Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अव्यक्त भाग ६

Read Later
अव्यक्त भाग ६


अव्यक्त

भाग ६


\"या फुलांचा सडा नेहमी तूझ्या आयुष्याला सुगंधाने दरवळत ठेवेल. भविष्यात माझं प्रेम मी व्यक्त करेन की नाही ते माहित नाही. ही फुलं मात्र त्याचा वर्षाव सदैव तुझ्यावर करतील.

किती छान! वाटतं ना वाचायला! मन जावे त्या गावा जिथे प्रियकर रहावा. भावनांनी भरलेल्या मनात त्याच्या प्रेमाचा व्हावा शिडकावा.\"


   
ती पुस्तकात रममाण झालेली. वाचता वाचता स्वप्नांच्या गावी पोहचली.

पुस्तक वाचणे, हा तिचा एकमेव छंद. बालपणापासून जोपासलेला. आता लग्नानंतर ही त्याला अंतर देणे तिला शक्य झाले नाही.


सूर्याच्या ही आधी उठून ती, तिची आन्हिके आवरायाची. सडा सारवून, न्याहारी तयार करायची. सगळं घर कसं लख्खं ठेवायची.


आजही नेहमी प्रमाणे सगळी कामे आटपून ती वाचायला बसली. लेखकाच्या शब्दांत एवढी गुंतली की; सूर्य माथ्यावर येऊन आग कधी ओकू लागला तिला कळलंच नाही.


दरवाजा खूप जोरात वाजला. त्याच्या आवाजाने ती बिथरली. पुस्तक मिटून लगबगीने पडवीत गेली.


त्यांच्या पायावर घालायचं पाणी गरम करायलाच ती विसरली होती.  एक तांब्या पायावर ओतताच त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला.


" जेवणं तरी गरम मिळेल ना?" त्याचा खोचक स्वर तिच्या हृदयी वर्मी बसला.


"...." त्याच्या हातात, हात पाय पुसायला पंचा देतं, ती लगबगीने स्वयंपाकघरात गेली.


थंडीचे दिवस असल्यामुळे, जेवणं आधीच थंड
झालं होतं. आता तिचे हात पाय गारं पडायला सुरुवात झाली.


लगबगीने जेवणं चुलीवर ठेवून, ती त्याची यायची वाट बघत बसली.

तो आला, तोच ताटासमोर बसला. ताट रिकामं बघून, काही न बोलता तो उठला.

हीचा जीव घाबरागुबरा झाला. आता हा काय करेल नी काय नाही.


थोड्यावेळात त्याची पावले वाजली.

हातात तिची पुस्तके बघून हीची नजर गोठली.

\" मी चुकले, नको ओ !!!!! माझी पुस्तके.\" तिची वाक्ये ओठांची भिंत पार करू शकली नाही.


बघता बघता पुस्तके त्याचं जेवणं गरम करू लागली.
-©® स्वर्णा_________________________________________________________________

कथा आवडली तर समीक्षा व अनुसरण नक्की करा.

??
          

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//