Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा )पार्ट 23

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा )पार्ट 23


पार्ट 23

रात्री अजितच्या घरी(मोहिते विला)

अजित करूणा बरोबर चाट करत असतो

अजित : करूणा रिझल्ट लागायला 1 मंथ बाकी आहे ...आपण भेटायचं कसं....??? I mean कॉलेज सुरु होत तेव्हा तर नेहमी भेटायचो..आता तर कॉलेज संपलं... एक्साम संपल्या...आता तर भेटायचं पण मुश्किल झालं आहे

करूणा : हो ना मी पण तोच विचार करते......बघु पुढे ...काय आणि कसं भेटता येईन ते...नेहमी नेहमी खोट पण नाही बोलु शकत मी.....आपण चाट तर करतोचे... पण भेटायचं पण मन करत रे....

अजित : हम्मम....तु फॉर्म सबमिट केलंस का....??

करुणा : हो आज दुपारीच 12 वाजता केला....त्यांच्याकडुन अप्रुवलं आलं की मग फी पे करावी लागेन....

अजित : गुड....बघ कस होतंय ते...काही अडचण आली तर नक्की कळव..... मी करेन मदत

करुणा : थँक्स ....चल मी आता ठेवते....परत रात्री चाट करू

अजित : ओके.... बाय ....टेक केर

करुणा : बाय.... यु टु टेक केर

@@@@@@@@@@@@@@@

नंदुच्या घरी

नंदूचे काका: नंदु आता रिझल्ट लागल्यावर काय करायचं ठरवलं आहे

नंदु : ते...(नंदुला थोडं टेंशन येत)ते काका मी विचार करतोय की पोलीस भरतीला उभा रहाऊ....(काळजीत)

काका : अरे वा ...छान छान.... पण अजुन तुला पुढे काही शिकायचं आहे का

नंदु : म्हणजे ते मी PSI (Police Sub Inspector)साठी तयारी करतोय.... त्याच्या अभ्यासासाठी मला बाहेर ट्युशन लावावे लागतील...थोडा खर्च आहे त्याचा....आणि मागे वळतो(रडक्या अवजातच)

काका : नंदु इकडे बघ....इकडे बघ माझ्या कडे....(नंदु मागे वळतो)तुला कोणी काही बोल का....म्हणजे काकी किंवा इतर कोणी...???

नंदु :नाही नाही ...कुणीच नाय बोल मला....

काका : मग असा एकटा का बरं रडत असतोस...काय झालं मला नाही सांगणार का....

नंदु : (एकटक काका कडे बघतो आणि त्यांना मिठी मारतो)काका बाबांच्या शेती मजुरीतुन जे मिळेल त्यावर जगावं लागत....कारण दुसरा कुठला मार्गच नाय....बहिणी जमेंन तशा शिक्षण करतायत....एक टाइम मिळालं तर जेवतायत नाहीतर उपाशी झोपतात... राहिलो मी एकटा....मला समजतंय सगळी जवाबदारी शेवटी मला पार पाडायची आहे....कसा तरी 10 वी केली गावाकडच....पुढची शिक्षणाची परिस्थिती नाय म्हणुन तुम्ही बाबाना जबरदस्ति करून मला इकडे मुंबईला घेऊन आलात.....माझं सगळं शिक्षण बघतायत...काकी हवं नको ते बघते...कधी माझ्या शिक्षणाला पैसे कमी पडले तर तुम्ही दोघांनी मागचा पुढचा विचार न करता काकीचा सोन्याचा हार गहाण ठेवला... आजच्या जगात कोण सख्ख एवढं करत नाय...पण तुम्ही दोघे माझ्या साठी उभे रहायलात... आणि आता पुढे ...पुढे पण आशेच माझ्या पाठीशी उभे रहाल माहिते मला...पण मी कस फेडू हे तुमचे उपकार.... समजत नाय मला....

काका : अरे वेडा बिडा झालास का...तु काय परकायस का माझ्यासाठी ...मी जे पण करतोय ते माझ्याच मुलासाठी करतोय ना....आणि आई वडील कधी पासून आपल्या मुलांकडून परत फेड घ्यायला लागले रे...तु आम्हाला परका समजतो का...????

नंदु मानेनेच नाय बोलतो

काका : मग परत फेड कसली....तुझ्या जागी आमचा सख्खा मुलगा असता ना तरी आम्ही हेच सगळं केलं असत....कळलं... परत नाही हा अस बोलायचं... बघ तु तुला काय शिकायचं ते....आम्ही आहोत तुझ्याबरोबर....

नंदू आनंदाने मिठी मारतो...किचन मध्ये उभी असलेल्या काकीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत

@@@@@@@@@@@@@@@

परीक्षेचा निकाल उद्यावर येऊन पोहोचतो

पंटर गॅंग चाट

संगिता : मला जाम भीती वाटते यार...उद्या काय रिझल्ट लागेन तो...

अभिषेक : सो व्हाट... फेल तर फेल परत परीक्षा दे(मुदामून चिडवत)

संगीता : तुला तर माझं कधी चांगलं बघवतच नाही ना....

अभिषेक : मस्करी केली रे

ध्रुवी : dnt worry संगिता पास होशील तु

नंदु : पास तर सगळेच होणार...

अजित : yes no डाऊट्स... आपल्या ग्रुप ची पण टॉपर आहे ना

करूणा : ये अजित अस काही नाही ....उद्या कळेन कोण टॉपर आहे ते....

रिचा : करूना तुम्हे टक्कर देने के लिये AJ हे इस ग्रुप मे...सो टॉप लिस्ट मे तुम्हारे नाम की ग्यारेंटी कम हे(हसतच)

करूणा : कोई बात नही...नंबर मॅटर नही करते... तुम्हारा टॅलेंट मॅटर करता हे

रिचा एक नखरेलू ईमोजी सेंड करते

संगिता : रिचा तुम्हारा क्या खयाल हे...तुम कितने मार्क्स लाओगी

रिचा : मुझे तो पास भी हो जाऊ बडी बात हे(मनातच बोलते)संगिता मेरा भी टॉप लिस्ट मे शायद नाम रहेगा....तु मेरी छोड अपनी फिकर कर...सबसे ज्यादा तो तु नर्व्हस हे

संगीता:नही तो...मुझे भी पुरी गॅरंटी हे...की मे पास हो जाऊनगी...मुझे तुम्हारी फिकर हो रही थी ना इसलीये पुछा

मयुरेश : उद्या कितीला भेटायचं

अजित : 11 ला भेटु सगळे... 12 परेनंतर लिस्ट लागेन....????

सगळे एकत्र हो चालेन हा रिप्लाय करतात

ध्रुवी : ठिके गायझ चला उद्या भेटु आपण...ok ...गुड नाईट


सगळे एकमेकांना गुड नाईट मेसेज सेंड करतात....आणि झोपायला जातात

@@@@@@@@@@@@@@

सकाळी 11 वाजता कॉलेज मध्ये

एक एक करून सगळे कॉलेज च्या ग्राउंड वर भेटतात...

संगिता : माझ्या पोटात तर गोळा येतोय...(रडक्या सुरात)

ध्रुवी : अग कशाला घाबरतेस एवढी..... कधी न फेल होणारी मुलगी फायनला फेल होणार का

संगीता : तरी पण भीती वाटतेच ना

करूणा : डोन्ट वरी... चांगला येईन तुझा रिझल्ट...

अजित : करूणा तुझ नाव टॉप लिस्ट मध्ये 100% येणार

अभिषेक : तुला तर पूर्ण गॅरंटी आहे ना तिची(अजितला चिडवतच)

अजित : तस नाही रे...(लाजतच)

रिचा अजितच्या जवळ जातच(AJ मुझे तुमसे अकेले मे थोडी बात करणी हे)

अजित : अकेले मे क्यु यहा पे करोना ...

रिचा : थोडा प्रायव्हेट हे...तुम मेरे लिये इतना तो कर ही सकते हो न....

अजित : (करुणा कडे बघतच)ठिके रिझल्ट के बाद बताता हू

सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालु होत्या...त्यातच रिझल्ट ची लिस्ट बोर्ड वर लागली तशी सगळ्यांची धडधड वाढु लागली

मयुरेश : सर्वात आधी कोण बघणार लिस्ट...म्हणजे कोण जाऊन मार्क्स सांगणार

अजित : एक काम करा ...तुम्ही सगळे इकडे थांबा ...मी आणि अभिषेक जाऊन सगळ्यांचे मार्क्स लिहून आणतो

सगळे होकारथी मान हलवतात....

अभिषेक : मला सीट नंबर द्या सगळ्यांचा

सगळे जण मिळून आपआपला सीट नंबर देतात

अजित आणि अभिषेक प्रत्येकाचे नंबर घेऊन जातात...कमीत कमी अर्ध्या तासाने ते दोघे येतात....

अभिषेक : (रडका चेहरा करत)गायझ आय एम सो सॉरी

करूणा : आ ....म्हणजे ....सॉरी कशाबद्दल....?.?

अभिषेक : सॉरी म्हणजे ...आपण सगळे पास झालो(जोरात ओरडातच)

अभिषेक च्या बोलण्या नंतर सगळे जण एकत्र आनंदाने एकमेकांना मिठी मारतात

नंदु :आधी मार्क्स सांगना....

अजित : हो हो नक्की....

संगिता : तुला 71 %

ध्रुवी : 74 %

नंदु : 83 %

मयुरेश : 87 %

अभिषेक : 70 %

रिचा : (रीच्याच नाव घेतच ....अजितला थोडं हलकं हसायला येत)

रिचा : क्या हुआ ....टॉप लिस्ट मे मेरा नाम देखके शोक लगा....?

अजित : तुम्हारा रिझल्ट.... तुम्हे 51 % मिले हे(अस बोलताच संगिता हळुच तोंडावर हात ठेऊन हस्ते)

रिचा : what नोंसेन्स.... दिखाओ मुझे...how it is possible
जरूर कुछ गलती हुई हे....मेंने तो पढाई ठीक से की थी

संगीता : पार्टी की जगे थोडा पढाई पे ध्यान दिया होता तो शयद middle लिस्ट मे नाम जरूर होता तुम्हारा

रिचा रागातच संगीता कडे बघत निघुन जाते

ध्रुवी : नशीब गेली...अरे पण अजून तुमच्या दोघांचा रिझल्ट नाही सांगितला

अजित : मी आणि करूणा दोघे पण टॉप लिस्ट मध्ये आहोत

सगळे जण एकत्र बोलतात congratulation

अजित : मला 95 % आणि करूणा 97 %

पुर्ण पंटर गॅंग त्यांना congratulat करत होती

मयुरेश : मानल यार तुमच्या दोघांना....टॉप केला तुम्ही दोघांनी...

नंदु : नुसता अभ्यासतंच नाही तर प्रेमात सुद्धा....(चिडवतच)

करूणा : काय रे नंदु आता तू पण चिडवणार(लाजतच)


मयुरेश : एक काम करूया आपण सगळे सेलिब्रेशन करूया

सगळे एकत्र हा बोलतात

अभिषेक : तो हो जाय वडापाव पार्टी

पंटर गॅंग (एकत्रच ओरडते.....ये ये ये ये....हिप हिप हुरे.... हिप हिप हुरे)

सगळे जण एकत्र कॅन्टीन मध्ये जातात

@@@@@@@@@@@@@@

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)