अनपेक्षितपणे.. अपेक्षित.. भाग -३( जलद कथालेखन)

Unexpectedly Expected
"चालायचा रुबाब तर बघा..अगदी निर्भिड जणू मीच राजा ...
उंची लगबग माझ्यापेक्षा थोडीच जास्त ..
शरीरयष्टी अगदी रावणासारखी ...
हा शेवटी जगावेगळच आवडत याला...
लोक रामामागे वेडे आणि हा रावणामागे..
दिसायला अगदी उंच थोडा रुंद... राजबिंडासारखा..
अगदी रांगडा एका देखण्या पुरुषाची उपमा द्यावी अगदी तसाच..
गळ्यात रुद्राक्ष..
हातात एका रुबाबदार व्यक्ती सारख्या अंगठ्या....अगदी शोभेल अशाच...
रावणासारखाच महादेवाचा भक्त...
रोज मला भेटू अथवा नाही भेटू पण महादेवाला नक्की भेट देणार...
आणि आज तर रुबाबच पाहून घ्यावा ...
काळा शर्ट.. त्यात त्या शर्टच्या भाया कोपरापर्यंत वळवलेल्या निळी जीन्स..
सफेद शूज..
जणू मुलगी बघायला येणार आहे ना..
हा पण स्वभाव गोड आहे ...
माझी मज्जा घेतो पण चालत तेवढं.."
"हॅलो..वृंदा... वीणा...मीना... संजना.."
रक्षित उत्तरला.
एवढ्यात विचारत गुंग झालेली वृंदा एकदम बोलली,.
"अरे, आज कसा काय आला तू वेळेत?" वृंदा रक्षितला विचारत होती.
"अग, आज ना विणाच काम होतं आणि सोबत संजना सुध्दा होती म्हटल आलोच तर सर्वांना परत भेटून घेऊ परत येणं कधी होणार ना ? "रक्षित उत्तरला.
"काय म्हणता? कशा आहेत सर्व ?? काल मस्त वाटल बर का एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर !"
रक्षित आनंदातच बोलला थोडा
"हो हो ..चौघिनी एकसाथ होकार दर्शवला."
"बर चला मी ऑर्डर देऊन येते कोण कोण काय काय घेणार मला मेसेज करा."
मीना उच्चारली.
"अरे, साजिरी! "
वीणा स्वतः शी पुटपुटत बोलली.
"ए ऐका ना मी आलेच थोड्यावेळात माझी मैत्रीण आली रे इथे! खूप जुनी मैत्रीण मी आलेच भेटून बसा तुम्ही."
संजना ऐक ना माझ्यासोबत चल ना आपण लगेच येऊ परत ...वीणा संजनाला विचारत होती.
"बर बाई चल! तू काही ऐकणार नाही! चल "
असे बोलून दोघी तिथून गेल्या.
बघता बघता तिघींना अचानक काम आले आणि वृंदा आणि रक्षित दोघेच तिथे राहून गेले.पण त्यांना जणू कुणाची गरज भासालीच नाही ते तर मस्त गप्पांमध्ये रंगून गेले..
दोघांकडे कुणी बघितले तर नक्की म्हणेल..
"एक लडका ओर एक लडकी कभी दोस्त नही हो सकते"
पण राहिल ..
दोघं बराच वेळ गप्पांमध्ये रंगले..
काही वेळानंतर तिघी पण आल्या पण त्यांना असे बोलताना बघून त्यांची इच्छा झालीच नाही की तिथे जाऊन ते भंग करावे पण नाईलाजास्तव काही वेळाने तिघी पण तिथे गेल्या ...
आणि काही वेळातच सगळे निघाले..
पण आज वृंदा आणि रक्षितची आज एक वेगळीच बाजू जणू तिघी बघून आल्या होत्या..
"मीना, मस्त वाटल बर का एवढ्या वेळानंतर आज परत भेटल्यावर खूप छान वाटल .."
"बर.". मीना उत्तरली.
आणि "रक्षित खरंच खूप छान आहे स्वभावाने एकदम चांगल्या जिवाभावाच्या मित्रसारखा अगदी आयुष्यात एक तरी असा व्यक्ती असावा ग.."
"बर.."मीना पुन्हा उत्तरली.
"अग, काय बर बर लावल मी सांगते ना काहीतरी लक्ष तर दे दे.."वृंदा थोडी चिडूनच बोलली.
"वृंदा,मी ऐकते पण तू ऐकते का स्वतःला तू एका मुलाचं गुणगान गाते! खरंच मला तर विशेष वाटत.."
"एक सुचवू का तुला.."
"काय ? "वृंदा परत थोडी हिरमुसून बोलली.
"मला काय वाटतं तुला पहिल्यांदा असा वाटत कोणाबद्दल तरी मग मी काय म्हणते सांगून तर बघ फक्त.."
मीना बोलतच होती.
"ए ,गप काहीही तुझा जा बघू काही पण असत तुझा.."
वृंदा उत्तरली.
"हे बघ फक्त सांगायला काय जातं बाकी बघू नंतर.."
मीना समजावत होती.
"अस म्हणतेस का ! बर बघेल विचार करेल "..
असे म्हणून दोघी आपापल्या मार्गाने प्रस्थान झाल्या.
क्रमशः
( काय होणार वृंदा बोलणार की नाही ? रक्षित स्वतः पर्यंतच ठेवणार का? बघू पुढच्या भागात)

🎭 Series Post

View all