Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अव्यक्त भाग १०

Read Later
अव्यक्त भाग १०


अव्यक्त

भाग १०


मारामारीमुळे त्याच्या अंगावर भरपूर जखमा झाल्या होत्या. त्यावर मलमपट्टी करणारी ती डोळ्यातून आसवे गाळत बसली होती.

हातात रुमाल घेऊन, रुमालाने डोळे पुसणारा तो तिला खूप समजावू पहात होता; पण तिची अश्रुधारा काही थांबेना.


ती अचानक रडायची थांबली, तशी त्याची नजर त्याच्या जखमेवर गेली. जखमेवर व्यवस्थित मलमपट्टी करून झाली होती. तिने उठून  त्याच्याकडे पाठ फिरवली.

" का आणलं मला इथे? माझा देह तुला तिथेही मिळाला असता, त्यासाठी याची गरज नव्हती. मी इथे राहणार नाही. तुझा आणि माझा काही संबंध नव्हता आणि या पुढेही नसणार आहे. तुझा सहवास मला नको आहे. तू इथे असशील तर मी इथून कायमची निघुन जाईन. मी माझ्या आवडीने हा पेशा निवडलेला आहे आणि आज अचानक तू मला इथे घेऊन येऊ शकत नाही. आता त्या नरकातचं माझं आयुष्य आहे."

हे सगळ बोलताना तिने त्याच्याकडे एकदाही बघितले नाही.

तो उदास हसला काही न बोलता तिथून उठला आणि दरवाजा जवळ जाऊन थांबला.

"तुला आता इथून मोकळं होता येणार नाही.मी तुला विकत नाही घेतलं असलं तरी माझं रक्त गाळून जिंकल आहे. त्याची किंमत वसूल झाल्याशिवाय तुझी सुटका नाही. मी तुला इथे आणायला जीवपणाला लावू शकतो, तर तुझा जीव घेऊ ही शकतो. ध्यानात ठेव. जर तो नरक हेच तुझं आयुष्य आहे, तर हा नरकच आहे असं समज."

"...." त्याच्या शब्दांनी ती निरुत्तर झाली.दरवाजा बंद झाल्याचा मोठा आवाज झाला. खिडकीत उभं राहिल्यावर तो दिसेल, या भीतीने खिडकीत जाऊन उभी राहिली नाही.
तिच्या ओठांनी जरी त्याच्यावर आगपाखड केली असली, तरी मन मात्र त्याच्याकडे आकर्शिल जातं होतं. त्या निर्भिड डोळ्यात पाहिलं तर स्वतःची अपवित्रता विसरायला होईल; म्हणून तिने त्यांना नजर मिळवली नव्हती. शब्द ही लतपटत बाहेर आले होते. जोर त्यांच्यात नव्हताच.

त्यानेही मान वळवून खिडकीकडे पाहिले नाही.
माझ्या मनाचा ठाव तिला लागला, तर ती जिवाचं काहीही बरं वाईट करून घेईल. या भीतीने तोही ग्रासला होता.


देहविक्रीचा व्यवसाय करणारी ती; त्याला त्या स्त्रियांमध्ये वेगळी भासली. भांडून तिला यातून बाहेर काढण्याशिवाय त्याच्याकडे मार्गच उरला नव्हता. त्याने तो आपलासा केला.


तिला मात्र आपलंसं करायचा विचार मनात दडपून टाकला.

ती सुखरूप आहे, त्या दलादलीपासून दूर आहे एवढंच त्याच्यासाठी पुरेसं होतं.-©® स्वर्णा
  
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//