Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 17

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 17

पार्ट 17

जवळ जवळ सगळे जण मुंबई ला 9 ते 10 च्या दरम्यान पोहोचले सर्वात आधी मुलींना आप आपल्या घरी सोडण्यात आलं ....संगीता आणि ध्रुवी आधी घरी पोहोचल्या
जसे जसे करुणाचे घर जवळ येत होते तस तस त्या दोघांना पण ही रात्र संपु नये वाटत होतं..... थोड्याच वेळात करुणाचे घर आले करुणाचे डोळे अलगद पाणावले होते .....तिला अजित तिच्या पासुन दुर जावा वाटतं नव्हत.... अजित ची सुद्धा हीच दशा होती

अजित तिला घरापर्यंतर सोडायला उतरला....थोड्या वेळ तर कोणीच एकमेकांशी काहीच बोले नाही...शेवटी न राहवुन अजितने सुरवात केली


अजित : ठिके ....मग तु आता सांभाळून जा....घरी.... फ्रेश झाल्यावर मला टेक्स कर

करुणा :ह्म्म

अजित :नुसतं ह्म्म करणारेस की काही बोलणार पण....(हसतच)

करुणा जरा लाजतेच

अजित :चल बाय

करुणा :बाय गुड नाईट

अजित :गुड नाईट टेक केयर

अजित करुणाला घरात जाऊस तोपर्यंतर बघत रहातो

सगळे जण सुखरूप आप आपल्या घरी पोहोचतात आणि आप आपल्या घरच्यांना त्यांनी काय काय मस्ती केली ते ह्याची गंमत सांगतात...प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या घरच्यांना दिसत होता....

नंतर सगळेच खुप थकल्यामुळे झोपुन जातात

@@@@@@@@@@@@@@

मेहता वीला मध्ये

खुप दमल्यामुळे अजितला सकाळी जर लेटच जाग आली

अजित डोळे चोळतच आळस देत असतो आणि त्याच्या समोर त्याची आई नाश्त्याची प्लेट घेऊन एक गोड स्माईल देत असते

कल्पना(अजितची आई): गुड मॉर्निंग बेटा

अजित :आई गुड मॉर्निंग... सॉरी थोडा लेट झाला उठायला

कल्पना :काही हरकत नाही ...तु थकलेलास प्रवासामुळे म्हणुन मी तुला उठवले नाही

अजित: थँक्स आई

कल्पना : अरे त्यात थँक्स काय....चल आता पाहिलं फ्रेश हो आणि हा नाश्ता संपव...(एवढ बोलुन अजित ची आई निघायला उठतात तेवढ्यात अजित त्याच्या आईचा हात धरून थोड्या वेळ बाजुला बस म्हणुन सांगतो ...आणि तो त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन पुन्हा डोळे मिटतो....अजितची आई हलकेच तिचे बोट त्याच्या केसातून फिरवत असते

कल्पना :अजित बेटा काय झालं ....झोप नाही झाली का

अजित :काही नाही ग आई ....अस वाटत काश ती पिकनिक अजुन एक दोन दिवस असली पाहिजे होती

कलपना :हम्म ....मग करायचं होतं ना तस

अजित डोळे मिटुनच:नाही ग आई आमच्या बरोबर मुली पण होत्याना मग उगाच त्यांच्या घरच्यांना काळजी नको

कल्पना :ते पण बरोबर ....आहे...

अजित : आई तुला माहितीये जास्त मज्जा तर डान्स मध्ये आली....खुप म्हणजे खुप ...तो डान्स ते स्विमिंग पुल.... खरच तो दिवसच संपु नये वाटत होतं

कल्पना :हम्म....तो दिवस संपु नये का कोणी आपल्याला दिसणार नाही ह्याची काळजी तुला जास्त वाटत होती

आईच्या आशा बोलण्याने अजित एक टक आईला बघतो आणि आपली नजर चोरतच बाथरूम मध्ये पळतो

कल्पना :ठिके आता नको सांगुस नंतर कळेनच मला

अजित बाथरूम मधुन :तस काही नाही आई

@@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी

करुणा :आई मला नाश्ता दे ना खुप भूक लागलीये

मधु :पाच मिनिटं दे आलेच

दत्तात्रय :करुणा बेटा काय मग झोप झाली

करुणा : हो बाबा

दत्तात्रय :ये इकडे बस माझ्या बाजुला..(करूणा तिच्या बाबांच्या बाजुला बसते....हे बघ बेटा आता परीक्षा जवळ आल्या आहेत... तुझा अभ्यासक्रम कसा चालु आहे)

करुणा:मस्त बाबा....थोडंच बाकी आहे वाचायचं पण ते पण होऊन जाईन नो प्रोब्लेम(हसतच)

बाबा:छान ....खुप छान ...मग पुढे काय करणारे...काही कलपना तर दे आम्हाला म्हणजे तस तयारीला राहाता येईन आम्हाला

मधु : (हातात उपमा घेत येते आणि सगळ्यांना देते) तुझे बाबा अगदी योग्य बोलत आहेत बेटा.... तु आम्हला सांग काय बनायचं आहे तुला तशी आम्ही तयारी ठेऊ

करुणा :आई ....बाबा ते मला पुढे जाऊन फॅशन डिझाइन चा कोर्स करायचा आहे कारण ते जर केला तर मग मी बाबाना मदत करू शकते... मी स्वतः साड्या डिझाईन करू शकते ....त्यात आपला फायदा पण होईल आणी बाबाना माझी मदत पण....मी बरोबर बोलते ना बाबा

कारुणाच उत्तर ऐकुन दोघेपण खुश होतात

बाबा :वा बेटा... आज खुप खुश केलंस तु मला ...तुझ्या परिसक्षेच्या नंतर तु रिझल्ट येऊसतोपरेंतर फॅशन डिझायनर चे कोर्स शोध ....कोणत्या कॉलेज मध्ये किती वर्ष आहे ते ...आणि किती वर्षे लागतील ते....बाकीच आम्ही बघु....तुझा रिझल्ट तर माहीतच आहे आम्हाला ...त्यामुळे नो टेन्शन

करुणा :थेंक्यु बाबा....लव्ह यु सो मच

मधु :आणि आता मी गोड गोड चहा आणते

करुणाच्या घरात पण सगळ प्रसन्नतेचा वातावरण असत

@@@@@@@@@@@@@@@

सोमवारी

सगळीच पंटर गॅंग एकत्र कॉलेज मध्ये भेटते

संगीता : खरं सांगु मला तर आपली पिकनिक संपुच नये वाटत होत

(सगळे एकत्र : हो ना )

अभिषेक :संगीता काही हरकत नाही एकदा हे फायनल इयर च्या एक्साम्स होऊ दे मग आपण परत एकदा पिकनिक अरेंज करू

करुणा : नको बाबा .....आता परत नको....कारण आताच आपण जाऊन आलो ...आणि मला नाही वाटत माझे घरचे मला परमिशन देतील पुन्हा...

मयुरेश : अस काही नाहींग ....आम्ही सगळे मिळुन लास्ट चान्स पिकनिक म्हणुन कन्व्हेंस करू....

नंदु : आणि नाही तरी तुम्ही सगळे परत कशे भेटाल मला....माझी एकदा परीक्षा झाली की मज थेट माझ्या गावी

सगळे एकत्र शॉक होऊन नंदु कडे बघतात

अजित :अरे असा काय बोलतोस तु म्हणजे तु तुझ करियर इकडे मुंबई मध्ये नाही करणार का???

नंदु : अरे मित्रा माझे आई वडील सगळे गावी शेतात मजुरी करतात ...मी तर इकडे काका काकीकडे शिक्षणासाठी आलोय... चांगले मार्क मिळाले की मग बघता येईल पुढचं पुढे

अजित : अरे असा काय करतोस तु
.....तुला काही त्रास नाही ना काका काकुंकडून..???

नंदु :नाय नाय ...बाबा....आर नशीब लागत आशी आपली मानस भेटायला ...लय चांगलेत बघ ते सगळे...आज त्यांच्याच मुळे मी चांगलं शिक्षण घेऊ शकतो.... माझी फी पण तेच लोक भरतात... काकी तर आई वाणी माया करते बघ माया वर
.....अजुन काय हवं मला

अजित :अरे यार पण .....(नंदु मधेच तोडत बोलतो)

नंदु :जाऊदे मित्रा तो विषय नंतर बोलु
.....आधी आपण सगळे उरलेले डाऊट्स क्लिअर करू

(सगळे मानेने हा बोलतात....रिचा तर आज पण आलेली नसते)

अजित : ( नजरेनेच इशारा करत करुणाला साईडला बोलावतो)

करूणा :काय झालं ...तु मला इकडे का बोलावलं.....???

( का बोलावलं असें अजितने करुणाला बघुया पुढच्या भागात... वाचकांना माझी स्टोरी कशी वाटली नक्की कळवा कंमेंट द्वारे)