Login

उध्वस्थ ५

वैदेहीच्या मनातलं द्वंद्व सत्य आणि वास्तव या पलीकडे पाहू शकेल कुणी..?

रात्रभर पावसानं कहर केलाय..
उद्वेगाचे कितीतरी कढ रिचवून झालेत.. सत्य आणि आभास यांच्या हिंदोळ्यावर झोका घेणारं मन आत्ता शांत झालंय..
कोसळणारा भावनांचा प्रपात ,ती विद्धता सहज झालीय..
डोळ्यांतून वहाणारे अश्रू ही रुसलेत माझ्यावर की मी ईतकी कोरडी झालेय..? भावनातिरेकाचं दुःख ही वाटेनासं झालंय.. मथ्थड पणा आलाय का विचार करण्याची क्षमताच नाहीशी झालीय..
सध्या काहीच नकोसं वाटतंय कुणाशी काहीही बोलायची ईच्छाच राहीली नाहीये.. रमाकाकू ला काय उत्तर देणार आहे मी..?
आईची मैत्रीणच पण तीला माहीती आहे मिहीर असा वागतोय ते की सगळेच घरचे अनभिज्ञ आहेत..? शिक्षणा निमित्य आणि नंतर बिजनेस साठी सारखा घरा बाहेरच असणारा मिहीर.. या एक दोन वर्षातलीच ओळख...
सहज भेटायला म्हणून रमा काकूला गेलेले ..तीथेच पाहीलेलं मिहीरनं आणि प्रेमांतच पडला. आधी काही वाटलंच नाही फारसं त्याच्या बद्दल ..फारशी ओळख ही नव्हती.. पण नंतर माझ्यातलं गुंतणं त्याचं मोहवून गेलं.. सतत मागे मागे फिरणं ..एका अलवार नात्यांची गुंफण सहज होत गेली..
त्या वेळी त्याचं पझेसिव्ह असणं कधीच खटकलं नाही .. पण नंतर कुठेतरी काहीतरी चुकतंय याची जाणीव व्हायला लागली.. सततच्या चौकशा ,कुठे जाती आहेस ..? कुणा बरोबर आहेस..? आज बाहेरच का गेलीस ..?
फोन वर बोलणं कमी वादच व्हायला लागले.. ते ही सहन केलं पण नंतर काहीतरी बिनसत चाललंय याचं ,संशय पिश्शाच्यानं ताबा घेतलाय याचा असा दाट संशय यायला लागला.. एरवी चार चौघांत सभ्यपणे वागणारा मिहीर
पुरता बदलला.. टोमणे मारणं , अगदी शुल्लक गोष्टींवरून वाद घालणं ह्या वरच थांबलं नाही हे.. तर मित्रांशी बोलायचंच नाही.. ,ड्रेस कोणता घालायचा ,कोणत्या रंगाचा.. टिकली कोणत्या रंगाची लावायची लावायची की नाही ते ही हाच सांगणार.. कोणत्या नातेवाईकांशी बोलायचं तेही किती वेळ हे ही हाच ठरवणार घड्याळात पाहून हे यानंच ठरवायचं...
साडी नेसली तरी पिनअपच हवी एकेरी पदर नको . भलत्यांच अटी माझं स्वतःचं मतच नाही कशांत..
हे असह्य व्हायला लागलं.. तू "अग्नीसाक्षीतला" नाना आहेस का असं का वागतो आहेस हे फक्त विचारलं तर भडकलाच..
कसले पिक्चर पहातेस..?
"असलं काही वागतोय का मी..?"
तुझ्या काळजीनं रात्र रात्र झोप येत नाही..
सगळंच अनिश्चित भविष्य ..कसे दिवस काढायचे याच्या बरोबर ..?
मागे ही याच्या मित्राच्या पार्टीत ही असंच याला आवरतांना घाम फुटला सगळ्यांना..
मी ड्रिंक्स घेत नाही म्हणाले .साँफ्ट ड्रिंक कोणतंही चालेल कींवा ज्यूस ..मित्रानं आग्रह केला "घ्या हो वहीनी . काय होतंय ..?आपलीच आहेत सगळी .. घे ना वैदेही .. सब अपने ही है यार..हम सँभाल लेंगे..
ईतकंच म्हटलं माझा एकेरी उल्लेख आणि संतापलाच .."नाही म्हणती आहे ना ती ? समजत नाही एकदा सांगितलेलं.. आणि तू तू सांभाळणार..? स्वतःला आधी सांभाळ.. बायका दिसल्या की लागलाच मागे.."
बाप रे तमाशाच सुरु केला..
मित्रांनी आवरलं..
नक्की असा का वागतोय हा
काहीतरी कारण असावं नक्कीच.. पण कालचा प्रसंग हादरवणारा ..याचा विचार आता करायचाच नाहीये ठरवती आहे खरं पण रमाकाकू , आणि काका त्यांचा काय दोष यांत ..?
माझा निर्णय जरी ठाम असला तरीही सगळ्यांचा विचार ही केला पाहिजे...बोलावं का एकदा सगळ्यांशी स्पष्ट..? थोडा वेळ अजून मागून घ्यावा का..?
काही सुचेना झालंय..डोक्यांत विचारांचं थैमान उठलंय.."
वैदेही डोकं गच्च धरुन बसली.. सरीता वहिनी चहा घेऊन आली.. " जरा बोलुया का राणी..? मोकळेपणानं बोलु या का..? "
वहिनीनं मायेनं हात डोक्यावरनं फीरवला हलकसं चुंबन घेतलं वैदेहीच्या कपाळाचं .. डोळ्यांत बघत तीनं हातानंच अश्रू पुसले वैदेहीचे..आणि वैदेहीचा बांध फुटला...
क्रमशः ©लीना राजीव..

#उध्वस्थ भाग-५

दोन चार दिवस शांततेत गेले.. मुद्दामहून कुणी वैदेहीला त्रास होईल असा विषयच काढला नाही.. रमाकाकूशी बोलण्या आधी घरांत रवी दादा ,वहिनी आणि आई बाबांनी नातेवाईकांना हे सगळं सांगायचं कसं याचा विचार केला.. दोन्ही घरांतल्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता शेवटी..
समजूतदारपणाने या लोकांनी घेतलं तर बरं होईल पण वाद नकोत सामोपचाराने जितकं घेता येईल तितकं घ्यावं ह्या विचांरां पर्यंत घरातली मंडळी आली..
दारावरची बेल वाजली आणि आत्ता यावेळी कोण असेल या विचारांत सरीता वहीनींनी दार उघडलं..
मिहीरनं आल्या आल्याच वहिनींचे पाय धरले "चुकलोय मी क्षमा करा ..तुम्ही जो पर्यंत माफ करत नाही मी उठणार नाहीये ईथून.." अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेमुळे सरीता वहीनी गडबडून गेली.. नक्की काय करावं हे समजेना.." अरे उठ, मी कोण माफ करणारी. प्लीज उठ.."
"कोण आलंय गं ?"म्हणत वैदेहीची आई बाहेर आली.. मिहीर नं मोर्चा तिकडे वळवला आईं चे पाय घट्ट धरुन नाक घासायला सुरुवात केली "माझं चुकलंय ,सगळंच चुकलंय ..मला फक्त क्षमा हवीय .. असं वागायला नको होतं मी ..वैदेहीचा निर्णय मान्य आहे मला पण एकदा बोलायचंय तीच्याशी ..परवानगी द्या शेवटचंच ..पुन्हा तीच्या आयुष्यांत डोकावणार ही नाही.."
" आई,बाबा खचतील तीच्या या निर्णयानं.. त्यांना काहीच सांगितलेलं नाहीये मी अजून.. साखरपुड्याची तयारी आणि मनासारखी सून मिळालीय या आनंदात आहेत ती दोघं त्यांचा आनंद हिरावून घेणं जमणार नाहीये मला.."

"अरे असं काय करतोस ? शांत हो आधी.. बोलु या ..आमच्या मनांत कोणतीही अढी नाहीये तुझ्या बद्दल पण जरा समजुतीनं तू घ्यावंस असं वाटतंय.."
"तुम्ही म्हणाल ते करायची तयारी आहे ..एकदा फक्त एकदाच बोलु देत वैदेही शी..ती अशी वागू नाही शकत.. "
एकदम मूड बदलला त्याचा.. "ईतकं जीव तोडून प्रेम करतोय मी तीच्यावर .. तीच्याशिवाय जगणं अशक्य आहे मला.. नातेवाईकांना काय तोंड दाखवू.. ? सगळी कडे बदनामी होईल .. यांत वैदेहीला नावं ठेवतील सगळे ..तीनं मोडलंय लग्न.. तीच्या चारित्र्यावर संशय घेतला जाईल.. हवंय का तुम्हाला हे...?"
तो असं म्हणाला आणि हादरल्या दोघीही.. म्हणजे सहजा सहजी हा माघार घेणार नाहीये.. सांभाळून घेण्या ऐवजी धमकी देतोय..
घरांत रवी आणि बाबा कुणीच नव्हतं याला आवरावं कसं ..? घाबरुन गेल्या दोघी.. एकमेकींकडे नुसत्यांच पहात राहील्या..
पवित्रा पुन्हा बदलला यानं "सरीता वहीनींचे पाय धरले.. स्वतःच्या थोबाडीत मारुन घ्यायला लागला .. माफ करा मला ...पण हे लग्न मोडू नका.. मी काहीतरी बरं वाईट करुन घेईन जीवाचं .."
वैदेही चढलेले आवाज ऐकून बाहेर आली.. त्याचा हा अवातार पाहून थरथर कापायला लागली.. पुन्हा तेच पुन्हा तेच.. इमोशनल ब्लँकमेलींग.. आजवर सोसलं सगळंच पण आता अंत पहातोय.. किती विश्वासानं हात हातांत दिला होता याच्या.. आज ही दुसऱ्या कुणाचा ही विचार करु शकत नाहीये पण याचं हे असं पजेसिव्ह असणं सहनशक्तीच्या पलीकडे आहे .. नात्यांतली गुंतवणूक एकतर्फी होती आहे.. अधिकारशाही गाजवून जबरदस्तीनं प्रेम मिळवणं हा कुठला न्याय झाला ? नात्यातली मोकळीक ही नाहीये ..सगळे माझे निर्णय हाच घेणार असेल तर माझ्या जगण्याला अर्थ काय आहे..? असं कुढत जगणं फक्त याच्या वरच्या प्रेमासाठी करायचं..? किती दिवस..? किती महिने..? हा बदलेल याची शाश्वती नाही.. पुन्हा वागणारच नाही असं, खात्री नाही. कुणाच्या भरवंशवार याच्याशी लग्न करायचं..? "
एकदा मनाचा हिय्या केला वैदेहीनं स्पष्टच बोलायचं ठरवलं..
वैदेहीला पहातांच मिहीर उठला त्यानं तीचे दोन्ही हात धरले " ईतकी कृतघ्न कशी होऊ शकतेस..? दिलेली वचनं , आणा भाका सगळं विसरती आहेस..? मी जगु शकणार नाही तुझ्या शिवाय.. ऐक माझं ..मी बदलेन स्वतःला ..तू म्हणशील तसं वागेन.. प्लीज प्लीज लीज वैदु मला अंतर देऊ नकोस.."
त्याचा हात हातांत तसाच ठेवून वैदेहीनं "बोलु या आपण.. शांत बस ईथे जरा म्हणत त्याला बसवलं.. त्याच्या पायाशी बसत " माझं ही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर.. कधी हा विचार केला नव्हता ..एखादा कुणी येईल तुझ्यासारखा आयुष्यांत.. आधीचे दिवस फुलपंखी होतें बिलोरी स्वप्नांचे.. आशा आकांक्षांचे..भविष्यातल्या सप्तरंगाचे.. पण तू नख लावलंस त्या स्वप्नांना.. तुझं वागणंच समजत नाहीये मला.. मूड बदलतात तुझे हरएक क्षणाला.. कधी भरभरून प्रेम करायचं कधी विक्षिप्तपणाची मर्यादा गाठायची.. माझ्यावर अविश्वास दाखवायची एकही संधी सोडली नाहीस.. नाही कुणाचा विचार करतंय तुझ्या शिवाय..मित्र असले तरी ठराविक अंतर कायम ठेवलंय..येऊ दिलं नाही जवळ कुणालाही.. ते ही समजून आहेत.. माझा आदर आणि काळजी घेण्या पलीकडे नाती आहेत ती ..जीवापाड जपलेली ..तूला नाही समजणार.. तुला समजून घ्यायचंच नाहीये..
मला असं घाबरत जगायचं नाहीये ..वेळ दिला तुला हवा तेवढा पण आता तुझ्याशी आयुष्य बांधून घेणं जमणार नाही ..माझ्या निर्णयाचा आदर कर..
तुझ्या बदलण्याची वाट पाहीन मी.. मी ही बदलेन.. बदलायचा प्रयत्न करेन स्वतःला.. तो पर्यंत वेळ देऊया एकमेकांना.. आयुष्य एकमेकां सोबत घालवायचं ठरवलं होतं आता एकमेकां शिवाय जगू शकतोय का हे पाहुया.. ईतरांचा विचार सध्या तरी नको करायला स्वतः साठी जगुया..
तुझ्या सोबत आहेच नाही जात कुठेही सोडून तुला एकमेकांचा विश्वास होऊया.. भेटू अधुन मधून पण स्वांतंत्र्य एकमेकाचं अबाधित ठेवू या.. कोणताही भलता सलता विचार करु नकोस परीक्षा जेवढी तुझी आहे माझीही तेवढीच असणार आहे... मला वाटतं तू सहमत असशील यांवर.."
दूर कुठेतरी गाण्याच्या हळुवार लकेरी दरवळत राहील्या..
समाप्त...

मैं रहूँ या ना रहूँ,
तुम मुझमे कहीं बाकी रहना!
किसी रोज़ बारिश जो आये,
समझ लेना बूँदों में मैं हूँ!
सुबह धुप तुमको सताए,
समझ लेना किरणों में मैं हूँ!!
कुछ कहूँ या ना कहूँ
तुम मुझे सुनते रहना
बस तुमसे है इतना कहना

मैं दिखूं या ना दिखूं,
तुम मुझको महसूस करना!
बस इतना है तुमसे कहना,
बस इतना हैं तुमसे कहना!!
©लीना राजीव.

ही कथा संपुर्ण काल्पनिक आहे.. यांतल्या घटना ,व्यक्तीरेखा ही काल्पनिक आहेत.. तसा संबंध कुठे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा..

🎭 Series Post

View all