Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

उणीव

Read Later
उणीव


विषय_दोन धृवावर दोघे आपण
कवितेचे नाव _ उणीव

राज्य स्तरीय करंडक कविता स्पर्धा फेरी २

दोन धृवांवर दोघे आपण
तू तिकडे अन् मी इकडे
काय करावे समजेना आता
मृगजळ आहे चोहीकडे......१

दिवस असो वा रात्र सारी
उणीव तुझी भासते मजला रे
प्रेमाचे रंग भरण्यासाठी
कधी भेटू सांग सजना रे....२

संपता संपत नाही हा कठीण काळ
कर्तव्यदक्ष पालक आहोत आपण
रथ कुटुंबाचा ओढण्यासाठी
आपण विसरलो सारे देहभान.....३

प्रेमाचे पाखरू भिरभिर करते
तूझ्याभोवती गुणगुण करण्यासाठी
वाऱ्याच्या वेगाने धावत सुटते
मन आसुसलेले तुझ्या भेटीसाठी ....४

घर दोघांचे असूनही वाटे
परके तुझ्या नसण्याने मजला
सुनी वाटते मैफिल संसाराची
जीव जणू कासावीस झाला ....५

येऊनी ओठी शब्द दाटे जरा
सोसवेना हा दुःखाचा भार
हुंदका दाटून डोळे पाणावले
देतो आम्ही एकमेकांना आधार .....६

उंबरठ्यावर अडखळते पाऊल
कसा आवरू हा दुःखाचा पसारा
नात्यांच्या या बाजारातून निघून
एकांत हवा तुजसवे मिळेल का जरा.....७

©®अश्विनी मिश्रीकोटकर
संभाजीनगर (औरंगाबाद)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//