उमलत्या कळ्या

वाढत्या वयात मुलींच्या जीवनातील घालमेल व्यक्त केली आहे
उमलत्या कळ्या✍️?

जीवन बदलू लागलंय.....

कविता अग, ह्या रविवारी आपल्याला माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला जायच आहे, आपण सर्वच जाऊया. पियू ला पण सांग तिला हवा तो छान ड्रेस वगैरे निवडून ठेवायला. खूप वर्षांनी आपण त्या कुटुंबातील सदस्यांना भेटणार आहोत.
अहो, हो हो, किती ही घाई जाऊ आपण. आईंना पण नेऊ. पियू च्या क्लास च बघते काय ते मग नक्की जाऊ सर्वजण.
पियू अग अशी गप्प गप्प का? काय झालं? चल मस्त फ्रेश हो तुला आणि आज्जीला फक्कड चहा आणि गरम गरम भजी देते. तोपर्यंत बाबा आणि अभि पण येईल.
आई मला काहीच नकोय ग. मला खूप कंटाळा आला आहे रे.
ओहो, आई ऐकलं का? आपल्या पियू बेटाला कंटाळा आला आहे. म्हणूनच आपण सर्व ह्या रविवारी बाबांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला जाणार आहोत. तेवढंच जरा बदल, रोजच्या जीवनात. रात्री पण मस्त चौपाटीवर वगैरे फिरून येऊ.
आई तुला एकदा सांगितलं ते कळत नाही का? मला काहीच करायचं नाही आहे. पियू जवळपास आईवर संतापून च बोलली, आणि आत गेली.
कविता आणि तिची सासू दोघीही तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच राहिल्या. तेव्हड्यात कौस्तुभ आणि अभि येतात. अभि तर आल्या आल्याचं भाजीचा वास घेऊन, आई मला लवकर भजी दे, भरपूर भूक लागली अस सांगू लागतो. कविताच लक्ष मात्र पियूच्या तशा वागण्याकडे होतं. साऱ्यांचा चहा घेऊन झाल्यावर, ती पियूच्या खोलीत जाते. पियू शांतपणे झोपलेली असते. काय बिनसलं ह्या पोरीच? काहीच कळत नाही.
कौस्तुभ ही तेथे येतो, झालेला सर्व प्रकार त्याच्या कानावर अधिच पडलेला असतो, म्हणून तोही जरा शांतच असतो. तेव्हड्यात पियू ला जाग येते, ती आई म्हणतच कविताच्या मिठीत जाते. मला माफ कर ग आई, पण खरंच आज माझी खूप चिडचिड होत आहे. नाही ग कळत मला हे काय होतंय ते.
कविताला जे समजायचं होत ते समजलं. पियू बेटा, चल मस्त चहा घे, तुला ना मग मला एक गंमत सांगायची आहे. अरे वा, गंमत, अस म्हणतच उड्या मारत ती फ्रेश व्हायला गेली.
कौस्तुभ कविताला पहातच राहिला. तेव्हा कविता त्याला बोलली, आपली चिमणी आता लवकरच मोठी होण्याच्या उंबरठ्यावर आहे, तेव्हा तिला मला खूपच समजून घ्यावे लागणार, केवळ मलाच नाही तर आपल्या सर्वांनाच.
ए आई बघ मी मस्त फ्रेश झाले ग. काही म्हण पण तुझ्याकडे जादूची छडी आहे वाटतं. दोघी माय लेकींना अस हसताना पाहून घरातले सर्वच खुश झालेले. चला चला आई गंमत दाखवणार आहे, सर्व चला. वा गंमत, अस म्हणत अभि पण उड्या मारत येतो. तेव्हा कविता कौस्तुभ ला डोळ्यांनी खुणावते. मग कौस्तुभ अभि ला सांगतो, आपण दोघे आज मैदानात मस्त क्रिकेट खेळू,तुला गंमत तू मोठा होणार तेव्हा नक्कीच सांगणार.अस म्हणत ते निघून जातात.
आता आजी, आई आणि पियू तिघींची छान गंमत चालू होते. आई चल लवकर दाखव हा गंमत.
थांब पियू, जरा धीर धर.
पियू मागच्या वेळी अनघा मामी च्या पोटात आपली चिनू होती तेव्हा तू मला विचारलेलंस ना, की एवढं पोट कस फुगत? हो ग आई, तेव्हा तू मला सांगितलेलं, वेळ येईल तेव्हा मी तुला नक्की सांगेन.
हो, बरोबर. आता तुला त्याचीच एक सुरुवात सांगते. पियू तुला मी कधी कधी बोलते आता तू मोठी होणार ते ह्यासाठीच. तुझी चिडचिड हल्ली का वाढत आहे तेही सांगते. आता तू शांतपणे सर्व ऐक.गणपती बाप्पा ने आपल्याला एक सुंदर वरदान दिलेलं आहे. ते म्हणजे आई होण्याचं. वरदान तर त्याने दिलं, पण त्यासाठी तो आपल्याला तयार पण करत असतो, थोडं थोडं शिकवत तो आपली परीक्षा पण घेतो. जर का ही परीक्षा तू पास झाली की तो आपल्याला आई नावाची पदवी घेण्यास समर्थ करतो.
अरे वाह हे तर शाळेसारखं आहे, होना ग आई.
हो पियू, पण ह्या परीक्षेत संयम, शांतपणे सहन करण्याची ताकदही हवी.जेव्हा आपण काही खातो तेव्हा आपलं शरीर त्याची योग्य प्रक्रिया करून, नको ते घटक मलमूत्रा मार्फत बाहेर टाकतं. तसाच काहीसा प्रकार आपल्या मुलींच्या शरीरातील रक्ताच्या बाबतीत घडतो. पियू आता तू मोठी होत आहेस त्यामुळे हा प्रकार तुझ्या बाबतीतही घडेल. पण स्ट्रॉंग गर्ल सारख तू ते हाताळायच. त्यात तुला शरीर अधिकाधिक स्वच्छ ठेवावे लागणार, आणि भरपूर सकस आहार घ्यावा लागणार. हे जर का तू महिन्याच्या महिने केलंस की तू सुद्धा बाप्पा च्या परीक्षेत पास होणार. पियू तुझी चिडचिड बघता, बापा लवकरच तुला ह्या परीक्षेचा पेपर देणार आहे. एकदा का तो तुला मिळाला की तू मला किंवा आजीला सांगायच मग आम्ही तुला नक्कीच मदत करणार. आणि हो हे आपल्या तिघींमधील टॉप सिक्रेट आहे हा, कोणालाच नाही सांगायच. नाहीतर मग बाप्पा रागवेल हा.
पियू ला हे सर्व खूपच आवडलं, तिचा लाडका बाप्पा तीची परीक्षा घेणार होता म्हणून ती तशी खुश होती. अखेर तो दिवस आलाच परीक्षेचा. नेमकी त्या दिवशी पियूला सुट्टी होती तिने आईला सांगितलं. आईने आधीच दिलेल्या कल्पनेमुळे ती सर्व काळजी घेत होती. दूध, जेवण, ज्यूस भरपूर घेत होती, त्यामुळे जेवढा म्हणावा तेव्हढा तिला त्रास नाही झाला. पियू बाप्पा च्या परीक्षेत पास होत होती.
फक्त आजीने देवघरात जाऊ नकोस सध्या हे तिला जे सांगितलेलं, ते मात्र तिला का ते कळलं नाही, आणि पटलं देखील नाही. परीक्षा जर का बाप्पा घेत होता, मग त्याच्या घरात का नाही जायचं? तीच्या ह्या बोलण्यावर आजीही संभ्रमात पडलेली. त्यावर तिला तीची आई पुन्हा समजवते, पियू जर का बाप्पा परीक्षा घेत असेल तेव्हा तू त्याच्याच घरात कशी जात राहणार? शाळेत परीक्षा असतात त्यावेळी तू सतत टीचर रूम मध्ये जातेस का? नाही ना, इतर वर्गात राहून परीक्षा देतेस ना. मग तसच आहे हे. हळूहळू तुला ह्या सर्वांची उकल घडत जाणार आता मात्र परीक्षा उत्तमरीत्या देणे महत्वाचे.
कविताच्या योग्य शिकवणी मूळे पियूची जीवनपरिक्षा अगदी सोप्पी झालेली. तिच्या चेहऱ्यावरील ते तेज तिला परत मिळालेलं. खऱ्या अर्थाने अगदी सहजपणे तिचे जीवन बदलू लागलेलं.
#कृष्णवेडी
सौ.प्राजक्ता हेदे(बोवलेकर)