चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 18

Untold love Story (part 18)


पार्ट 18

करूणा :काय झालं ...तु मला इकडे का बोलावलं.....???

अजित :थोड बोलायचं होत...

करुणा :बोलना

अजित जरा गोंधळूणच बोलतो .....आपण थोड्या वेळ बाहेर फिरायला जाऊया....आय मिन गार्डन ओर मॉल

करुणा :( काळजीने) मी आले असते पण कोणी पाहिलं तर ...????

अजित : मी तुझा जास्त वेळ नाही घेणार ...थोडाच वेळ....काही जबरदस्ती नाहीये ....तु विचार करून सांग....अजुन आपल्याला इकडे थोडा टाइम लागेन सो यु टेक युर टाइम ....

करुणा : ओके

दोघे जण परत ग्रुप मध्ये येऊन बसतात...

मयुरेश :तुमच्या दोघांचा काही वेगळा टॉपिक होता का डिस्कस करायला... जो एवढ्या लांब जाऊन केला(मुदाम मस्करी करतच)

अजित : ते पण तुला सांगुन डिस्कस करू आता

मयुरेश :मला चालेल...(मुद्दामुन चिडवत....तसा अजित त्याला मारायला पळतो)

करुणा लाजुन मान खाली झुकवते

संगीता :काय ग काय झालं....?

करूणा : अजित बोलतो बाहेर चल फिरायला(काळजीत)

अभिषेक : मग जा ना......

करुणा :कोणी पाहिलं तर...???

अभिषेक : ओय .... जब प्यार किया तो डरणा क्या.....

हो(सगळे एकत्र बोलतात)

ध्रुवी : तु त्याला हो सांग आणि....हे बघ घाबरायची काही हरकत नाही....तो खुप चांगला मुलगा आहे ग....त्याच्यावर विश्वास ठेव

करुणा :हम्म

तेवढयात अजित आणि मयुरेश दमतच पळत येतात

ध्रुवी :अजित करूणा येते तुझ्या सोबत फिरायला डोन्ट वरी

अजित : काय ???तुम्हांला कोणी सांगितलं

ध्रुवी :त्यात सांगायला कशाला पाहिजे....movie मध्ये दाखवतात ना....एकदा प्रेमात पडलो ना मग ते दोन्ही love birds फिरतात.... समुद्रकिनारी बसतात हातात हात घालुन.... मॉल मध्ये जातात.... पिक्चर बघतात.... हो की नाय करुणा(मुद्दामुन चिडवत)

करुणा :(तिच्या खांद्यावर फटका देतच) खुप पिक्चर बघतेस वाटत....जरा अभ्यासात लक्ष दे म्हणजे मार्क्स पण चांगले येतील

अभिषेक : वा भाई ...भलाईका जमाना ही नही रहा(हसतच)

करुणा :तु नको माझी काळजी करुस....आम्ही दोघे बघु काय करायचं ते

(सगळे एकत्र हसतात)

थोड्याच वेळात सगळे जण थोडा थोडा अभ्यास करून कॅन्टीन मध्ये जाऊन थोडस खाऊन आप आपल्या घरी निघतात.... आणि हे दोघे वेगळे निघतात

करुणा :मग आपण कुठे जाऊया

अजित :मला सुद्धा हाच प्रशन पडला आहे... कारण मी पण पहिल्यांदाच कोणाला तरी बाहेर न्हेतोय

करुणा : आयडिया...तुला आवडली तर बघ आपण राधा कृष्ण मंदिरात जाऊया

अजित : अरे वा ...मस्त....आपल्या प्रेमाची सुरवात देवाच्या आशीर्वादाने करूया ....खूप छान...,चल निघुया

करुणा खुप खुश होते

अजित बाईक आणतो...तशी करुणा अस्वस्थ होते आणि मनातच बोलते ...बाईक वर ह्याला पकडुन बसावं लागेना... बापरे...आता कसं होईल माझं

अजित : करुणा ...करुणा

करुणा : हा हा बोलना

अजित :अग बस लवकर ...परत तुलाच उशीर होईल

करुणा :हा ....ठिके

करुणा अलगद त्याच्या मागे बसते पण तिला पकडू कुठे ह्याचा प्रश्न पडला....अजित हळूच तिची चलबिचल front mirror मधुन बघत असतो आणि गालातल्या गालातच हसतो

अजित :तु मला पकडुन बसलीस तरी चालेल

(अजितच्या बोलण्याने करुणा लाजुन मान खाली घालते आणि लाजताच अजितच्या खांद्यावर आपला हात अलगद ठेवते)

(करुणाच्या हाताच्या स्पर्ष्याने अजितला वेगळाच फिलिंग येते.... करुणा सुद्धा लाजुन लाजुन लाल लाल होते)

थोड्याच वेळात ते दोघेपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतात

त्यांच्या दोघांच्या येण्याची वाट जणु राधा कृष्ण सुद्धा पाहत होते.....दोघे पण देवाच्या पाया पडतात आणि त्यांची जी जी इच्छा होती ते त्या देवाकडे मागतात....मंदिरातले पुजारी त्या दोघांना पण प्रसाद देतात...आणि कायम सुखी रहा हा आशीर्वाद देतात....तसे दोघे एकमेकांना बघतात....आशीर्वाद घेऊन झाल्यावर दोघेपण मंदिराच्या पायऱ्यांवर बसतात

अजित : मग ....काय मघितलं देवाकडे

करुणा : आपण जे काही देवाकडे मागतो ना ते पूर्ण झाल्याशिवाय सांगायच नसत

अजित :ओके... नो प्रोब्लेम

अजित : तुझ्या बाबांचे साड्यांचे दुकान कसे चालु आहे

करुणा : "खुप छान ....चालू आहे....नवीन कलेकशन मुळे खुप काम वाढलं आहे बाबांचं

अजित : तु एकुलती एक आहे ना....???

करुणा : हो

अजित : मी सुध्दा....म्हणुन मी माझ्या आईचा लाडका आहे

करुणा : आणि बाबांचा....???

अजित : माहीत नाही ....

करुणा : म्हणजे...???(काळजीच्या स्वरात)

अजित : म्हणजे ....डॅड ला जास्त वेळ नसतो घरच्यासाठी ....कामानिमित्त ते जास्त आउट ऑफ इंडिया असतात... सो मला जास्त ओढ ही माझ्या आईचीच
....तिचा स्वभाव सुद्धा तसाच आहे....शांत.... निर्मळ.... एक दम स्वच्छ मनाची

करुणा :तु तुझ्या आईबरोबर खुप क्लोज आहेस ना

अजित : खुप नाही तर खुप खुप खुप....तुला माहितीये माझ्या आईच हे मंदिर फेव्हरेट आहे... ती नेहमी तीच मन ह्या राधा कृष्ण मंदिरामध्ये मोकळं करते.... तिच्या शिवाय माझं जगणं व्यर्थ आहे ग ...तीच्या प्रेमळ स्वभावाने ती कोणाला पण आपलंसं करून घेते.... मी तुला नक्की भेटवेन...मग बघ तुच सांग मला... कशी आहे माझी आई(गोड हसतच)

करुणा : नक्की भेटव... मी वाट बघेन त्या दिवसाची

अजित : तुला भेटावं तर लागेनच सासु जी आहे ती तुझी

करूना लाजताच त्याच्या हातावर फ़टका मारते

करुणा : चल मग निघुया आता...
मला उशीर होईल... घरचे काळजी करतील

अजित :ओके चल मी तुला सोडतो

करुणा : नको नको आता मी रिक्षाने जाते उगाच कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होइल

अजित : जशी तुझी मर्जी....पण हा(करुणा मध्येच तोडत)

करुणा :घरी गेल्यावर मला मॅसेज कर....काय बरोबर ना

अजित : स्माईल करतच हो बोलतो

अजित करुणाला ऑटो मध्ये बसवुन देतो....आणि तो सुद्धा त्याच्या घरी जाण्यासाठी निघतो

@@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी

करुणाची आई

मधु : करुणा आज कॉलेज वरून यायला लेट का झाला

करुणा : आनंदाच्या भरातचं (अगं आई ते येताना मी राधा कृष्ण मंदिरात गेलेली म्हणून(करुणा मध्येच स्वतःची जीभ चावते...अरेच्या हे मी काय बोलुन गेली)

मधु : मंदिरात ....(शंकेने)अस अचानक

करूणा : आई अगं ते परीक्षा जवळ आली आहे ना म्हणुन देवाला मस्का पोलिश करायला गेलेले....की मला संभाळून घे आणि चांगले मार्क्स दे

मधु : (हसतच) ....काही पण ....देवाला तु अस बोलिस.... वा मस्त ....(मधु करुणाच्या जवळ जाते आणि तिचे मुद्दाम कान खेचते.... वेडा बाई...असं देवाला मस्का पॉलीश करून मार्क्स नाही पडत...त्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो)

करुणा : (हसतच) मी मस्करी केली ग तुझी...अभ्यास तर मी करणारच ....आणि टॉप सुध्दा(आईला मिठी मारत)

मधु :चल जा हात पाय धु ...मी तुला नाश्ता देते....

करूणा :(रूम मध्ये जातच बोलते....आई नाश्ता नको डायरेक्ट जेवण दे ...मला जास्त भूक नाहीये आज...सो कमीच दे....)

@@@@@@@@@@@@@@

काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे















🎭 Series Post

View all