चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा )पार्ट 19

Untold love story (part 19)


पार्ट 19

रीच्याचा घरी

रात्रीचे 2 वाजतात

डॉली (रिचाची आई): रात्रीचे दोन वाजले तरी सुद्धा रिचा अजुन घरी आली नव्हती आणि तिचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ येत होता... त्यामुळेच रिचाची आई काळजी करत होती....तेव्हढ्यात त्यांना रिचा डगमगत चालत येताना दिसते

डॉली : रिचा बेटा रुको जरा....

रीचा तिच्या आईला इग्नोर करत पुढे निघते

डॉली : (रागातच)मेंने क्या कहा आपणे सुना नही.....

थोडं पुढेजाऊन रिचा थांबते

डॉली : (रिचाच्या जवळ जात)
आप का मोबाईल कहा हे ...????

रिचा : मॉम वो ....

डॉली : मेंने पुछा ...आपका मोबाईल कहा हे बेटा

रिचा : वो मेरे हात से गिर गया तो इसलिए... बंद हो गया(रिचा आपली नजर चोरतच)

डॉली : मोबाईल बंद हुआ...ठिके...कोई बात नही... पर आपके पास घडी तो होगी...आपणे टाइम तो देखा होगा...???

रिचा ला आता ह्या पुढे काय बोलु तेच कळत नव्हतं

डॉली : मेरी तरफ देखो...मेंने कहा मेरी तरफ देखो(आणि रीच्याचा हात मागे खेचत तिला ती तिच्या समोर उभी करते तेवढ्यात डॉली ला रिचाच्या तोंडातुन उग्र तीव्र वास येतो)

डॉली रागातच :आपणे आज फिर ड्रिंक की....???जवाब दो रीचा....

रिचा :मॉम वो ......(गोंधळातच)

डॉली : ओ गॉड हेल्प मी....whts wrong with you richa... आपणे टाइम देखा 2 बजे हे दो ...इस टाइम पे कोई आता हे क्या ...में थक चुकी हु तुम्हे समझाते बेटा.. में मानती हु ...की हमारी लाईफ स्टाईल अलग हे ....हमारा रेहेंन सेहेन अलग हे लेकीने इसका मतलब ये नही की तुम उसका गलत फायदा उठावो....

रिचा : मॉम प्लिज ...आप मुझे लेक्चर मत दो... मेरा जो मन करेंगा वो में करूनगी... आप प्लिज ये बार बार मुझे रोकना टोकना बंद किजीए....

डॉली :तुम अभि नशेमें हो इसलीये तुम्हे अंदाजा नही हे की तुम किनसे बात कर रही हो....

रिचा रागातच : ओ कमोन मॉम ...में दुनिया की पेहली लडकी नही हु जो ड्रिंक करके आई हु...सो प्लिज लिव्ह

अस बोलतच रिचा दगमगतच तिच्या रूम मध्ये निघुन जाते

रिचा च्या आईकडे तिच्याकडे पाहण्याशिवाय अजुन काहीच पर्याय नव्हता

@@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी (सकाळी सकाळी)

मधु : करुणा उठ आता ....किती वाजले बघितला का घड्याळात

करुणा डोळे चोळतच उठते ....गुड मॉर्निंग आई

मधु :गुड मॉर्निंग बेटा.... आज कॉलेज नाही का तुला ....???

करूणा : नाही ग...आता हे फायनल इअर आहे सो सगळे डायरेक्ट परीक्षेला भेटणार...

मधु : ठिके ...जा अंघोळ करून घे मी नाश्ता गरम करते

(कारुणाचे लक्ष मधुच्या बोलण्याकडे नसून ते मोबाइल मध्ये असत)

मधु :करुणा ....करुणा ...अगं लक्ष कुठे तुझं.... मी ना आजकाल बघते तुझं कशातच लक्ष नाहीये

करुणा कुणाचा तरी मॅसेज बघुन घाई घाईने अंघोळीला जाते आणि जाता जाता बोलते.....आई मला नाश्ता नको मला जरा नोट्स घ्याला जायचंय ...मी बाहेरच नाश्ता कारेन काहीतरी

मधु : अरे ....अशी काय ही मुलगी...आता एक दम शांत बसलेली ...आणि आता अचानक उठुन अंघोळीला गेली....नक्की काही तरी गडबड आहे ....(मधु मनातल्या मनातच बोलते ....थांब मी हिचा मोबाईल चेक करते....अस बोलुन मधु कारुणाचा मोबाईल चेक करते .....त्यात तिला अजितचा मॅसेज दिसतो...(गुड मॉर्निंग करूणा ...मला प्लिज आज तु राधा कृष्ण मंदिरात भेटशील का.....)
मधु सगळेच मॅसेज वाचते आणि तिला ह्याचा अंदाजा लागतो की नक्की करूणा कुणाच्या तरी प्रेमात आहे....मधुला थोडं टेन्शन येत...आणि अचानक तिला करुणाचा बाथरूम मधुन निघताणाचा आवाज येतो ....

करूणा : काय झालं आई ....तु असा माझा मोबाइल घेऊन का उभी आहेस...कुणाचा कॉल आलेला का (करूणा सुद्धा गोंधळून विचारते)

मधु :नाही नाही ते मी तुझा मोबाईल चार्जिंग ला लावत होते

करूणा :ओ थॅंक्यु आई

करूणा हॉल मध्ये येऊन निघण्याच्या तयारीत असते तर तिला सुद्धा तिची आई तयारीत करताना दिसते

करूणा :आई तु कुठे निघालीस

मधु : तुझ्याबरोबर येते मी

करूणा :काय ....(मोठ्याने ओरडते...म्हणजे मी तर नोट्स घ्याला निघालीये कॉलेजमध्ये तु तिकडे काय करणार

मधु :करूणा बेटा रिलॅक्स ...मी मस्ती केली ग तुझ्याबरोबर ....मी बाजारात चालीये ...थोडं सामान संपलय ना ते आणते म्हंटल....एक काम कर ना तु मला रस्त्याने जाता जाता सोड आणि तू ज पुढे

करूणा :(गोंधळतच....कारण कॉलेज आणि मंदिर दोन्ही वेग वेगळ्या रस्त्याने असतात) अगं अशी काय करतेस तु . मला उशीर होतोय तु जा ना प्लिज ....ऍडजस्ट कर आजच्या दिवशी ....एवढं बोलुन करुणाने सुद्धा तिचा पळता पाय बाहेर काढला

करूणा जशी घराच्या बाहेर गेली तशी मधु सुद्धा तिच्या मागे मागे गेली .....करुणाला रिक्षात बसताना बघुन मधु सुद्धा रिक्षात बसुन तिचा पाठलाग करते

थोड्याच वेळात करुणा मंदिरामध्ये पोहोचते जिकडे अजित ओलरेडी तीची वाट बघत असतो ....

करूणा : काय झालं अजित ....तु मला मंदिरात का बोलवलं

अजित : थांब ....थांब ...सगळे प्रशन इथे उभी रहाऊनच विचारणारेस का???

करुणा :ओ ...सॉरी ...मी पण ना....चल आपण गार्डन मध्ये जाऊन बोलुया....

दोघे पण गार्डन मध्ये जाऊन बसतात ....तेवढ्यात मधु सुद्धा मंदिरात पोहोचते ....आणि ती त्या दोघांना शोधत शोधत गार्डन मध्ये पोहोचते....मधु त्या दोघांना एका बेंच वर बसताना बघते....आणि ती त्यांच्याच बेंचच्या मागच्या झाडाजवळ लपते

करूणा : बोला साहेब ....का बोलावलं मला इथे

अजित :तु पहिलं डोळे बंद कर मग सांगतो का बोलावलं ते

करूणा : अरे पण......????

अजित : पण बिन काही नाही
...मी बोलो ना डोळे बंद म्हणजे बंद

करूणा सुद्धा कोणते आढे वेढे न घेता डोळे बंद करते

अजित तिच्या एका हातामध्ये एक पेपर देतो.....उघडा डोळे मॅडम आता....

करूणा तिचे डोळे उघडते ....हे काये अजित ....????

अजित : नुसतं बघत बसणारेस का वाचणार सुद्धा आहेस

करूणा अजितने दिलेला पेपर वाचते
त्या मध्ये एका नामांकित कॉलेज मधली (द सीझर)ह्या फॅशन डिझायनर च्या कोर्स ची जाहिरात असते....जाहीरात वाचुन करूणा एक टक अजित कडे बघते

करूणा : अजित अरे हे कॉलेज खुप महाग आहे ....इकडची फी सुद्धा खुप जास्त आहे....ह्याचा तर मी विचार सुद्धा करू शकत नाही

अजित : मला वाटलंच होत तु असंच काहीतरी बोलशील....जरा पुर्ण जाहिरात वाच वेडा बाई...

करूणा पुन्हा एकदा जाहिरात वाचते...त्या मध्ये काही ऑफरस दिलेल्या असतात ....

अजित :एक मिनिट .....मी सांगतो ....तुला ह्या कॉलेज तर्फे काही डिस्काउंट आहे जस ....जर तु 6 महिन्याची फी एक दम भरलीस तर तुला 35% ऑफ आहे आणि हा कोर्स 2 महिन्यानंतर सुरू होणार....टोटल तुला दोन वर्षे हा कोर्स करायचा आहे....ह्या मध्ये तुम्हाला बेसिक प्लस ऍडव्हान्स असे दोन्ही कोर्स शिकवले जातील त्या नंतर जेव्हा तुमचा कोर्स कम्प्लिट होईल तेव्हा तेच तुम्हाला नोकरी देतील...तुमचे नॉलेज तुमची बॉडी लयांगुएज तुमची पर्सनॅलिटी ह्यावर फोकस केला जाईल ....आणि ह्याचा फॉर्म तुला ऑनलाईन भरायचा आहे....ह्या मुळे तुला तुझा लास्ट इयर पण देता येईल आणि नंतर हा कोर्स सुरू होईल....मग कसा वाटला तुला माझा हा प्लॅन(गोड स्माईल देतच बोलतो)

करूणा : हसतच ....थॅंक्यु तु माझ्या साठी एवढं केल्याबद्दल ....मी नक्की विचार करेन ...पण सर्वात आधी मी ह्याची कल्पना माझ्या आई बाबाना देते आणि नंतर तुला कळवते..

ह्या दोघांचे बोलणे मधुला काही ऐकता येत नव्हते फक्त अजितने तिला कोणते तरी पेपर्स दिले तेवढं तिने पाहिलं...... पण तेव्हाच तिला ह्या मुलाला तिने कुठे तरी पाहिलं आहे असं तिला वाटु लागले.....

मधु : मी ह्या मुलाला आधी कुठेतरी पाहिले आहे....थोड्या वेळातच तिला ह्या मंदिरामध्ये धक्का लागुन तिची फुलांचे ताट खाली पडलेला किस्सा आठवला....तेव्हा मधुच्या लक्षात आलं.... की हा तोच मुलगा आहे ज्याने मला सॉरी बोलुन घरी सोडण्याचा आग्रह केलेला....हे सगळ आठवुन मधु थोडी मनातल्या मनात खुश होते....आणि तिकडुन निघुन जाते

अजित : काय मग कसा चालाय स्टडी ....???

करूणा : चांगला चालु आहे...पण तू नेहमी मला असा बोलावत रहाणार तर मग झालं माझ्या अभासच कल्याण
(तसे दोघे हसतात)

अजित : ओ सॉरी सॉरी ...तु काही खाल की नाही सकाळ पासुन

करूणा : नाही रे तु अस अचानक बोलावलं म्हणुन गडबडीत आले निघुन

अजित : चल आपण बाहेर कुठेतरी लंच करू मग तुला सोडतो मी

करूणा सुद्धा त्याला हा बोलते ....ते दोघे एका हॉटेल मध्ये लंच करून आप आपल्या घरी निघुन जातात

@@@@@@@@@@@@@@@

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)










🎭 Series Post

View all