Aug 06, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा) पार्ट 38

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा) पार्ट 38
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 38

दुसऱ्या दिवशी मोहितेंच्या सांगण्यावरून रॉबिन त्यांच्या ऑफिस मध्ये येतात

रॉबिन : बोलो मिस्टर मोहिते......इतना सुबे सुबे बुला लिया.....????

मोहिते : कल अजित ने बोला की उसके फ्रेंड्स आ रहे हे जिनके वजह से उसने पार्टी कॅन्सल की थी....सो में सोच रहा हु......की आफ्टर फिफ्टीन डेज के बाद पार्टी अरेंज करके.....उसे इन्ट्रोडुज करू

रॉबिन : मोहिते साब आप शायद भुल रहे हो आपको ओर भी काम करणा हे.....

मोहिते : नही में भुला नही....में चाहता हु की मी अजित को सरप्राईज दु

रॉबिन : आपको लगता हे वो खुश हो जायेगा आपके सरप्राईज से.....????.?

मोहिते : रॉबिन अजित ने आजतक मेरी बात नही टाली.... सो मुझे नही लगता वो नाराज होगा....

रॉबिन :मुझे लगता हे तुम्हे उसे सारी सचाई बता देणी चाहीये.....वरना प्रॉब्लेम हो सक्ती हे.....(काळजीत)

मोहिते : वो तुम मुझपे छोड दो...... में हँडल कर लुंगा.....

रॉबिन : ठिके ऑल राईट.....में निकलता हु....मुझे काम हे ....

(दोघे एकमेकांना मिठी मारून आपआपल्या कामाला निघतात)

@@@@@@@@@@@@@@@@@@@

पंटर  ग्रुप

ग्रुपवर नंदु पोलिसांचा युनिफॉर्म घालुन फोटो टाकतो सेम मयुरेश सुद्धा करतो......

अभिषेक : आज आमच्या मित्रावर आम्हाला गर्व वाटतो यार....

संगिता : खुप छान दिसतात तुम्ही दोघे.....तुमच्या दोघांना सॅल्युट आपल्या पंटर गॅंग कडुन.....

नंदु : आम्ही घरी आलो ना मग आपण परत पार्टी करूया......खुप दिवसांनी भेटतोय ना आपण परत म्हणुन

करूणा : मी तर केव्हाची वाट बघते

ध्रुवी : तु नंदु आणि मयुरेशची वाट बघतेस का अजितला भेटायला मिळेल ह्याची वाट बघतेस(मुद्दाम चिडवत)

करूणा : तु भेट मला मग सांगते मी(मुद्दाम रागवत)

अभिषेक : झाल्या सुरू इकडे.......

ध्रुवी : तुला काय प्रॉब्लेम अभि....हे ह्या रिचाने ग्रुप का सोडला काल

संगिता : अरे हो ....तेच ना....अचानक लेफ्ट झाली.....अजित काही भांडण केलंस का तिच्या बरोबर....नाही म्हणजे ती तुमचीच फॅमिली फ्रेंड आहे ना म्हणून विचारलं

अजित : नाही ग ....तस माझं आणि तीच जास्त बोलणं नाहीच होत ते सोड आता गेली ना ती जाऊदे.....हे गाईझ....मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायचीये

मयुरेश : लग्न वगैरे ठरलं का काय तुझं आणि करुणाच....???

अजित : ते जर झालं असत तर अस ग्रुप वर नसत सांगितलं...... पार्टी दिली असती......

मयुरेश : हम्म बरोबरे

करूणा : मयुरेश तुला किती काळजी रे माझी.....आमचं ठरलं ना की सर्वात आधी तुला सांगेन मग तर खुश  ना....

सगळे एकत्र हसतात

अजित : अरे एकुण तर घ्या आधी माझं.... नंदु आणि मयुरेश आल्यावर माझ्या डॅड ने मला ऑफिस मध्ये इन्ट्रोडुज करायचं ठरवलं आहे.....

नंदु : पण तु तर त्यांचा मुलगा आहेस मग तु डायरेक्ट नाही लागु शकत का कामाला.....

अजित : नाही तस नाही चालत ना प्रत्येक गोष्टीला एक पोस्ट दिलेली असतर... ह्या इंडस्ट्रीत प्रत्येकाला इन्ट्रोडुज केलं जातं.....

ध्रुवी : मग तु कोणत्या पोस्ट वर आहेस

अजित : मी आर्ट डायरेक्टर म्हणुन असणार.....

संगिता : वा मस्त रे.....मग तर पार्टी ना

अजित : हो तेच तर सांगतोय... नंदु आणि मयुरेश आला की पार्टी ठेवणारे डॅड.....

अभिषेक :मस्त यार ......आम्ही सगळे येणार......छान एन्जॉय करू.....करूणा उद्या तुझा कोर्स संपतोय ना

करूणा : हो .....लास्ट दे उद्या

अभिषेक : नंतर काय करायचं ठरवलं

करूणा : बाबांच्या दुकानावर जाऊन त्यांना हेल्प करणार....मी माझ्या पद्धतीने साड्या डिझाइन करणार....आणि त्या मार्केट मध्ये उतरवणार.....

नंदु : मस्त आयडिया आहे....तु वाटलं तर अजितची मदत पण  घेऊ शकतेस......

करूणा : हो हो नक्की....त्याला जास्त नॉलेज आहे....मी नक्की त्याची मदत घेईल

अजित :तुमच्या दोघांचं pop (  Passing out parade)   असणार ना नंदु आणि मयुरेश.....????.

नंदु : हो दोन तास असणारे......

मयुरेश : घरचे येणारे सगळे.......लास्ट दिवशी त्यांच्या सोबतच आम्ही येऊ सगळे......

ध्रुवी :किती छान ना......आई वडील येणार त्यांना तर आनंदाने भरून येईन........ मी तर रडलेच असते.....एवढा सुंदर दिवस बघुन

नंदु : आज माझे बाबा असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता माझा.....

करूणा : ते तर आता व तुझ्या सोबत आहेत नंदु.....त्यांचा आशीर्वाद तुझ्या सोबत नेहमी आहे....म्हणुन तु इथं परेनंतर पोहोचलास......

नंदु : ते पण बरोबरे.....जाऊदे नको तो विषय....माझ्या बोलावण्याने ते येणार थोडी..... पण ते नेहमी माझ्या सोबत असतात.....ह्याच फिलिंग होत मला

करूणा : गुड बॉय......आम्ही सगळे तुमच्या दोघांची वाट बघतोय ....लवकर या......

नंदु आणि मयुरेश : नक्की.....

सगळे एकमेकांना बाय बोलुन आप आपल्या कामाला लागतात.....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

असेच दिवस निघुन जातात.......नंदु (नाशिक)आणि मयुरेशची(नागपुर) फॅमिली त्यांच्या pop(Passing out parade)ला पोहोचतात.....साधारण 2 तासाची परेड असते....तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक फॅमिली ला त्यांच्या मुलांवर अभिमान असतो......ह्या मध्ये मुली पण मागे नसतात.....आज मुलींना खाकी वर्दीत पाहुन प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते......आपले मुलं आज देशासाठी स्वाधीन केले.....आपल्या देशासाठी त्याचा त्यांना गर्व होता......

प्रत्येक आई वडील आप आपल्या मुलांना परेड करताना बघुन चकित व्हायचे.....नंदुची आई डोळ्याला पदर लावुन मुलाला डोळे भरून बघत असते....आज नंदुच्या काका काकीला त्यांनी त्याच्यावर केलेल्या संस्काराचा अभिमान वाटत असतो......मयुरेशची फॅमिली सगळी नागपूरला पोहोचते.... त्याच्या बहिणी आणि आणि आई वडिलांना सुद्धा आज त्याच्यावर अभिमान असतो.....परेड ग्राउंड वर मुलींचा ग्रुप आणि मुलांचा ग्रुप वेगवेगळा असतो........मुली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची गर्जना होत होती.....भारत माता की जय ह्या आवाजाने आकाश गजबजून आलेलं...... सगळ्यांच्या आवाजात आपल्या भारता बद्दल चा आदर ...... प्रेम दिसुन येत होता........प्रत्येक मुलांनी आपल्या भारतमातेला सॅल्युट करून आपआपला परेड संपवला.....

नंदु त्याच्या आई काका काकीसमोर जाऊन उभा रहायला.... त्याने सर्वात आधी सगळ्यांना सॅल्युट केलं ....

काकाच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते.....काकी आणि आई खूपच हळव्या झाल्या.....काकाने नंदुला घट्ट मिठी मारली......आज त्यांच्या मेहनतीला फळ आलं......दोघे पण खुप वेळ एकमेकांच्या मिठीत होते.....नंतर नंदुने त्याच्या आई आणि काकीला मिठी मारली........त्या दोघी खुप रडल्या..... त्यांच्या मुलाचं आज स्वप्न साक्षात साकार झालं......

नंदु : काका थंक्यु इथपर्यंत साथ दिल्याबद्दल......

काका : हे माझं नाही तुच्या मेहनतीचं फळ आहे रे.........ज्याचा आम्हा सगळ्याना अभिमान आहे.....काका त्याच्या वर्दीवरून हात फिरवतात.....

आई : भावोजी बघाना आपला नंदु आता मोठा माणुस झालाना....वर्दी किती छान शोभून दिसते तुझ्यावर....

काकी : हो ना.....मिशा बघा ह्याच्या ......आज दादा समोर उभे आहेत असाच दिसतोय नंदु आपला......

काका : हम्म.....चला आता निघुया आपण.......घरी पोहोचायचं .....सगळे वाट बघतायत.....आपली.....

@@@@@@@@@@@@@@@@@@

मयुरेश त्याच्या घरच्यांपुढे उभा रहातो

मयुरेश : पपा  आता आपण दोघे सेम टु सेम झालो

पपा : नाव काढलस तु आज आमचं.....खुप छान दिसतोयस.....

मयुरेश ची आई सारखी एकटक त्याच्याकडे बघत होती......

मयुरेश : मम्मी बघुन झालं असें तर काही बोलशील का अशीच उभी रहणारेस

मम्मी: (त्याच्या डोक्यावरून हात फिरवून कडाकड तिचे बोट मोडुन त्याची दृष्ट काढते)छान दिसतोयस

माझ्या गणपती बाप्पा ने ऐकलं माझं.....आता काही नको मला.....जीवनाचं सार्थ झालं माझ्या......

सगळे आनंदाने घरी निघतात....मयुरेश आणि नंदु त्यांच्या अकॅडमी मधल्या मित्रांना बाय बोलुन त्यांचा निरोप घेतात आणि परत आपापल्या घरी येतात....नंदु आणि मयुरेशची आई त्यांना ओवाळून आत घेतात.....

@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी करुणाच्या घरी.....

मधु :(आई ): मी काय बोलते.....तुम्ही एकदा करूणा बरोबर बोलायला पाहिजे......

दत्तात्रय(बाबा ): कशाबद्दल......?????

आई : तीच आणि त्या मुलाबद्दल.....(काळजीत)

बाबा : पण ती स्वतःहुन सांगेनच आपल्याला......

आई : आपण तिची वाट का बघायची पण.....आपण आई वडील आहोत तिचे तुम्ही एकदा तिला विश्वासात घेऊन विचारांना.... आता तीच शिक्षण पण पूर्ण झालंय.....अजुन एक दोन वर्षात तिचं लग्नाचं काय ते ठरवावं लागेन आपल्याला....... जर तीच आणि त्या मुलाचं खरच काही असें तर त्याची चौकशी करा.....बघा नीट सगळं.......

बाबा : आज बोलु का......ती आज घरात पण आहे.....

आई : आज बोलुन बघा.....उद्या माहितेना काये ते....???

बाबा : कसा विसरेंन मी.....माझ्या परीचा बर्थडे आहे उद्या....

आई : म्हणुन बोलते आज विचारा काय ते

बाबा : कुठे ती....

आई : आत तिच्या खोली मध्ये

करुणाचे बाबा तिचा रूम मध्ये जातात....त्यांच्या मागोमाग मधु सुद्धा येते

बाबा : करूणा काय करतेस बेटा....

करूणा : काही नाही बाबा.....काही डिझाइनस बनवत होते..... मला उद्या क्लास मध्ये दाखवायच्या आहेत....या ना बसा ....काही काम होत का

बाबा : काही नाही...सहज आलेलो......

तेव्हड्यात मधू त्यांना नजरेनेच खुनावते(बोला म्हणुन)

आई : खुप बीझी नशील तर बोलायचं होत.... बाबांना....

करूणा : हा बोलाना....तुम्ही दोघे एवढे टेंशन मध्ये का दिसतायत...

बाबा : बेटा .....काही नाही ग.....सहजच....... थोडं बोलायचं आहे....

करूणा : हा बोला......

बाबा : बेटा तुझी आई बोलते की तिने तुला मागे कधीतरी एका मुलाबरोबर पाहिलेलं...... राधाकृष्ण मंदिरात

बाबांच्या अशा बोलण्याने करूणा शॉक होते....तिला काय बोलु नि काय नाय काहीच समजत नाही.....

बाबा :हे बघ आम्ही तुला ओरडायला किंवा तुझ्यावर नाराज होऊन नाही आलो.......हे बघ कसय ना बेटा आता तुझ कलास पण संपलाय तुझं शिक्षण पण पुर्ण झालंय..... तु आता माझ्या बरोबरच काम करणारेस...त्यात काही हरकत नाही..... पण समजा...आज ना उद्या तुला लग्न करायचं आहे.....मग तुझ्यासाठी आम्हाला मुलं शोधावी लागेन.....म्हणुन सहजच विचारलं तुझं अस काही बाहेर असेंन तर सांग....आम्हाला काही हस्तक्षेप नाहीये त्यात

करूणा : ,(हळु आवाजातच)सॉरी बाबा.....

बाबा :  सॉरी कशाबद्दल.....,

करूणा : (घाबरतच)माझं एका मुलावर प्रेम आहे ....

आई : बघा मी बोलले ना ......खरं निघालं ना ते.....

तुम्हाला तर कधीच विश्वास नसतो माझ्यावर

बाबा : एक मिनिट.... अग मला बोलु तरी दे......घाबरू नकोस.....कोण आहे तो....जरा नीट सांगशील तर बरं वाटेनं.......(हलकं हसतच विचारतात)

करूणा :(थोडी चाचरतच) बाबा तो फॅशन डिझायनर चा मुलगा आहे.....मिस्टर मोहिते आहेत ना.....(runway fashion show) चे मालक......त्यांचा मुलगा आहे

आई तर तोंडावर हातच ठेवते....

आई :अग ते कुठे आपण कुठे....काही अंतर आहे की नाही आपल्यात आणि त्यांच्यात(काळजीने)

करूणा :त्याला फरक नाही पडत ह्या गोष्टीने.......आई

आई :म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही दोघांनी.....(काळजीत)

करूणा : तु समजतेस तस नाहीये आई....तो खुप चांगला मुलगा आहे ....

बाबा : एक मिनिट.... तुम्ही दोघी आधी शांत बसा.....मधु मला बोलुदेशील आधी.......हे बघ बेटा....त्यांचं नाव मी ऐकलय..... खुप मोठी माणसं ती......अग टीव्ही वर पण दिसतात ती......सगळी.....तुम्ही कस सगळं जमुन आनल हे सगळं......

करूणा : बाबा अजित नाव आहे त्याच.....तो आमच्या कॉलेज मध्ये होता.....लास्ट इअर ला....तिकडेच ओळख झाली आमची पहिल्यांदा.......त्याने दोन वर्षे बाहेर गावी शिक्षण केलं.... फक्त लास्ट इयर तो आमच्या कॉलेजला होता.....मी त्याच्या घरी पण जाऊन आले......त्याची आई लन खुप चांगलीये

बाबा : ठिके हे सगळं....पण त्याला आपल्या परिस्थिती चा अंदाजा आहे ना.....म्हणजे आपण त्यांच्यात बसत पण नाही....ते खुप मोठी माणसं झाली.....आपण कुठे ते कुठे....

करुणा : बाबा त्याला खरच काहीच फरक नाही पडत ह्या गोष्टींचा.... तो खुप वेगळा आहे.....तो पैसा.... प्रॉपर्टी हे सगळं नाही बघत....

बाबा : त्याच्या घरी माहिते का......सगळ्यांना

कारुणा : मला नाही माहीत....पण तो लवकरच कळवेन .....

बाबा : मग एक काम कर.....त्याला भेटायला बोलावशील आपल्या घरी

करूणा : (ओरडत)काय.....???

बाबा :हा मला बघु तरी दे त्या मुलाला .....

करूणा :म्हण्जे.... तुम्ही माझ्यावर रागावला नाहीत...

बाबा : रागावलो असतो तर एवढ्या हळु आवाजात बोलो असतोका.....

मधू : आहो तुम्ही काय बोलतायत

बाबा :मी तेच बोलतोय जे मला योग्य वाटतंय..... करूणा बेटा तु कधी बोलावशील.....

करूणा : बाबा तो ऑफिस ला जातो आता .....त्याला विचारावं लागेन मला.......

बाबा : ठिके  बघ कधी टाईम आहे त्याला ते......मग कळव मला....

करूणा आनंदाने तिच्या बाबांना मिठी मारते

(काय मग कसा वाटला आजचा भाग .....नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife