त्यांना काहीच करायचं नसत... भाग 1

शरद प्रिती दोघ खूप शिकलेले, दोघांच खूप छान पटायच, प्रिती आधी नौकरी करायची, सावनीचा जन्म झाला तेव्हा तिने ब्रेक घेतला होतात्यांना काहीच करायचं नसत... भाग 1
त्यांना कुठलीच जबाबदारी नकोय

©️®️शिल्पा सुतार
........

"अहो रात्रीचे अकरा वाजले अजून मुल आले नाहीत पार्टीहुन, किती ते बाहेर फिरण",.. सुरेखा ताई

"तू झोप उगीच डोक्याला ताण नको आपल्या",.. सुरेश राव

"सावनी झोपली असेल ना पण",.. सुरेखा ताई

" आता आपणच नाही बोललो ना तिला सांभाळायला, ते तर तिला घरी ठेवायला तयार होते, घेवुन गेले सावनीला मग ते सोबत ",... सुरेश राव

" जाऊ द्या हो आता हल्ली होत नाही माझ्या कडून, बरेच वर्ष केल, आता नको वाटत",.. सुरेखा ताई

शरद, प्रिती, तिची मुलगी सावनी छान त्रिकोणी कुटुंब, आणि शरदचे आई बाबा , सुरेश राव, सुरेखा ताई सगळे एकत्र रहात होते ते, सुरेश राव रिटायर झालेले होते ,

शरद प्रिती दोघ खूप शिकलेले, दोघांच खूप छान पटायच, प्रिती आधी नौकरी करायची, सावनीचा जन्म झाला तेव्हा तिने ब्रेक घेतला होता, आता सावनी बरीच समजूतदार झाली होती, एकटी राहू शकेल ती आजी आजोबां जवळ, फर्स्टला होती ती, प्रिती आता परत जॉब करायचा विचार करत होती ,

पण घरच्यांचा हवा तसा सपोर्ट नव्हता त्यांना, सुरेश राव सुरेखा ताई एकत्र मस्त रहात होते, कोणतही काम कोणतीही जबाबदारी नको होती त्यांना, सदोदित आम्ही खूप केल आता आराम हवा आहे अस सांगायचे ते, खर तर सुरेखा ताई सुरेश राव कायम सासू सासर्‍यां पासून वेगळे राहिले आणि आता मुला कडून अपेक्षा ठेवतात त्याने सुनेने सगळ कराव, सदोदित ते मुलांना बोलत असायचे,

आजही अस झाल... शरदच्या ऑफिस मध्ये पार्टी होती, प्रिती ही जाणार होती सोबत, सावनीला घरी ठेवू या, पण सासुबाईंनी नकार दिला, आम्ही नाही सांभाळणार तिला, आमच्या कडून नाही होत,

मग ते तिघे गेले पार्टीला

सुंदर फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये पार्टी होती, खुप मजा येत होती, बर झाल सावनीला आणल सोबत, खूप छान खेळत होती ती, बरेच मुल होते तिथे, जेवण ही छान होत, शरद प्रीती खुश होते, येतांना सावनी झोपून गेली, खूप उशीर झाला घरी यायला, दुसर्‍या दिवशी सुट्टी होती,

सुरेखा ताई सकाळी सहा पासून उठून बसल्या होत्या,
आठ वाजले तरी प्रीती उठली नव्हती, त्यांनी शरद प्रितीच्या रूमचा दरवाजा वाजवला,... "उठ प्रीती आम्हाला चहा हवा आहे",

"आई अग आम्ही किचन मधे झोपलो आहोत का? तू कर की चहा",... शरद

"होत नाही माझ्या कडून आता हल्ली ",.. सुरेखा ताई

हे अस होत, यांना काहीच करायच नव्हत , घरकाम नको, कोणती जबाबदारी नको, रोज छान फिरायला जातात, वेळोवेळी ट्रीपला जातात, नातेवाईकांन कडे जातात, मुलगा सुनेच काही करायला नको फक्त, मदत करत नाही त्यांना , घरकाम नको, एकदा काम केल की नेहमी कराव लागेल ना म्हणून,

शेवटी प्रीती उठली चहा केला सगळ्यांना दिला हातात नेऊन,

"आज अगदी नउ वाजले ना चहा घ्यायला, तुझ्या पप्पांना सकाळी सहाला चहा लागतो, पण होतो आता हल्ली उशीर, ठीक आहे",... सुरेखा ताई

"अरे मग तुम्ही करून घ्या ना एक कप चहा, पप्पांना ही देत जा लवकर चहा",.. शरद

सुरेखा ताई काही बोलल्या नाहीत

लोकांना सांगायला घरात मोकळ वातावरण होत, पण प्रितीचा त्रास वेगळ्या प्रकारचा होता

सगळ येत होत तिला हाच मोठा प्रॉब्लेम होता, कार चालवत येत होती, बाहेरचे कामे... ऑनलाईन कामे येत होती, त्यामुळे सगळ तिला कराव लागायच, शिवाय घरची कामे आहेतच ती चुकली नव्हती,सुरेखा ताई होत नाही म्हणून काहीही करत नव्हत्या , ना घरच काम ना नातीला सांभाळण,

फक्त आमच सगळ तू कर, तुझ आम्ही काहीही करणार नाही अस होत

या सगळ्यात एक गोष्ट चांगली होती नवरा शरद चांगला होता, पण तो खुप बिझी होता, मोठ्या पोस्ट वर असल्याने त्याला वेळ नव्हता घरच्यांसाठी, आई बाबां, घरचे प्रिती कडून सगळी अपेक्षा करत होते, सून हक्काची असते,

आज आवरून शरद ऑफिसला गेला, सुरेखा ताई आवरून रेडी होत्या,

"प्रिती आम्हाला जरा मंदिरात सोडून ये ग कारने",.. सुरेखा ताई

"मला खूप काम आहेत आई बाबा तुम्ही आज टॅक्सीने जाता का? ",.. प्रिति

"कश्याला टॅक्सीचा खर्च घरची कामे होत राहतील ग, चल लवकर पूजेचा मुहूर्त जाईल",... सुरेखा ताई

प्रितीने हातातलं काम बाजूला ठेवल, कार काढली त्या दोघांना सोडून आली ती देवळात, खर तर तिला सावनी शाळेतून येण्या आधी सगळ काम संपवायच होत, पण हे सासू सासरे तिला अजिबात काही सुचू देत नव्हते, ती घरी होती ना नेहमी easy available

कुठे बाहेर जायच असेल तर काढ कार, सोडून ये आम्हाला, परत घरी येवून घरची काम करा, परत यांना घ्यायला जा, येते ना प्रितीला कार मग कश्याला हवी टॅक्सी

प्रिती कंटाळली होती, तिने शरदला फोन केला

"काय कुठे गेली होतीस प्रीती?",.. शरद

"आई बाबांना देवळात सोडल",.. प्रिति

"का? टॅक्सीने जायच ना त्यांनी",.. शरद

"आता हे त्यांना समजायला पाहिजे ना, दुसर्‍याला किती त्रास द्यायचा ते, जाऊ दे, मला आता या विषयावर बोलायचा ही कंटाळा आला आहे",.. प्रिति

"खर आहे मी बोलतो त्यांच्याशी",... शरद

"तुला मी या साठी फोन केला होता, त्या प्लेसमेंट सर्विसचा फोन नंबर लगेच पाठव, मी जॉब बघते आता, मला खूप कंटाळा आला आहे घर काम करून, दुसर काही आयुष्य नाही जस माझ, मी शिकलेली आहे हे विसरून गेली आहे मी ",... प्रिति

"हो चालेल ते बर राहील, बराच गॅप झाला तुझा आता, तु खुप हुशार आहेस, सगळी हुशारी घरकामात जाते आहे तुझी, स्वतः च्या करिअरच बघ आता ",... शरद

" शरद तू खूप छान आहेस, खूप समजून घेतोस मला ",.. प्रिति

" चल काहीतरी तुझ... आज जाऊ या का पिक्चरला दोघ? ",... शरद

हो...

" तिकीट बूक करतो मी, रात्री जाऊ मस्त, तू रेडी रहा, सावनीच जेवण करून दे, दुपारी आराम कर ",... शरद

हो...

प्रिती आता खुश होती, शरदशी बोलून छान वाटत, खूप समजूतदार आहे हा, ती घरी आली पटापट आवरल, पोळ्यांना बाई होती ती येवून गेली, सावनी येईल आता, तिला घ्यायला बस स्टॉप वर गेली ती,

तेवढ्यात सुरेखा ताईंचा फोन आला,.." अग आमच देवळाच काम झाल आहे, घ्यायला येते का?",

"मी बाहेर आहे आई, सावनीला घ्यायला आले आहे, तुम्ही या तुमच तुमच",... प्रिति

"अग आता इथून कुठे टॅक्सी मिळेल? तू सावनी आली की ये ना",.. शरद

"आई मंदिर इथून अर्धा तासावर आहे, मी तिकडे येईल तो पर्यन्त तुम्ही घरी याल टॅक्सीने, माझी धावपळ होते हो ",... प्रिति

" तू ये ग.. कार मध्ये तर बसायच आहे ",... सुरेखा ताई

" ठीक आहे, अजून बस आली नाही, लेट आहे बस, सावनी सकाळ पासून गेली आहे, ती आली की जेवण करेन, मग येते मी,अर्धा तासाने निघते, तो पर्यन्त तिकडे थांबा तुम्ही, सावली बघून बसुन रहा ",... प्रिती ने फोन ठेवला,

" अग अटोप लवकर",... सुरेखा ताई

दहा मिनिटाने बस आली, प्रिती सावनी घरी आल्या, छोटीशी सावनी खूप थकली होती, तिला जेवू घातला, मग प्रीतीने सासूबाईंना फोन केला,.." निघाले आहात का तुम्ही? की येऊ घ्यायला? ",

\"निघालो आहोत किती वेळ उन्हात उभं राहणार ",... सुरेखा ताई रागात होत्या

" तेच सांगत होती मी तुम्हाला निघून यायचं टॅक्सीने, सारखं मला घ्यायला यायच आणि सोडवायला या हट्ट का करतात, सगळे दमतात उगीच ",... प्रिति

आई बाबा घरी आले, तोपर्यंत सावनी झोपली होती, प्रीतीने ही जेवून घेतलं, तिला शरदने प्लेसमेंटचा नंबर पाठवला होता, ती त्यांच्याशी फोनवर बोलत होती

सुरेश राव, सुरेखाताई घरी आले, रागावलेले होते ते जरा, रस्ता भर नुसत प्रीती बद्दल बोलत होते, प्रिती काही काम करत नाही वगैरे, म्हणजे देवाला जायच आणि येतांना सुने विषयी वाईट साईट बोलायच

" प्रीती जेवायला वाढ आम्हाला",.. अजूनही सुरेखा ताईंचा आवाज वरच्या पट्टीत होता

प्रीतीने बोटाने गप्प बसा असं सांगितलं, ती बोलत बोलत रूम मध्ये निघून गेली, टेबल वर सगळे पदार्थ ठेवलं होतं, ताट सुद्धा ठेवले होते, फक्त ताटात वाढून घ्यायचं होतं, पण सून घरी असताना त्या स्वतः कशा काय वाढुन घेतील स्वतःला,

दोघंजणं फ्रेश होऊन आले, प्रीती अजून फोन वरच बोलत होती, महत्त्वाच्या विषयावर तिची चर्चा सुरू होती, सासुबाई परत रूम मध्ये आल्या, प्रीती अगं ताट करते ना?, भूक लागली आम्हाला,

" हो करते आई जरा दहा मिनिटं थांबा, माझा महत्वाचा फोन सुरू आहे",... प्रिति

सुरेखाताई बाहेर गेल्यावर प्रीतीने दार लावून घेतलं, त्या दहा मिनिट टेबलावर तशाच बसून होत्या, शेवटी त्यांनी त्यांच आणि सुरेश रावांचा ताट वाढलं, ते दोघे जेवायला बसले, जेवताना त्या नाराज होत्या,

जरा वेळाने प्रीती बाहेर आली

" काय ग कोणाचा फोन होता?",... सुरेखा ताई

"प्लेसमेंट सर्व्हिस चा फोन होता, माझ्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी आली आहे जॉब साठी, त्यासाठीच बोलत होतं आता",.. प्रिति

"तू जेवलीस का?",.. सुरेखा ताई

"हो, मी आणि सावनी दोघं जेवलो  सावनी झोपली",.. प्रिति

"नवीन जॉब शोधते आहेस का तु?",.. सुरेखा ताई

" हो आई ",.. प्रिति

तसे ते दोघं एकमेकांकडे बघत होते

" सावनी लहान आहे ग अजून, पहिल्या वर्गात आहे, तू जॉबला गेली तर तिच्याकडे कोण बघेन, तिचा अभ्यास कोण घेईल? वरच्या वर्गात जाईल ती तसा अभ्यास वाढत जाईल तिचा ",... सुरेखा ताई

" तुम्ही दोघ आहात ना तिच्याकडे बघायला, मला माहिती आहे तुम्ही दोघं तिची नीट काळजी घ्याल तिची",.. प्रिति

जेवण झालं सुरेश राव सुरेखाताई रूम मध्ये आले

" अहो आता ती जॉब करायचं म्हणते आहे, सावनीला कोण सांभाळणार? कोण घेईल तिचा अभ्यास? उगीच आपल्याला परत अडकून जायला होईल, मला तर अजिबात जमणार नाही हे काम ",... सुरेखा ताई

" काम मलाही नाही जमणार, स्पष्ट सांगून दे तिला, तुला काय जॉब करायचा ते कर, आम्ही तुझ्या मुलीला सांभाळू शकत नाही",... सुरेश राव

" हो ना म्हणजे यांनी दिवसभर बाहेर फिरायचं आणि आपण यांची मुलं सांभाळायची ",... सुरेखा ताई रागात होत्या

🎭 Series Post

View all