अव्यक्त भाग ७

व्यक्त न झालेले क्षण


अव्यक्त भाग ७


ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यावर भुरभुरणारे तिचे केस सावरण्याचा तिने व्यर्थ खटाटोप सुरू ठेवला होता. खिडकीतून बाहेर बघण्यापेक्षा केस सावरण्यात तिचं लक्ष अधिकच गुंतल होतं.


बाहेरच निसर्ग रम्य कोकण तिला खुणावत होतं. सांगत होतं,

\" उडू दे त्या केसांना स्वैर आज
   त्यांनाही पाहू दे ना माझा साज.
   तूही मिसळून जा रंगाच्या उधळणीत
   नकोस बाळगू नसती मनाची लाज.\"

तरीही तिचं लक्ष त्या उडणाऱ्या केसांभोवतीच गुंडाळून राहिलं होतं.


एवढंही तिच्या लक्षात आलं नव्हतं; की समोरची व्यक्ती बराच वेळ तिचं निरीक्षण करत आहे.

\" कुठेतरी पाहिलं आहे हिला? कुठे ???? कुठे बरं???? काहीच कसं आठवतं नाही. आपल्या शाळेत होती का? नाही, नाही.... कॉलेज मध्ये? नाही. कॉलेजमध्ये नसणार, मग तिचं नावं लक्षात असतं. कुठे?? कुठे ??? हां आठवलं.\"

त्याच्या लक्षात येताच त्याने तिच्याकडे बघणे तर थांबवलंच, त्याच्या चेहऱ्याचा रंग ही उडाला.


ही तिचं होती. जिचा फोटो सकाळी त्याला आईने दाखवला होता आणि याने नाक मुरडल होतं. आईनेही मग तडकाफडकी चिरंजीवांचा नकार कळवून टाकला होता.


त्याचं एक मन त्याच्यावर हसत होतं, निर्णय देण्याची घाई केली म्हणून शिव्या देत होतं. एक मन धीर देतं होतं. तिच्याशी बोल असं सुचवतं होतं.


माणसाला दोन मन असतात, हे त्याला पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणवत होतं. युद्ध जुंपल होतं मनाचं, तरीही हरायच मात्र यालाच होतं.


या युद्धात \" तिच्याशी बोल \" असं सांगणार मन जिंकल. सगळा धीर एकवटून त्याने तिच्याकडे पाहिलं.


त्याने पाहिलं तरी
ती समोर होती कुठे?
गाडी निघून गेली,
तू अजूनही मात्र तिथेच.



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट आणि स्टिकर्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

🎭 Series Post

View all