अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-१३

Khushi gets in trouble.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२- अबोल प्रीत

भाग-१३


पूर्वार्ध-

आपण आधीच्या भागात पाहिलं की, खुशी-विवेक मुळे नचिकेतला त्याची वर्तणूक बदलण्याची एक संधी मिळाली. नचिकेतच्या बाबांनीही तो बदलत नाही तोपर्यंत माफ करायचं नाही असं ठरवलं. खुशी ही विवेकच्या ग्रुपमध्ये हळूहळू मिसळायला लागली आहे. आता पुढे...

नचिकेत कॉलेज मध्ये आल्यापासून शांतच होता. त्याच्या बरोबर नेहमी असणारे त्याचे मित्र जॉन, संचित आणि रजत बरोबर तो आज नव्हता. तो एकटाच पुढच्या बेंचवर बसून होता. क्लासमध्ये त्याच्या अशा वागण्याने त्याने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं होतं. विवेक आणि त्याचे मित्र ही त्याचं अधून मधून निरीक्षण करत होते. लेक्चर्स संपली तसे सगळेजण क्लास मधून निघाले. फक्त नचिकेतच्या मित्रांनी त्याला अडवून धरलं.

संचित: हे नची मघासपासून बघतोय, काय असा शांत शांत आहेस...

जॉन: हां ना, चल मस्त बाईकरेस के लिए चलते है...

रजत: अरे, कुछ तो बोल... पुरा क्लास तेरी इस सन्नाटे से शॉक में था...

नचिकेत: प्लीज, मला नाही बोलायचं आहे यापुढे कोणाशीही.... 

रजत: लेकिन हम तो तेरे दोस्त है, हमसे भी बात नहीं कर सकता क्या...?

नचिकेत: रजत, प्लीज आज के बाद मुझे क्लास में किसी से बात नहीं करनी है... मुझे अकेला छोड दो... 

नचिकेत त्यांच्या बोलण्याची वाट न पाहता तिथून निघून गेला.

रजत: (निघून जाणाऱ्या नचिकेतकडे पाहत) ए जॉन, क्या हुआ है नची को...? ये ऐसे क्यू बिहेव कर रहा है...? मै कुछ दिन क्या छुट्टी के लिए गया, अपना नची एकदम बदल गया.. मुझे तो लगा था, इतने दिनो बाद मस्त पार्टी करेंगे, पब जायेंगे...

जॉन: अरे ये सब वो विवेक और वो लडकी कौन है संचित...

संचित: कुछ तो खुशी नाम है...

रजत: उनका क्या...? और ये खुशी कौन है...?

संचितने त्याला घडलेला प्रकार सांगितला.

रजत: व्हॉट, उसके पापा आए थे... लेकिन, केबिन में क्या हुआ...? वो उसने बताया क्या...?

जॉन: नहीं ना, कल वो केबिन में जो गया उसके बाद मिला ही नहीं हमें...

रजत: ये सब उन दोनों की वजह से हुआ है... उनको पता नहीं उन्होंने क्या किया है... अभी उनको पछताने का मौका भी नहीं मिलेगा...

जॉन: रजत, कुछ ऐसे मत कर की हम सबको कॉलेज से निकाल दिया जाए...

रजत: नहीं रे... तू देख सिर्फ मै क्या करता हूं अभी... किसी को शक नहीं होगा की ये हमने किया है...

संचित: तो फिर ठीक है... 

तिघे हसत हसत एकमेकांच्या हातावर हात ठेवत म्हणाले, "पहले मिशन खुशी...!"

***

खुशी लायब्ररीत अभ्यास करत बसली होती. संचितने हळूच रजतला खुशी कोण आहे ते दाखवलं आणि दोघे तिथून निघाले.

खुशी तिच्या नेहमीच्या वेळेला लायब्ररीमधून निघाली. संचित, जॉन आणि रजत तिघे तिचा लपून छपून पाठलाग करु लागले. 

खुशी घरी जायला निघण्यापूर्वी वॉशरूममध्ये गेली. वॉशरुमच्या आसपास कोणी येत नसल्याची खात्री रजतने करुन घेतली आणि जॉनला त्याने हळूच वॉशरुमच्या दाराची कडी लावून घ्यायला सांगितली. कोणी आपल्याला पाहत तर नाही आहे ना याची खात्री करुन घेत तिघेही तिथून निघाले.

***

खुशीने बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजाला कडी असल्याने तो उघडेना. तिने मदतीसाठी ही आवाज दिला पण बाहेर कोणीच नसल्याने कोणी यायचा प्रश्नच उरला नव्हता. आता काय करावं या विचारात तिने डोक्याला हात लावून घेतला. तेवढ्यात बॅगेतला तिचा मोबाईल वायब्रेट होऊ लागला. खुशबूचा कॉल बघून तिने लगेच कॉल उचलला.

खुशी: (टेन्शनमध्ये) हॅलो खुशबू...

खुशबू: किधर है, कबसे तुम्हारे कॉलेज के गेट के पास वेट कर रही हूँ...

खुशी: (टेन्शनमध्ये) खुशबू... मै

खुशबू: क्या हुआ... तुम्हारी आवाज ऐसे क्यू आ रही है...?

खुशीने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

खुशबू: व्हॉट, ऐसे कैसे... किसने किया है ये सब...

खुशी: मला नाही माहीत... मला इथून बाहेर काढ यार...

खुशबू: ओके ओके, टेन्शन नको घेऊ... मी येते... असं म्हणत तिने कॉल ठेवला आणि ती कॉलेजच्या एन्ट्रीकडे आली.

गार्ड: आयकार्ड कुठे आहे...?

खुशबू: माझ्याकडे आयकार्ड नाही आहे. पण माझं आत जाणं खूप गरजेचं आहे..

गार्ड: अशी कारणं चालणार नाही... आयकार्ड असेल तरच आत जायला मिळेल.

खुशबू: प्लीज काका, मला आत जाऊ द्या... 

गार्ड: बरं काय काम आहे ते सांगितल्या शिवाय आत जाता येणार नाही.

खुशबूला सांगावं की नाही ते समजेना. कोणाकडे मदत मागावी तर कशी ते ही तिला समजेना.

गार्ड: (तिच्यावर हसत) काही कारण सुचतं आहे का... ?  हे असं तुम्ही विद्यार्थी आयकार्ड विसरुन येतात आणि काही ना काही कारणं देत राहतात.

खुशबू: नाही काका, मी खरंच सांगते आहे... माझं खूप महत्त्वाचं काम आहे.

गार्ड: बरं, आयकार्ड घेऊन ये, मग पाठवतो तुला आत...

खुशबू थोडा वेळ तिथेच घुटमळत राहिली पण गार्ड काही ऐकायला तयार होईना. शेवटी न राहवून तिने खुशीला कॉल केला.

खुशी: हॅलो, कुठे आहेस तू...

खुशबू: अग मी आले कॉलेजमध्ये पण मला आयडी शिवाय आत नाही पाठवत आहेत.

खुशी: (डोक्याला हात लावून) हां इकडचे नियम... तू बघ ना कोणाला तरी सांगून... कोणती मुलगी तरी येऊन खोलूच शकेल ना...?

खुशबू: हां रुक देखती हूँ... म्हणत तिने कॉल ठेवला.

खुशीला कॉल ठेवल्यावर अमिषाची आठवण झाली. तिला कॉल करुन बघू का...? तिने मनात विचार करत लगेच तिला कॉल केला. The number you have dialed is currently not reachable... तिने वैतागत कॉल बंद केला.

खुशबूला कॉलेजच्या आवारात मुली दिसत तर होत्या पण कोण आपली मदत करेल हेच तिला कळत नव्हतं. तिला खूप वेळानंतर एक मुलगी दिसली. जी तिला मदत करेल असं तिला वाटत होतं. ती त्या मुलीला सांगत असतानाच संचितच्या कानावर त्यांचं संभाषण पडलं. संचितने लगेच खुशबू बोलत असलेल्या मुलीला आवाज दिला आणि तिला मॅम बोलवत आहेत अशी थाप मारत तिथून कॉलेजमध्ये जायला भाग पाडलं आणि संचित ही तिथून निघून गेला. आता पुन्हा खुशबू कोणाशी बोलावं याचा विचार करु लागली. आतापर्यंत तिला खुशीचं कॉलेज किती कडक पद्धतीने नियम पाळायला लावतं हे फक्त ऐकून माहीत होतं पण तिला आज अनुभव ही घ्यायला मिळाला होता.

***

खुशबूचा बराच वेळ झाला काही कॉल येईना तसं खुशीने पुन्हा एकदा अमिषाला कॉल लावून पाहिला. अजूनही तिचा नंबर नॉट रीचेबल दाखवत होता. आता कोणाला कॉल करावा याचाच ती विचार करु लागली. कॉलेजमध्ये ती अमिषा सोडून फार कोणाशी मिसळून वागलीच नसल्याने तिच्याकडे कोणाचाच नंबर घ्यायची वेळ आली नव्हती. नाही म्हणायला हल्ली विवेक आणि त्याच्या मित्रांशी तिची मैत्री झाली होती. तिने अखिलेशला कॉल केला तर त्याचा ही कॉल लागेना. जयला कॉल केला पण त्याने तो उचललाच नाही. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तिने विवेकला कॉल केला आणि तो आता ऑफिसमध्ये असेल हे आठवून तिने पटकन कॉल कट केला. पण तोपर्यंत विवेकला तिच्याकडून मिसकॉल गेला होता. खुशीचा मिसकॉल पाहून विवेकने लगेच कॉल केला. 

विवेक: हॅलो खुशी, तू कॉल केला होतास का...?

खुशी: हो, पण तू ऑफिसमध्ये आहेस ना... हे मला नंतर लक्षात आलं म्हणून कॉल कट केला.

विवेक: इट्स ओके, इतकं काय त्यात... पण सहज केला होता की काही काम होतं...?

खुशी: actually ते... 

विवेक: बोल ना.. काही प्रॉब्लेम आहे का..?

खुशी: प्रॉब्लेमच आहे खरं तर... मी ज्या वॉशरुममध्ये गेले होते ते बाहेरुन कोणीतरी लॉक केलं आहे.

विवेक: व्हॉट, तू आवाज नाही का दिलास कोणाला..?

खुशी: मी खूप आवाज दिला पण कोणी या दिशेने नसेल आलं...

मी अमिषाला ही कॉल केला पण तिला नेमका कॉल लागत नाही आहे... मी जय, अखिलेशला ही... पुढे तिला काही बोलवेना.

विवेक: ऐक रिलॅक्स, येतो मी... कोणत्या फ्लोअरला येऊ ते फक्त सांग.

खुशी: दुसऱ्या मजल्यावर... लायब्ररीच्याच खालच्या मजल्यावर.

विवेक: (थोडा विचार करून) अच्छा, ओके समजलं... येतो मी लगेच... 

खुशी: थँक यू...

विवेक: ते सगळं नंतर साठी ठेव... आता निघतो मी इथून... असं म्हणत त्याने कॉल ठेवला आणि तो सरांना लगेच येतो असं म्हणत ऑफिसमधल्या एका टीम मेम्बरची स्कूटी घेऊन कॉलेजमध्ये यायला निघाला.

***

खुशबूने खुशीला कॉल केला. खुशीने तिला विवेक तिकडे येत असल्याचं सांगितलं. हे ऐकून खुशबूचा ही जीव भांड्यात पडला.

विवेक घाईघाईने कॉलेजमध्ये आला आणि लागलीच खुशी असलेल्या फ्लोअरवर पोहचला. त्याने पाहिलं खरंच लेडीज वॉशरुमच्या दरवाजाला कडी लावलेली होती. त्या मजल्यावर फक्त केमिस्ट्री लॅब असल्याने तिकडे फार कोणाचं येणं जाणं नसायचं. त्याने लगेच वॉशरुमच्या दरवाजाची कडी उघडली. खुशी विवेक तिथे आलेला पाहून खूश झाली.

विवेक: (बाहेर पडलेल्या खुशीला) तुला याच वॉशरुम मध्ये यायचं होतं का...?

खुशी: म्हणजे...?

विवेक: अग म्हणजे इथे फक्त केमिस्ट्री प्रॅक्टिकल असतं आणि बाजूचे क्लास या वेळेला खालीच असतात. तेव्हा या लाईनला कोणीतरी असतं तर मदतीला आलं असतं ना. आणि तुझा आवाज ऎकायला येणार कोण मग इकडे.

खुशी: पण मग कडी लावली कोणी असेल... 

विवेक: मला वाटतं ती कोणीतरी चुकुन लावून गेलं असेल

खुशी: पण मी इतका वेळ अडकून बसले ना... माझी बहिण पण माझी वाट पाहत थांबली आहे.

विवेक: मग ती का नाही आली वर..?

खुशी: आयकार्ड लागतं ना आपल्या कॉलेजमध्ये एन्ट्री करताना...

विवेक: अरे हां विसरलोच होतो.. निघूया का आता? कोणीतरी मला नेमकं असं लेडीज कॉमनरुमकडे पाहिलं तर काहीतरी वेगळंच वाटेल... त्याचं बोलणं ऐकून खुशी जोरजोरात हसू लागली. तिला हसताना बघून त्याला ही हसू आवरेना.

खुशी: (हसणं आवरत) चल निघूया.

विवेक: हो हो चल.

दोघेही कॉलेजमधून बाहेर पडले. त्या दोघांना एकत्र पाहून जॉन, संचित आणि रजत यांचा राग अनावर झाला.

***

खुशी विवेक बरोबर खुशबू वाट पाहत असलेल्या ठिकाणी पोहचली. खुशीला समोर पाहून खुशबूने आनंदाने मिठीच मारली. 

खुशबू: (मिठीतून दूर होत) किती टेन्शनमध्ये आले होते मी...

किसने हेल्प की...?

खुशीने विवेककडे हात दाखवला.

खुशबू: हा कोण?

खुशी: (विवेककडे हात करुन) हा विवेक, यानेच कडी उघडली.

खुशबू: (विवेकसमोर हात पुढे करुन) मी खुशबू, खुशीची मामेबहीण, मी बाजूच्याच कॉलेजमध्ये शिकते आहे.

विवेक: अच्छा, नाईस टू मीट यू.

खुशबू: येस सेम हिअर.

विवेक: (खुशबूला) ओके बाय भेटू पुन्हा कधीतरी... ( मग खुशीकडे पाहून) चल बाय.

खुशी: हो बाय बाय. थँक यू विवेक.

विवेक: (हसून) तू थँक यू बोलणं कधी सोडणार...

त्याचं बोलणं ऐकून खुशी हसत हसत त्याला बाय करु लागली. तो स्कूटीवरून निघून गेला तरी खुशी तिथेच पाहत होती.

खुशबू: (तिच्याकडे हसून पाहत)तुझं बाय बाय करुन झालं असेल तर निघायचं का... की उद्या तो कॉलेजमध्ये येइपर्यंत थांबूया ?

खुशी: (भानावर येत) तुझं काहीतरीच असतं.. चल जाऊया घरी.

दोघी ही योगिताच्या घरुन नेहमी प्रमाणे बुरखा घालून त्यांच्या घरी जायला निघाल्या.

***

रात्री झोपताना

खुशबू: तू सांगितलं नाही खुशी की विवेक कसा काय मदतीला आला.

खुशी: अग तुझा काही कॉल नाही आला नंतर. मग मी अमिषा, अखिलेश आणि जयला केला पण कोणाला कॉल लागेना तर कोणी उचलेना. मग विवेकला लावला आणि मला आठवलं की तो ऑफिसमध्ये असणार. मग लगेच कट केला. त्यानंतर... त्याचाच कॉल आला.

खुशबू: वाह, तेरी मदत करने के लिए वो ऑफिस छोडके आया. (सीआयडी एसिपी प्रद्युम्न यांच्यासारखे हातवारे करत) कुछ तो गडबड है दया.

खुशी: कुछ भी गडबड नहीं है... तू बिना वजह दिमाग घुमा रही है... वो बंदा दोस्त ना होकर भी मेरी मदत कर रहा था... तो अभी तो हम दोस्त है... चल अभी चुपचाप सो जा

खुशबू: सोच तू, जब दोस्त नहीं था तब उसने तुम्हे इतनी हेल्प की. दोस्ती हो गयी तो वो ऑफिससे तुरंत आया तो दोस्ती के आगे अगर तुम दोनो बढ गये तो सोच वो तुम्हारी पर्वा कितनी करेगा.

खुशी: सो जा मेरी अम्मा... और मुझे भी सोने दे...

खुशबू: (हसत हसत मनात) वो दिन भी लेकिन जरुर आयेगा... 

***

क्रमशः

🎭 Series Post

View all