गाडी थांबताच मुग्धा हसर्या चेहेर्याने गाडीकडे धावत आली .पटकन गाडीचा दरवाजा उघडत जोरात..
"मामीआई "
अशी ओरडताच ,सागर ,सागरचे आईवडिलही घराबाहेर आलेत.
मुग्धाने मयुरीला घट्ट मिठ्ठी मारली...मयुरीनेही मुग्धाला पकडल व झपाझप माथ्यावर आपले ओठ टेकवले.दोघीही एकमेकींच्या मिठीत सुखावल्या..
रवी म्हणाला ,"अग घरात तरी चला".
दोघींनीही मिठी सोडली व मुग्धाने मयुरीचा हात धरत घरात नेलं..रवी गाडीतील सामान काढू लागला .तोच सागरची आई म्हणाली,"सागर त्याला मदत कर रे".
सागरही गाडीजवळ गेला .खाली मान घालतच आवघडलेल्या स्थितीतच रवीला प्रवास कसा ?झाला.काही ञास नाही झाला ना?...अस विचारत बोलत करु लागला रवीनेही फक्त "नाही..नाही "म्हणत ..प्रश्नाला उत्तर दिलं..
मयुरी व मुग्धाला आनंदी बघून मयुरीचे आजीबाबा ,"शेवटी रक्ताची ओढ अनामिक हो " असे दोघेही एकमेकांशी पुटपुट. होते...
आजी मयुरीला म्हणाली,"बस गं...प्रवास छान झाला ना?काही ञास नाही ना झाला,घरी सगळे छान ना?,तब्बेती वैगरे.."
अशी चौकशी करत होत्या मयुरी फक्त ,"हो सार छान मावशी ".
म्हणतं...घरात मुग्धाच्या आई आहे का?नजरेने शोधत
होती..ते त्यांच्या लक्ष्यात आलं..व त्याच बोलल्या .
"बसं मी पाणी आणते तुम्हाला,जया व प्रणित गावाला गेलेत .....".
मयुरीने नजरेनेच हो का अस प्रतिउत्तर दिलं..
मुग्ध म्हणाली ,"आजी बस गं तु मी आणते ना?.."
तीने पाण्याचा ट्रे आणला तोवर रवी व सागरही घरात पोहचले होते तीने पाणी देतच रवीला घट्ट मिठी मारली..
घरात आणलेल्या पिशव्या बघून आजी म्हणाली,"मुग्धा मामीआईने तुला गाडी भरून सामान आणल गं बाई..मयुरी तु मुग्धासाठी इतक काही घेऊन येतेस की आम्हाला तिला काय?घ्याव हाच प्रश्न पडतो गं...".
"असू द्या हो मावशी ..माझी जानू आहे ती "म्हणत
मयुरीने हसतच उत्तर दिलं.मुग्धा मयुरीला घट्ट कवटाळून तीच्या काॅलेजच्या गप्पा व सगळच सांगत होती..तीचे भारावलेले डोळे,तीचा मयुरीबद्दलचा आदर ,सारच ओसंडून वाहत होत.मध्ये मध्मे रवीही मुग्धाकडे एकटक बघता होता .त्याला तीच्या बोलण्यात व लकबीमध्ये दिप्तीचा भास होत होता.डोळ्यात पाण्याने गर्दी केली होती पण त्याला कुठेतरी तो थांबवत होता..मयुरीलाही मुग्धाला भेटुन आनंदाची भरतीच आली होती..गप्पांनी सर्व हाॅल गजबजला होता .दोघींच्या त्या अनोख्या नात्याकडे घरातील फक्त आनंदाने बघत होते..बोलतांना किती खुलत होती मुग्धा मयुरीसोबत ,ऐव्हाना कोणतीही गोष्ट करतांना समंजदारी दाखवणारी मुग्धा मयुरीच्या एखाद्या गोष्टीत लाडिक लाडाने रूसतही होती..जसं दिप्तीने जन्म दिला नसुन ती मयुरीचीच मुलगी शोभावी अशी...
कस नातं होत ह्या दोघींच म्हणजे मामे भाचींच ,कधी गुंतल्या एकमेकीत ते दोघींनाही कळल नव्हत ..जश्या दोन वेगळ्या व्यक्ती तरी एकमेकींशी एका नाळेने गुंतलेल्या अनामिक ओढीच्या ,आनंदात चिंबचिंब होणार्या सहवासात गुंतलेल्या ह्या दोघी दुर असूनही एक अश्या...दोन तुटलेल्या घरांना जोडणार्या ,नात्यांची सुंदर विन विणणार्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या व सोबत दोघ परिवारांनाही त्यांच्यासोबत एकञ बांधणार्या ह्या गोड "सख्या"..म्हणजे मामी भाची...
रवीला तर कायमच ह्या दोघींचाही हेवा वाटत असे..आपली भाची पण ती मयुरीशी किती जुळलेली .जी भाषा मला कळायला हवी ती मयुरीला कळावी .जेथे आपण नात्याला पुर्णविराम दिला होता तेच नाते मयुरीने किती प्रेमाने व आपलेपणाने जवळ केलं..दिप्तीच्या आठवणी आम्ही जपायला हव्या त्या आठवणींना नव्याने सुर देण्याच काम मयुरीने केलं होत ..नाते फुलू लागले होते.आता दोघाही परिवारात पुन्हा नात्यांची विण जळू लागली होती...दिप्तीची जागा मुग्धा घेणार व मयुरीच्या परिवारातील दिप्तीची सुनी सुनी जागा मुग्धाने भरून निघणार हा विश्वास मयुरीला होता...
क्रमश:
बाकी कथा पुढील भागात...
,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा