत्र केक कापायला जातात.......

करूणा केक कापते.......अभिषेक फुगा फोडतो...तसे सगळे हॅप्पी बर्थड टु यु बोलत टाळ्या वाजवतात.......

करूणा सगळ्याना केक भरवते.....ती जशी अजित कडे वळते तो तिला थांबवतो

अजित : केक भरवायच्या आधी अजुन एक सरप्राईज आहे

करूणा एकटक  त्याच्याकडे बघते.....

अजित त्याचा हातात गुलाबाचा गुच्छा घेऊन .....खाली गुडघ्यावर बसतो.....आणी त्याच्या खिशातुन एक डायमंड रिंग बाहेर काढतो

अजित : करूणा.....तु पहिली मुलगी आहेस जिला मी पहिल्यांदा कॉलेज मध्ये पहिल्यांदा पाहिलं.....आणि तिच्या प्रेमात पडलो....मला माहीत नाही प्रेम म्हणजे नक्की काय....पण नकळत मी तुझ्यात ओढल्या जात होतो......मी तेव्हाच ठरवलं......माझ्या आयुष्यात हिच्या शिवाय मी दुसर कुणालाच स्थान नाही देणार.....तु हसलीस.....तर मला आनंद व्हायचा....तु रडलीस तर मला दुःख व्हायचं..... मी नकळत का होईना पण तुझ्यात गुंतत गेलो.......आणि आज मी तुला रडवल त्या बद्दल सॉरी......मला तुला आज इकडे सगळ्यांसमोर एक गोष्ट विचारायचिये.....(अजित रिंग पुढे करत)

करूणा विल यु म्यारी मी.........माझ्या घरी मला तुला माझी मिसेस बनवुन न्हयायच आहे.....तु साथ देशील मला

सगळे मित्र एकमेकांना बघुन खुश होतात......

करुणाच्या तोंडातुन एक शब्द बाहेर पडत नव्हता......तिला समोर जे घडतंय त्यावर विश्वास बसत नव्हता....तिच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा सुरू होत्या

अजित : करूणा तु माझी होशील का.....?????

करूणा : तिचा थरथर ता हात पुढे करत ......बोलते......येस .....(मी तुझीच होणार)आणि ती रिंग हातात घालते....दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात....करूणा हुंदके देऊन देऊन रडत होती........आज सगळे मित्र सुद्धा रडत होते....आणि आनंदाने टाळ्या वाजवत होते.....

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife

//