त्याला आवडलेली ती भाग नववा

As Rugved gets admitted in hospital things got changed

त्याला आवडलेली ती:- भाग 9

कॉफी, केक आणि पफ खाऊन ऋग्वेद चे पोट भरले...पेनकिलर चा इफेक्ट् अजून जाणवत होता...त्याला परत ग्लानी आली. 
तो हळूच झोपून गेला. त्यांच्या बरोबर आलेले मित्र आधीच गेलेले... त्या दोघी तिथेच थांबल्या. 

संध्याकाळ झाली आणि दादा वैशंपायन यांच्याकडून 4 लोक आली.
हातात 4 पुडाचा डबा होता आणि सोबत 4 शहाळी पण होती.
सकाळी आलेले लोक आणि आत्ताचे लोक वेगळे होते. ऋचा आणि नैना फक्त पाहात होते. 
"आम्हाला दादांनी पाठवले आहे...ऋग्वेद भैय्या जवळ आम्हीच थांबू रात्री...तुम्ही जा आता"
त्यांच्या या अश्या अरेरावी बोलण्याने ऋचा ही नैना जवळ जाऊन उभी राहिली.

"आम्ही जाऊ थोड्या वेळात, ऋग्वेद झोपला आहे. 
"आवश्यकता नाही, आम्ही आलो आहोत"
"असे कसे म्हणता तुम्ही, इथे आल्यापासून आम्ही त्याच्या बरोबर आहोत, त्याला सांगून जाऊ"
"तुम्हाला सांगितले जा तर आता जा की ...वेगळ्या शब्दांत सांगायचे का अजून?"
"चल नैना, आपण जाऊयात..." ऋचा तिचा हात ओढत तिला म्हणाली...
नैना ने सुद्धा जास्त आढेवेढे न घेता तिची बॅग उचलली आणि त्या दोघी रूम च्या बाहेर आल्या.

"कसले दादागिरी करतात हे लोक...ऋग्वेद ला सांगितले पाहिजे." नैना वैतागून म्हणाली.
"जाऊ दे ना आपण उद्या बघू..."
दोघी रिक्षा करून घरी गेल्या.

इकडे थोडया वेळाने ऋग्वेद जागा झाला. रुम मध्ये त्या दोघी नाहीत आणि दादाची चार माणसे दिसली. 
"त्या दोघी कुठे गेल्यात..."
"घरी गेल्या भैय्या..."
"मला न सांगता..."
"तुम्ही झोपला व्हता ना...मग वाट पाहून गेल्या.." 
" आणि काही निरोपनाही दिला का?"
"नाही..."
"माझा फोन दे..."
"तुमचा फोन तुटला आहे...रिपेअर ला दिला आहे" 
"तुमचा फोन द्या मला..."

त्या माणसाने ऋग्वेद ला स्वतःचा फोन दिला.
ऋग्वेद ला ऋचा ला फोन करायचा होता पण तिचा नंबर त्याच्याकडे नव्हता...
नैना चा नंबर ही त्याच्याकडे नव्हता..
त्याच्या कुठल्या मित्राला फोन करायचा तर त्याला कोणाचा नंबर आठवत ही नव्हता...

"काय वैताग आहे यार..." तो चिडून म्हणाला.
"काही हवे का भैय्या साहेब? दादा साहेब आता येतीलच तुम्हाला भेटायला..."
"सकाळ पासून का नाही आले?"
"ते येऊन गेले पण त्यावेळेस तुम्ही झोपले होता..."
ऋग्वेद काहीच बोलला नाही...

तेव्हढ्यात डॉक्टरांची राऊंड झाली...
"यंग बॉय, थोडक्यात ब्रेन वाचला आहे बरं का?"
तो फक्त हसला..
"तुम्ही तरुण लोक हेल्मेट का नाही घालत?"
"आमचा ऋग्वेद हेल्मेट घातल्या शिवाय कधीच गाडी चालवत नाही" डॉक्टरांच्या या प्रश्नावर दादासाहेब यांनी एन्ट्री करत उत्तर दिले.

दादासाहेबांना पाहून सगळे चपापले.
"काय ऋग्वेद, खरंय ना आमचे?"
"खरंय"तो क्षीण आवाजात म्हणाला...
"खरंय, पण आज हेल्मेट घातले नव्हते..."
"........"
"काय ईचारतोय आम्ही...?"
"हो"
"का?"
"........"
"का नव्हते घातले..."
"अहो त्यांना आराम करू दे जरा" डॉक्टर मध्ये पडत म्हणाले. 
"आम्ही आमच्या मुलाशी बोलतोय डॉक्टर, तुमचा काय संबंध मध्ये बोलण्याचा?"
त्यांच्या या जरबेने डॉक्टर तिथून निघून गेले...

"का नव्हते घातले?"
"आज घालायचे राहिले..मी विचार केला की न घालता कसे वाटत आहे ते बघू"

"खोटं बोलताय भैय्या तुम्ही... आपल्या वैशंपायन घराण्यात खोटे बोलायची परवानगी नाही...त्या मुलीबरोबर तुम्ही गेला होता तिच्या मागे बसून...तुम्हाला कॉलेज मधून निघताना अनेक जणांनी पाहिले आहे. 
आणि आम्हाला माहिती आहे की तिनेच तुम्हाला पाडले आहे...आता आम्ही तिचे काय करतो ते बघाच तुम्ही..."

"दादासाहेब, तुम्ही असे काही करणार नाही"
"का नाही करणार? जरूर करणार."
"तुम्ही असे केले तर मी पण काय करेन हे पण बघाच!  लक्षात ठेवा,माझ्यात पण वैशंपायन घराण्याचे रक्त आहे"
दादांची नजर पूर्ण आग ओकत होती. 

ते काही न बोलता बाहेर निघून गेले. 
ते गेल्यावरही त्यांचे लोक तिथंच थांबले होते...
"तुम्ही पण जा की...का थांबलाय इथे?"
"दादासाहेबांनी तुम्हाला एक मिनिटे सुद्धा एकटे न सोडण्याची ऑर्डर दिली आहे"
"म्हणजे नजरकैदेत ठेवायचे आहे मला असेच ना?"
कोणी काहीच बोलले नाही...

ऋग्वेद खूपच वैतागला...एकतर त्याचा फोन त्याच्याजवळ नव्हता... ऋचा न सांगता गेल्यामुळे तिचा नंबर घेता आला नव्हता...कोणाचा नंबर आठवत नव्हता..

"भैय्यासाहेब, खाऊन घेता का? घरून मोठा डबा आणलाय..."
"तुम्हीच खा, मला नकोय..."
"आम्हाला यातले खायला नाही सांगितले आहे...हे खास तुमच्या साठी आहे..."
"मग द्या फेकून मी नाही जेवणार..."
त्याच्या या बोलण्याला कोणीच काही बोलले नाही.

तेवढ्यात दरवाज्यापाशी काही आवाज आला...
एक माणूस आत आला आणि म्हणाला की , भैय्यासाहेब यांचे कोणी मित्र आले आहेत...त्यांना आत यायचे आहे"
"कोणालाही आत पाठवायचे नाही, दादा साहेबांनी सांगितले आहे"
"मी सांगितले पण जात नाही आहे..."

तसा ऋग्वेद म्हणाला, "पाठवा त्याला...कोण आहे मला पण बघू दे" 
त्या लोकांचा नाईलाज झाला. 
एक बारीकसा मुलगा आत आला..
ऋग्वेद ने त्याला आधी कधीच पाहिले नव्हते....तो त्याच्याकडं बारीक नजरेने पहात होता..
"हाय ऋग्वेद कसा आहेस?"
"तू..."
"तू कसा आहेस सांग, मी छान आहे..." त्याचे उत्तर थांबवत तो त्याला म्हणाला...आणि कोणाचेही लक्ष नाही असे पाहून त्याने अलगद डोळा मारला. 
ऋग्वेद ला लक्षात आले की हा खास आपल्यासाठी आला आहे...
"अजिबात ठीक नाही आहे यार...त्या लोकांकडे पाहत तो  म्हणाला"
"आता मी आलो आहे ना...होईल ठीक..., मला सांग जेवलास का?"
"नाही..."
"थांब मी तुला वाढतो...ओ दादा, जरा प्लॅस्टिक स्पून आणि प्लेट आणता का? असे डब्यातून खाणे त्याला अवघड जाईल..."
तो माणूस हो म्हणून बाहेर पडला...
आत अजून एक माणूस होता...
"अरे या डब्यात मीठ आणि साखर तर नाहीच आहे...ओ दुसरे दादा त्या दादांना सांगा ना मीठ आणि साखर आणायला...त्याशिवाय हा जेवल कसा?"

तो मान डोलावून बाहेर पडला तसा हा मुलगा ऋग्वेद ला म्हणाला, "ऋग्वेद, मी शंतनू, नैना चा मित्र! तिने मला खास पाठवलं आहे...हा मोबाईल धर...माझा फोन आहे यात नैना आणि ऋचा दोघींचे नंबर आहेत...ऋचा तुझ्याशी बोलायची वाट पाहतेय... तू व्हाट्स ऍप वर बोल तिच्याशी" 
त्याचे हे बोलणे ऐकून ऋग्वेद चा चेहरा एकदम खुलला. 
त्याने त्याच्या हातातून मोबाईल घेतला...
कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन नैना चा फोन नंबर पाहून घेतला आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवला. 

ती दोन माणसे आल्यावर शंतनू त्यांच्या समोर अघळपघळ गप्पा मारत बसला...
ऋग्वेद चे जेवण होईस्तोवर थांबला आणि नंतर गेला...

तो गेल्यावर ऋग्वेद ने त्या लोकांना सांगितले की,
"आता मला विश्रांती हवी आहे...
तुम्ही बाहेर जाऊन जेवून घ्या आणि बेड च्या बाजूचा जो पडदा आहे तो पूर्ण लावून घ्या..एक नाईट लॅम्प चालू  ठेवा काही लागले तर मी सांगेन..."

त्याच्या सांगण्या प्रमाणे त्या लोकांनी केले...
ते गेल्यावर त्याने फोन ऑन केला आणि नैना ला मेसेज केला..
"हाय.."
"हाय..."दुसऱ्या क्षणाला रिप्लाय आला.
"काय करत आहेस?"
"तुझ्या मेसेज ची वाट पहात आहे...इतकी आसुसलेली आहे मी तुला भेटायला ऋग्वेद, कसे सांगू...?
"हम्मम, मला माहिती आहे"
"व्हिडिओ कॉल करू?"
"आत्ता नको, दादांचे लोक आहेत...त्यांना कळले की तू मला पाडले म्हणून तुझ्यावर राग धरून आहेत..."
"आता मी काय करू?????"
"निश्चिन्त राहा...मी आहे☺️"
"????????????????????????????????"
"????"
"????"
"ही कसली ईमोजी आहे ऋचा?"
"तुला नाही माहिती का?"
"नाही, मला कोणी पाठवलीच नाही कधी"
"नाटकी..."
"कोण मी? एवढा सरळ साधा मुलगा मी आणि तुला नाटकी वाटतो आहे का?"
"????????"
"आज काय ईमोजी ईमोजी खेळणार आहेस का माझ्याशी?"
"हो रात्रभर.. चालेल तुला?"
"का नाही, चालेल की..तसेही मी उद्या कॉलेज ला जाणार नाही आहे"
"हा हा हा"
"अगं खरंच!"
"मला माहिती आहे, मी पण जाणार नाही आहे"
"वा वा.."
"मला यायचंय तिथे ऋग्वेद"
"दादासाहेबांना फोन करून विचार आणि ये"
"मला त्यांची फार भीती वाटते रे...ते कसे पाहत होते माझ्याकडे..."
"आणि आता तर त्यांना कळले आहे की तूच मला पाडले आहे आता तर ते तुला सोडणार नाही..."
"खरंच का रे ऋग्वेद????"
"कोई शक?"
"आता मी काय करू?"
"जर तू मला काहीतरी म्हणलीस, तर मी बोलतो दादा साहेबांशी"
"काय म्हणू?"
"जे मला ऐकायला आवडेल?"
"काय?"
"ते तू ठरव.."
"ऋग्वेद प्लिज बोल ना, काय बोलू...माझा जीव जळत आहे इथे"
"हे बघ, मी आजारी आहे, तुला मला लवकर बरे झालेलव पाहायचे असेल तर बोल छानसे काहीतरी"
"अम्म्मम........"
"हे काय??"
"अरे विचार करत आहे, थांब ना"
"ओके...."
"मला ना तू खूप आवडतोस..."
"फक्त एवढेच...जाऊ दे नाही बोलत दादा साहेबांशी..."
"अरे असे काय...ओके बोलते..."
"लवकर"
"मला न आत्ता तिथे यावेसे वाटत आहे..."
"हं, अजून..."
"तिथे येऊन तुझ्याशी बोलावसं वाटत आहे..."
"पुढे..."
"तुझा हात हातात घेऊन तुला घट्ट पकडावे असावं वाटत आहे"
"आणि..."
"आणि ते ..."
"ते काय..."
"ते नाही का वरती चॅट मध्ये तुला ईमोजी पाठवली ते..."
"म्हणजे काय..."
"कसला आहेस रे तू?...एवढे पण  नाही कळत का तुला?"
"नाही..."
"ठीक आहे भेटल्यावर सांगेन..."
"सांगेन का करेन?"
"करेन..."
"नक्की?"
"हो नक्की"
"बघ हां..."
"हो हो हो नक्की...."
"आत्ता दे ना..."
"नाही"
"दे ना...."
"नाही..."
"ठीक आहे मी बोलणार नाही दादा साहेबांशी..."
"ओ ऋग्वेद तू पण ना...घे.....????" 
"☺️"
"हॅप्पी?"
"अर्धाच हॅप्पी..."
"ठीक आहे उरलेला हॅप्पी मी जेव्हा भेटेन तेव्हा करेन"
"मी वाट पाहतोय ऋचा तुझी..."
"मी पण तुला भेटायची वाट पाहत आहे"

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all