Login

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 20

Untold love story (part 20)


पार्ट 20

कारुणाचा घरी

इकडे करुणाची आई अजितच्या स्वभावाबद्दल विचारात असते....तेवढ्यात करूणा येते

करुणा : आई ....तु कधी आलीस...मला वाटलं तुला उशीर होईल.....(करुणाच्या बोलण्याकडे तिच्या आईच लक्षच नसत)

करूणा : आई ....अगं आई मी तुझ्याबरोबर बोलते(करुणाच्या हाताच्या स्पर्शाने मधू तिच्या तंद्रीतुन बाहेर येते)

मधु : तु कधी आलीस ....???

करूणा : हे काय आताच आली ....किती आवाज दिले मी तुला...एवढा कसला विचार करतेस...???


मधु : काही नाही ....तु घेतलेस तुझे नोट्स

करूणा : नोट्स ....कसले नोट्स....(करुणा लगेच आपली जीभ चावते.... आणि गोंधळतच बोलते....नोट्स ....हा आणले ना आणले....ऐकना मी ना जरा आराम करते परत मला संध्याकाळी अभ्यास करायचाय...थोडा आराम केला तर फ्रेश वाटतें ....)

एका श्वासात हे सगळं बोलुन करूणा बेडरूम मध्ये गेली

(करुणाच्या बेडरूम मध्ये- ओ गॉड वाचवलंस तु आज मला .....नाय तर काय झालं असत माझं....)

करूणा अजितच्या ऑफरचा विचार करते... तिला पण ती ऑफर पटते.... आणि ती आजच तिच्या बाबांनबरोबर बोलायचं ठरवते

आणि इकडे मधु करुणाच्या खोटं बोलण्याने अस्वस्थ होते आणि मनातच बोलते .....काही झालं तरी हिच्या बाबांना कळलं पाहिजे....मला जेव्हा वेळ मिळेन तेव्हा नक्की सांगेन

@@@@@@@@@@@@@@

अजितच्या घरी

अजित ची आई कल्पना : अजित...अरे काय झालं तु जेवला नाहीस...सगळ जेवण तसच आहे....अजित मी आजकाल बघते तुझं लक्ष नाहीयेरे जेवणाकडे.....काही बरवगैरें वाटत नाहीये का....???इकडे बघ...मला चेक करुदे ( काळजीच्या स्वरात)

अजित : आई .....आई ....जरा शांत हो....किती काळजी घेतेस....मला बोलू तरी दे
आई तस काही नाही ....मी आज बाहेरूनच जेवुन आलोय ....म्हणुन नाही जेवलो आणि म्हंटल थोडं रिलॅक्स झालो तर स्टडी ला बसेन....(हे बोलतच अजित त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन डोळे बंद करतो...

कल्पना सुध्दा त्याच्या डोक्यातुन हळुच हात फिरवत असते

कल्पना : अजित बेटा एक विचारू....???

अजित : हम्म....

कल्पना : कोणे ती...???

आईच्या ह्या प्रशनाने अजित पटकन जागेवर उठुन बसतो....

अजित : ती ....ती ....कोण ....कोण नाय (जरा गोंधळुनच त्याची जीभ थरथरत होती)...एवढं बोलुन अजित त्याच्या आईच्या प्रशनाणंपासुन वाचण्यासाठी उठतो तेवढ्यात त्याची आई मागुन त्याचा हात पकडते

अजित : आई प्लिज सोडना

कल्पना : बस इथे माझ्या बाजुला..... अजित

अजित हळुच आपली नजर चुकवत त्याच्या आईच्या बाजुला बसतो

कलपना :हम्म ...आता बोल ....कोण आहे ती

अजित : मी बोलोना ....कोणीही नाही

कल्पना : हे बघ बाळा ....मी ना तुझी आई आहे ...तुझ्या डोळ्यातुनच सगळं सांगू शकते की तुला काय झालं आहे ते ....तु लहान होतास ना तेव्हा पासुन मी तुला चांगलीच ओळखते.....अजित तुला ना शाळेमध्ये कोणी मारलं किंवा ओरडला ना तेव्हा तु मला सांगत नव्हता ....मी सहजच समजुन जायची....तसच आता सुद्धा मला समजतंय तु कुणाच्या तरी नक्की प्रेमात आहेस....आता बोल ....कोण आहे ती.....???

अजित : आई अगं ...तीच...नाव करूणा आहे...कॉलेज मधलीच आहे.... खुप शांत ...मनमिळाऊ आहे...म्हणजे बाकीच्या मुलींसारखे शॉक नाही तिचे..... स्वतःच्याच दुनियेत असते ती....तिला ना जे हवं आहे ते ती करूनच रहाणार.... खुपच साधी सरळ आहे

कल्पना : हम्म ....तिला माहीत आहे का की तुला ती आवडते म्हणुन

अजित :ते मी तिला खंडाळ्याला प्रपोज केला ऑलरेडी...(लाजताच)आणि तिने सुद्धा होकार दिला ...

कल्पना : (दोन्ही डोळ्यांच्या भुवया उडवतच....)अरे वा ....तु एवढ्या पुढे घेलास ....नाईस....

अजित : एक एक मिनिट आई ....अजून तिला बरेच गोष्टी अचिव्ह करायच्या आहेत सो...अजुन परेनंतर तर आम्ही हाय हॅलो वरच आहोत....आणि तिच्या मना विरुद्ध तर मला वागायला नाही आवडत...

कल्पना :(जोरात हस्ते...माझा मुलगा एवढा मोठा कधी झाला मला कळलच नाही ....अजित तुला एकच सांगते ....प्रेम केलं आहेस ते निभव ....कोणताही मनामध्ये खेद न ठेवता आप आपले विचार मांडत जावा तुम्ही दोघे...

अजित :पण आई ....डॅड च काय ....ते तर ह्या विचारांचे नाहीये ....मी त्यांना कसं हँडल करू....

कल्पना : ते तु माझ्या वर सोड ....त्यांना मी बघुन घेईल....मग आता दररोज भेटी गाठी होत असतील ....हो ना

अजित : नाही आई ...तिने साफ मना केलं आहे ....ते परिक्षा जवळ आल्या आहेत ...सो माईंड डिस्ट्रकट नको व्हायला म्हणुन ....नंतर येईनच भेटता ....सो सध्या मोबाईल वरूनच चॅट करतो

कल्पना : गुड .....तु सुद्धा जास्त लक्ष स्टडी वर ठेव.... बाकीच पुढच्या पुढे बघु....( एवढ बोलुन ती निघते....तेवढ्यात अजित तिला मागुन मिठी मारतो....)

अजित : आय लव्ह यु आई

कल्पना :लव्ह यु बेटा ....

@@@@@@@@@@@@@@

रीच्याचा घरी(संध्याकाळी)

डॉली म्हणजे रिचाची आई आणि तिचे मिस्टर रॉबिन हॉल मध्ये बसलेले

रिचाची आई डॉली : रॉबिन मुझे आपसे कुछ बात करणी हे...???

रॉबिन : हा बोलो....

डॉली : मुझे रिचा के बारेमें बात करणी हे

रॉबिन : अब क्या किया उसने...???

डॉली : रॉबिन आपको लगतां नही रिचा की आदते बोहोत ज्यादा बिगडती जा रही हे.....??? कल रात को फिरसे घर लेट आई

रॉबिन : कमोन डॉली .... उसमें क्या हुआ ....बच्चे हे....पार्टी में गये होंगे.... थोडा बोहोत लेट हुआ तो चल जाता हे... उसमें क्या

डॉली : पार्टी तक ठिके रॉबिन ...पर ड्रिंक्स अँड ऑल... ये उसका अब ज्यादा हो रहा हे....उपर से फायनल इअर हे... ना उसका पढाई मे ध्यान हे ना किसीं ओर चीज में

रॉबिन : डॉली .....डॉली कम डाऊन ...रिलॅक्स ....लिसन रिचा एक फॅशन डिझाईनर की बेटी हे...ये पार्टी...तो हमारे लिये आये दिन चलती रेहती हे....तो उसमें कोणसी नई बात हे....तुम कुछ ज्यादाही unconscious हो रही हो....


डॉली : रॉबिन आप मेरी बात समझ नही रहे हो ....में...(मधीच डॉलीला अडवत)

रॉबिन : डॉली तुम मेरी बात नही समझ रही हो ...या समझना नही चाहती...रिचा को जो करणा हे उसे करणे दो.... ओर रही उसकि पढाई की बात ...अगर वो फैल भी हो गई तो कोई बडी बात नही...आखीर ये सब उसिका हे...बादमें वो सब हँडल कर लेगी(एवढं बोलून रॉबिन तिकडुन निघुन जातो)

आणि डॉली त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काळजीने बघत रहाते

(काय मग कसा वाटला आजचा भाग....नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)












🎭 Series Post

View all