Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 15

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 15


पार्ट 15

रिचा जशी रूम वर जाते तस सगळ्यांचा मुड थोडा नाराज होतो

अभिषेक :ही उगाच आली इकडे ....वाटलं नव्हतं यार ही येईल इकडे...आली तर आली मुड पण खराब केला

अजित :गायझ तिच्या इथे असण्याने मला तर काहीच फरक पडत नाही...मग तुम्ही सगळे कशाला टेन्शन घेतायत... अभिषेक उगाच मुड खराब नाही करायचा...काही लोकांच्या सवई आशा असतात ज्या आपण नाही बदलु शकत...मग का आपण आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवायची ...

करुणा :अजित बरोबर बोलतोय ...अरे आपण सगळे आहोतना सोबत ..मग एक जण अजुन ऍड झाला तर काय बिघडलं...

मयुरेश : करुणा तुला तर आता अजितच सगळंच पटणार(तसे सगळे हसतात)

(करुणा पुन्हा लाजुन मान खाली वाकवते)

अजित :आणि हो एक लक्षात ठेवा ....प्लिज रिचा समोर मला आणि करुणा ला कोणी पण एकमेकांच्या नावाने चिडवायच नाही

ध्रुवी :का....????

अजित : बिकोज रीच्याचे वडील हे माझ्या वडिलांचे फ्रेंड आणि बिझनेस पार्टनर आहेत...सो मला एवढ्या लवकर आमच्या दोघांच्या रिलेशनशिप ची अनौनसमेंट नाही करायची...थोडा वेळ द्या मला...मी नक्की घरी सांगेन...पण आधी मला माझी लेव्हल बनउद्या... करुणाला सुद्धा करियर करूनद्या...मग आम्ही ठरवु कस बोलायचं ते आमच्या घरच्यांशी....(मी बरोबर बोलतोय ना करुणा....???)

(करुणा मानेनेच होकार कळवते)

संगीता : आता तुम्ही दोघांनी सगळं ठरवलच आहे सगळ तर ठीके...आम्ही आहोत तुमच्या दोघांच्या बरोबर(सगळे एकत्र संमती दर्शवतात)

अजित :थँक्स(गोड स्माईल करत)

थोड्याच वेळात रिचा सुद्धा फ्रेश होऊन त्यांना जॉईन होते...

अलरेडी सगळे नाचुन दमलेले असतात म्हणुन सगळे एकत्रच पुल साईडला बसलेले असतात...

रिचा :हे गायझ... व्हॉट ह्यापन... आओ सब थोडा डान्स मस्ती करते हे

अभिषेक :वो एकचुली सब थक गये.. इसलीए सोचा की अभि खाना खाके अराम करणे जाये

रिचा :पर में तो अभि आई हु... थोडा तो एन्जॉय करे

संगीता : तु एन्जॉय कर ना...ओर वेसेभी कल राईड्स का मजा लेना हे... तो आज जलदी सोना पडेगाना (रुको में सबके लिये खाना लाती हु)

मयुरेश :नको नको आम्ही सगळेच येतो तुझ्या बरोबर

(तसे सगळे उठुन निघायला लागलें....तेवढ्यात रीच्याने अजितचा मागुन हात पकडला... हे AJ कमोन यार तु तो रुक सकता हे ना मेरे लिये)

रीच्याचा बोलण्याने अजित करुणा ला बघतो..करुणा ने अजितचा हात रीच्याचा हातात बघुन मान खाली वाकवली असते)

अजित :नही रीच्या... सफर में थक गया हू में ओर उपरसे ये डान्स... के चक्कर में पैर दर्द हो रहे हे... ओर वेसे भी कल राईड्स का मजा लेना हे तो आज अराम करणा जरुरी हे

(एवढ बोलुन सगळे जेवायला निघाले...आणि रीच्या सुद्धा निघाली...खरं तर तिला राग आलेला पण करणार काय तिचा नाईलाज होता...थकल्यामुळे सगळे आप आपल्या रूम मध्ये निघुन गेले...परंतु आज करुणा आणि अजितला मात्र झोप काही लागेना)

तेवढ्यात करुणाच्या मोबाईल वर मॅसेज टोन वाजते...तो मॅसेज अजितचा असतो

अजित:झोपलीस...???

करुणा :नाही अजुन... झोप नाही येत...पण तू अजुन झोपला का नाहीस

अजित :मला सुद्धा झोप नाही येत

करुणा :झोप आता ....सकाळी उठायचं आहे लवकर

अजित :हम्म्म

करुणा :गुड नाईट

अजित :गुड नाईट....???

करुणा :हे काय...???

अजित :गुड नाईट नंतर काहीतरी बोलतात

करुणाला अजितचा इशारा कळतो... ती लाजुन नाही बोलते

अजित :हे काय आता अस सतवणार...??

करुणा : ओके ....ठिके ...आय लव्ह..... गुड नाईट

अजित मॅसेज बघुन हसतो आणि बोलतो उद्या भेटशीलच ना तेव्हा बघु...गुड नाईट

करूणासुद्धा मॅसेज वाचुन दिवसभराच्या आठवणी आठवुन झोपुन जाते


@@@@@@@@@@@@@@

सकाळी सगळ्यांनाच आठ वाजता जाग येते सगळे जण राईड्स एन्जॉय करण्यासाठी तयार होऊन पुल साईडला जमा होतात...

संगिता : ये चला चला... पाण्यात जाऊया...

नंदु : तु आणि पाण्यात ...भूकंप नाही येणार का....(सगळे हसतात)

संगीता : तु परत बोलास (रागातच)

नंदु : सॉरी... सॉरी ....सॉरी ...अग मस्करी केली

मयुरेश : लेट्स गो गाईज

(सगळे एका सुरात... ये ये ये ये ये)

अभिषेक :एक मिनिट..रिचा कुठे...?

ध्रुवी : अजुन कुठे असणार ....झोपलीये मॅडम...तिच्या कॅलेंडर मध्ये सकाळी सकाळी उठणे नाही लिहलं

अभिषेक : अच्छा सोड...चला सगळे

तेवढ्यात मागुन रीच्याचा आवाज येतो(रुको रुको में भी आई....सॉरी सॉरी थोडा लेट हुआ)

संगीता : तु नही भी आती तो भी चलता... वेसे भी हम सब एन्जॉय कर ही रहे हे

रिचा : कमोन संगीता...मेरे बिना क्या मजा आता..चलो सब राईड्स पे

(सगळे जण एक एक करून राईड्स एन्जॉय करत असतात ...करुणा मात्र एका ठिकाणी उभी असते..."तिला पोहता येत नाहीना म्हणुन)

अजित हे लांबुनच पहात असतो

रिचा अजितच्या जवळ येऊन त्यांला स्विमिंग करण्यासाठी फोर्स करते पण तो मात्र तिला टाळत असतो... रिचा ला अजितच वागणं नवीन नव्हतं म्हणुन तिने पण त्याला फोर्स करणे सोडुन दिल... आणि ती स्वतःच एन्जॉय करत होती

अजित इकडे करुणा जवळ येतो

अजित :करुणा काय झालं तु का नाही खेळत

करुणा : ते मला स्विमिंग नाही तर येत आणि तशीपन मला पाण्याची भीतीच वाटतें

अजित तिच्या ह्या बोलण्यावर हसतो तस तिला राग येतो

अजित: सॉरी... सॉरी करुणा... अगं केवढस पाणी आहे ते चल माझ्या बरोबर मी तुला शिकवतो

करुणा : "नाही नको ....नको...मी नाही येणार...मला स्विमिंग पण नाही येत..उगाच नकोते उद्योग कशाला

अजित : अशी काय करतेस...मी आहे ना सोबत...माझ्यावर विश्वास नाहीं का

करुणा : अजितच्या बोलण्याने करुणा एकटक त्याच्याकडे बघते

अजित हळुच चुटकी वाजुन तिला भानावर आणतो

अजित : एक काम कर पहिलं मी स्विमिंगपुल मध्ये उतरतो मग तु हळुच उतर...मग तर ठिके

करुणा हो बोलते...पण तरीही तिच्या मनात भीती असतेच

अजित: माझ्यावर भरोसा ठेव काही नाही होणार तुला

करुणा गालातच हसते

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कॉमेंट द्वारे)