Feb 26, 2024
वैचारिक

Types Of Taunts Writer Face

Read Later
Types Of Taunts Writer Face

" अग काय लिहीत बसतेस मोबाईलवर ? टाईमपास नुसता. " नवऱ्याने तिला टोमणा मारला.

***

" काय लिहीत बसतोस रे मोबाईलवर ? हे असलं लेखन वगैरे करून पोट भरत नसते. आधी करीयरवर लक्ष दे. लेखन करणे आपले काम नाही. " आईने त्याला टोमणा मारला.

***

आपल्या एका फॅनचा मेसेज पाहून तो खरच सुखावला.

" काय हसतोय रे ? गर्लफ्रेंड वगैरे या घरात चालणार नाही. चपलीने मारेल. " त्याचे बाबा ओरडले.

***

" काय हे व्याकरण आणि शुद्धलेखन. किती चुका. व्याकरण जमत नसेल तर तोंड वर करून लिहितातच कशाला ?" एका वाचकाने तिला कमेंट दिली.

तिचे डोळे पाणावले.

***

" किती लेट पार्ट पोस्ट करतात. लाज वाटू द्या. " एक वाचक म्हणाला.

घरचे टोमणे , संसार , मुले सर्व सांभाळून ती लेखन करत होती.

***

" मला वाटलं तुझ्या कथेत दाखवल्याप्रमाणे तू पण खूप सुंदर असशील. असो. " तिचा मेल फॅन फोटो पाहिल्यावर म्हणाला.

नंतर त्या फॅनने कधीच तिच्या कथा वाचल्या नाहीत.


लेखक म्हणून तुम्हाला कोणते टोमणे बसलेत ?

©® पार्थ धवन

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//