Aug 05, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 37

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 37
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 37

अजित त्याच्या डॅड चा विचार करत......झोपतो....पण त्याला झोप काही येत नाही....तो पण एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत असतो.....ही गोष्ट कल्पना (अजितच्या आईला)माहीत असते....त्यामुळेच ती त्याचा रूम थोड्या वेळाने येते

कल्पना : काय झालं झोप नाही येत......

आईच अस अचानक पणे येणं अजितला बर वाटत......त्याचा चेहरा.....विरूद्ध दिशेला असल्यामुळे त्याला त्याची आई आलीये हे माहीत नव्हतं....अजित चटकन उठुन बसतो

अजित : ये ना आई.....काय झालं

आई :  काही नाही मला वाटलं....माझ्या अजितला माझी कदाचीत आता गरज आहे....पण तो काही मला बोलणार नाही ....."म्हणुन मीच आले.....चांगलं केलं ना मी

आईच बोलुन झाल्यावर अजित थोडा हळवा होऊन त्याच्या आईला मिठी मारतो.....अजितच्या मिठी मध्ये त्याच मन दुखलय हे कल्पना जाणते.....त्याच्या केसांवरून हळुच हात फिरवते

आई : काय झालं......अजित....काही टेन्शन...???

अजित : आई मी प्रेम करून चुकी केली का.....????(हलक्या स्वरात)

आई : का रे.....अस का बोलतोस.......काय झालं...ये इकडे बस बेड वर.....मी बोलते ना बस इकडे......(अजित आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपतो)

बोल काय झालं.....

अजित : म्हणजे प्रेम पैसे ....श्रीमंती बघुन करायचं असत का....???

आई : नाही तर.......बाळा.....

अजित : मग माझं काही चुकल का......?????मी जिच्यावर प्रेम केलं ती श्रीमंत नाहीये.....पण मनाने खुप श्रीमंत आहे....खूप हळवी आहे ग ती.....तिच्या ना मनात अस काहीच नाही.....तिने पण डोळे झाकुन माझ्यावर प्रेम केल

आई : एक एक मिनिट..... जरा श्वास तर घे......हे घे पाणी......,(तिथेच टेबलावर असलेलं पाणी देते)

हम्मम....तर हा तुझा प्रॉब्लेम आहे.....एक सांगु तुला....माझं ऐकशील.....

अजित मानेनेच होकार देतो

आई :प्रेम ना कधी पैसे.... श्रीमंती....त्याचा गर्व पणा हे सगळं नाही बघत..... ते आपोआप होऊन जातं.....आपल्याला ला जी व्यक्ती आवडते ना....तिच्या नकळत आपण तिच्याकडे खेचले जातो......मग ती कोणी पण असो......गरीब असो नाहीतर श्रीमंत असो.....प्रत्येकाला आपला जोडीदार निवडायचा हक्क असतो.....जो तुला पण आहे.....तु हा सगळा विचार नको करुस......तुला जर पैसा इम्पोरटंट  असता तर तु करुणाला नाही रिचाला पसंत केलं असत.......हो ना.....तु खर प्रेम केलंस....तुना तुझं मन जे बोलत ते आईक..... दुनियेच सोड.....लोक काय आज बोलतील.....उद्या बोलतील....नंतर स्वतःच शांत होतील......तुला जे वाटत ते कर......बाकी सगळं माझ्यावर सोड.....(हसतच)

अजित : थंक्यु आई .....तु सांगितलं म्हणुन कळलं ....नाहीतर आता परेनंतर मला समजलंच नसत....काय चुक काय बरोबर......

आई : तु स्वतःला कधीच ऐकट नको समजूस मी आहे सोबत तुझ्या.....(आता झोप येईना तुला....)ये झोप.....इकडे मी डोक्याला तेल लावुन देते

अजित बेड वर झोपतो....त्याची आई त्याला मालिश करून देते....त्यामुळे त्यालाच कळत नाही की त्याला कधी झोप लागते ते

@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी.......करुणाच्या घरी (सकाळी)

मधु (करुणाची आई) : आहो ऐकता का.....????

दत्तात्रय (बाबा )पेपर वाचत असतात : हम्मम.....बोल

करूणा : आता करुणाची परीक्षा संपली......(काळजीत)

बाबा : हम्मम.....मग......

आई : तुम्ही बोलेला......की तिची परीक्षा झाल्यावर तिला सगळं खरं खर सांगणार ते

बाबा: हम्म

आई : "तुम्ही मला उत्तर का देत नाहीये

बाबा :( पेपर बाजुला ठेवत) काय ऊत्तर देऊ....तुच सांग मला.....बोल....बोल ना आता......कोणत्या तोंडाने तिला तीच खर सांगु....... तुला ती आपल्या पासुन दूर जाईल ह्याची भीती नाही वाटत का....???

आई : म्हणुन खर सांगा बोलतेनं मी.....तिला उद्या बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगितलं....तर तिचा विश्वास बसेन आपल्यावर..... नाही तर आपली मुलगी आपल्यापासून दुर जाईल ओ

बाबा : नाही जाणार.....तिला आपण मोठं केलंय...... काहीच होणार नाही तु उगाच टेन्शन घेतेस.....आणि मला पण देतेस(थोडे चिडचिड करतच)

मधु : तस नाही ओ....उद्या कुणा दुसऱ्यांकडून काळण्यापेक्षा आपण सांगितले ल बर....म्हणुन काळजी वाटते.....दुसरे सांगताना चुकीचा अर्थ लागला तर ती लांब होईल आपल्या पासुन..... काळजी वाटते....माझ्या मुलीची

बाबा : हे बर आहे तुझं.....एक तर मुलगी पण बोलतेस आणि काळजी पण करतेस.....तु काळजी नको करुस....करूणा आपली मुलगी आहे......तिला खरं कळाल तरी काही फरक नाही पडणार........आपले संस्कारच आहे तसे.....

मधु : ठिके.....तुम्ही बोलतायत म्हणुन शांत बसते....ह्यापुढे मी विषय नाही काढणार.....पण मला अजुन एक गोष्ट सांगायचीये..... शांत पणे ऐकत असतील तर सांगते....आणि रागवायच पण नाही

बाबा : आधी स्वतःच राग आणुन देते....आणि नंतर स्वतःच.....

आई : झालं परत सुरू....

बाबा : हा बोल.....

आई : आपली करूणा मला वाटत कुणाच्या तरी प्रेमात पडलीये

बाबा :काय.....काही पण.......करूणा अस नाहीच करू शकत

आई : मला वाटलेलंच ....नाही पटणार तुम्हाला.....पण सांगुन ठेवते....उद्या परत मला बोलाल......मी स्वतः तिला पहिल आहे....आणि मी ओळखते त्याला

बाबा :काय ?????.....मग तु हे मला आज सांगतेस.....माझ्या बिना परमिशन पण दिलीस

आई : जरा एकुण तर घ्या माझं......

बाबा : आता काय ऐकायचं बाकी रहायल का

आई : जरा शांत पणे ऐकना माझं .....बोलुन पण देत नाही

बाबा : हा बोल....

मधु सगळं स्टारटिंग पासुन घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगते.....

बाबा : ठिके.....मी ऐकलं तुझं....पण तुला काय वाटतं......ह्या बद्दल

आई : मला त्या मुलामध्ये काहीच खोट वाटत नाही....खुप चांगला घरातला आहे.....मला मान्य आहे त्याची बराबरी होऊ शकत नाही पण बघुना पुढचं पुढे....

बाबा : तु बोलतेस ते योग्य आहे....पण आपल्याला पण करुणाला विचारावं लागेना ह्या गोष्टी

आई : तुम्हाला काय वाटत ती आपल्याला सांगणार नाही का......आवो ती स्वतः येईल सांगायला.....आपल्या मुलीवर तेवढा विश्वास आहे आपल्याला.......

बाबा : ठिके ....मग आपण नको हा विषय काढायला....तिला वाटेनं तेव्हा ती स्वतःहुन सांगेन आपल्याला

आई  : हम्म.....

बाबा :पण ते दोघे भेटत पण असतीलना.......

आई : जास्त नाही.....वाटत.....कारण हीचे कलासेस चालु आहे.....मग हिला कुठे  एवढा वेळ

बाबा : हम्म....

आई : त्या मुलाच्या सांगण्यावरून तर हिने हे कलासेस लावलेत....

बाबा : काय.....

आई : हम्मम

तेवढ्यात करूणा उठते

करूणा : गुड मॉर्निंग बाबा.... आई

बाबा : गुड मॉर्निंग बेटा.... आज कलास नाही वाटत.....

करूणा : नाही....आज सुट्टी.....

बाबा : मग आज पूर्ण दिवस घरातच......

करूणा : नाही जरा बाहेर जाऊन येते......मला फ्रेंडला भेटायचं आहे

बाबा : कोण फ्रेंड

करूणा : आहेत कॉलेज मधले.....(का बाबा काही काम आहे का माझ्याकडे )

बाबा : नाही ग सहज विचारलं......ते तुझे मित्र मयुरेश आणि नंदु पोहोचले का......बरोबर.....

करूणा :हो....एक दम सुखरूप पोहोचले.....

बाबा : ट्रेनिंग सुरू झाली का त्यांची लगेच

करूणा : नाही अजुन .....होईल दोन चार दिवसांनी......आई आज मी दुपारी जेवायला नाहीये.....बाहेर जेवणारे फ्रेंड्स बरोबर

आई :( किचन मधुन) आज काल तु बाहेरच खुप खातेस..... घरातलं आवडत नाही का आता........

करूणा : बाबा ....सांगाना आईला.....

बाबा :  जाऊदे आजच्या दिवस.......नंतर नाही खाणार.....(करूणा आणि तिचे बाबा दोघे एकमेकांना टाळी देतात)

आई : हे नेहमीच झालं आहे आता....उगाच बाहेरच खाऊन आजारी पडशीलना म्हणुन बोलते

करूणा किचन मध्ये जाऊन तिच्या आईला मागुन मिठी मारते

करूणा : सॉरी आई....पण नेहमी नाही होणार आता....पण आजच्या दिवशी सोड प्लिज......

आई : आजचा लास्ट दिवस खा....एकदा बाहेरच्या खाण्याची सवई लागली ना मग ....घरातलं जेवन बरोबर नाही लागत

करूणा तिच्या आईचे गाल खेचते....अग आई.....नेहमी नाही जात....कधी तरी ठिकेना......सॉरी पुढे मी नक्की लक्षात ठेवेन......

दोघी हसी मजाक करण्यात गुंतात.....

करूणा दुपारी 1 च्या दरम्यान अजितला भेटते.....खुप दिवसांनी दोघे भेटतात.....म्हणुन एकमेकांना बघून त्यांना खुप आनंद होतो.......दोघे पण एका......मालवणी रेस्टॉरंट मध्ये जातात......

अजित : काय खाणार......

करूणा : इकडे फिश थाळी चांगली भेटते.....मला ती मागव

अजित : मी मला चिकन थाळी मागवतो......

करूणा : हम्मम

दोघे पण आप आपल्या पसंती चे जेवण ऑर्डर करतात.....

करूणा : बोला साहेब....काय झालं......आज अचानक बोलावलं

अजित : अचानक कसलं......एक तर आज काल वेळ मिळत नाही तुला आणि मला.....आज फ्री होतो म्हणुन म्हंटल तुला आज बोलावतो......आणि जरा बोलायचं पण होत......

करूणा : हा बोलना.....

अजित करुणाला एकटक बघत असतो.......

करूणा :(लाजुन)असा एकटक काय बघतोयस..... काही बोलणार नाही का.....

अजित :आधीच एवढ्या दिवसांनी भेटतेस..... नीट बघु तरी दे आधी तुला......

करूणा : काही पण....हातावर त्याच्या हात ठेवतच....बोल काय झालं

आजित: डॅड मला बोलत होते की तुला आता सगळी फॅशन डिझायनर ची नॉलेज आली आहे तर तु सांभाळ सगळं.....मी तुला इन्ट्रोडुज करून देतो....एक पार्टी ठेवतो......त्यात तुझं इन्ट्रोडक्शन होईल

करूणा : (खुश होत)ओ ग्रेट......कॉंग्रेचुलेशन ....मग काय बोलास तु.....?????

अजित : मी त्यांना सहा महिने थांबायला सांगितलं......कारण......नंदु आणि मयुरेश इकडे नाहीयेत....आणि त्यांच्या शिवाय मला नाही जमणार

करूणा :  मग डॅड तयार झाले का.....?????

अजित : हो .....सहा महिने थांबतायत आता ते......नंतर एक पार्टी अरेंज करून मी पर्मनंट होईल

करूणा : खुप छान न्यूज दिलीस.....आय एम सो हॅप्पी फॉर यु

अजित : नुसतं थँक्स म्हणुन काम नाही चालणार......त्यासाठी गिफ्ट पण द्यावं लागेन(तो त्याच्या गालावर बोट ठेऊन इशारा करतो)

करूणा : चुप बस चावट कुठला.......(काही पण)

अजित : आता त्यात काय झालं....विसरलीस वाटत....माझ्या घरी.....

करूणा : अजित प्लिज ना.....(लाजतच)

तेवढ्यात त्यांचं जेवण टेबलावर येत......दोघेही आप आपलं जेवण करतात

अजित : मस्त आहे ना जेवण.....

करूणा : हम्मम....तु फिश ट्राय करणा.....

अजित : हम्मम थांब घेतो

दोघेपन जेवणाचा छान अस्वाद घेतात.......

करूणा : निघु आता......आई काळजी करते मग

अजित : हम्म....थोडा मला पण वेळ देत जा जरा......(हसतच)

करूणा : काय करणार आता मी....कलासेस वरून येऊन थकुन जाते मी....फक्त सहा महिने बाकी आहे..... थोडं थांब.....नंतर वेळच वेळ आहे माझ्या कडे........

अजित : आता तर थांबवच लागेन.....पण जास्त नको थांबाऊस......(हसतच)

अजित आणि करूणा दोघेपण निघुन जातात आपापल्या घरी.....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

रात्री सगळी पंटर गँग व्हिडीओ कॉल करते......

नंदु : कसे आहात सगळे.......(खुश होताच)

सगळे एकत्र......आम्ही सगळे मजेत आहोत........

मयुरेश : आम्हाला विसरला नाहीत ना.....????

अभिषेक : तुमच्या दोघांना विसरून कसं चालेन....तुम्ही तर ग्रुप ची शान आहात

संगिता : ट्रेनिंग झाली का सुरू...

नंदु : उद्या पासुन सुरु होणार......सकाळी पाच वाजता उठवणारे.....सगळे वेगळंच आहे इकडे.......बघु आता कस जमतंय ते......

मयुरेश : हो ना यार ....मला तर जाम टेन्शन आलाय रे

नंदु : झाला सुरू परत.....

मयुरेश : तस नाही रे......पण थोडस वाटताना....म्हणुन बोलो.....

सगळे : हम्म

अजित : काही त्रास नाहि ना तिकडे....कोणी मित्र वगैरे बनलेत का....

नंदु : हो झालेत ना....सगळ्याना रूम दिलीये तेव्हा एकमेकांना विचारून ओळख करून घेतकी...... सगळे खुप मेहनती आहे इकडे

ध्रुवी :खाण्या पिण्याची सोय कशी आहे रे

मयुरेश : इकडचा सगळा टाईम टेबल वेगळा आहे....त्यानुसारच व्ह्याला पाहिजे....थोडं ऍडजस्ट व्हायला वेळ लागेन पण होईल सगळं व्यवस्थित

ध्रुवी: हम्म

नंदु : उद्या पहिला दिवस आहे....बघू उद्या काय शिकवणार ते

अजित : तुम्ही दोघे झोपा आता......सकाळी लवकर उठायचं आहे ना.....उगाच त्रास होईल नाहीतर

नंदु : हम्म.....

सगळे मित्र एकमेकांना बाय बोलुन व्हिडीओ कॉल कट करतात

@@@@@@@@@@@@@@@@@@

इकडे दिवस असे भरभर निघुन जातात.....मिस्टर रॉबिन मोहितेना नेहमी कॉल करून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट ची आठवण करून देतात....पण मोहिते मात्र अजितचा जो निर्णय झाला आहे तो सांगतात......

कारुणाचे कलासेस आता संपायला आलेले असतात......ती पण आता तिच्या खाली वेळेमध्ये  बाबांबरोबर त्यांच्या दुकानावर जात असते....तिच्या बाबाना तीच कौतुक वाटत....एवढ्या लहान वयात ती मोठी जबाबदारी स्वीकार त होती....नंदु आणि मयुरेश सुद्धा छान ट्रेनिंग प्रॅक्टीस करतात.....त्यामुळे त्यांना थकायला व्हायचं....त्यामुळे ते सुद्धा जास्त वेळ देऊ शकत नव्हते....पण जस जसा त्यांना वेळ मिळायचा ते कॉल करून सगळ्यांची चौकशी करायचे

अजित सुद्धा आता कामात बराच रमला होता.....त्याला सुद्धा जसा वेळ मिळत तसा तो करुणाला वेळ द्यायचा....ते दोघे एकमेकांना खुप समजुन घ्यायचे त्यामुळे.....त्यांच्या प्रेमाचा रंग अजुन बहरत होता.....असेच सहा महिने संपायला अजुन 10 दिवस बाकी होते......नंदु आणि मयुरेश त्यांच्या मित्राना ते कधी येणारे ह्याची तारीख संगतात..... त्याच प्रमाणे अजित त्याच्या डॅड ला त्याची पार्टी ऑर्गनायझ करायला सांगतो

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला

अजित त्याच्या वडिलांच्या रूम मध्ये जातो......

डॅड आत येऊ का

मोहिते :हा ये ना(कल्पना तिकडेच बेडवर बसून राधा कृष्णचा जप करत असते)

अजित : डॅड माझे मित्र येतायत दहा दिवसा नंतर......

डॅड :हा मग....

अजित :ते तुम्ही माझी पार्टी देणारेना..... सो त्याची तयारी करा तुम्ही.....(अजितचे डॅड एकदम चमकुन उठतात)

डॅड :ठिके मी सगळे तारीख वगैरे बघुन तुला कळवतो.....

आजीत : हो पण ते आल्या आल्या जरा रेस्ट करतील....नंतर मग ह्या मध्ये अजुन पाच सहा दिवस निघुन जातील त्या हिशोबाने......तुम्ही सगळी तयारी करा......

डॅड :ठिके.....मला कळव तुझे मित्र आले की.....

कल्पना हे सगळं ऐकत होती आणि ती मोहितेंचे हाव भाव पण टिपत होती

अजित : ठिके मी येतो गुड नाईट डॅड आई

डॅड आणि आई :गुड नाईट बेटा

अजित निघुन गेल्यावर मिस्टर रॉबिन ला उद्या ऑफिस मध्ये भेटायला या असा मेसेज करतात आणि झोपतात....

@@@@@@@@@@@@@@@@@

(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife