उडण्याचे बळ तुच दिलेस, आता सोबत देशील भाग १

गावातली मुलगी म्हणून तिला पाण्यात बघायचे. त्याच मुलीने खोखो च्या स्पर्धेत सगळ्यांना पाणी पाजल होत.

“काय गरज आहे तिच कॉलेजला अॅडमीशन करुन द्यायची? शेवटी करायच तर तिला घरातीलच काम न?” तिची मामी थोडी चिडून बोलते.

“थोबाड सांभाळून बोल वने, किमान आज ती होती म्हणून तुझ्या डोक्यावर छप्पर आहे याची तरी लाज ठेव” मामा गरजले.

वनिता घाबरली. आणि त्यांच पण खर होत. कारण जेव्हा त्यांच्यात गैरसमज होऊन नात तुटायची वेळ आली होती तेव्हा त्यांच्या लाडक्या भाचीनेच ते दुर केले होते.

आता तिचे आई वडील हयात नव्हते म्हणून तिचे मामा तिला त्यांच्या घरी घेउन आले होते.

ती स्वाती जाधव. कामाला एकदम चुणचुणीत, अभ्यासातही चांगली होती. पण स्पोर्टस मध्ये तिचा हात कोणी धरेल तर नवलच. अतिशय चपळ. तिने एकदा धावायला सुरवात केली की वाराही ही गप्प बसेल.

त्यांच्या घरात एक मामाच तिचे आधार होते. बाकी तिची मामी आणि त्यांची दोन्ही मुल स्वाती ला गांवढळ म्हणून पाण्यातच पहायचे.

तिच अॅडमीशन एका नामांकीत कॉलेजला करून देण्यात आल होत. तिच्या मामांना स्वाती च्या आईच स्वप्न पूर्ण करायच होत. स्वाती ला एकदम मोठ झालेल बघायच होत. त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये आणि स्वाती मध्ये कधीच भेदभाव केला नव्हता.

तिच्या कॉलेजचा आज पहीला दिवस होता. ति एकटीच होती. कॉलेजच्या गेटवर पोहोचताना एक ओळखीचा आवाज तिच्या कानी आला.

“स्वाती”

स्वातीने मागे वळून पाहिले. तर तिची शाळेतली मैत्रीण अनघा होती. स्वाती ला खुप आधार भेटल्यासारख वाटल. तिने पळतच जाऊन तिला मिठी मारली.

त्या दोघी त्यांचा वर्ग शोधून मागे जाऊन बसल्या. कॉलेजच रुटीन सुरू झाल होत.

एक दिवस सहज म्हणून स्वाती आणि अनघा  त्या कॉलेजच्या स्पोर्टस डिपार्टमेंट ला गेल्या. सकाळी लवकरच गेल्या असल्याने तिचे सध्या कोणी नव्हते.

तिथल्या नोटीस बोर्ड वर लागलेले फोटो ती बघत होती. ह्या कॉलेजमध्ये स्पोर्टस खुप जोरात चालतात वाटत. आणि तस होत ते कॉलेज, विद्यार्थ्यांच्या स्किल्स ला डेव्हलप करणार, मग ते कुठलाही असो, अभ्यासातल किंवा खेळातल.

पुढे पुढे जात असताना ति एका फोटोवर थांबली. ति गोंधळली.

“अनु माझा फोटो बघ शाळेतला, इथे कस काय?” स्वाती

तो फोटो स्वातीचा होता, मागच्या वर्षीच्या खो खो खेळतानाचा.
अनघालाही कळत नव्हते.

जेव्हा स्वाती माझा फोटो बोलली, तेव्हाच मागे उभा असलेल्या एका मुलाच लक्ष तिच्याकडे गेल. त्यानेही तिला निरखून बघीतल. तो तसाच बाहेर धावत गेला.

दोघींना कळल नाही का हा त्यांना बघुन का बाहेर पळत गेला.

पुर्ण कॉलेजमध्ये ती बातमी पसरली, स्वाती जाधव आलीये म्हणून.

थोड्याच वेळात त्या कॉलेजचा कोच आणि काही ट्रॅक सुट घातलेले विद्यार्थी तिथे धावत आले. एवढी गर्दी बघुन त्या दोघी मागेच थांबल्या.

त्या विद्यार्थ्यांमध्ये ती पण होती, तीने पटकन येउन स्वाती ला मिठी मारली. स्वातीने पण तिला ओळखल.

“हाय एक्सप्रेस” नेहा.

“हाय, आणि हे एक्सप्रेस काय ग??” स्वाती गोंधळून विचारते. तेव्हा नेहा तिला तिच्या फोटो खालच नाव दाखवते.

“इलेक्ट्रीक एक्सप्रेस”.

बाकीच्या विद्यार्थ्यांनी फक्त आजवर त्यांच्या कोचकडुन फक्त नाव ऐकल होत आज ते तिला बघत होते.

स्वातीच शेवटच वर्ष होत दहावीच. तिचा खो खो चा खेळ पुर्ण शाळेला माहीती होता. पण मामींच्या धाकापायी ति कधीच त्या शाळेकडून बाहेर खेळायला गेली नव्हती.

पण ह्यावर्षी त्या शाळेच्या सरांनी तिच्या मामांकडुन परमिशन मिळवली होती.
स्वाती ला तिच्या टीमची कॅप्टन बनविण्यात आल होत.

जिल्हास्तरीय खो खो च्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.

इयत्ता ९वी ते इयत्ता १२ वी पर्यांतचा एक गट आणि दुसरा महाविद्यालयीन गट.
स्वातीने तिचा मिळालेल्या संधीचा सोन केल. तिचा झंझावात सुरू झाला.

एकशे एक प्रायव्हेट शाळेच्या टिम, स्वाती च्या टिम समोर हात टेकवत होत्या.

स्वातीची टिम मॅचवर एकहाती वर्चस्व  गाजवत होती.

स्वाती च्या टीममधल्या पहिल्या ३ मुलींनाच आउट करता करता, खेळाचा पुर्ण वेळ निघुन जायचा.

एकवेळ बाकी २ मुली आउट व्हायच्या, पण स्वाती आऊट झालेली क्वचितच व्हायच.

त्या पुर्ण स्पर्धेमध्ये एकमेव सरकारी शाळा नाव टिकवून होती. ती फक्त स्वाती च्या टिम मुळे.

स्वातीने तिची टिम खुप मजबुत बांधलेली होती. फक्त डोळ्याच्या आणि हाताच्या इशारा वर पुर्ण टिम खेळत होती.

सेमी फायनल राऊंड त्यांचा स्वातीने अॅडमीशन घेतलेल्या १२ वीच्या टिम सोबत होता.

आता १०वी ची टिम १२ वी च्या टिम सोबत कशी खेळणार, आणि किती वेळ टिकणार. ह्याच आविर्भावात होते ते. कारण त्यांचा अटॅक खुप जबरदस्त होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all