त्यात काय कमीपणा

Tyat Kay Kmipnaa
प्रथमेश खालच्या मेडिकल मध्ये न जाता तो घरापासून दुरून असलेल्या मेडिकल मध्ये जातो... आजूबाजूला कोणी नाही ना हे बघूनच तो बोलायला जातो तोच कोणी तरी येते आणि तो बोलायचे टाळतो...

एकंदर दुकानदार त्याची चलबिचल मनस्थिती बघत असतो...त्याला कळत नाही की हे गृहस्थ नेमके कश्यासाठी आले आहेत आणि बराच वेळ झाला तरी ते पुढे येऊन काय हवंय ते मागत नाहीत...आणि मागायला गेले तर मध्येच कोणी तरी आले की बोलत नाही... काय विचित्र आहे हा माणूस म्हणून तो त्याला सोडून इतरांना attain करतो....

तरी 20 मिनिटे झाली तो असाच उभा होता बाजूला, आणि येणारे जोपर्यंत थांबत नाही आणि त्यांची गर्दी कमी होत नाही तोपर्यंत तो वाट बघतच होता...


इकडे स्नेहा त्याला फोन करत असते ..

स्नेहा....अरे प्रथमेश अजून किती वेळ लागणार आहे रे तुला मला इकडे पॅड बदलायचे आहे, मी थांबले आहे बाथरूम मध्ये...लवकर ये...


स्नेहा ,प्रथमेशची बायको, तिला अचानक periods येण्याआधी ओटीपोटात खूप दुखायला लागले आणि तिला ऑफिसमध्ये जाण्याआधी खूप अंगावरून जात असल्याने ती ड्रेस बदलायला आत गेली, पण बघते तर पॅड संपले होते. म्हणून तिने तिच्या नवऱ्याला पॅड आणायला पाठवले..



तो ही लाजत काजत...म्हणाला , " मी कसे आणू यार, मी तिथे जाऊ म्हणतेस..?पण मला ते शक्य नाही... कोणत्या तोंडाने मी पुरुष तिथे जाऊन बायको साठी पॅड घेऊन येऊ...हे काम बायकांचे आहे...उगाच चार चौघात इज्जत जाईल माझी...काय म्हणतील हे लोक जे रोज मला येता जाता बघतात...म्हणतील साहेबांना आता हेच काम बाकी होते...बायकोचे पॅड आणायला आले..
उगाच नुसती चर्चा "

तिला आता काही पर्याय नव्हता, म्हणून तिने त्याला पॅड आणायला सांगितला,तिला ही हे पटत नव्हतेच पण ती ह्या अवस्थेत जाणे शक्य नव्हते... ती खरेतर एक गोळी घेऊन आराम करणार होती...तिला दोन पाऊले ही चालणे शक्य नव्हते... तिला नेहमी इतकाच भयानक आणि न सहन होणारा त्रास होत असत... ह्या दरम्यान त्यांच्या ऑफिसमध्ये ती फोन करून हाल्फ डे ची रजा घ्यायची..
पण ती इतके जिने चढ उतार करू शकत नसल्याने कसे बसे दोघे ही तयार झाले आणि तो खाली तिच्यासाठी पॅड आणायला गेला...


पण तिथली गर्दी बघून तो तिथे बराच वेळ येरझऱ्या घालत होताच... शेवटी त्या दुकानतील नौकराने समजून घेतले ,तो दुकानदार म्हणाला ,"काय कोंडोम हवंय का साहेब ? "

दुकानातील नौकर इतक्या जोऱ्यात ओरडला की, प्रथमेश जवळ जाऊन म्हणाला ,"अरे बाबा हळू बोला ,हे काय जोरात ओरडतोस... "

दुकानातील नौकर, " बोला ना साहेब कोणता हवा "

तो...अमका अमका दे...

नौकर....अजून काय हवंय का...?( नौकर चावट होता )

तो.../ हळुच/ ते एक सॅनिटरी पॅड पण दे,

तितक्यात प्रथमेश च्या बाजूला एक माणूस येतो ,आणि मेडिकल वाल्या नौकरला म्हणतो, एक /carefree/ दे ."

तो माणूस एकदम बिनधास्त पणे आपल्या बायकोसाठी/ बहिणींसाठी वा घरातील कोण्या बाईसाठी पॅड मागून घेऊन गेला ,तेव्हा प्रथमेशला नवल वाटले... हा इतका बिनधास्त पणे कसा मागू शकतो पॅड....याला जरा ही लाज शरम नाही वाटावी...आणि हा तर त्या बिल्डिंग मध्ये राहणारा संतोष होता, तो जो एका मोठया कंपनी चा मालक आहे.... काही वाटत नाही का त्याला बदनामीचे..



असा विचार करत असताना प्रथमेश ने त्या दुकानदाराकडे पाहिले... तेव्हा तो दुकानदार म्हणाला, "साहब ,आप कंडोम मांग सकते हो बिनदिक्कत ..पर बीवी के लिये पॅड मांगणे में शरम आती है...."

प्रथमेश थोडा शरमल्या सारखा झाला.... त्याला आता स्वतःच्या खुज्या विचारांची लाज वाटली...त्या दुकानदाराने त्याची इज्जतच जणू काढली...

तसे ही बघायला गेले तर हे पॅड ज्या ठिकाणी बनवले जातात तिथे बनवणारे ही बऱ्याच पैकी पुरुषच असतात, त्याचे मार्केटिंग ही बऱ्याच ठिकाणी पुरुषच करतात, बऱ्याच ठिकाणी मेडिकल शॉप वर बहुदा पुरुषच असतात मग जर ते खरेदी करणार पुरुष असेल तर बिघडले कुठे, बिघडते कुठे....
खरा पुरुषार्थ तोच जो बायकोला, आईला, बहिणीला, लेकीला तिच्या ह्या अवस्थेत  सांभाळून घेत जातो ना की तो अश्यावेळी त्यांचे काही करण्यात कमीपणा आणि अपमान समजतो....ती आहे तर तुम्ही आहात... ती आहे म्हणूनच तुम्ही पुरुष म्हणून मिरवतात... पुरूषार्थ गाजवायला आधी प्रगल्भ विचार सरणी अंगीकारावी लागते....