अनपेक्षितपणे.. अपेक्षित..भाग -२( जलद कथालेखन)

Unexpectedly Expected
पंचकोनासारखा गोड मुखडा..
त्याभोवती पसरलेला तो गव्हाच्या दाण्यासारखा गव्हाळी रंग..
त्याच्या चहूबाजूने पसरलेले तिचे ते सर्वांपेक्षा वेगळे असे दाट कुरुळे केस..
मन करते आयुष्यभर त्या केसांमध्येच गुंतून राहावे.. भाग्यवान व्यक्तिंसारखे भव्य असे ललाट..
त्यावर साक्षात चित्रकाराने रेखाव्या अशा भुवया..
त्याच्या अगदी खाली तिचे इवले इवले पण टपोरे आणि लांब असे नेत्र..
त्याभोवती लावलेलं ते काजळ..
याररर .....बघतच राहावे पण बघू देईल तर ना एवढा मोठा चष्मा लावते की त्याभोवती
दुरून सुद्धा तिच्या त्या छोट्याश्या नाकावरचा मनी चमकावा असे ना जास्त मोठे ना जास्त लहान अगदी योग्य नाक..
त्याच्या अगदी समांतर तिचे ते दोन कान ज्यामध्ये न चुकता रोज एक कानातले येऊन पडता..
नाकाच्या अगदी खाली तिचे गुलाबी ओठ..
त्याखाली तिची अरुंद मान आणि उंची तशी खूप नाही पण माझ्यासमोर योग्यच आहे..
बोलायला सुद्धा अगदी साधी सरळ...
गोष्टी जास्त कळत नाही पण मला समझून घेते..
आणि जीन्स असो वा कुर्ती नेहमीच सुंदर दिसणार आणि साडी ती तर विचारूच नका ....
असा वाटत साडी घालून जर समोर आली ना बास...नजरच हटू नये अशी इंद्राची...अप्सरा..
वृं....
"काल खूप दिवसांनी भेटली पण त्यात सुद्धा तिला चिडून दिले मी .. "स्वतः शी पुटपुटत रक्षित कामाला लागला.
"रक्षित फोन उचल ..कोणी वीणा फोन करते..रक्षित अरे दिवसाढवळ्या कोणाचे स्वप्न बघतो आहेस???"
रक्षितचा भाऊ त्याला कधीचा आवाज देत होता.
पण रक्षित काही ऐकेना..कुठेतरी गुंतला होता तो काही दिवसांपासून...देव जाणे..
"संजू.. अरे इथे काय करते तू? आज इकडे कशी ? गावात काही घ्यायचं होतं का?" वीणा संजनाला बोलली.
अग,हो बर झालं तू भेटली मला जरा खरेदी करायची पण काही आवडत नव्हते..चल बर मला थोडा घ्याच आहे.
संजना उत्तरली.
"हो ..हो चल" अग काल खरंच मस्त वाटल खूप दिवसांनी निवांत भेटलो अगदी ..तू मी वृंदा मीना रक्षित.
वीणा उत्तरली.
"हो ना खूपच वेळ गेला होता ग आता भेटत जाऊ जसे जमेल तसे "
चालेल ना! संजू बोलली.
"अग ऐक ना आपण काल जे पाहिलं ते फक्त भास होता की वास्तव?" संजना थोडी विचलित होऊन विणाला विचारत होती.
"अग काही पण का? असा शक्यच नाही ? ते फक्त असच आपण मज्जा घेतली ! तसे काही नाही आपला भासच असावा." वीणा उत्तरली.
"हो ,कदाचित ती फक्त चिडली होती कारण त्याने खूपच उशीर केला होता यायला आपण रोज थोडी भेटतो आणि एक दिवस यायच पण ते पण असा उशिरा" संजना बाजू सावरत बोलली.
एवढ्यात रक्षितचा फोन आला..
"हॅलो..हा बोल ना वीणा काय झाल ? फोन केला होता..
अरे,हा ते काल जरा जाताना माझी पर्स तुझ्या बॅग मध्ये पडली तीच हवी होती तशी अवधी तात्काळ नको हवी होती पण त्यात माझ्या महत्वाच्या गोष्टी आहेत रे! "
मग तुला जमेल का आज भेटायला ? वीणा उत्तरली.
"हो चालेल . कुठे भेटायचं?" रक्षित उद्गारला.
चालेल..थांब करते मी फोन संजना सोबत बाहेर आली कळवते.. वीणा उत्तरली.
संजना..पण आहे मीना आणि वृंदा पण असतील की? रक्षित उत्सुकतेने विचारू लागला.
नाही रे! पण विचारते मी त्यांना वेळ असेल तर येतील कदाचित! एवढे बोलून वीणाने फोन ठेवला.
क्रमशः
( काय वाटतं काय होणार पुढे? रक्षितच्या मनात कोण आहे ? आणि आभास होता की वास्तव? बघू पुढच्या भागात)




🎭 Series Post

View all