उडण्याचे बळ तुच दिलेस, आता सोबत देशील अंतीम भाग

स्वातीने तिचा खेळात प्रगती दाखवली. उशीरा का असेना, तिला तिच्या माणसांची सोबत भेटली. आभार तर सगळ्यांचे व्यक्त केले तिने. मात्र मयंक जवळ तिने आयुष्यभराची सोबत मागीतली.

मागच्या भागात

मयंकने तिला मस्करी मस्करी विचारले देखील होते, की तुझे हे काही बोलले नाही कधी??”

स्वाती ला पहीले कळल नाही, नंतर समजल्यावर ती बोलली, “गरजेला साथ नाही दिली, मग आयुष्यभराची अपेक्षा तरी काय करायची”

हे एकुन मयंक ला जरा बर वाटल की, तो नाहीये आता तिच्या आयुष्यात.

स्पर्धा जवळ आल्या. टिम ची कॅप्टन निवडायची वेळ आली, तेव्हा स्वातीने स्वतः पुढे येउन विद्याच नाव सजेस्ट केल. बाकीच्यांना कळल नाही का म्हणून.

आता पुढे

“मागच्या वर्षी पासूनचा तिचा खेळ बघतेय, तेव्हा जर तुम्ही तिने सांगितल्याप्रमाणे खेळले असते तर कदाचित जिंकु शकत होते. तिचा प्रेझेन्स ऑफ माईंड खुप अॅक्टीव्ह आहे.” स्वाती

जिंकण्यासाठी टिम एकत्र आणणे गरजेचे आहे, शाळेच्या वेळेस पण तिने तेच केल होत आणि आता कॉलेजला पण तिने तिची टिम ला मनाने एकत्र केले होत.

कोच ला आणि टिम ला आठवत होत की, विद्या काही डिसीजन ला विरोध करत होती, नेमकी त्याच पॉईंटवर ते हारले होते. आणि जे काही पॉईंट मिळाले होते ते तिनेच खेचुन आणले होते.

स्पर्धा सुरू झाल्या. अपेक्षेप्रमाणे त्यांची टिम एकजुट होउन एक एक विजयाचा टप्पा पार पाडत होती. विद्येच्या कॅप्टनशीपमुळे ती टिम समतोल दिसत होती.

अॅटॅकींग तर खुप चांगली होती त्या टिमची. पण ज्या डिफेन्समध्ये ते मार खात असत. तिथे आता स्वाती खंबीर ऊभी रहायची.

त्यानंतर सलग ५ वर्षे त्यांच्या कॉलेजमध्ये खो खो च्या खुप सा-या गोल्डन ट्रॉफी अॅड होत राहील्या होत्या.

तिच्या प्रगतीचा आलेख वाढत होता.

तिची निवड राज्यस्तरीय टिममध्ये झाली होती. तिथेही तिचा तो झंझावात कायम राहीला. ज्याची जी एक्सपरटीझ आहे, स्वाती त्याला तिथे सजेस्ट करायची. आणि त्याचा फायदा टिम ला व्हायचा.

तिच्या रस्त्यात येणारे प्रत्येक काटे मयंकने तिच्यापर्यंत येण्याआधीच तोडून टाकले होते. ते ही तिला न समजता.

गावंढळ म्हणून तिला बोलत होते तेच तिचा आता रिस्पेक्ट करत होते.

आज तिने नॅशनल लेव्हलवर राज्यात प्रतिनिधीत्व करत गोल्ड मेडल आणल होत. तिच्या कॉलेजमध्ये तिचा सत्कार ठेवला होता.

ज्या काका काकुंनी तिला टाळल होत, ज्या आत्याने तिचा शब्द मोडला होता, ज्या मामींनी तिला अॅडमीशन घेउन दिल म्हणून आकांडतांडव केला होता. तेच सगळे आज जमा जाले होते, माझी मुलगी म्हणत.

आत्याला तर तिने दिलेला शब्द आत्ता आठवत होता. ते ऐकून मयंक ला कसरतीचे झाल. तो मागे नेहा सोबत जाउन उभा राहीला.

अनघा, नेहा, मयंक लांब मागे उभे होते.

स्वाती बोलायला उभी राहीली. तिने तिच मत व्यक्त केल.

त्या कॉलेजचे, कॉलेजच्या प्रिन्सिपॉल चे आभार मानले. कारण त्यांनीच तिला त्यांची मुलगी म्हणून सर्व काही दिले होते.

स्वातीने पाहीले की ते तिघ लांब उभे आहेत. तिने दोघींना बोलावून घेतले, “ह्यांच्या सारखी मैत्री सोबत असली न, की कशाचीच कमतरता भासत नाही, तुमचे ही खुप खुप आभार, तुम्ही होते म्हणून मी आज ईथवर पोहोचू शकले.”

“अजुन एक व्यक्ती माझ्या आयुष्यातला, जो थोडा वेळासाठी माझ्यापासून दुर गेला होता, तो पण आज मला परत मिळेल अशी अपेक्षा करते”

मयंक ला वाटल की ती तिच्या आत्याच्या मुलांबद्दल बोलतेय. तिकडे तिची आत्याही खुश झाली.

मयंक जायला निघाला. स्वातीने ते पाहील.

“त्या चिचेंच्या झाडावरची चिंच अजुन वाट बघत आहेत मयंक, आजवर मला माझ्या आभाळात उडण्याचे बळ तुच दिलस, आता आयुष्याची सोबत देशील? ” स्वाती

मयंकची पावल थांबली.

सगळे मयंक कडे बघतात.

तिच्या आत्याचा चेहरा पडतो.

 नेहा आणि अनघा तर उड्याच मारायला लागतात.

नेहाने मयंक ला तिच्या आठवणीत झुरताना, रडताना पाहील होत. आज त्याच स्वप्न पूर्ण झाल होत.

मयंक ने हात पसरवले. तशी स्वाती धावत जाऊन मयंक च्या मिठीत विसावली.

“ते तुमच लग्नानंतर बघा न, पहीले लग्न आटपून घेउ” मागुन आवाज आला. मागे मयंक चे आई वडील असतात.

स्वाती त्यांना बघुन पहीले घाबरते.

 “अग त्यांना माहीती आहे सर्व” मयंक

तशी स्वाती लाजली.

धुमधडाक्यात त्यांच लग्न लावुन देण्यात आल. कन्यादनाला मात्र स्वातीने प्रिन्सिपल सरांनाच हट्टाने बसवले होते.

उडणा-या त्या पंखांचे पाठबळ आता हक्काचे झाले होते.

समाप्त

🎭 Series Post

View all