उरातील हुंदका..❤️❤️

A Blog On Tears


खरतरं , या प्रश्नांची उत्तरं मिळणं काही सहजासहजी शक्य नाही. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यालाच त्या खोलवर समुद्रात उडी मारावी लागते.उत्तरं मिळाली तर ठिक...नाहीतर समुद्रात उडी मारून बुडाल्याचाच भास होत राहतो.अहो ,अचानक धो धो कोसळत असलेला पाऊस मध्येच थांबला तर त्याचं काही विशेष वाटत नाही पण अशी अचानक शब्दांना चिमटीत पकडणारी व्यक्ती जर कायमची निःशब्द झाली तर मन आतून तुटतं.....चुरा होतो ओ त्याचा...! मन तुटत रहातं ,आतल्या आत रडत राहतं....त्यांच्या अशा वागण्यामुळे.


उरी फाटलय आभाळ वेदनांच


         पण मन शांत आहे....

हल्ली पापण्याही मिटत नाहीत....

         इतकीच खंत आहे...!!


आता समजून घेणही समजण्याच्या पलिकडे गेलय.त्यांच्या अशा वागण्यामुळे मनाला ईतक्या वेदना होतात की काही विचारायलाच नको.पण इतक्या वेदना होऊनही मन मात्र अगदी पाण्यासारख शांत आहे. मन शांत आहे वाटलं जरा झोप लागेल दुःखातही सुखाची....पण नाहीच...कसलं काय माझ्या पापण्या ही मिटायला तयार नसतात हल्ली.... (त्यांच्यामुळे) आणि इतकीच माझी त्या जीवापाड जपलेल्या पण कुठेतरी हरवलेल्या हक्काच्या फुलांकडे तक्रार आहे.

   
काय झालय काही थांगपत्ता नाही. कधी झालं तेही कळालं नाही. तुमच्या वाटा नक्की कुठे हरवल्यात काहीच कळेनासं झालयं बघा.....अगदी "उसवले धागे कसे कधी? सैल झाली गाठ...
पावलांना ही कळेना का हरवली वाट? " या गाण्यासारखीच अवस्था झालेय.पण जाताजाता इतकच सांगेन त्यांना की ,उरलेले श्वास  झुरतायत केवळ तुमच्यासाठी...तुम्ही आल्याशिवाय हे श्वास मावळणार नाहीत.............पुन्हा परत फिरा.....एकदा तरी...मला सुर्योदय होताना पहायचय.......!!

     उरातील हुंदका लिहून मोकळा केलाय...त्याला वाटा मिळाव्या इतकीच कणभर अपेक्षा.....! ??

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे✍️

🎭 Series Post

View all