Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अव्यक्त भाग ५

Read Later
अव्यक्त भाग ५
अव्यक्त

भाग ५


\"रोजची धाव धाव, पळ पळ वाढली असताना; कुठून नवीन संकट ओढवून घेतो हा कोण जाणे? याने त्या संकटाना घरापर्यंत घेऊन यायचं आणि मी ते निस्तरायच.\" तिची चीड चीड काही केल्या कमी होतं नव्हती. सगळं काही मनात चालू होतं. रागात दाराची बेल वाजवली. दारात सासूबाईंना बघून, राग तोंडातून पोटात पटकन गेला.


"काय ग? आज लवकर आलीस."  त्यांच्या प्रश्नाला कसंनुसं हसून टाळत, ती गपचूप आपल्या खोलीत गेली.

पायातल्या चपला काढणार्‍या चिरंजीवांना आईने खुणेनेच विचारलं, \" वातावरण गरम व्हायला, काय झालं? तुझा चेहरा असा? काय लागलं हे?\"


तोही मिश्कील हसला. तिच्या पाठोपाठ लगबगीने आत गेला. त्याचं अस वागणं त्यांच्यासाठी नेहमीचच होतं.

खोलीत ती रागारागाने कपाटातून, त्याचे आणि तिचे बदलायचे कपडे काढून ठेवत होती.

ती आरश्यासमोर उभी राहिली.
वर्दी वरचे तारे काढून समोरच्या टेबलावर ठेवले. तिला कंबरेचा बेल्ट सैल करून काढताना बघून हा घाबरला.

\" आता ह्यानेच मारते की काय?\"  दोन पावलं पुढे जाऊन चार पावलं मागे आला.


कॉलरच बटण काढून ती वळली. तसा हा, तिला बघताच जागीच थिजला.

ती मात्र अजूनही रागात होती. तिचे बदलायचे कपडे घेऊन तशीच न बोलता बाथरुम मध्ये निघून गेली.

\"एका सब इन्स्पेक्टरचा नवरा, एक सुजाण नागरिक, असा पोलीस लॉकअप मध्ये जावा. कारण काही असो, ही वेळच का येऊ द्यावी? म्हणते मी! कसं वाटलं असेल मला, याला गजाआड बघून. याचा विचार कुठे करतात, हे महाशय? ते काही नाही. आता मी याला चांगलाच फैलावर घेणार आहे. बोलणं तर कायमच!......नको कायमच नको........ हां!! हा सुधरे पर्यंत बंद. हो असच करणार मी.\" मनाशी चंग बांधून तिने बाथरुम दार उघडलं.तो तिची वाट बघत बसला होता.

"हे बघ मला माहित आहे तू चिडली आहेस; पण खरचं माझी काही चुकी नव्हती. ते गुंड एका म्हाताऱ्या जोडप्याला त्रास देतं होते. मी मारामारी केली नाही. फक्त बाचाबाचीत पोलीस आले." तो केविलवाणा चेहरा करून तिला सांगत होता.

"मग हे जे चेहऱ्यावर गुलाबी छटांच जाळ पसरलंय. ते काय? मेकअप मधला ब्लश का?" ती अजूनही तिरमिरित होती.


"तू बघतेस ना? त्यांनीच मला किती मारलं? मग मला हात उचलणं भाग होतं." शेवटचं वाक्य त्याने ओठातच हळू आवाजात घोळवल.


\" किती मारलं?\" या दोन शब्दांनी तिची नजर त्याच्या जखमांवर स्थिरावली. मेंदूने दिलेली,\" तिकडे बघू नकोस, तुझा मुद्दा सोडू नकोस.\" ही सूचना मनाने धुडकावली. त्याच्याजवळ जाताच त्याच्या डोळ्यांनी तिला भूल पडली.तुझ्या डोळ्यात पाहता, माझा राग
कुठच्या कुठे पळून गेला.
व्यक्त होण्यासाठी आसुसलेला तो
मिठीत शिरता विरघळून गेला.

जखमांवर प्रेमाने फुंकर घालताना ती कधी त्याच्या मिठीत शिरली, तिलाच कळले नाही.


"राग व्यक्त करायला आले होते मी. करूच शकले नाही." त्याच्या मिठीत ती पुटपुटली.

"कधी कधी अव्यक्त राहिलेल्या गोष्टींची गोडी वेगळीच असते." त्याने असं म्हणताच तिने न कळून त्याच्याकडे पाहिले.

\" मी समजले नाही.\" हे तिचे वाक्य त्याच्या ओठात विरले.
-©® स्वर्णा_________________________________________________________________

कथा आवडली तर समीक्षा व अनुसरण नक्की करा.

??
          

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//