उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ - सांडगे ( वडे )

SUMMER RECIPE


" मे " महिना सुरु झाला की, आपल्या समोर जसे रखरखीत ऊन येते तसेच उन्हाळ्यात येणारे आंबे आठवले की थोंडाला पाणी सुटते. तसेच उन्हाळ्याची सुरुवात झाली की आईची लगबग सुरु होते ती उन्हाळी काम करण्याची म्हणजेच कुरडई,वडे, पापड करण्याची. हे सगळे पदार्थ मग वर्षभर आपल्या जेवणाची लज्जत वाढवतात.
आत्ताच्या या काळात या सगळ्या गोष्टी शहरी भागात जागेअभावी थोड्या मागे पडल्या असल्या तरी अजूनसुध्या बऱ्याच ठिकाणी हे सगळे पदार्थ खूप आवडीने केले जातात.माझ्या माहेरीही माझी आई खूप हौशीने सगळ्यांसाठी हे सगळे पदार्थ करते.
तिच्याच या उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थांच्या कृती येथे देत आहे .......


हरबरा - मठ - मूग डाळींचे सांडगे - ( वडे )


साहित्य -

1- एक वाटी हरबरा डाळ
2- एक वाटी मठाची डाळ
3- 1 वाटी मूग डाळ
4 - 2 चमचे लाल तिखट ( आवडीनुसार घेतले तरी चालेल)
5- 2 चमचे मीठ
6 - पाव वाटी कोथिंबीर ( बारीक चिरलेली )
7 - पाणी
कृती -
1 - तिन्ही डाळी समप्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजवायच्या. दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून मिक्सरवर पाणी न घालता दळून घायच्या.( ग्राईंडरवर दळून घेतले तर वडे अजून छान कुरकुरीत होतात. पण यासाठी मेहनत थोडी जास्त लागते.)

2- दळून तयार झालेल्या मिश्रणात लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचे आणि या मिश्रणाचे छोटे - छोटे सांडगे तोडायचे .
3- उन्हात सांडगे वाळू द्यायचे. वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचे.
? या सांडग्याची भाजी पण छान होते आणि तळूनही खाता येतात.