अनपेक्षितपणे.. अपेक्षित..अंतिम भाग( जलद कथालेखन)

Unexpectedly Expected

आज सकाळपासून वृंदा थोडी खुश होती..मध्येच बैचेन होती मध्येच तिला हसू यायचं आणि मध्यचे शांत होत होती..देव जाणे आज सकाळपासून वृंदाचे कुठे मन लागत नव्हते डोक्यात कालपासून एक विचार फिरत होता पण बोलावं की नाही ? आवडेल की नाही? योग्य आंहे की नाही ? या सर्व प्रश्नांमध्ये ती खूपच अडकली होती..

आणि इकडे शेवटचे एकदा वृंदाला भेटून मनातले सांगून एकदाचे मोकळे होतो या विचाराने रक्षित सकाळपासून विचलित होता..

घडीत त्याला सर्व योग्य वाटे आणि घडित त्याला विचार येई की तिला नाही आवडले तिला वाईट वाटले आणि या सर्वात तिने मैत्री तोडली तर मनाच्या एक भावणेपायी मी कायमचा गमावून बसलो तर एकतर ती खूप व्यक्तिगत विचारांची मुलगी आहे ..

पण नाही बोललो तर मला वाईट वाटेल..

याच गडबडीत शेवटी न राहून त्याने फोन केला.

एवढ्यात रक्षितचा फोन आला.

"हॅलो,वृंदा कुठे आहेस ग?मी जरा बाहेर आलो होतो तुला वेळ असेल तर भेटायला जमेल का?"

रक्षित उत्तरला.

"अरे..हा मी नाही ..आहे आज काय करू काय म्हणातोस! "

वृंदा थोडी विचलित होऊन बडबडली.

"हॅलो ,वृंदा अग काय बोलतेस मला काही कळत नाही ! "मी काय विचारतो तुला जमेल का भेटायला ? "रक्षितने प्रतिप्रश्न केला.

"हो येते ना अरे ते थोडी गडबडीत आहे ! कुठे भेटतोय? नेहमीच्या जागी! "

वृंदा उत्तरली.

"हो ये लवकर! "रक्षितने होकार दर्शवला.

दोघेही नेहमीच्या जागी आले..

दोघेही थोडे विचलित होते ..

दोघांना काहीतरी सांगायचे होते..

आणि सुरवात करणार एवढ्यात एक भांडण त्यांच्या कानावर पडले!

( अरे,तुला मी चांगला मित्र समजले तू काय केलेस? बोल ना अरे,मैत्रीची पवित्र सीमा ओलांडून तू प्रियकराची सीमा ओलांडू बघतोस? अरे कसे रे तुम्ही मुलं? मैत्रिच नाही केली पाहिजे..) 

त्यांचे ते भांडण ऐकून कुणास ठाऊक दोघांनी सुद्धा त्यांच्या भावनांना आळा घातला.

कुणास ठाऊक अचानक त्यांच्या गप्पा मैत्री मध्येच गुर्फुटून राहिल्या. दोघांनी तीक्ष्ण नजरेने एकमेकांकडे बघितले कुणास ठाऊक नजरेतूनच त्यांनी एकमेकांना खूप काही सांगून दिले.. पण त्यानंतर सुध्दा खूप गप्पा मारून  आणि नेहमप्रमाणे एकमेकांचा निरोप घेऊन ते परतले..पण जाताना मनात काही राहिला नव्हतं कदाचीत आयुष्यात थोडे दिवस सारथी बनून राहण्या ऐवजी आयुष्यभर एक खूप चांगला मित्र आणि मैत्रीण बनून राहणे त्यांना जास्त योग्य वाटले.

(घरी जाताना दोघांनी एकच विचार केला मैत्रीतर चांगली होऊ द्या.. नंतरचे बघू पुढे..मैत्री गमावून बसलो ना तर सर्वच गमवल जाईल आणि एक मैत्रीण नेहमी सोबत राहील पण एक प्रेयसी/प्रियकर तिच्या इच्छा असे पर्यंत साथ देईल.)

कदाचित आजच्या काळात मैत्री ही एका प्रेमप्रकरणं पेक्षा जास्त महत्त्व घेते . मित्रानो दोघांकडे संधी असताना दोघांनी मनाला आवर घातला. कदाचित गोष्ट खूप लहान होती पण एक नाते वाचवताना नेहमीच दुसऱ्या नात्याचे बलिदान देणे आजच्या काळात प्रत्येकाला नाही जमत म्हणूनच अनपेक्षित जरी कधी काही वाटल तरी लक्षात ठेवा त्याचा शेवट नेहमी अपेक्षितच असतो . ..

धन्यवाद 

समाप्त...

🎭 Series Post

View all