अव्यक्त भाग २

व्यक्त न करता आलेले क्षण

अव्यक्त


भाग २


दूरवर नजर नेत असूनही ती स्थिरावत नव्हती. विचारांच्या कोळ्याने विणलेले जाळे मन आणि बुद्धी दोघांनाही जखडून ठेवू पाहत होती.

\" नाही, सकाळी मी जे ऐकले आणि आता मी जे पाहत आहे ते खरे नाही. \" एक मन समजूत काढत होते.

\" खरे कसे नाही? सकाळचा एकवेळ गैरसमज असू शकतो; पण हे!! हे जे समोर दिसत आहे ते असत्य कसं मानू मी.\" त्याची नजर त्यांच्यावर
राहायला तयारच होईना.

\" मी काही बघितलं नाही. मी इथे आलो ही नव्हतो. मला काहीच आठवतं नाही. \" घाई घाईने रेस्टॉरंटच्या बाहेर येत तिचा नंबर फिरवला.


रिंग वाजत होती. बराच वेळ वाजून ही कोण उचलत नव्हते. जीवाची तगमग तिने फोन उचलल्या शिवाय शांत होणार नव्हती. त्याला असे ही वाटले एका क्षणाला; की नकोच तिने फोन उचलायला.

त्यासाठी आपण फोन कट करायला हवा. त्याने बोट डिस्कनेक्टच्या आयकॉनकडे गेलच होतं; तेवढ्यात पलीकडून आवाज आला, " हॅलो, बोल रे."

"हां. हॅलो. हॅलो." त्याने घाईगडबडीत फोन कानाला लावला.

"हो हॅलो ते कळलं मला. आता पुढे बोल." तिचा त्रासिक स्वर.

"तू कुठे आहेस?" त्याच्या शब्दातही थरथर.

"किती वाजलेत?" ती आता अजूनच वैतागली.

"संध्याकाळचे सात. अग, मीही तुला काही विचारलं आहे. तू कुठे आहेस?" तो अजूनही अस्वस्थ. शंका कुशंकामध्ये अडकलेला.

"असा काय रे करतोस? मी \"सातच्या आत घरात.\" ना. चल काम आहेत ठेव फोन." तिचा मस्करीचा स्वर.

"हां, हो." \" ती घरीच आहे.\" असं मनाला समजावत त्याने फोन ठेवला आणि कुठेही न पाहता तिथून निघून गेला.


तिनेही फोन कट केला आणि बाजूने आवाज आला, "कोण होतं फोनवर?" ती सूचक हसली.


-©® स्वर्णा


तुमचं प्रोत्साहन , कॉमेंट रुपात उमटवाल अशी अपेक्षा करते. या आधी दिलेल्या सर्व कॉमेंट्स
बद्दल खूप खूप मनपूर्वक आभार.


🎭 Series Post

View all