Jan 22, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 12

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 12


पार्ट 12

इकडे सगळी पंटर गॅंग चार ते पाच तासाच्या प्रवासाने शेवटी पोहोचली एकदाची सी व्हीव रिसॉर्ट वर

Sea view resort(एक थ्री स्टार प्रॉपर्टी)...मोठे स्विमिंग पुल... त्या राईड्स... गार्डन...dj फ्लोर... बार्बेक्यू... खुपच सुंदर असा त्याचा व्हीव ....

(गाडी मधुन उतरल्या उतरल्या सगळ्यांच्या तोंडातुन एकच वाक्य... wow... किती सुंदर नजारा... किती सुंदर रिसॉर्ट...)

अभिषेक ने सुद्धा ड्रायव्हर्ची सोय केली होती....तेवढ्यात तिकडुन रिसॉर्टचे मॅनेजर येतात... मिस्टर सागर

सागर : हॅलो एवरी वन... वेल कम टु अवर सी व्हीव रिसॉर्ट...

(मॅनेजर च्या बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱयावर आनंद झळकत होता)

:सागर : तुमच्या सगळ्यांची सोय अलरेडी झालेली आहे...प्लिज तुम्ही सगळे आधी आत चला...(सगळे जण आत आल्यानंतर सागर ने त्यांना सगळी इन्फॉर्मेशन दिली... सर...मॅडम...तुमचे टोटल दोन रूम बुक केले आहेत...ही त्याची चावी.... गर्ल्स साठी 201 आणि बॉईस साठी 202
....ह्या दोन्ही रूम मधुन तुम्हाला सी व्हिव दिसेन

(सागरच्या बोलण्याने सगळ्यांचा एकच जल्लोष ....व्हाट....सी व्हिव)

सागर :एस ...आम्हाला आमच्या सरांनी सुचनाच तश्या दिलेल्या... तुमची सगळी जिमेदारी आमची...आता तुम्ही सगळे जण थोडं फ्रेश होऊन या...तुमच्या सागळ्यांसाठी पुल साईडला dj अरेंज केला आहे...

(सगळे जण एकाच आवाजात ...ये ये ये ये)

सागर:तुम्ही सगळे पुढे व्हा मी तुमचं समान तुमच्या रूम मध्ये सुखरूप पाठवुन देतो

(सगळे जण आपापल्या रूम मध्ये गेले)

रूमचा नजरा पण मस्त होता...रूम मध्ये शिरतानांच चंदनाचा सुगंध येऊ लागला... अगदी शांत असा रम्य वातावरण... रूमच्या बालकणीतून सुद्धा छान असा निळसर समुद्र दिसतो...हिरवळ नुसती अंथरूण पांघरून झोपली होती...

करुणा : किती सुंदर नजारा आहेना...

संगिता आणि ध्रुवी:हो ना.....

करुणा :तुम्ही सगळे एक एक करून फ्रेश व्हा मी थांबते बाहेर

संगीता : पहिली मी जाते नंतर तु जा ..ध्रुवी

(इकडे मुलांचा सुद्धा आनंद गगनात मावत नव्हता)

मयुरेश : यार ...अभि तुझ्या फ्रेंड चे वडील खुप छान आहे रे... किती छान सोय केलीयेणा आपली...

(सगळे एकत्र ...होणा)

अभिषेक :ए ऐकना आता सगळे लवकर फ्रेश व्हा आपल्याला परत dj एन्जॉय करायचाय... ओक

(सगळे फ्रेश होण्या साठी तयार असतात)


अजित: (सगळ्यांच्या बॅग चेक करत असतो)अरे ही लेडीज पर्स कोणाची आहे...

नंदु :बघु (अरे ही तर आपल्या ग्रुप मधलीच असेना कोणाची तरी)जा तु जाऊन देऊन ये त्यांच्या रूम वर

अजित : मी ...नको नको...तुम्ही कोणी पण जा ना...मी नको

नंदु : ( हळुच कानात बोलतो) अरे असा के कारतोयस तु त्यांच्या रूम वर गेलास तर करुणा भेटेन तुला ..तु जा बिनधास्त...आणि बोलून टाक मनातलं सगळं

अजित :तु बोल्तोयस ते बरोबरे पण अरे ह्या वेळेला कस बोलु

नंदु :ह्या साठी पण वेळ काळ लागतो तुला... तिला प्रपोज करताना तुझ्या बाजूला बँड वाजवू मी(मुद्दामुन रागात)

अजित :नाय ...नको ...जातो मी

नंदु :गुड बॉय

@@@@@@@@@@@@@@@

अजित इकडे गर्ल्स रूम वर येतो

सगळ्या मुली इकडे फ्रेश होत असतात... तेवढ्यात त्यांच्या रूमची बेल वाजते

ध्रुवी :करुणा प्लिज बघणा कोणे ते

करुणा : हो आलेच

करुणा दार उघडते(दरवाज्यावर अजितला बघुन तिच्या हृदयाची धडधड वाढते)

अजित :ते तुमच्या कोणाची तरी बॅग आमच्या रूम मध्ये चुकुन आली होती...तीच द्यायला आलेलो

करुणा : हां... ओ... हां ..ही बॅग माझीचे
...थँक्स

अजित : नो...नो...इट्स ओक...(अजित जाण्यासाठी मागे वळतो ...पुढे जातो तसा मागे वळून बघतो ...कारण करुणा तिच्या आहे त्या जागेवरच उभी राहवुन अजितला न्हयाळत असते)

अजित :ते माझं थोडं काम आहे तुझ्या कडे

करुणा :हा बोलणं

अजित: इकडे... नको ...आपण नंतर खाली भेटु... तेव्हा बोलु ...तुला चालेना....???

करुणा : मला ...हा हा चालेना...(मनात लाजतच)

अजित : अच्छा ठिके ...बाय

करुणा: बाय

@@@@@@@@@@@@@@@

इकडे रिचा तिच्या ड्राईव्हरला गाडी फास्ट चालवण्यासाठी जोर देत होती... तिला तेवढा राग पण आलेलाच...आणि त्यात तिचा कोणी कॉल पण उचलत नव्हते
@@@@@@@@@@@@@@@

सगळे जण मस्त फ्रेश होऊन खाली येतात
प्रत्येकाने छान असे शर्ट पॅन्ट घातलेले असतात

अजितने मस्त असा ट्रान्स्पेरंट ब्लॅक शर्ट घातलेला असतो..त्या शर्ट मधुन त्याचे पिळदार शरीर उठुन दिसत होतं

त्यात मुली सुद्धा काही मागे नसतात..त्यानी सुध्दा वन पीस घातलेला असतो

अभिषेक :करुणा कुठे...???

संगीता : येते ती..तिच्या आईचा कॉल आलेला ना...मगाशी तर ती त्यांच्याच बरोबर बोलते...ती बघ आली ती

(संगीताच्या बोलण्याने सगळे करुणा ला मागे वळुन बघतात)

करुणाने मस्त असा लॉंग रेड कलरचा वन पीस घातलेला असतो...त्यावर हलकासा मेकअप. .लाईट ब्राऊन लिपस्टिक.... कानामध्ये डायमंड एअरिंग
. .अजित तर तिला बघुन पुर्ण घायाळ होऊन जातो...
(सगळे मित्र मैत्रिणी एकमेकांची तारीफ करण्यात गुंग झालेले असतात)...आणि ही दोघे एकमेकांना चोरून बघण्यात

तेवढयात तिकडे मॅनेजर सागर येतात

सागर : हॅलो एव्हरिवन. ...

पंटर गॅंग :हॅलो...(एका जल्लोषात)

सागर : वाव... किती छान... तुम्ही आता सगळे खुप फ्रेश दिसतायत... हो ना...आणि आता नऊ सुध्दा वाजत आले आहेत.. सो मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे तुमची जेवणाची आणि dj ची सोय झालेली आहे...जेवणा मध्ये वेज नॉन वेज दोन्ही मिळेल... त्यात तुम्हि सगळे पुल साइड एन्जॉय करू शकतात... so all r ready...for this party..

पंटर गॅंग: येस सर

सगळे जण पुल साईडला निघतात

(पुल मस्त असा फ्लॉवर शेप मध्ये होता...त्यातले निळसर पाणी.. एक दम चमकत होत..जसे काही त्यात हिरे होते)

ध्रुवी : बापरे केवढा मोठा स्विमिंग पुल हा...मी तर कधी पहिलाच नव्हता

करुणा : हो ना मी सुद्धा...

ध्रुवी : ए चला आपण पाण्यामध्ये पाय सोडुन बसुया... खुप थंड वाटेनं

अभिषेक : ध्रुवी जा बेटा...जा...जी ले अपनी जिंदगी...(सगळे जण एकत्र हसतात)

(कसा वाटला आजचा भाग...नक्की कळवा तुमच्या कंमेंट मधुन)