
पार्ट 11
दोन तीन तासांच्या प्रवासामध्ये ड्राईव्हर काकांनी मुलांची परमिशन घेऊन एकाठिकाणी चहा साठी गाडी थांबवली
करुणा :ओ wow काय मस्त क्लाईमेट आहे ना...नक्की आज पाऊस पडणार...हो की नाही गाईज....??
मयुरेश :हो यार पडायला पाहिजे... काय मज्जा येईल यार
संगीता :ये तिकडे बघा... कणीसवाला...चलाना जाऊया... मला जाम भुक लागलीये...
नंदु : (हळुच मित्रांच्या कानात बोलतो...बघितला.... बघितला जिकडे कुठे काही खायचं दिसला ही चालु होते...नक्की हीला भसम्या झालाय)
नंदुच्या अश्या बोलण्याने सगळे मुले हळु हळु हसतात
संगीता :काय बोलास...परत बोल...काय बोलास...
नंदु :मी कुठं काय बोलो ...ते
....चल चल जाऊया ...चल
संगीता :तु आज काल खुप बोलतोस...(हलक्या रागातच)
ध्रुवी :ए ... ऐकना तू ना आपण रिसॉर्ट वर गेलो ना मग ह्याच काय करायचं ते कर... पण आता चल ...परत उशीर नको व्हायला
संगीता आणि नंदु दोघेपण एकमेकांना चिडवत कणीस खाण्यासाठी निघतात
@@@@@@@@@@@@@@
अजित : भैया... कितनेका दिया...
(पाच्चीस रुपये भाई)
नंदु : कुछ ज्यादा महाग नहि हे क्या... तुम्हारे पास
अभिषेक :एक तर मराठी बोल नाय तर हिंदी बोल
नंदु... मी मस्ती करतोय यार
अजित : कोई बात नहीं आप सबको देदो...
(गरम गरम कोळशाच्या शेगडीवरील कणीस हा हा हा हा...)त्या वर मस्त लिंबु रगडून तिखट मसाला लावलेला)
करुणा :किती गोड आहेना... यमम...
मयुरेश :तु ठीक आहेस ना...गोड म्हणे....अग तोंडातुन आग निघते माझ्या...
(भैया बोहोत ज्यादा मसाला लगाया आपणे)
अभिषेक :एक काम करो भाईया ...थोडा शखर लागाके दो(अभिषेक च्या अश्या बोलण्याने सगळे हसतात)
मयुरेश :मला पाणी घ्या रे कोणी तरी....
करुणा :हे घे
सगळे जण मस्त कणसाचा आनंद घेत होते...आणि इकडे अजित हळुच करुणाच्या ओठांकडे आकर्षित होत होता...कणीस खाताना तिचे ओठ हलकेच लाल झालेले...हवे मुळे ती सारखी केस मागे करत होती...त्यामध्ये तिची उत्सुकता... तिच्या पाणीदार डोळ्यातुन झळकत होती... तिच्या...वर नजर रोखुन तो तिला पहात होता... तीच पण लक्ष होताच त्याच्याकडे.. कदाचित तिला पण त्याच अस पाहणं आवडु लागलेला
(सगळ्यांची कणीस पार्टी करून झाल्यावर...सगळे जण चहाचा आस्वाद घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले)
@@@@@@@@@@@@@@
(करुणाच्या घरी)
कारुणाचे बाबा tv वर बातम्या बघत होते आणि आई संध्याकाळच्या स्वयंपाक करण्याच्या मागे
....अचानक दरवाज्यावर कोणी तरी बेल वाजवली
मधु :आहो ...जरा बघता का कोण आलं ते???
दत्तात्रय :हो... आलो आलो
(दरवाज्या उघडल्यावर समोरच्या व्यक्तीला पाहुन करुणाच्या वडिलांची तळ पायाची आग मस्तकात गेली
दत्तात्रय :तु ....तु इथे काय करतोयस(रागाने)
मधुकर : काय म्हणजे ...तुला नाही माहीत... मी का आलो इथे
(मधुकर दत्तात्रय चा मोठा भाऊ...म्हणजेच करूणचा चुलता)
दत्तात्रय : तुला कितीवेळा सांगितल इकडे नाही यायचं... एकदा सांगितलेली गोष्ट कळत नाही का(भडकून)
(हॉल मध्ये काही तरी गडबड चालू आहे ह्या आवाजाने मधु सुद्धा बाहेर आली)
मधुकर : तु मला किती पण अडवलं तरी मी येणार...
मधु : आवो भावोजी का असे वागतायत... त्यांना त्रास होईल ना...प्लिज तुम्ही जा... इथुन... आपण... नंतर बोलु
मधुकर : जातों ना मी...मी कुठे इथे थांबायला आलोय... पण मला जे हवं आहे ते तर द्या... मी नक्कीच जाईन इथुन...परत कधीच येणार नाही
(मधुकरच्या अश्या बोलण्याने दत्तात्रय भडकतात)
दत्तात्रय :अरे तु भाऊ आहेस का कोण.... अरे आपण एका रक्ताचे असुन सुद्धा किती अंतर आहे रे आपल्या मध्ये...छि... किळस वाटते मला तुझ्या अश्या वागण्याची....छि....
मधुकर : हो ...किळस वाटते तुला माझी...किळस... मग मला जे हवं आहे ते देऊन टाक मला.... मी नाही येत परत
...(क्रूर हसणं तोंडावर आनंतच)
दत्तात्रय :एक लक्षात ठेव... आज परेनंतर मी सगळं काही माझ्या मुली साठी सहन केला.. पण इथुन पुढे नाही करणार...
मधुकर :कोणासाठी? मुलींसाठी... हाहाहहहहह(जोरात हसत)अरे काय बोलतोयस तू हे ....तुला काय वाटतं... तु आज परेनंतर जी गोष्ट लापावतोय ती गोष्ट सहजच तुला अजुन लपवता येईल...???तुझी मुलगी माफ करेन...???.बोल...बोल...आता काय झालं... बोलती बंद झाली तुझी
....अरे एवढी सोपी गोष्ट नाहीयेरे दत्तात्रय ..
दत्तात्रय : मधु ह्याला सांग निघुन जायला... माझ्या घरातुन..
मधु : भावोजी ...प्लिज जा तुम्ही इथून ...नका आम्हाला त्रास देऊ ओ
मधुकर ...जातो जातो... पण परत नक्की येईन... विसरू नका... मी परत येईन...मला माहित होतं करुणा आज घरात नाहीये म्हणुन मी आलो होतो... पण एकदा तिच्या समोर येईन
(मधुकर निघून जातात... दत्तात्रय त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघुन जागीच गप्प बसतात)
मधु : अहो ...काय होतंय तुम्हाला...तुम्ही ठीक आहात ना...अहो...बोलाना... मी पाणी आणते तुमच्यासाठी
(मधु किचन मधुन पाणी आणते)
दत्तात्रय : काळजी नको करूस मधु... मी आहे ना...काही नाही होणार आपल्या करुणाला...
मधु :अजुन किती दिवस लपणारे ही गोष्ट तुम्हीच सांगा मला.. सांगुन टाकांना.. एकदाच
दत्तात्रय : नाही ...बिलकुल नाही... आणि परत परत हा विषय मला नको
(दत्तात्रय तसेच उठुन त्यांच्या रूम मध्ये गेले)
(कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)