Aug 06, 2021
प्रेम

चुकीला माफ़ी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 36

Read Later
चुकीला माफ़ी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 36
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 36

नंदु गेल्यानंतर थोड्या वेळ कोणचं कुणाबरोबर बोलत नव्हतं......

अजित : अरे आता सगळे का असे गप्प बसलेत....उलटा आपण हॅपी व्हायला हवं....कारण नंदु आणि मयुरेशला जे बनायचं होत ते ते लोक बनले.....आणि खुश व आहेत ते.....

मयुरेश : अजित बरोबर बोलतोय.... आम्हाला दोघांना पण इकडुन तुम्हाला सगळ्याना सोडुन जाताना त्रास होतोय .....पण पायावर पण उभं राहायलयाचा अभिमान पण आहे

अभिषेक : हो ना.....प्लिज हा आता मयुरेश ला सोडताना कोणी रडु नका......

संगिता : तु आम्हला संगतोयस का स्वतःला समजवतोय....????मगाशी तूच जास्त रडत होतास

अभिषेक पुन्हा थोडा हळवा होतो

धुर्वी : अभिषेक प्लिज यार आम्हला पण वाईट वाटलं रे....पण बघ ना सहा महिने असे निघुन जातील......कळणार पण नाही.....

अभिषेक : हम्म

मयुरेश (नंदुच्या काकांना ):  काका तुम्हाला उशीर होत असेल तर निघु शकतात

नंदूचे काका : नाही नाही .....तुला सोडल्याशिवाय आम्ही कोणीच नाही निघणार.....जसा नंदु आमच्या साठी तसाच तु पण आहेस रे

मयुरेश ला गहिवरून येतं

सगळे इकडच्या तिकडच्या गप्पांन मध्ये रंगतात..... नऊ कधी वाजतात कळतच नाही.....मयुरेशची बस थोडी उशिरा येते ......सगळे मित्र पुन्हा त्याला सामान ठेवायला मदत करतात......भरल्या डोळ्यांनी सगळे मयुरेशला पण निरोप देतात....

अजित : चला आता निघुया....मी सोडतो तुम्हाला सगळ्याना.... मी आज मोठी गाडी आणलीये

मयुरेश चे वडील : नको नको बेटा..... कशाला त्रास करून घेतोस....आम्ही सगळे जाऊ....रिक्षाने.....

अजित : आवो त्यात त्रास कसला....मी ह्या मुलींना सोडणारचे त्यांच्या घरी तुम्ही पण चला सगळे.....

काका : ठिके चालेन.....

सगळे एक एक करून कार मध्ये बसतात ....अजित प्रत्येकाला व्यवस्थित त्यांच्या घरी सोडतो

@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला

मिस्टर मोहिते आज घरी लवकर आलेले असतात.....ते अजित बरोबर आज काही करून बोलायचं ठरवतात

अजित 11 च्या सुमारास घरी पोहोचतो....तो आज पाहिल्यांदा त्याच्या डॅड ला लवकर घरी बघुन शॉक होतो

मोहिते : अजित आलास..... ये ये ये तुझीच वाट बघत होतो

अजित : डॅड आज तुम्ही.....ऑफिस मधुन एवढ्या लवकर......????

डॅड :हो रे आज काम लवकर संपलं... म्हणुन म्हंटल आज जरा मुलाबरोबर टाईम स्पेनड करावा(हसतच)

अजित : ओ ग्रेट....तुम्ही थांबा....मी आलोच फ्रेश होऊन

डॅड : ठिके ये लवकर

अजित फ्रेश होण्यासाठी निघुन जातो आणि तो जाता जाता करुणाला घरी पोहोचल्याचा  निरोप मेसेज वर देतो

अजित आणि मोहितेंच बोलणं कल्पना(अजितची आई )ऐकत असते......अजित रूम मध्ये गेल्यावर ती लगेच खाली येते

कल्पना (अजितची आई) : काही खास काम आहे का अजितकडे

मोहिते : का ....काय झालं....

कल्पना :नाही म्हणजे एवढ्या दिवसानंतर तुम्हाला वेळ मिळाला म्हणुन विचारलं.....

मोहिते :अस काही नाही ....आज काम नव्हतं जास्त म्हणुन लवकर आलो

कलपना : मला का अस वाटत तुम्ही काहीतरी लपवतायत आमच्या पासुन.....????

मोहिते : मी .....मी काय लपवणार तुमच्या पासून(जरा घाबरतच)

कल्पना : मी काय तुम्हाला आज ओळखते का.....गेले पस्तीस वर्ष मी तुम्हाला ओळखते.... अशा किती गोष्टी आहेत ज्या तुम्ही आमच्या पासून लपवलेत.....म्हणुन सहज विचारलं

मोहिते : तुला का अस वाटत मी काही लपवतोय(चिडचिड करतच)

कल्पना : मग चिडु नका .....मी सहजच विचारलं.......कती दिवस झाले तुम्हाला नीट झोप पण नाही लागली ना.....कधी हॉल मधेच झोपतात....तर कधी सकाळी सकाळी झोपतात.....कधी तर घरी येतच नाही.....

मोहिते : काही नाही तस .....आज काल काम  जास्त वाढलं आहे.....म्हणुन थोडं टेन्शन आलेलं....आता सगळं ठिके....आणि आता अजितला पण मला इन्ट्रोडुज करायचंय तर त्याचाच प्लॅन चालू आहे माझा.....म्हणुन थोडा उशीर होतो घरी यायला

कल्पना काही विचारणार तोच अजित खाली येतो......

अजित : आई तु कधी खाली आलीस....मी तुलाच बोलवायला येणार होतो.....आज डॅड आपल्या बरोबर टाईम स्पेनड करणारे....तु पण बस ना....

मोहिते : तिला कुठे सांगतोस थांबायला...... तिला काय कळतं ह्यातलं.....(हसत)

कल्पना आणि अट एकमेकांकडे बघतात .....अजितला तसा राग येतो पण तो दाखवत नाही

कल्पना : मला जरी कळत नसलं तरी माणसाचे चाल चलन कळतात मला.....आणि मला काम आहे अजित.....तुम्ही दोघे गप्पा मारा मी माझं काम संपलं तर येते......

एवढं बोलुन कल्पना निघुन जाते.....मिस्टर मोहिते आणि अजित सोफ्यावर बसुन गप्पा मारतात.....मोहिते सेर्व्हेन्ट ला सांगुन त्यांच्यासाठी ड्रिंक मागवतात


अजित : आज काल कामच प्रेशर खुप आहे का डॅड....????? तुम्ही थकलेले दिसतायत

डॅड : नाही रे.....काम तर चालुच रहात.....त्यात काय एवढं....बर माझं जाऊदे....तुला काम जमतंय ना सगळं..... ??.

अजित :हो डॅड....खुप इजी झालं माझ्या साठी सगळं .....तुम्हाला नेहमी बघायचोना....कलाइन्ट बरोबर....सो शिकत घेलो.....बेसिक येतच होत....आता अलमोस्ट सगळं समजलं.....का डॅड....काही चुकलं का माझं

डॅड : नाही नाही रे .....सहज विचारलं....तु नवीन आहेस ना.....सो तुझ्यावर प्रेशर नको म्हणुन विचारलं......

अजित : त्यात प्रेशर कसलं......काम आहे.....आज ना उद्या मला पण तुमच्या बरोबर उभं रहाऊनच शिकायचंय

डॅड : ते पण बरोबरे.....अच्छा मी काय बोलतोय......तुला ऑफिस मध्ये मला सगळ्याना इन्ट्रोडुज करायचंय म्हणजे.....आता तू माझ्या बरोबर काम करणार मग तुला पण चांगली पोजिशन द्यायला हवी ना

अजित : त्यात इन्ट्रोडक्शन कशाला हवं.......सगळे ओळखतातच मला......मी डायरेक्ट येत जाईल

डॅड : कसयना अजित जस आपण आपल्या कलेक्शन ला इन्ट्रोडुज करतो ना तसच आपण आपल्या एम्प्लॉईला पण इन्ट्रोडुज करायचं....म्हणजे शंका रहात नाही.....आणि तुझी पार्टी पण द्यावी लागेन मला

अजित :हम.....मला चालेन ....पण आता नको.....आफ्टर सिक्स मंथ ने करा

डॅड : व्हॉट.... आफ्टर सिक्स मंथ.....व्हाय..... ..???

अजित :डॅड ते माझे दोन जिगरी फ्रेंड्स पोलीस ट्रेनिंग ला गेलेत.....आजच सो त्यांच्या शिवाय मला नाही जमणार.....

डॅड : अरे पण अस कस करून चालेन.....

अजित :डॅड प्लिज....नाही नका बोलु.....आणि ते दोघे खुप खास आहेत मला.....सो मला खरच त्यांच्या शिवाय नाही जमणार.....आपण एवढं थांबलो मग अजुन सहा महिन्याने काय होणार......

डॅड : अजित ....अरे पण.......

अजित : डॅड डॅड .....प्लिज ....प्लिज....(रिक्वेस्ट करत)

डॅड :अच्छा ठिके.....फक्त सहा महिने....ठिके

अजित :थँक्स डॅड.....(खुश होतच)

डॅड :ओर बोलो ....अजित आज बोहोत दिनोके बाद मिले हो....अपने कॉलेज के बारे में बताओ.....

अजित :आप को तो सब मालुम हे डॅड......मेरे फ्रेंड्स अँड ऑल...

डॅड : बुरा नही मानोगे तो एक बात पुछु

अजित : हा बोलाना......बुरा क्यु लगेगा

डॅड : तुम्हारी कोई गर्ल फ्रेंड नही हे....?????

डॅड च्या अशा प्रश्नाने अजितच्या चेहऱ्याचा रंग उडाला

अजित : डॅड तव

डॅड : हहहहहह.....किती घाबरतोस तु .....मिन तर  सहज विचारलं

अजित : नाही तस नाही.....पण सध्या तस काही नही(घाबरत बोलतो) पण तुम्ही मला असं का विचारलं......????

डॅड : हे बघ अजित : कॉलेज लाईफ मी पण एन्जोय केलीये ....म्हणुन सहज विचारलं.....आणि तुला नसेन सांगायचं तर नको सांगुस....फक्त एक लक्षात ठेव.....तु प्रेम जर करशील तर ..…..विचारपूर्वक कर.....

अजित : म्हणजे......मला समजल नाही

डॅड : ओ कमोन अजित.....तु आता एवढा पण लहान राहिला नाहीस की मी प्रत्येक गोष्ट तुला समजावी....ठिके वेट.... ये इकडे....बस माझ्या जवळ.....

अजित आपण ना आयुष्यात जे आहोत ते पहिलं बघायचं....म्हणजे आपण कोण आहोत....कुठे आहोत.....का आहोत..... प्रेम ना डोळे झाकुन नाही तर बरोबरीच्या लोकांवर करायचं.... आता तूच बघ ना....आपला स्टेटस बघ कुठे.....नंबर फोर्थ वर आपली फॅशन कंपनी आहे.....किती मेहनत लागकी माहितीये अजित ह्याला इथं परेनंतर पोहोचवायला...... हे सहजच नाही मिळत....माझ्या मागे असे अनेक लोकांचा हात आहे ज्यांनी मला मदत केली इथे पोहोचवण्यासाठी..... त्यामुळे मी तुला एवढच सांगु शकतो....तु प्रेम कर पण आपल्या लेव्हल ला सुट होईल असं कर....

अजित जरा टेन्शन मध्ये येतो....कारण तो पूर्ण विरुद्ध असतो.....

डॅड : अजित ....अजित...

अजित : हा हा ....बोलाना

डॅड : अरे लक्ष कुठे तुझं....केव्हाचा आवाज देतोय

अजित : पण डॅड ....प्रेम हे सगळं नाही पहात ना......म्हणजे....पैसा....श्रीमंती.... स्टेटस....

डॅड : अरे त्या तर फिल्मी गोष्टी आहेत.....त्या पिक्चर मध्ये चांगल्या दिसतात....असलं जिंदगी मध्ये तस नसत रे.....खुप झटपट करावी लागते ह्या अशा ऐशो आराम साठी.....

अजितला आता काय बोलु नि काय नाय काहीच कळत नाही....

डॅड .: मला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे ....तु माझा विश्वास तोडणार नाहीस

अजित काहीच बोलत नाही....तेवढ्यात कल्पना येते

कल्पना (आई ) : झालं का तुमच्या दोघांचं बोलणं....का मी डीसटब केल.....

मोहिते : नाही ग ....झालं आमचं .....अजित बेटा तु जा आता झोप .....खुप रात्र झालीये.....उद्या परत ऑफिस आहे ना....तु जा आता.....

अजितचा उतरलेला चेहरा पाहुन कल्पना एक नजर मोहितेंवर टाकते......

अजित शांत पणे आई आणि डॅड ला गुड नाईट बोलुन निघून जातो.....थोड्या वेळाने मोहिते पण निघतात

कल्पना ; एक मिनिट. ...मला बोलायचंय जरा

मोहिते : हम्म बोल

कल्पना : कदाचित तुम्ही विसरला असाल की अजितची आई अजून जिवंत आहे.....

मोहिते रागाने कल्पना कडे बघतात

मोहिते : तु धमकी देतेस

कल्पना (हसत): धमकी आणि मी.....काही पण तुमचं....आवो फक्त लक्षात आणुन देते....मी अजितची आई अजुन जिवंत आहे....

मोहिते :हा मग....????

कल्पना : अजितच्या चेहरा लपला नाही माझ्याकडून.... तुम्ही नक्की त्याला कोणत्या तरी गोष्टीत अडकवलेल आहे....हे मात्र खरं....हो ना

मोहिते : एवढं कळत ....मग विचार जाऊन त्याला....अजुन झोपला नसेन तो

कल्पना :नाही नाही ....मी नाही तो स्वतःच येईल माझी मदत मागायला....आणि मी शंभर टक्के त्यालायच साथ देणार....मग बघते कोण अडवत मला....एवढं बोलुन कल्पना झोपायला निघुन जाते

मोहिते पुन्हा एकदा तिला रागाने बघतात.......आणि ते पण निघुन जातात.....

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife