अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-१०

It is a story of two lovers who get separated before confessing their love feeling for each other. And after some years destiny is responsible for their meet.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२-अबोल प्रीत

भाग-१०


शरदच्या डोक्यात बदला घ्यायची भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालली होती. त्याला ठाऊक होतं की जयाला नक्की श्रीधर-श्रेया बद्दल काही ना काही माहीत असणार पण तिच्याकडून माहिती काढून घ्यायची तरी कशी... याच विचारात तो होता. त्याने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायला त्याच्याच गुंड मित्राची मदत घेतली होती. जयाला मात्र याची जरा ही कल्पना नव्हती.

***

खुशी, खुशबू नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाल्या.

खुशबू: (अर्ध्या रस्त्यात) ऐकना खुशी, योगिताकडून तुला एकटीलाच कॉलेजला जावं लागेल. मी तिथेच थांबणार आहे.

खुशी: का काय झालं...?

खुशबू: आज हमारे दो लेक्चर्स ऑफ है... तो मैं और योगी लेट जाएंगे थोडा...

खुशी: अरे ये बात थी, तर तू आधी सांगायचं होतं ना... उगाच माझ्यामुळे तुला पण लवकर निघावं लागलं नसतं.

खुशबू: ऐसे क्या कर रही है खुशी, घरवालों के लिए हम दोनो एक ही कॉलेज में है... विसरली की काय...?

खुशी: अरे हो, विसरलेच बघ मी...

खुशबू: तू जाशील ना मग योगीच्या घरुन कॉलेजमध्ये एकटी की, मी येऊ तुला सोडायला...?

खुशी: काय तू पण... योगिताच्या घरापासून थोडी ना कॉलेज जास्त लांब आहे आपलं.. जाईन मी एकटी डोन्ट वरी...

खुशबू: तो फिर ठीक है, पण तू मला कॉलेजमध्ये पोहचली की मेसेज कर...

खुशी: हो बाबा करते करते... अभी चले योगी के घर...

खुशबू: हां हां...

दोघी योगिताच्या घरी पोहचल्या. खुशीने घातलेला बुरखा बॅगेत भरला आणि खुशबू-योगिताला बाय बाय बोलून ती कॉलेजमध्ये जायला निघाली. 

***

योगिताचं घर कॉलेजपासून फार दूर नव्हतं पण नेमकं खुशीच्या डोक्यात घरी सांगितलेला शरदचा विषय आठवू लागला. रस्त्यात तिच्या लक्षात आलं की एक मुलगा तिचा पाठलाग करत आहे. तिने तिचा चालायचा वेग अजून वाढवला. चालताना तिच्या हातातलं आयडी कधी रस्त्यावर पडलं हे तिच्या लक्षात ही नाही आलं. ती कॉलेजपाशी पोहचली तेवढ्यात तिला खुशी म्हणून कोणीतरी आवाज दिला. तिने मागे वळून पाहिलं. विवेक तिच्या समोर उभा होता. आपला पाठलाग करणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून विवेकचं आहे असं तिला वाटून गेलं. रागाच्या भरात तिने बडबड करायला सुरवात केली.

खुशी: लाज नाही वाटत एका मुलीचा पाठलाग करायला... मी तुम्हाला एक चांगला मुलगा समजत होते पण नाही माझं थिंकिंग टोटली रॉन्ग होतं.

विवेक: एक मिनिट, बोलू देशील का मला...

खुशी: काय बोलायचं आहे आता... तुमची चोरी पकडली गेली तर आता नाटकं करुन दाखवणार आहात का...? दूर रहायचं... माझ्यापासून... 

विवेक: ए जा ग... कोण समजतेस तू स्वतःला... उचलली जीभ लावली टाळ्याला... तुझ्या सारख्या मुलींच्या मी नादी पण नाही लागत...

खुशी: माझ्या सारख्या मुली म्हणजे... म्हणायचं काय आहे तुला... खुशी भडकून त्याच्या जवळ येत म्हणाली.

विवेक: हेच हे असं सभ्यपणाचा आव आणून एका मुलाच्या जवळ येत बोलणाऱ्या मुली...

खुशी: यू... म्हणत खुशीने तिचा हात विवेकला मारण्यासाठी उचलला. विवेकने तो हवेतच असताना पकडला.

विवेक: हात मला ही पकडता येतो... विवेकने त्याच्या हाताची पकड घट्ट केली. खुशीचा हात दुखावून जाऊन तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण ती विवेक पुढे झुकली नाही. तिच्या डोळ्यांत आलेलं पाणी पाहून विवेकच्या ह्रदयात कालवाकालव झाली. त्याने त्या डोळ्यांकडे पाहतच तिचा हात हळूच सोडला. खुशी तिचा हात चोळत कॉलेजच्या गेटमध्ये शिरली. ती गेल्यावर विवेकला आठवलं की भांडण्याच्या नादात रस्त्यात पडलेला तिचा आयडी द्यायचाच राहिला. तो आयडीकडे पाहून विचार करत होता तोच त्याला अमिषा येताना दिसली.

अमिषा: तू आणि खुशी भांडत का होता...?

विवेक: ओह म्हणजे तू पाहिलं तर...

अमिषा: फक्त मीच नाही बाकीच्यानी पण पाहिलं. पण नेमकं काय झालं जे तुम्ही दोघे भांडत होतात...? सॉरी मी हे तुला स्पष्टचं विचारतेय...

विवेक: नो नो ईट्स ओके, तुझ्या फ्रेंडला असं वाटतं आहे की मी तिचा पाठलाग करत होतो...

अमिषा: ओके ओके, समजावते मी तिला... तू तसा एखाद्या मुलीला छेड काढणाऱ्यातला मुलगा नक्कीच वाटत नाही... 

विवेक: थँक यू, माझं एक काम करशील का...?

अमिषा: हां सांग ना...

विवेक: ऍक्चुअली तिचा रस्त्यात मला आयडी पडलेला दिसला तोच देण्यासाठी मी तिला आवाज दिला होता आणि पुढे तर तुला माहितीच आहे काय झालं ते... असं म्हणत त्याने तिला आयडी दिला. खरं तर मी पण रागाच्या भरात तिला नको ते बोललो.. पण मी खरंच तिचा पाठलाग नव्हतो करत...

अमिषा: येस येस आलं लक्षात... मी देते तिला आयडी... आणि तिचा झालेला गैरसमज पण दूर करते... 

विवेक: थँक यू... (नाव माहीत नसल्याने थोडा वेळ थांबला)

अमिषा: मी अमिषा...

विवेक: मी विवेक... थँक यू अमिषा...

अमिषा: चल बाय, मी निघते आता... विदाऊट आयडी तिला आत घेणार नाही...

विवेक: येस येस बाय

दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि अमिषा कॉलेजच्या गेटमध्ये शिरली तर विवेक अखिलेश आणि जयची वाट पाहत थांबला.

***

खुशीला अपेक्षेप्रमाणे कॉलेजमध्ये विदाऊट आयडी जाण्याची परवानगी मिळेना. तिने बाजूला एका कट्ट्यावर बसून पूर्ण बॅग शोधून काढली पण आयडी कुठेच मिळेना. अमिषा तिला शोधत शोधत तिच्यापाशी आली. खुशी अजूनही बॅग पुन्हा पुन्हा शोधून आठवण्याचा प्रयत्न करत होती.

अमिषा: झाला का आयडी शोधून... मिळाला का...

खुशी: (चमकून वर पाहिलं) तुला कसं माहिती... की मी आयडी शोधते आहे ते...?

अमिषा: कारण आयडी माझ्याकडे आहे. (अमिषाने आयडी तिच्या हातात दिला)

खुशी: (आनंदात) तुला कुठे मिळाला आयडी... (तिला मिठी मारत) थँक यू यार...

अमिषा: थँक यू मला नको विवेकला बोल...

खुशी: विवेक कोण...

अमिषा: विवेक तोच ज्याला तू पाठलाग करतोय असं समजून खूप काही बोललीस... तो तर तुला बिचारा रस्त्यात पडलेला आयडी द्यायला आला होता. आणि तू आहेस की त्याला नको नको ते बोललीस...

खुशी: (डोक्याला हात लावत) खरंच माझं चुकलं... अग मी कॉलेजमध्ये येत असताना कोणीतरी माझा पाठलाग करत होतं मग मी घाबरून फास्ट चालत आले.

अमिषा: (तिला बॅगमध्ये सामान भरायला मदत करत) तू बघितलं होतं का, कोण तुझा पाठलाग करत आहे ते...?

खुशी: नाही यार... मी मागे वळून पाहिलं की ती व्यक्ती लपायची... त्यामुळे मला कळलंच नाही की कोण होतं ते...

अमिषा: आणि तू त्याला झापलंस...

खुशी: सॉरी ना यार... चुकलंच माझं...

अमिषा: त्याला म्हण ग... तो पण म्हणत होता त्याचं पण चुकलं रागाच्या भरात तो पण तुला खूप काही बोलला म्हणून... चल इथेच बोलत बसणार आहेस का... लेक्चर्ससाठी नाही जायचं का...?

खुशी: (बॅग खांद्याला लावत) हो चल...

दोघी आयडी गळ्यात घालून लेक्चर्ससाठी निघून गेल्या.

***

जय, अखिलेश विवेकपाशी कॉलेजची बॅग घेऊन आले. विवेक त्याच्याच विचारात होता.

जय: विकी, काही मॅटर झाला का घरी...

विवेक: (भानावर येत) नाही रे... 

अखिलेश: मग असा हॅन्डसम चेहरा पडलेला का आहे तुझा..?

जय: हो ना... आपल्या क्लास मधल्या मुलींनी असा तुझा पडलेला चेहरा बघितला तर त्या तुझ्या काळजीने इथेच चक्कर येऊन पडतील.

विवेक: गप्प रे...

जय: पुन्हा भेटली का ती पायऱ्यावाली..

विवेक: तुला कसं माहिती... तुला कोणी सांगितलं का...?

अखिलेश: ओह म्हणजे भेटली तर...

विवेक: (थोडा वेळ गप्पच बसला) लेक्चर्सला नाही जायचं का...?

जय: (अखिलेशच्या हळूच कानात) बघ कसा टॉपिक बदलतोय...

विवेक: सांगतो तुम्हाला दोघांना नंतर... मग तर झालं... तसंही तुम्ही दोघेही एकदा एका गोष्टीच्या मागे लागलात की हात धूवूनच लागतात...

अखिलेश: (नाटकी स्वरात) तुला नसेल सांगायचं तर राहू दे...

मी आणि जय तुला काही फोर्स नाही करत आहोत...

विवेक: बरं... निघूया आता... उशीर होतोय...

दोघे: हो चल... तिघेही गळ्यात आयडी घालून कॉलेजमध्ये शिरले.

***

विवेक लेक्चर्स संपल्यावर आदल्या दिवशी ज्या वेळेला खुशीला लायब्ररीत भेटला होता त्याच वेळेत लायब्ररी मध्ये गेला. आज नेमकं खुशीचे एक्सट्रा काही लेक्चर्स होते त्यामुळे तिला लायब्ररीत जाणं शक्य झालं नाही. विवेक बराच वेळ तिची वाट पाहत थांबला पण त्याला त्याच्या ऑफिसमध्ये ही जायचं असल्याने तो तिथून निघाला. जय आणि अखिलेशला ही लेक्चर्समध्ये लक्षात येऊन गेलं होतं की ननक्कीच काहीतरी मोठा मॅटर झाला असणार त्याशिवाय विवेक इतका शांत शांत नाही राहणार. विवेक लायब्ररीत निघून गेला तेव्हा ते त्याच्या बरोबर न थांबता कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर त्याची वाट पाहत थांबले होते. दुरून त्यांना विवेक येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही निराशाच दिसत होती. तो त्यांच्या बरोबर बोलत न बसता त्यांना बाय बोलून त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. तो गेल्यावर जय आणि अखिलेश त्याच्याबद्दलच बोलत बसले. 

***

खुशी लेक्चर्स संपले तशी अमिषाला बाय बोलून लायब्ररीत निघून गेली. अमिषा ही अखिलेशला भेटण्यासाठी तिथून निघाली. खुशीने एकवार लायब्ररीत विवेक कुठे दिसतो आहे का ते पाहिलं. पण तो तिला कुठेही दिसेना. ती तिचे बुक्स घेऊन तिच्या नेहमीच्या ठिकाणी अभ्यासाला बसायला जातंच होती तोच तिच्या बॅगेतला मोबाईल  मेसेज नोटिफिकेशनने वायब्रेट होऊ लागला. तिने लायब्ररी बाहेर येऊन मेसेज वाचला. खूषबूने तिला कॉलेज मधून निघायला सांगितलं होतं. खुशबूचे लेक्चर्स आज फार नसल्याने ती तिचं काम करुन कॉलेज मधून निघाली होती. खुशी ही मग लायब्ररीत पुन्हा न जाता बुक्स बॅगेत ठेवत बाहेर पडली.

***

अमिषा अखिलेशला त्याच्या नेहमीच्या ठिकाणी भेटली. नेमकं विवेकबद्दलचं त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं.

अमिषा: तुम्ही दोघेही विवेकला ओळखतात का...?

अखिलेश: अरे फक्त ओळखत नाही आमचा तो जिगरी यार आहे. त्याच्या बरोबरच तर तुझी ओळख करुन द्यायची राहिली आहे.

अमिषा: ओह... आमची आजच तशी ओळख झाली. फक्त तुझा मित्र म्हणून ओळख नाही झाली. ती अजून बाकी आहे.

अखिलेश: एक मिनिट, तू कधी विकीला भेटली.

अमिषा: ते ना... म्हणत तिने सकाळी घडलेला सगळा प्रकार त्या दोघांना सांगितला.

जय: ओह तरीच आमचे विकी भाऊ आज खूपच अपसेट होते.

अमिषा: खुशी पण काही खुश नव्हती. ती तर लेक्चर्स कधी संपत आहेत आणि त्याला जाऊन सॉरी कधी म्हणतेय याचीच वाट पाहत होती. आणि नेमकं आज नायर सरांनी दोन एक्सट्रा लेक्चर्स घेतले.

अखिलेश: ओह तरीच विवेकचा कॉलेजमधून बाहेर पडते वेळीही चेहरा पडलेला होता.

जय: अरे ती बघ ती तुझी फ्रेंड खुशी घरी जायला निघाली.

अमिषा: अरे हो रे... जास्तच मनाला लागलं वाटतं तिच्या सकाळी जे झालं ते...

अखिलेश, जय: हं, आमच्या मित्राच्या पण...

अमिषा: मी काय म्हणते या दोघांची ओळख करुन देऊया का एकमेकांशी...

अखिलेश: इतक्यात नको, बघूया तरी ते एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी काय करत आहेत ते... आणि त्या आधी मला तुझी त्याच्या बरोबर ओळख करुन द्यायला हवी.

अमिषा: हं राईट... निघूया का आता...?

अखिलेश: हो निघूया ना... म्हणत अखिलेश-अमिषा जयला बाय करुन निघाले तर जय त्याच्या घरच्या रस्त्याने निघाला.

***

खुशी खुशबूला तिच्या नेहमीच्या ठिकाणी भेटली. खुशी गप्प गप्प आहे हे खुशबूच्या लक्षात आलं पण तिच्या बरोबर योगिता ही असल्याने तिने खुशीला त्याबद्दल नंतर विचारायचं मनाशी ठरवलं. तिघी ही नेहमीप्रमाणे योगिताच्या घरी जाऊन त्यांचा बुरखा घालून त्यांच्या घरी जायला निघाल्या. रस्त्यात खुशी पुन्हा शांतच होती.

खुशबू: खुशी, मैने तुझे कॉलेज में पहुंच ने के बाद मेसेज करने के लिए बोला था ना... मैं कितनी देर तक तुम्हारे मेसेज का वेट कर रही थी.

खुशी: सॉरी यार... कॉलेजमध्ये जाताना रस्त्यात जे घडलं त्या नंतर मी तुला मेसेज करायचं पूर्ण विसरुन गेले.

खुशबू: काय घडलं...?

खुशीने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

खुशबू: या अल्लाह... खुशी कौन रहेगा जो तुम्हारा पिछा कर रहा था... मला तर आता खरंच खूप टेन्शन आलंय...

खुशी: प्लीज घरी काही सांगू नकोस, तुला तर माहिती आहे ते उगाच काळजी करत बसतील...

खुशबू: हां, आणि आपण दोघी वेगवेगवेगळ्या कॉलेज मध्ये आहोत हे पण त्यांना कळेल... हमारी ही गलती थी, मीच तुला एकटं जाऊ दिलं...

खुशी: अग कशाला स्वतःला ब्लेम करतेय... ये तो मेरा भी डीसीजन था ना...

खुशबू: फिर तुमने उस लडके को सॉरी कहा क्या...?

खुशी: हम नहीं मिल पाए... लेकिन कल हम पक्का उसे सॉरी कहेंगे..

खुशबू: हां... अभी घर पे किसी को कुछ पता ना चले ऐसे ही बिहेव करना...

खुशी: हां...

दोघी एकमेकांशी बोलत बोलत घरापाशी आल्या.

***

रात्री खुशीचं जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हतं.

फातिमा: खुशी बेटा, तबीयत ठीक है ना आपकी... आप खाना क्यूँ नहीं खा रहे हो...?

खुशबू: वो क्या है अम्मी, कल हमारे क्लास में एक टेस्ट है तो खुशी उसी बात के टेंशन में है... हां ना खुशी...?

खुशी: जी हां...

नूर: टेस्ट तर होतच असतात त्याचा जेवणावर परिणाम करु द्यायचा नसतो...

खुशी: हो आई म्हणत खुशीने भरभर तिचं जेवण आटपलं आणि ती तिच्या आणि खुशबूच्या रुममध्ये आली.

खुशबू: (रूमचा दरवाजा बंद करत) आज हम दोनो ही मरते थे... तुला म्हणाले होते ना मी, की एकदम नॉर्मल वाग... पण नाही...

खुशी: खुशबू, माझं चुकलंच, मी इतकं बोलायला नको होतं त्या मुलाला...

खुशबू: या अल्लाह, तू अजूनही त्याच विचारात आहेस...  आता काहीही करुन उद्या त्याला सॉरी बोल... नाहीतर उद्या पण त्याच गोष्टीचा विचार करत बसशील. चल अभि सो जा... म्हणत खुशबू बेडवर झोपली. खुशी पण मग तिच्या बाजूला उद्या सॉरी कसं बोलायचं याचा विचार करत झोपली.

***

विवेक घरी आल्यापासून शांतच होता. प्रेरणाने त्याला रात्री जेवून झाल्यावर त्याच्या रुममध्ये जाऊन हटकलच.

प्रेरणा: विकी, काय रे काय झालं...? घरी आल्यापासून बघतेय तू शांत शांतच आहे.

विवेक: दीदी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील

प्रेरणा: हां विचार ना...

विवेक: जर तू एखाद्याला रागात खूप नको नको ते बोललीस तर त्याला सॉरी कसं म्हणतेस...?

प्रेरणा: आपलं चुकलं आहे या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली की आपोआप सॉरी बोलायची हिंमत येते.

विवेक: पण त्या व्यक्तीने सॉरी accept नाही केलं तर...?

प्रेरणा: मग काय पुन्हा पुन्हा सॉरी म्हणायचं... कधीतरी ती व्यक्ती accept करेलच ना तुझं सॉरी..

विवेकने हे ऐकून प्रेरणाला मिठी मारली.

प्रेरणा: नक्की तुला सॉरी कोणाला म्हणायचं आहे अखिलेश की जय बरोबर भांडलास...

विवेक: दीदी, बोलू की नंतर, चल गुड नाईट... म्हणत तो लगेच बेडवर झोपला.

प्रेरणा ही त्याला गुड नाईट म्हणत तिच्या रुममध्ये निघून गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all