चुकीला माफी नाहीं(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 21

Untold love story (part 21)

पार्ट 21

रात्री करुणाच्या घरी

सगळे रात्री एकत्र जेवत असतात....

करुणाच्या मनात अजित ने सांगितलेल्या ऑफर बदल बाबांना कसे सांगु हे कळत नव्हतं.... तिची ही चलबिचल तिची आई बघत होती....पण ती पण काय बोलणार...करुणाने शेवटी हिम्मत करून बोलायचं ठरवल

करूणा : बाबा ते थोडं बोलायचं होत

दत्तात्रय : हम्म ...बोलना

करूणा : ते मी आज नोट्स आणायला कॉलेज ला गेलेली तर तिकडे आमच्या सरांनी आम्हाला हा पेपर दिला...तुम्ही वाचुन बघाणा...

दत्तात्रय : बघु ...दे इकडे....(मधुचे बाबा पेपर वाचुन खुश होतात ....अरे वा ...ऑफर चांगली आहे...त्यात डिस्काउंट सुद्धा आहे...मग तु काय वीचार केलास...???

करुणा : मला तर ऑफर पटली आहे....पण पैसे ....(काळजीच्या स्वरात)

दत्तात्रय : करूणा बेटा ....लास्ट टाइम मी तुला काय बोलो ...तुला तुझ्या एक्साम नंतर काय करायचं आहे ते तु ठरव....तु पैशाची चिंता नको करुस....ते मी बघेन आणि हो हा फॉर्म लगेच ऑनलाईन भरून सबमिट कर ....नाही तरी एकच हप्ता राहिला आहे...चल आता शांत पणे जेवण कर....

(करूणा तिच्या बाबांचं बोलणं ऐकुन खुश होते आणि मधु सुद्धा)

रात्री झोपताना करूणा अजितला मॅसेज करते ...हाय... मी बाबाना तु दिलेली ऑफर सांगीतली आणि ती त्यांना पटली सुद्धा

अजित....व्हेरी गुड...लावकरात लवकर तो फॉर्म सबमिट कर ओके

करुणा : हम्म...जेवलास तु

अजित : नाही अजुन ....जेवेन थोड्या वेळात

करूणा : 11 वाजले... अजुन नाही जेवलास तु...काय करतोयस एवढा वेळ आधी जेऊन घे

अजित : मी नेहमी लेटच जेवतो डिअर ...

करूणा : हा ...कदाचित मलाच अस वाटलं असें की मी लवकर जेवते तर तू का नाही जेवलास...पण तरी पण तू लवकर जेवत जा... चांगल असत तस...

अजित :तु म्हणशील तस करेन... उद्यापासून 9 लाच जेवेन...आता ठिके

करूणा : चल मग मी झोपते...सकाळी लवकर उठायचं आहे मला...स्टडी करण्यासाठी

अजित : ठिके....

करूणा : गुड नाईट

अजित : हम्म(मुद्दामुन)

करूणा : बाय

अजित : हम्म(मुद्दामुन)

करूणा: तिला कळत असत अजित ला काय ऐकायचं आहे ते...म्हणून ती मुदाम त्याला चिडवत असते

करुणा : "गुड नाईट...आता मी ठेवते

अजित : अगं ..अशी काय तु...मुद्दामून करतेस ना...प्लिज बोलना एकदा

अजितच्या अश्या रिक्वेस्ट ने तिला तर आधी हसायला आलं....म्हणुन तिने त्याला जास्त त्रास न देता आय लव्ह यु चा मॅसेज पाठवला...ते बघुन अजितला खुप आनंद झाला...

आणी ते दोघे एकमेकांच्या आठवणीत शांत झोपुन गेले

@@@@@@@@@@@@@

जस जसे परीक्षेचे दिवस जवळ येत होते तस तसे सगळी पंटर गॅंग मन लावुन अभ्यास करत होती....जर कोणाला काही अडचण येत असें तर ते सगळे मिळुन ग्रुप वर शेर करून सोलव करत....

इकडे अजित आणि करूणा ने सुद्धा अभयासकडे दुर्लक्ष न करता वेळेत मन लावुन अभ्यास करत असे...आणि वेळ मिळत असें तसे ते मोबाइल वर बोलत असे

असेच परीक्षेचे दिवस सुद्धा जवळ आले...आणि खुप दिवसानंतर सगळे कॉलेज मध्ये एकत्र भेटणार होते....

अजित आणि करुणातर कधी एकमेकांना बघतायत अस झालेला त्यांना....

@@@@@@@@@@@@@@@

कॉलेज मध्ये

सगळे जण एकत्र कॉलेजच्या ग्राउंड वर भेटतात....आज रिचा सुद्धा असते

रिचा : हे AJ how are you... स्टडी हुई तुम्हारी...

अजित : हा हो गई....

रिचा : मेंने कल तुम्हे मॅसेज किया था.... उसका रिप्लाय नही दिया तुमने...??

आजीत :वो पाढाईके चक्कर मे याद नही रहा

तेवढ्यात करूणा पंटर गॅंग ला जॉइंट होते

ध्रुवी : काशी आहेस तु...???

करूणा : मी मस्त...तुम्ही सगळे कसे आहात...???

सगळे जण एकत्र(मस्त)

अजित आणि करूणा एकमेकांना नुसते बघतच असतात

नंदु :चला मग निघुया अर्धा तास बाकी आहे फक्त....परत गोंधळ नको व्हायला...

नंदुच्या बोलण्या नंतर सगळे आप आपल्या दिशेने निघतात...अजित करूणा सोबत बोलायचा प्रयत्न करत असतो पण रिचा त्याच्या बाजुला असल्यामुळे त्याला काहीच करता येत नसत ....तसा तो अभिषेक ला डोळ्याने इशारा करतो....

अभिषेक : हे रिचा यहा आओना मुझे कुछ डाऊट्स क्लियर करणें हे

रिचा : मुझसे...???

अभिषेक : हा हा तुझसे... क्यु नही जमेगा क्या....

रिचा : attitude मधेच(क्यु नही जमेगा)लाओ इधर.....नाक उडवतच बोलते

अजित खुश होऊन डोळ्यानेच अभिषेक ला थ्यांक्स बोलतो आणि
चांगली संधी साधुन करूणा जवळ जातो तशी करूणा सुद्धा खुश होते.....

अजित : झाला सगळा स्टडी व्यवस्थित

करूणा : हो ...आणि तुझा

अजित : हो माझा सुध्दा ...ऑल द बेस्ट...व्यवस्थित atempt कर सगळं....ओके मी आहे तुझ्या सोबत ...

करूणा : थ्याक्यु ...(गोड लाजतच)

सगळे जण व्यवस्थित आप आपले पेपर मन लावुन देत असतात....कोणाच्याही चेहऱ्यावर काहीच टेन्शन दिसत नसतं

असेच पेपर चे दिवस भरा भर निघुन जातात ...आणि शेवटचा पेपर रहातो.... त्या दिवशी सगळ्यानी बाहेर डिनर साठी जायचा प्लॅन करतात

पेपर संपल्यावर सगळे ग्राउंड वर भेटतात...

अजित :कसे गेले सगळ्यांना पेपर....?

नंदु : खुप छान....मस्त होते ...मी तर पास बाबा(हसतच)

ध्रुवी : तु एकटाच नाही आम्ही सगळे पास. ..कल....आला मोठा शाना... मी पास(नंदूला चिडवतच) तसे सगळे हसतात...पण रीच्याचा चेहऱ्यावर दिसत होतं की तिचा फायनल इयर चा चान्स थोडा काठावरच आहे...आणि हे सगळे जण हेरत होते

मयुरेश : रिचा क्या हुआ...पेपर्स अच्छे नही गये....??

रिचा : कोण बोला...एसी कोई बात नही....सारे पेपर अच्छे गये....(तोंड वाकड करतच)

अजित : अच्छा सोडा हे सगळं... आपण संध्याकाळी किती वाजता भेटायचं.....???

संगीता : 7 वाजता.... ठिके...

सगळे एकत्र : (हम्मम)

नंदु: पहिलं हॉटेल डीसाईड करा...???

अभिषेक: वो मेंने किया ब्रो...हॉटेल संगम

हॉटेलचं नाव ऐकुन सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो

रिचा : what... hotel sangam... वो कितना चिप हे कोई फाईव्ह स्टार हॉटेल देखो ना...(स्वतःचा attitude दाखवुन)

नंदु : नही नही.... हमें ये हॉटेल परवडता हे...ये भी चलेगा(हळुच मयुरेश त्याच्या कानात बोलतो.... किती वेळा सांगितलं एक तर मराठी बोल नाही तर हिंदी)

नंदु : तु चूप रे ही बया बघ कुठे घेऊन चालीये... कळत नाही का तुला

ध्रुवी : रिचा हमारे बडजेत में वही हे...सो वही ठिके

रिचा : ओ कमोन ध्रुवी.....कर ली ना छोटी बात.... कभी कभी बडे हॉटेल्स भी ट्राय किया करो ...मजा आता हे...चलो एक काम करते हे...आज की ट्रीट मेरी तरफ से....तो चलेगा....????

संगिता : नही बिलकुल नही चलेगा....अगर तुझे हमारे साथ आणा कम्फर्टेबल नही हे तो मत आ.....हम सब चले जाएंगे

रिचा :(रागातच )तु कुछ ज्यादा नही बोल रही हे

संगीता : नहीतो... बिलकुल नही ....

रिचा: ठिके मुझे ऍड्रेस भेज देना...में पोहोच जाऊनगी....फिलाल में निकल रही हु... मुझे ओर भी काम हे(आणि रिचा तिकडुन निघुन जाते)

@@@@@@@@@@@@@@@

रिचा निघुन गेल्यानंतर

मयुरेश : संगिता कशाला तिच्या मागे लागते...माहिती आहे ना तिचा स्वभाव

संगीता : मग बघावा तेव्हा पैशाची गुर्मी कोणाला दाखवते....नाही पटत तर कशाला रहाते ग्रुप मध्ये....एखादा अमीर ग्रुप करावा ना तिने

अजित : सोडा हे सगळं....आणि आता सगळे घरी जावा आणि 7 वाजता भेटा... ठिके....

अजितच्या सांगण्यावरून सगळे आपापल्या घरी जातात

@@@@@@@@@@@@@@

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)















🎭 Series Post

View all