लग्नातील उखाणे

लग्नातील उखाणे


*सत्यनारायण पुजेला*

रांगोळी काढून मांडला पाट,
पाटावर विराजमान विष्णू नारायण,
करुन वंदन, वाहते हळदी कुंकू,
सुख समाधानचे मिळावे वरदान,
अखंड सेवेचा दे आशिर्वाद देवा,
मनोभावे नमस्कार माझा तुला,
गणेश रावांचे नाव घेते मी आज,
सत्यनारायणाच्या पुजेला.
--------------------------

*गृहप्रवेश करताना*

झगमगत्या दीपमाळेने सजले घर,
घराच्या चौकटीला फुलांचे तोरण,
आनंद झाला फार तोरण बांधताना,
गणेशरावांचे नाव घेते गृहप्रवेश करताना.
--------------------------------------

*मित्रमंडळीसमोर*

पैठणी शालूला जरीचा काठ,
जरीच्या काठवर मोराची नक्षी,
गणेशरावांचे नाव घेताना आज,
सर्व मित्रमंडळीं आहेत साक्षी.
------------------------------

*इतर*

*माहेरचे उखाणे*

१)दादा वहिणीची मी लाडकी,
माहेर सोडून आले सासरी,
आई बाबांची गोड शिकवण,
जपेन मी गणेशरावांच्या घरी.

२)माहेरची माया, कुटुंबाचे प्रेम,
सोबतीलाच संस्काराची शिदोरी,
नात्यांचे बंधन विणण्यास घट्ट,
राहिन सक्षम सदैव मी सासरी.

*पतीराजासाठी उखाणे*

*प्रेमळ*
१)साथ मिळावी जन्मोजन्मी,
हे साकडं मी घालते देवाला,
गणेशरावांच्या सोबतीने रोज,
फुलवून दाखविन संसाराला.

*टोमणा*
२)सास-याकडे मागितली लग्नात,
बायकोला फिरवाय नवीन कार,
अहो पण चालवता कुठे येतीय,
गणेशराव आहेत आळशी फार.
-------------------------------------
*सौ.वनिता गणेश शिंदे©®*