त्यांना काहीच करायचं नसत... अंतिम

इकडे सुरेश राव सुरेखा ताईंना खूप सहानुभूती मिळत होती, बरेच नातलग मित्र मंडळींना समजल होत शरद प??

त्यांना काहीच करायचं नसत... अंतिम
त्यांना कुठलीच जबाबदारी नकोय

©️®️शिल्पा सुतार
........

जेवायची वेळ झाली प्रीतीने सावनीला आधी वाढून दिल, सुरेश राव सुरेखा ताई आले जेवायला, जरा गप्प होते ते,

" आई बाबा काय म्हणत होते तुम्ही बोला ",.. शरद

"प्रीतने नौकरी करण आम्हाला मान्य नाही",.. सुरेश राव

"का काय झाल आता? ",... शरद

"स्वयंपाकाला बाई लावली काय गरज आहे? ",... सुरेखा ताई

"प्रीती एवढी हुशार आहे करू द्या तिला काम",.. शरद

"सावनीच काय ठरलं मग? ",.. सुरेखा ताई

" तीला सध्या प्रीतीच्या आई कडे ठेवणार आहोत",... शरद

" कश्याला? म्हणजे लोक आम्हाला नाव ठेवतील की बघा हे आजी आजोबा नातीला सांभाळायला तयार नाहीत ",.. सुरेखा ताई

"पण खरं तसच आहे ना, तुम्ही सांभाळायला तयार नाहीत ना, मग काय करणार आम्ही? , नंतर एक बाई ठेवणार आहोत सावनी कडे लक्ष द्यायला इथे घरी, तिला बस स्टॉप वरुन घरी आणायला, ती घेईन अभ्यास ",.. शरद

" नको बाई आम्ही लक्ष देणार नाही त्या बाई कडे, त्या पेक्षा सावनीला प्रीतीच्या आई कडे ठेवा ",... सुरेखा ताई

" हो पण कायम नाही ना ठेवता येणार तिला तिकडे? तुम्ही काय करता दिवस भर? जरा काम नको तुम्हाला? ",... शरद आता चिडला होता

" तुझी अशी आम्हाला बोलायची हिम्मत कशी झाली? आम्ही आमचे कर्तव्य केले आहेत पूर्ण, तुम्ही करा आता तुमच कर्तव्य, काहीही काम नको त्या प्रितीला, सगळ्या कामाला बाई ठेवली आहे ",.. सुरेखा ताई

" प्रीतीला म्हणा जरा घरात लक्ष देत जा जॉब वगैरे राहू दे",.. सुरेश राव

आई बाबांच्या स्वभावाला शरद वैतागला होता, तो चीड चीड करत आत आला

" काय झाल शरद ",.. प्रिति

" आई बाबांना समजुन घ्यायच नाही, काय करू या आता? " ,... शरद

" काळजी करू नकोस होईल जस व्हायच तस होईल, उद्या आपण माझ्या आई बाबांना कडे जाऊ सावनी बाबत बोलाव लागेल",... प्रिति

हो चालेल..

दुसर्‍या दिवशी प्रीती सावनी रेडी होतो

" कुठे निघाले तुम्ही?",... सुरेखा ताई

" मी आई कडे जाते आहे \",.. प्रिति

"स्वयंपाकाची बाई केव्हा येणार आहे",.. सुरेखा ताई

"येईल थोड्या वेळाने",. प्रिति

"तिच्या कडे कोण लक्ष देईल मग?",.. सुरेखा ताई

" तुम्ही आहात ना घरी",.. प्रिति

"आम्ही जातो फिरायला आता तू अस कर तिच्या कडे लक्ष दे मग जा ",.. सुरेखा ताई

" नाही मी निघते आहे आता, शरद तिकडे येणार आहे परस्पर, आमचा स्वयंपाक नका करायला सांगू बाईला, तुम्हाला नसेल जमत लक्ष द्यायला तर तिला आज काम नाही अस सांगा ",... प्रिति

\"हो का मग आम्ही काय खाणार?",.. सुरेखा ताई

"तुम्ही करून घ्या तुमच्या हाताने, खर तर पूर्वी पासून थोड स्ट्रीक्ट वागायला हवं होत मी, उगीच तुमच्या पुढे पुढे केल",... प्रीती सावनीला घेवून आई कडे निघून गेली

सासुबाई सगळीकडे सांगत सुटल्या प्रीती कशी वागली आज ते, एवढ बोलली ती मला आज, आमच घरात काहीही चालत नाही, घरात सगळ प्रीती बोलेल तस होत, आता ही काही काम नाही केल तिने, काढली गाडी की गेली फिरायला, काय कराव आता आम्ही? ,

सावनीला तिकडे आईकडे ठेवण्यात सावनीच्या आईला काही अडचण नव्हती, फक्त घर थोड लांब होत, उगीच रोजची ये जा होईल, सावनी खुश होती आजी कडे, तिथे खेळायला बरेच मुल होते,

तरी एक मदतनीस ठेवू या सावनी साठी, ती लक्ष देईल अभ्यास घेईल, बस स्टॉप वरुन घेवून येईल तिला, अशी जरा हुशार मुलगी बघू

प्रीतीचा इंटरव्यू छान गेला, तिला लगेच जॉईन व्हायच होत, सावनीची ओढाताण होत होती, प्रीतीच्या आईच घर थोड लांब होत

"आपण एक काम करू प्रीती, तुझ्या आईच्या घराजवळ एक फ्लॅट घेवू, तिथे सोमवार ते शुक्रवार राहू शनिवारी रविवार घरी राहू",.. शरद

"चालेल तू बोलून बघ घरी",.. प्रिति

शरदने घरी सांगितल, आई बाबा काही बोलले नाही,.., "आता तुम्हाला आमची जबाबदारी नको आहे, काय बोलणार आता आम्ही, तुम्हाला नौकरी प्रिय, करा काहीही",

" इकडच आवरायच, स्वयंपाक पाहुणे, येणारे जाणारे वगैरे कोणी बघयायचे ",.. सुरेखा ताई

" तुम्ही सावनीला सांभाळल असत तर हा प्रश्न येणार नाही ना? आम्हाला जर सपोर्ट नाही कोणाचा तर आम्ही काय करणार ",... शरद

" आम्ही आधीच सांगितल आमचा नकार आहे प्रितिला काही गरजच नाही एवढी धावपळ करायची",... सुरेश राव

" जाऊ द्या तुम्हाला नाही समजणार बाबा",.. शरद

प्रीती शरदने तिकडे एक फ्लॅट भाड्याने घेतला, ते तिघे तिकडे रहायला गेले, वीक एंडला घरी येत होते ते, सुरेखा ताई बरोबर सगळे काम काढून ठेवत होत्या प्रीती साठी, प्रीती दमून जायची, ती विचार करत होती की सुट्टीच्या दिवशी सावनीचा अभ्यास घेवू, आराम करू, पण ते होत नव्हत

आज सुट्टी होती, शरद उठला, त्याने चहा ठेवला प्रीतीला थोडा ताप होता, खुप दगदग होत होती,

"आज मी येत नाही तिकडे, तु जावून ये आई बाबां कडे",.. प्रिति

"ठीक आहे मी दुपारनंतर जातो भेटून परत येतो",.. शरद

दहा वाजता सुरेखा ताईंचा फोन आला,.. "अजून कसे आले नाहीत तुम्ही?",..

"हो येतो मी दुपार पर्यंत",... शरद

"इकडे पाहुणे येणार आहेत, प्रीतीला लवकर पाठव घर आवरायच आहे स्वयंपाक आहे ",.. सुरेखा ताई

" तिला बर नाही तू बाईला सांगून दे काम ",.. शरद

" बर पाहुणे येणार आहेत हे ऐकुन ताप आला का",... सुरेखा ताई

" आई काय हे, आता तरी सोड तिरकस बोलण",.. शरद

दुपार नंतर खूप ताप आला प्रीतीला ते सावनीला प्रितीच्या आई कडे सोडून डॉ कडे गेले, शरद गेला नाही घरी

रात्री सुरेखा ताईचा फोन आला, खूप बोलल्या त्या शरद ला, प्रिती झोपलेली होती, प्रितीच्या आई कडून जेवणाचा डबा आला, शरद नाराज होता

" काय झाल शरद?, तुझा चेहरा असा काय झाला?",.. प्रिति

"काही नाही आई चिडली आहे, तीच म्हणण आहे आपण आपली जबाबदारी पूर्ण करत नाही",.. शरद

"काय करू या मग आता, मला बर वाटत नाही",.. प्रिति

"इथे राहण कठिण झाल आहे, मला आमच्या ऑफिस तर्फे फॉरेनला जाण्याचा चान्स मागे ही मिळाला होता तेव्हा नाही सांगितल आपण, आता मिळतो आहे का ते बघु का? ट्राय करु या का? ",.. शरद

"चालेल पण आई बाबा हो म्हणतील का? , आणि माझ्या जॉबच काय ",.. प्रिति

"तू तिकडे कर प्रयत्न, आपण सावनीला डे केअर मध्ये ठेवू, आणि आई बाबा आपण काहीही केल तरी नाव ठेवतात, बोलू दे जे बोलायचं ते",... शरद

"चालेल जरा लांब राहील की बर असत",.. प्रिति

दुसऱ्या दिवशी शरदने ऑफिस मध्ये अप्लाय केल, फॉरेनची अपॉर्च्युनिटी ओपन असेल तर मी रेडी आहे तिकडे जायला, त्यांना हवेच होते लोक तिकडे जायला, शरदच लगेच काम झालं, त्याने लगेच प्रीतीला फोन केला प्रीती आपल्याला, पुढच्या एका महिन्यात फॉरेनला जायचं आहे, तर तू तुझ्या ऑफिसमध्ये विचारून राजीनामा देऊन टाक

"चालेल घरी आल्यावर बोलू, मग मी उद्या देते राजीनामा" ,.. प्रिति

चालेल शरद घरी आला तो खूप खुश होता, प्रीतीने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला होता,.. "एवढी मोठी संधी ऑफिस मधुन चालून आली तुला अमेरीकेत काम करायची, तुझं खूप अभिनंदन शरद आणि सावनीच्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने ही आपण तिकडे राहण चांगला आहे ",

"आई बाबांना सांगितलं का तू",.. प्रिति

" नाही मी अजून काही बोललो नाही प्रत्यक्षात जाऊन सांगावं लागेल",.. शरद

" मला राजीनामा द्यावा लागेल उद्या ",.. प्रिति

" ठीक आहे उद्या संध्याकाळी जाऊ आपण दोघी घरी जावू आणि दोघांना सांगून देऊ तुझे आई बाबा, माझे आई बाबा त्यांना ",.. शरद

चालेल

घर भाड्याने घेतलं होतं त्या मालकाला ही सांगून दिलं की आम्ही पंधरा दिवसात घर खाली करतो आहोत, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, दुसऱ्या दिवशी प्रीतीने ऑफिसमध्ये राजीनामा द्यायला पेपर दिला, त्यांनी कारण विचारल, प्रितीने फॉरेनच सांगितल, आपल पण ऑफिस आहे तिकडे, तुझी तिकडे ट्रान्सफर होत का ते बघू, एक आठवडा इकडे ऑफिस मध्ये ये तो पर्यंत सांगतो आम्ही

प्रीतीने आनंदाची बातमी शरदला सांगितली खूप आनंद झाला होता त्याला,.. "तुझ काम झाल तर दोघांना नौकरी राहील तिकडे" ,

"सावनीच बघु आता काय ते",.. प्रिति

"तिकडे डे केअर खूप चांगले असतात, काळजी करू नकोस तिकडे कामाच्या वेळा थोड्या व्यवस्थित आहेत होईल ठीक, आपल्या मुलीच फॉरेनला शिक्षण झाल तर भरून पावल",.. शरद

संध्याकाळी ते दोघं आधी प्रीतीच्या घरी गेले तिथून त्यांना बातमी दिली, ते सगळे खुश होते अशी प्रगती करा, तिथून सावनीला घेऊन ते शरदच्या आईबाबांकडे गेले,

"आज कसं काय येण केलं तुम्ही दोघांनी इकडे , आम्हाला जरा वेळाने बाहेर जायचं आहे",.. सुरेश राव

"हो जा आम्ही दहा-पंधरा मिनिट बसणार आहोत आई-बाबा, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, माझी अमेरिकेत ट्रान्सफर झाली आहे, पुढच्या महिन्यात आम्ही तिघे जातो आहोत तिकडे , व्हिसा साठी लगेच इंटरव्ह्यु आहे आमचा",... शरद

" चला म्हणजे तुम्ही आमची जबाबदारी पूर्ण झटकायची असं ठरवलं आहे, म्हातारे आई वडिल राहतील एकटे",... सुरेश राव

" बाबा तुम्हाला आनंद नाही झालं का? ",.. शरद

" नाही झाला, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? तू आणि तुझी बायको नेहमी घरची जबाबदारी झटकतात, आता ही मुद्दाम तिकडे ट्रान्सफर करून घेतलीस तू ",... सुरेश राव

" काय बोलत आहात बाबा तुम्ही? प्रीतीने नेहमी तुमच्या सगळ्यांचा भरपूर केल आहे, मी बघत आलो आहे, उलट तुम्हीच आहात की तुम्ही तुमची जबाबदारी झटकली आहे, आमच्या मुलीला सांभाळायला तुम्ही नकार दिला म्हणून आम्हाला घराबाहेर पडावं लागलं, आता मला परदेशात काम करायची संधी मिळते तर तेही तुम्हाला चालत नाही तुम्हाला हवं तरी काय? तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त आम्ही सगळ करायला हव तुम्हाला, अस कस चालेल , तुम्ही काय नुसते नावाला आजी आजोबा आहात का? ",... शरद

" निघा तुम्ही आता शरद प्रीती इथे दोन मिनीट थांबू नका, मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही ",... सुरेश राव

" आई तू तरी बोल काही तरी ",... शरद

" छान झाल शरद प्रीती आमचे आशीर्वाद आहेत",... सुरेखा ताई जास्त काही बोलल्या नाहीत

शरद प्रीती निघाले, थोड पुढे आल्यावर शरदने कार बाजूला लावली, शरद रडायला लागला, बाबा नीट बोलले नाही माझ्याशी प्रीती,

" धीर धर शरद, तुला राहायच का आई बाबां जवळ?, तू म्हणशील तस करू आपण ",... प्रिति

" नाही आता ठरलं आहे यात बदल होणार नाही ",.. शरद

पुढच्या महिन्यात ते दोघ फॉरेनला निघून गेले, तिकडे खूप छान जम बसला त्यांचा, सावनी रमली तिकडे, दोघांचा जॉब व्यवस्थित सुरू होता,

इकडे सुरेश राव सुरेखा ताईंना खूप सहानुभूती मिळत होती, बरेच नातलग मित्र मंडळींना समजल होत शरद प्रीती फॉरेनला गेले, सगळे येवून भेटत होते, ते दोघ कोणी आल की रडत होते, काय सून आणि मुलगा आहेत?, या वयात आई बाबांना सोडून निघून गेले फॉरेनला, आई वडलांना आधार द्यायचा तर त्यांना एकट सोडून गेले, कसे वागतात आताच्या पिढीचे लोक, अस वाटत शिकवू नये मुलांना, जास्त शिकलेले मुल अस करतात, बरेच बोलत होते लोक,

पण या निर्णयाच मूळ कारण काय? का गेले शरद प्रीती घर सोडून हे कोणाला माहिती नव्हतं, सगळे मुलाला सुनेला दोष देत होते.

अस असत सगळीकडे आई बाबा सपोर्ट करत नाही मग काय करतील मुलगा सून त्रास तरी किती सहन करतील आणि नातेवाईकांना तरी किती सांगतील की आमचा दोष नाही, काही बोलण्या पेक्षा कधी कधी गप्प बसलेल बर अस वाटायला लागत. 

त्यामुळे कोणी आपल्या आसपास असे लोक दिसले तर लगेच मत बनवू नका, त्यांच्या घरच्यांवर टीका घेवू नका आपल्याला काही माहिती नाही तिकडे नक्की काय झाल ते, त्यांचा सून मुलगा कोणत्या परिस्थितीतुन परदेशात गेला किंवा वेगळ रहात आहे. 







 

🎭 Series Post

View all