Feb 26, 2024
नारीवादी

टिपिकल बाई वाटत असेल ती..

Read Later
टिपिकल बाई वाटत असेल ती..
टिपिकल बाई वाटत असेल ती.

श्रावणी, "कशी आहेस,चल भेटूया आपण.."

तृप्ती खूप वर्षांनी भारतात आली होती आणि सहज फोन चाळत बसलेली असतांना श्रावणीचा फोन नंबर दिसला..

ती हसली... मनात आठवणीने घेर घालायला सुरुवात केली..

आता श्रावणी एक टिपिकल बाई वाटत असेल..

दोघी बालपणीच्या घट्ट मैत्रिणी...वेडी अल्लड..बोलकी..श्रावणी..आली की तृप्ती आणि ती फुगडी खेळायच्या...दम लागला तरी थांबायच्या नाही..हसून हसून सगळ्या वाड्यात गोंधळ घालायच्या....कधी घर घर खेळायच्या तर कधी भावाला भावलीचे लग्न लावायच्या.. छोट्या छोट्या गोष्टींवर ही हसायच्या..दोघी एकमेकींशिवाय रहात नसत..कधी तृप्ती कुठे गावाला गेली की वाड्यात शांतता पसरलेली असायची...

तृप्तीचे आई वडील नौकरी निमित्त ह्या शहरात आले होते..श्रावणीच्या आजोबांच्या जुन्या वाड्यात खोली करून रहात होते.. ते जवळपास ती बारावीपूर्ण करूनच हे शहर सोडून गेले..आणि तेव्हाच तृप्ती आणि श्रावणीची मैत्री तुटली....मैत्री होती पण दोघी वेगळ्या झाल्या..हळूहळू मग संपर्क ही कमी होत गेले..कधी तरी फोन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//