पार्ट 59
दुसऱ्या दिवशी सगळ्या घरात लग्नाची धावपळ असते.......
अजितच्या घरी........
अजित : (पर्सनल सेक्रेटरी ला फोन वर सकाळी 6 वाजता)
एक काम कर सकाळी सकाळीच सगळे मीडिया वाले करुणाच्या घरी पोहोचतील......तर तु आधीच ससगले बॉडिगार्डस ची तिकडे व्यवस्था कर......कारण ह्या सगक्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन आहेत.......मला अस वाटतं तु आता लगेच ताबडतोब गार्डस ला तिच्या घरी पाठव.......उगाच सगळ्यांचा गोंधळ नको उडायला.........
सेक्रेटरी : हो नक्की..........सर मी आताच सगळी व्यवस्था करतो...........
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
करुणाच्या घरी.......
सकाळी 7 वाजता.......सगळे जण आवरायला घेतात.....तेव्हा करुणाचे बाबा..... बाहेर येऊन बघतात.....तर बऱ्याच अशा उंच उंच माणसांनी काळे कपडे आणि डोळ्यांवर गॉगल घातलेला त्यांना दिसतो.....
दत्तात्रय : मधु .....अग ये मधु.....ते बाहेर बघ ना .....किती तरी माणसे उभे आहेत काळ्या कपड्यांवर..........
करूणा डोळेचोळतच बाहेर येते....... तसे सगळे पाहुणे बाहेर येतात.....
करूणा : बाबा .....बाबा ....रिलॅक्स.... ते अजितने पाठवलेले बॉडीगार्ड आहेत......आता हे एवढ मोठं लग्न आहे.....त्या साठी आपल्या सुरक्षिते साठी त्यांना पाठवलं आहे......आणि त्यांनीच मला हॉल वर घेऊन जाण्यासाठी बुलेटफ्रुफ कार सुद्धा पाठवलीये........
दत्तात्रय :बर .........घाबरलो मी........जाऊदे.....चला आवरा सगळ्यांनी........ लवकर लवकर......
सगळे पाहुणे आवरायला घेतात........
करुणाची पार्लर वाली घरी येऊन तिचा मेकअप करते......तिच्या सोबत ती अजुन दोन तीन मुली सोबत आणते.....बाकीच्यांचा मेकअप करायला......
सगळे जण छान तयार होतात.........करूणा हिरव्या गडद पैठणी मध्ये.......नऊवारी साडी घालुन बाहेर येते..............तसे सगळे तिला बघतात.......ती आज खुपच खुलुन दिसत होती.........तिच्या चेहऱ्यावर तिचा आनंद स्पष्ट दिसत होता.........मधु करुणाला बघतच किचन मध्ये जाते......मंदा ला हे दिसत म्हणुन ती पण तिच्या मागे मागे जाते......
मंदा : समजु शकते मुलीला सासरी पाठवताना आईचा जीव कितीही घालमेलीत असतो.......मी पण मुलगी पाठवलीये सासरी......
मधु तशीच मागे वळुन मंदाच्या गळ्यात पडते.........
मंदा तिच्या पाठीवर हळुवार पणे हात फिरवते......अग आईची मायाच अशी असते........काय करणार.......मुलगी नाहीतरी परकी च असते.......एक ना एक दिवस जिथं तीच नशीब लिहलय तिथंच जाणार.......
मधु : हो ताई.......कुणाच्याच हातात नाहीये......हे सगळं.......पण आज ह्या गोष्टींचा आनंद सुद्धा आहे की तीने कधी आमचा मान सन्मान दुखावला नाही.......माझं तर ठिके......पण ह्याना कस आवरायचं......तेच कळत नाही......
मंदा : काळजी नको करुस............होईल सगळं व्यवस्थित.....
(तेवढ्यात किचन मध्ये सुवर्णा येते......आता रडुन झालं असें तर बाहेर या.......फोटो वाला बोलावतोय सगळ्याना.......फॅमिली फ़ोटो साठी)
मंदा : चल पुढे.......येतो आम्ही......
सुवर्णा :आणि प्लिज रडु नका रे......आता......तो मेकअप खराब होईल........
मंदा आणि मधु दोघी डोळे पुसतच बाहेर जातात.....तिकडे आधीच करूणा आणि तिच्या बाबांचा फोटो शुट सुरू असतो......मधु लांबुनच परत थोडी हळवी होते.......मंदा परत तिचा हात पकडत तिला शांत रहायला सांगते......
फोटोग्राफर सगळ्यांना एक फॅमिली फोटो साठी एकत्र बोलावतो...........सगळे गोड स्माईल देऊन फोटो काढतात.. .
बॉडिगार्ड : सॉरी मॅम तुम्हाला डिस्टर्ब केलं.....पण आपल्याला निघावं लागेन........मला कॉल आला सरांचा.......आणि पुढे बरीच मीडिया वाल्यांची गर्दी जमलीये.....म्हणुन हॉल जवळ पोहोचता पोहोचता एक तास तरी लागेल......
दत्तात्रय : अरे बापरे.......चला मग.......निघुया.......
करूणा जाण्यासाठी निघते तशी ती पुर्ण घरभर तिची नजर फिरवते........तिच्या डोळ्या समोर तिला तीच बालपण आठवत.....तस चटकन तिच्या डोळ्यात पाणी येत......
निशा : अग निशा रडु नकोस सगळा मेकअप खराब होईल......एवढी मेहनत वाया जाईल ना.....
निशाच्या बोलण्यावर......तिला थोडं हसु येत......तिच्या बाजुला उभे असलेल्या बाबांचा ती हात पकडते.......बाबा सुद्धा कसे तरी स्वतःच रडणं कंट्रोल करत तिचा हात पकडत कार मध्ये बसवतात........आणि ते सगळे सुद्धा त्यांना पाठवलेल्या कार मध्ये बसुन निघतात......
बाहेर भरपुर मीडिया वाले असतात........ सगळी कडुन त्यांच्या कारला बॉडीगार्ड ने विखळा घातलेला......असतो..........
मंदा : बापरे......काल परेनंतर जो रस्ता अगदी मोकळा होता.....आज बघा कसा गजबजून भरलाय.......
अश्विनी : हो ना......किती फोटो काढतायत सगळे......आपल्या सगळ्यांचा..... काही म्हण आई .... एका फिल्मस्टार सारख वाटतंय मला........
मंदा :हो ना......ह्या फोटोच्या लाईटीने मला तर समोरच काही दिसतच नाही.........
सुवर्णा : हो ना.....ताई हा बघ टीव्ही .....थांब मी चालु करते......
अश्विनी : वेडी झालीस का.......लग्न आहे आणि तुला काय ग असलं भलतेच उद्योग सुचतात...... .
सुवर्णा : अग मग काय करू.....इथल्या इथेच हॉल आहे....पण बघ ना किती वेळ लागतोय.......जाऊदे मी झोपते कार मधेच.......नाहीतरी मस्त गादिसारखी.......मऊ मऊ सीट आहे ह्याची.....
मंदा : (वैतागुण)....एक काम कर उतर आताच्या आता ह्या गाडीतुन..... चालत जा......हॉल वर.......मगास पासुन बघते......तोंडाला जरा पण आराम नाही तुझ्या........
सुवर्णा : आता मी काय केलं.......(तोंड वाकड करत)
अश्विनी : ये माझी आई चुप बस...... जरा......
थोड्याच हॉलच्या जवळ पोहोचल्यावर बॉडीगार्ड करुणाला सोडुन तिच्या घरच्यांना गाडीबाहेर यायला सांगतात...........कुणाला काहीच माहिती नसत पुढे काय होणार ते......
मधु : आहो ऐकलं का(हळू आवाजात) त्या माणसाला विचारांना का उतरवलं आम्हाला......
दत्तात्रय एक नजर त्या बॉडिगार्ड वर फिरवतो......
दत्तात्रय : तुला वेदबीड लागलंय का.....तो बघ कसा बघतोय......नाहीतरी कुठं दिसतंय मला त्याच्या त्या काळ्या चष्म्यातुन...... घरापासुन जेव्हा निघालोय ना आपण तेव्हापासुन एक पण बॉडीगार्ड हसला नाय माझ्या बरोबर..........आणि ते बघ तो केवढा मोठा उंच आहे......माझा आवाज पण जाणार नाय त्याच्या परेनंतर....
मधु :धड एक काम होत नाय तुमच्याकडुन(वैतागुन)
तेवढ्यात समोरून फुलांनी सजवलेली डोली येते......आणि त्याबरोबर अजितचे आईवडील सुद्धा
दोन्ही घरचे व्याही एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना नमस्कार करतात.........
कल्पना : मीच सांगितलेलं सगळ्याना उतरवायला..........ते करुणाला डोलीमधुन हॉल परेनंतर न्हयायच होत म्हणुन..........
मधु : ओ अच्छा......काही हरकत नाही........
कल्पना : अजित समोरच गोड्यावर चढुन बसलाय........तो येईलच थोड्यावेळाने तो परेनंतर करुणाला बसवा......
मधु : हो नक्की......(मधु सगळ्या बहिणींना सांगुन करुणाला डोली मध्ये बसायला सांगते) करूणा जशी कारमधुन उतरते तसे सगळे मिडियावले .....तिच्या एक एक फोटो साठी तुटुन पडतात......सगळे बॉडीगार्ड त्यांना हँडल करतात........करूणा हळुच डोलीमध्ये जाऊन बसते.........
थोड्याच वेळात अजित सफेद रंगाच्या शाही घोड्यावरून येतो
त्याचा चेहरा सगळा फुलांच्या माळांनी झाकलेला असतो.......त्याच्या मागुनच सगळे ढोल ताशे वाजवत येतात...........कल्पना सगळ्यांचा हात धरून नाचायला आणते.....तेवढ्यात करुणाच्या डोली जवळ तिची पंटर गॅंग येते......
ध्रुवी : काय मग मॅडम....कस वाटतय....
करूणा : तुंही सगळे इकडे कधी8 पोहोचलात.....
संगिता : आम्ही सकाळीच पोहीचलो.....अजितने आम्हाला आधीच त्याच्या घरी बोलावलेलं..... म्हणुन आम्ही सगळी गॅंग सकाळपासुन इकडेच आहोत.....ते बघ ते तिघे कसे नाचतायत......... करूणा हळूच बाहेर मान काढुन सगळ्याना बघते..........सगळे आनंदात नाचत असतात.........अजितला त्याचे मित्र खांद्यावर घेऊन नाचतात......
मयुरेश इशाऱ्याने दोघींना नाचायला बोलावतो.....तशा दोघी क्षणांचा विलंब न करता पळतात......बरेच सेलिब्रिटी सुद्धा त्यांना जॉईन होतात..........नंतर एक साथ अजितचा घोडा आणि करुणाची डोली बाजुबाजूला आणुन त्यांना हॉल परेनंतर न्हेतात.......आजच रूप बघुन अजित करुणावर पूर्ण घायाळ होतो......आज तीच सौंदर्य अगदी शाही परिवाराला शोभेल अस होत........दोघांची नजरा नजर होते तशी करूणा लाजुन मान खाली घालते.........अजित सुद्धा त्याच्या सदऱ्यामध्ये खुलुन दिसत होता........त्याचे रूप अजुन देखणं दिसत होतं.......दोघेही शाही तुतारी वाजल्यानंतर खाली उतरतात.........
करुणाची आत्या त्या दोघांना ओवाळुन आत यायला सांगते...........अजित कारुणाचा हात पकडुन तिला स्टेज जवळ न्हेतो........अजित ला आधीच ब्राम्हण स्टेज वर जायला सांगतो...........ब्राम्हणाच्या सांगण्यावरून कारुणाचा मामा तिला उचलुन पाच पाऊलानी स्टेज वर आणतो......... दोन्ही मामा त्यांच्या त्यांच्या भाची आणि भाच्याच्या मागे उभे असतात..........
ब्राह्मण : हे पान तोंडामध्ये दाबुन ठेवा.....खाऊ नका......मंगक अष्टका संपल्यावर काढून टाकायचं......
दोघेही तोंडात पण धरतात......... दोघांच्या मध्ये अंतर पाठ आखला जातो..........
थोड्याच वेळात मंगल अष्टका सुरू होतात
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
मंगल अष्टका जशी संपन्न होतात.....तसे करुणाचे घरचे भावुक होतात.....आज तर बाबांची अश्रु थांबायचे नावच घेत नसतात........दोघांच्या हातात ब्राम्हण हार देतो.......अजित करुणाला हार घालणार तोच मयुरेश आणि अभिषेक तिला खांद्यावर उचलुन घेतात.........अजितच्या घरचे सुद्धा त्याला खांद्यावर उचलुन घेतात........दोघे पण कोण पहिला हार घालणार ह्याच्या आनंदाने खूप एक्साईटेड होतात......सर्वात आधी करूनाच अजितला हार घालते..........नंतर अजित लांबुनच तिच्या गाळ्यात हार
घालतो .....दोघांनाही खांद्यावरून खाली उतरवतात.........थोड्याच वेळात ब्राह्मण मंत्र बोलुन त्यांच्या सगळ्या विधी पूर्ण करतात.........शेवटी मंगळसुत्र घालायची वेळ येते... ......मंगळसुत्र घालताना अजित हळूच तिला डोळा मारतो......करूणा सुद्धा लाजुन मान खाली घालते........तिच्या भांगात सौभाग्याच कुंकु भरताना......नकळत करुणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात.....आज तिच्या चेहऱ्यावर तीच प्रेम सफल झाल्याच समाधान होत......हे नकळत झालेलं प्रेम....... आज त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांनी केलेल्या प्रेमाची कबुली देत होत.........
सगळ्या विधी सुखरूप पणे पार होतात ......करुणाला भाऊ नसल्यामुळे.........मयुरेश अभिषेक आणि नंदु ह्या तिघांनी मिळुन तिचा भाऊ बनुन त्यांचे विधी पूर्ण केलेले असतात...........कन्यादान करताना......मधु आणि दत्तात्रय खुप भावुक होतात.........सगळे जण. थोड्या वेळाने जेवायला जातात......अजित आणि करूणा दोघांना घास भरवतात........दोन्ही घरातले व्याही एकमेकांना घास भरवतात.......... आजच्याच दिवशी सेम हॉटेल वर संध्याकाळी सात च्या सुमारास रिसेप्शन असत........त्यामुळे त्याच हॉटेल वर सगळे पुन्हा रिसेप्शन ची तयारी करायला जातात...........बाहेर लग्नापेक्षा दुप्पट रिसेप्शन ला पाहुणे येतात.............सगळे सेलिब्रिटी सगळे.....मोठं मोठे नामवंत डिझाईनर्स ह्या रिसेप्शन ला त्यांची हजेरी लावतात.........खुप ठिकाणचे नेते सुद्धा ह्या रिसेप्शन ला येतात.....आजचा दिवस कुठच्या कुठे पळुन जातो काहीच कळत नाही........रिसेप्शन ची थीम सुद्धा वेगळी असते......त्या प्रमाणे गोल्डन अँड सिल्वर विथ व्हाईट फ्लॉवर ने त्यांचं हॉटेल सजवलं जात.......करूणा आणि अजितचे काही क्षण फोटोग्राफी मध्ये टिपले जातात........सगळे जण त्यांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा द्यायला स्टेज वर येतात......रात्री अकराच्या सुमारास ते दोघे त्यांच्या फॅमिली सोबत हॉटेल बाहेर येतात......सगळे मीडिया वाले त्यांच्या एका झलक साठी थांबलेली असते.......करूणा आणि तिच्या फॅमिली साठी तर हे सगळं नवीनच असत......पण बिना कोणत्या निसंकोच पणे ते सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेतात......खुप उशिरा परेनंतर रिसेप्शन संपल्यानंतर....... करुणाची सासरी निघण्याची वेळ येते........सगळेच तिच्या निघण्याने भावुक होतात.....करुणाचे बाबा एका खुर्ची वर बसतात......आज त्यांचा जीवाचा तुकडा त्यांच्या पासुन दूर जात होता..... करूणा तिच्या बाबाना जवळ येते
करूणा : बाबा.......माझ्याकडे बघा......(दत्तात्रय त्याचे डोळे बंद करून बसतात)बाबा.....प्लिज.....माझ्या कडे एकदा बघा......
दत्तात्रय हळुच डोळे उघडतात.........
करूणा : आज तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळाल ना बाबा.......मी आज परेनंतर जे काही मगितल ते तुम्ही मला न काही बोलता आणुन दिल.....आज माझ्या बरोबर अजित आहे......ते सुद्धा तुमच्या मुळे बाबा.......मी अजित मध्ये हमेशा तुम्हाला शोधलं........बाबा त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाहीये....... खुप खुश ठेवेल तो मला......तुम्ही खुश आहेत ना बाबा
दत्तात्रय : करुणाच्या गालावरून हात फिरवत....का नसणार मी खुश.......माझ्या मुलीने आज परेनंतर मला कधीच दुःख नाही दिले......म्हणेल तशी वागली......तु......आज खरच आमच्या दोघांना तुझ्या वरती खुप अभिमान वाटतो.........आणि आता रडायचं नाही.......फक्त हसत हसत आनंदात सासरी जायचं........आणि हो सगळ्यांची मन धरून रहा....कोणाला दुखवू नकोस.......(एवढं बोलुन दत्तात्रय करुणाच्या गळ्यात पडुन रडतात......)
मधु : आहो बस झालं.....नाहीतर तब्येत बिघडेन तुमची........
करूणा : करूणा तशीच तिच्या आईच्या गळ्यात पडुन रडते..........आई काळजी घे तुझी आणि बाबांची.......काही लागलं तर कॉल करत जा..........
मधु : तु आता आमचं टेन्शन नको घेऊस.....आम्ही सगळे बरे आहोत.....तु फक्त तुझ्या संसारात लक्ष दे......
करूणा तशीच तिच्या मोठ्या आईकडे वळते
मंदा : मला मान्य आहे........मी तुला माझ्यापासुन खुप लांब केलं.....पण माझी पण मजबुरी होती ग.......एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी तुला लांब ठेवण.......पण काय करणार नशीबा पुढे कुणाचं चालत........
करूणा :बरोबर बोलीस तु मोठी आई .......तु जर मला आज लांब नसत ठेवलं.....तर मला एवढे चांगले आई बाबा कसे भेटले असते...........तुझ्या प्रेमाची जाणीव कधी त्यांनी मला जाणूनच नाही दिली......मी समजु शकते तुझं दुःख....पण आता प्लिज सारख सारख ते नको आठवुस.....त्याने तुलाच त्रास होणार......(दोघी कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत रडत होत्या)
करुना अशीच सगळ्या बहिणींना आणि मित्र परिवाराला भेटुन तिच्या सासरी जायला निघते......सगळ्या बहिणी मिळुन तिला गाडीत बसवतात.........अजित सगळ्यांचा निरोप घेऊन.....निघतो
अजित : काळजी नका करू.......मी आहे करूणा बरोबर.........ती आज परेनंतर जशी होती तशीच मी तिला स्वीकार केल.....ती पुढे पण तुमची करुणाच राहणार...... येतो आम्ही.....(हसत) नमस्कार करतो
सगळे जण एकमेकांना नमस्कार करतात.....आणि हसत खेळत त्या दोघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतात
(काय मग कसा वाटला माझा अंतिम पार्ट..... नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे.......वाचकाहो.....माझ्या ह्या पहिल्या स्टोरीला तुम्ही खुप छान प्रतिसाद दिला त्या बद्दल मी तुमची आभारी आहे.........माझ्या कडुन काही चुकलं असें तर मी क्षमा मागते.....अजुन तुम्हाला माझ्याकडुन कोणत्या स्टोरी वाचायला आवडेन नक्की सांगा.....मी नक्की प्रयत्न करेन....धन्यवाद)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा