त्याला आवडलेली ती भाग 6

Naina shows all support to rucha to meet That boy

त्याला आवडलेली ती:- भाग 6 

लेक्चर संपल्यावर हा उठला...
ती पण उठली.
ते दोघे उठलेले पाहून नैना पण उठली....
त्या दोघी उठलेल्या पाहून हा खाली बसला.
त्याला बसलेले पाहून ऋचा पण बसली.
ऋचा बसलेली पाहून नैना बसली.
आजूबाजूला असलेली मुले यांचे खेळ पाहून हसायला लागली.
नैना ने मागून ऋचा ला चिमटा काढला..
ऋचा जोरात ओरडली.
आता सगळी मुलं ऋचा कडे पाहायला लागली...
तिने ओशाळून नैना कडे पाहिले तर नैना गालातल्या गालात जीभ घोळवून हसत होती. 
आणि तेवढ्यात तो उठून बाहेर निघाला..
ऋचा गोंधळून त्याच्याकडे पाहत असताना नैना ने तिला हलवले आणि म्हणाली, "
अगं तो बाहेर पडत आहे"
ऋचा ने धावपळ करून बॅग खांद्यावर घेतली आणि ती पण निघाली...
ते दोघे निघाल्यावर मुले ओरडायला लागली, "ओये दोघे एकत्र चालले बघ..."
"अरे ती आत्ता ओरडली ना...म्हणून चालले असतील.."
"कही पे निगाहें कही पे निशाना" 
त्यांचे तौण्ट ऐकून ऋचा भडकली...
ती काही बोलणार तेवढ्यात मागून नैना आली आणि तिने तिला क्लास बाहेर नेले
ऋचा ने त्याला गाठले आणि म्हणाली,
"तुझ्यामुळे मला क्लास मधील मुले काय काय बोलत आहेत?"
"एक्सक्युज मी..."
"नो यु आर नॉट एक्सक्युज...
तुझे हे वागणे आहे ज्यामुळे मला  त्रास होत आहे..मनस्ताप होत आहे..तुझ्या बेभरवश्याचे वागणे मला संताप देत आहे..तू कोण समजतोस स्वतःला?" ती एका दमात बोलली...
नैना ने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले आणि अगदी कॅलक्युलेटिव्ह शब्दात बोलला...
"यात माझा काही संबंध मला दिसत नाही" आणि तो चालायला लागला..
ती त्याच्यापुढे जाऊन त्याचा रस्ता अडवत म्हणाली, "कुठे चाललास तू? मी तुझ्याशी बोलत आहे...
आज तुझयामुळं मला लोकांच्या कमेंट्स ऐकाव्या लागल्या..तुझ्यामुळे माझा अपमान झाला..आणि तू सरळ सरळ काही संबंध नाही असे म्हणतोस..."
त्याने नैना कडे पाहिले आणि तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला,
"चल कॉफीला येतेस..."
नैनाने एकदम ऋचा कडे पाहिले...
ऋचा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "जा तू जा, त्याच्या बरोबर..मीच जाते इथून"
नैना ने तिचा हात पकडला आणि तिला थांबवले...

त्याच्याकडे पाहून ती म्हणाली, " हे बघ, माझी ही खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिला मी असे त्रासात ठेऊन तुझ्या बरोबर येऊ शकत नाही...आलो तर आम्ही दोघे येऊ नाहीतर कोणीच नाही.."

त्याने खांदे उडवले आणि म्हणाला, " ऍज पर युवर विश.."

ते तिघेही जण कॉलेजच्या जवळ जे कॉफी शॉप होते तेथे गेले...
त्याने मेनू कार्ड नैना च्या हातात दिले आणि म्हणाला,
"ऑर्डर तू दे"
तिने मेनू कार्ड हातात घेतले आणि ऋचा कडे पाहिले... तिने नजर वळवून घेतली.
शेवटी तिने ऑर्डर देऊन टाकली,
2 चीज ग्रील्ड सँडविच, 1 व्हेज बर्गर आणि 3 कॅफे लाटे ऑर्डर केल्या...
ऑर्डर दिल्यावर नैना ने त्याला विचारले, " आता तुझे नाव सांगशील का?"
"अगं नाव काय जन्मकुंडली सांगेन पण ते आपण दोघे असताना ना"

"म्हणजे?"

"कॉफीचे आपल्या दोघांचे ठरले होते ना, तेव्हा मी सांगणार होते"

त्याचे बोलणे ऐकून ऋचा प्रचंड रागाने त्याच्याकडे बघायला लागली पण नैना ने सावरून घेतले..
"जाऊदे, आता आपण तिघे आहोत ना"
"हम्मम"

"ए तू कुठे राहतोस?"

"घरात" असे म्हणून तो मोठमोठ्याने हसायला लागला. 

त्याचे उत्तर ऐकून ती पण हसायला लागली..
ऋचा ने फक्त दोघांकडे तिरकस नजरेने पाहिले

"नैना, काही लोकांना सेन्स ऑफ ह्यूमर नसतो असे मला वाटते, तुझे काय मत आहे"

"हो ना माझे पण हेच मत आहे, असे लोक फार बोअर असतात"

"नैना, तो माझ्याबद्दल बोलतोय"

"नाही ग, तो इन जनरल बोलतोय, हो ना रे?"

"मी इन जनरलंच बोलतोय, काही लोकांना स्वतःवर ओढून घ्यायची सवय असते"
"नैना, आपले रात्री काय ठरले होते" ऋचा तिला आठवण करून देत म्हणाली

"हो लक्षात आहे माझ्या! ए ऐकना, मी हिला प्रॉमिस केले आहे की तुझे नाव हिला सांगेन, तू सांग ना तुझे नाव काय आहे"

"तिला जर माझे नाव हवे असेल तर मी मगाशीच सांगितले की.."

"बुलेट" ऋचा म्हणाली...

ये ऐकून नैना हसायला लागली..."ओह कमॉन, तुझे खरं नाव सांग आता"

" ऋग्वेद वैशंपायन"

त्याचे नाव ऐकल्यावर ऋचा च्या डोळ्यात चमक आली.
"बघ मी म्हणल्याप्रमाणे तुला नाव काढून दिले हं ऋचा"

तिने हलकेच स्माईल दिली.
सँडविच आणि कॉफी टेबलावर आली..

"बाय द वे, मी रोड वर राहतो बरं का"
"म्हणजे?"

"म्हणजे मी रोड वर राहतो

"काहीही काय बोलतोस तू?"

"M. G. रोड वर राहतो मी" तो हसत हसत म्हणाला. 

त्याचे हे वाक्य ऐकून ऋचा च्या तोंडून कॉफीचा एक फवारा धाडकन बाहेर पडला...

नैना आणि ऋग्वेद हसण्याचा आवाज पूर्ण कॉफी शॉप मध्ये पसरला होता. 

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all