TYSM

शिकवत जाणा-या अनुभव, परिस्थितीला Thank You So Much तर म्हणायला पाहिजे ना...
प्रिय वाचक

आपल्यासाठी ‘टीवायएसएम’ या नावाची कथामालिका घेऊन येत आहे. यात प्रत्येक लघुकथा कथा वेगळ्या असतील पण त्या ‘टीवायएसएम’ चा एक भाग असतील. तुमच्या लक्षात आलंच असेल ‘टीवायएसएम’ म्हणजे थँक्यू यू सो मच...

आपल्या आयुष्यात काही लोक, परिस्थिती वेगळे, विचित्र तर कधी आतून कोलमडणारे, पिळवटून टाकणारे अनुभव देऊन जातात... ते एका अर्थाने आपल्याला काहीतरी शिकवूनच गेलेले असतात... आणि त्यावेळी त्यासाठी लागणारी, त्या अनुभवाची किमंत आपण आर्थिक नुकसानीतून, झालेल्या मानसिक त्रासाने, तुटलेल्या नात्यातून अदा केलेली असते...

अशा अनुभवविश्व उलगडणाऱ्या... वेगवेगळ्या वळणांवरच्या कथा या ‘टीवायएसएम’ सिरीजमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत...

तुमचं सर्वांचं माझ्या लेखनप्रवासात स्वागत आहे...