Jan 27, 2021
प्रेम

,चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 9

Read Later
,चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 9


पार्ट 9

इकडे सगळे कँटीन मधुन थोडं फार खाऊन आप आपल्या घरी निघतात

@@@@@@@@@@@@@@@

(करुणाच्या घरी) सगळे जण रात्री एकत्र जेवत असतात

करुणा : (काळजीच्या स्वरात)आई बाबा मला जरा बोलायचं होत

आई: हा बोलणं

करुणा : बाबा ते आमच्या टीचरस से पिकनिक ऑर्गनायझ केली आहे... दोन दिवस...खंडाळा ठिकाणी (जरा घाबरतच)

बाबा : हा मग.... (मुद्दाम तिला घाबरवण्यासाठी)

करुणा : ते मी अजुन पण नाहीच बोले पिकनिक ला...पण ते सगळे मला जबरदस्ती करतायत

बाबा :ते सगळे???ते सगळे कोण???

करुणा : ते माझे मित्र मैत्रिणी ....

बाबा : तुला नाही जायचं तर नको बोल....

करुणा :आ .....तस नाही बाबा ... मला जायचं आहे.....(रडक्या स्वरात)

बाबा :(जोरात हसतात) अग मग जा बिनधास्त... कर मज्जा मस्ती...अग बाळा हेच तर दिवस असतात आपल्या आयुष्यातले... जे आपण आपल्या मनात साठवुन ठेवतो... तु आज एन्जॉय करशील उद्या तीच गोष्ट आठवून किती आनंद होईल तुला...हो की नाही... बरोबर ना मधु...???

मधू : अगदी बरोबर...बाबांनी तर परमिशन दिलीचे मग...बिनधास्त जा...पण तेवढीच काळजी पण घे...
(अग पण निघणार कधी आणि कसे)

करूणा : अग आई अभिषेक ने सगळी अरेंजमेन्ट केली आहे ...आम्ही सगळे तिकडे रिसॉर्ट वर जाणार आहे ...उद्या निघु दुपारी किंवा संध्याकाळी आणि परवा रात्री रिटर्न घरी

बाबा (दत्तात्रय ) वा छान... एका मुलीची मज्जा आहे बाबा....(मस्ती करत)

करुणा (हहहह हसत बाबा लव्ह यु बाबा)आणि बाबाना एक मिठी मारते...

त्या दोघांचे प्रेम बघुन मधुच्या डोळ्यात हलकस पाणी येत

(इकडे रात्री झोपताना करुणा तिच्या पंटर गॅंग च्या ग्रुप वर तिला परमिशन मिळाल्याची खबर देते)

तसे सगळे तिला गुड म्हणुन हॅपी वाला इमोजी पाठवतात...तिच्या मॅसेज मुळे अजितच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता तो अजितच्या आईने अजितच्या नकळत हेरला)

....अभिषेक ने इकडे रात्रीच उद्याचा टायमिंग ,जागा,इनोव्हा गाडी ची डिटेल पाठवली...सगळ्यानी तशी ती नमूद करून आप आपल्या घरच्यांना एक सेफ साइड लिहून दिला...रिचा ने सुद्धा जास्त काही न विचारता हो ला हो म्हणत गेली

@@@@@@@@@@@@@@@

(दुसऱ्या दिवशी)

अभिषेक चा सकाळी सकाळी सगळ्यांना मेसेज येतो

गुड मॉर्निंग पंटर गॅंग.... ठरल्या प्रमाणे आज आपण सगळे खंडाळ्याला जात आहोत.... पण प्लॅन मध्ये थोडाच चेंज करण्यात आला आहे... सगळ्यांनी दुपारी 12 वाजता मला टेकडीवरच्या कृष्ण मंदिराजवळ भेटावे....जर आपण दुपारी निघालो तर आपल्याला संध्याकाळी dj एन्जॉय करता येईन... टाइम वाचेन .... आणि दुसऱ्या दिवशी साठी राईड्स एन्जॉय करता येतील...आपला दिवस पण वाया जाणार नाही....प्लिज जर कोणाला काही अडचण असेन तर आताच सांगा

(अभिषेक चा मॅसेज वाचुन सगळ्यांनी आम्ही तयार आहोत ह्याची संमती दर्शवली)फक्त रीच्याचा काही रिप्लाय आला नव्हता)नाहीतरी तिला कुठे सकाळी सकाळी उठायची सवई......

रिचा काही रिप्लाय देत नाही म्हणुन अभिषेक ने तिला तीन चार वेळा कॉल सुद्धा केला...पण ती उचलेन तर....मॅडम मोबाईल सायलेंट वर ठेऊन झोपल्या होत्या....

@@@@@@@@@@@@@@@

इकडे अभिषेक च्या सांगण्यानुसार सगळे कृष्ण मंदिरा जवळ येतात

मयुरेश :ही रिचा का नाय आली अजुन ...????तिला डिटेल्स दिलेलीन तु(अभिषेक ला)

अभिषेक :अरे काय सांगु काल मी मेसेज केला तीने रिप्लाय नाय दिला मला.... म्हणुन कॉल केला तरी नाही उचला... हे बघ अजुन पण मी तिलाच कॉल करतोय... उचलत नाय यार ती ( काळजी च्या स्वरात)

ध्रुवी :तिला मोहितेना आपण आज जाणारे... मग एवढं कोणी हलगर्जी पणाने वागत का(जरा रागानेच)

नंदु : तुला रागावता पण येत(मुद्दाम चिडवण्यासाठी)

ध्रुवी :तू परत बोलास(रागात बघत बोलते)

सगळे एकदम हसतात

नंदु :मस्करी केली ग माझी आई..... माफ कर(हळुच हसतो)

करुणा :अजुन अजित पण नाय आलाना???

नंदू :तो बघ तिकडे चालत येतोय

अजित :सॉरी.... सॉरी गायझ... माझी कार मध्येच बंद पडली... सो म्हणुन थोडा लेट झाला

नंदु : अरे आम्हाला माहीत होतं तू येणार...पण करुणालाच तुझी काळजी वाटत होती...म्हणुन ती विचारत होती...हो ना करुणा

करुणा :नाही तस नाही.... ते मी सहजच विचारलं.... कारण सगळे आलेंना म्हणुन(जीभ चावतच )

(नंदुच्या अश्या बोलण्या अजित एक नजर प्रेमाने करुणा कडे बघत बसतो...ती पण तिची नजर चोरत असते).....

(नंदू सुद्धा अजितला नजरेने खुनवुन सांगतो बघ बघ तिच्या पण मनात आहे)

(अजित नजरेनेच बघु पुढच्या पुढे म्हणुन विषय टाळतो)

अभिषेक : चला मग निघुया....???

संगीता : अरे निघुया काय... त्या रीच्याच काय करायचं

अभिषेक: तिचं ती बघुन घेईन.... मी केलेला ना कॉल ...उचलायला काय होत

नंदु : अरे अस नको बोलुस... तिला के वाटेल

अभिषेक: तुला तिची काळजी वाट्तेना ...एक काम कर आम्ही सगळे निघतो ...तु ये तिला घेऊन

नंदु : (रागातच)तू का रे माझ्या मागे लागतोस

अभिषेक : अरे तुलाच तर पडलीये तिची फिकीर...टाइम बघ जरा ...एक वाजत आलाय...हिला काळात नाय का (रागातच)

अजित :एक एक एक मिनिट... तुम्ही दोघे शांत व्हा आधी... कश्याला उगाचच भांडतायत... असे नाराज चेहरे घेऊन जाणार का रिसॉर्ट ला...एक सांगुका पटलं तर बघा... नंदु अभिषेक ने रीच्याला बरेच कॉल ...मेसेज केले पण तिचा काही रिप्लाय आला नाही.... म्हणजे तिला काही इंटरेस्ट नसेन असा आपण सगळे गृहीत धरूया... तिला जर इंटरेस्ट असता तर तिने आपल्याला एखादा तरी रिप्लाय दिला असता ना...पण बघ ना काहीच रिस्पॉन्स नाहीये...बेटर आहे की आपण निघुया आता...परत तिकडे पोहोचायला चार ते पाच तास लागतील...ठिके

(सगळे होकारार्थी मान हलवतात)

अभिषेक :सॉरी यार नंदु ....तुला दुखवायचा मला हेतू नव्हता रे बट बघ ना....

(अभिषेक चा मधेच बोलणं तोडत)

नंदु :बस का यार...हीच का आपली दोस्ती...माझा पण हेतू तसा नव्हता रे

(हसतच दोघे पण एकमेकांना मिठी मारतात)

अजित :चला मग निघुया

(एका आवाजात सगळे जण ओरडतात येये ये ये ये.....)

सगळ्यानी आप आपली सामान गाडीच्या डीकीत ठेवली

इनोव्हा नऊ सीटर होती त्या मुळे अजित पूढे ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला
....त्याच्याच मागे करुणा... संगीता... ध्रुवी...आणि त्यांच्या मागे मयुरेश....नंदु ...अभिषेक

(प्रवास सुरु व्हायच्या आधी सगळे जण एकत्र गणपती बाप्पा मोरया म्हणून आप आपला आनंद व्यक्त केला)

(काय मग कसा वाटला आजचा भाग...नक्की तुमच्या कंमेंट द्वारे कळवा)