अव्यक्त भाग 3

व्यक्त न झालेले क्षण


अव्यक्त
भाग 3


तिने फोन कट केला आणि बाजूने आवाज आला, "कोण होतं फोनवर?" ती सूचक हसली.


"माहित नाही ग. बरेच दिवस झालेत या प्रकरणाला." तिच्या या वाक्यावर तिच्या आईने नकळून तिच्याकडे पाहिले. आईच्या चेहऱ्यावर काळजी उमटली.


"अग, मग तू त्याला का सांगत नाहीस? की तो चुकीचा नंबर लावत आहे. "आईने समजावणीचा सुर लावला.


"ह्मम, बरोबर आहे तुझं; पण त्याचा आवाज ऐकला; की धीर होतं नाही. तो जास्त काही वावगं बोलतं ही नाही ग. नाहीतर त्याला कधीच वाटेला लावला असता. कधीतरी एखादा फोन येतो. काळजीने भरलेला आवाज माझी चौकशी करतो. \" मी सुखरूप आहे.\" याची खात्री करून निर्धास्त होणारं मन. इथे कोणाला माझी इतकी काळजी आहे." तिच्याबरोबर तिच्या आईच्याही पापण्या पालवल्या.


आईने भरलेल्या काळजाने तिच्या खांद्यावर हात ठेवला.


" मीच चुकले अश्या निर्णयाला तुझ्यावर थोपून......" आईने डोळ्यांना पदर लावला आणि ती आत निघून गेली.


ती ही बाहेर जाऊन झुल्यावर बसली.


असताना त्याच्याजवळ
दुरावा मी प्रार्थला.
दुस्तर जिणे झाले होते
श्वास गुदमरला.
आता चित्रातले रंग उडाले
रस आयुष्यी नाही उरला.
दारं हृदयीचे घट्ट लावून घेतले
बंद दरवाजा हा कोणी ठोठावला?


पुन्हा एकदा या फोन कॉल मुळे तिच्या जखमे वरची खपली काढली गेली. जखमेतून वाहणाऱ्या रक्ताला तिने दुर्लक्षित केलं; पण त्यामागून येणाऱ्या आठवणी ती दुर्लक्षित करू शकली नाही.


-©® स्वर्णा


_________________________________________________________________

कथा आवडली तर समीक्षा व अनुसरण नक्की करा.

वाटताना एकच वाटणाऱ्या, पण त्याच क्षणी वेगळी भासणाऱ्या अश्या कथांची मालिका.

??



🎭 Series Post

View all