त्याला आवडलेली ती भाग 5

Rucha bodke down due to his behaviour. naina took her into her house

त्याला आवडलेली ती:- भाग 5

ती नैना च्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडली. नैनाचे घर तिथून जवळच होतं ती म्हणाली "तू अशी घरी गेलीस तर सगळे काळजी करतील. तू माझ्यासोबत घरी चल सध्या घरी कोणी नसेल, मग बघू काय करायचं ते!"
काहीही न बोलता ती नैना सोबत तिच्या घरी गेली. नैना ची आई ऑफिस मधून आली नव्हती आणि तिचे बाबा बाहेरगावी गेले होते त्यामुळे त्यांना चांगली स्पेस मिळाली.
हातपाय धूवून त्या फ्रेश झाल्या, नैना ने मस्त गरम कॉफी दिली तिला थोडं बरं वाटत होतं.
थोड्याच वेळात नैना ची आई आई आली आणि ऋचा ला बघून त्या सरप्राइज झाल्या " अरे वा! तू कधी आलीस? छान वाटत आहे तुला बघून आणि हो आज तू इथेच जेवण कर मी तुझं आवडीचं बनवते."
"आई, अग तिला मी आज जाऊच देणार नाही आहे.
तिच्या घरी फोन करून सांगते म्हणजे त्यांना पण काळजी वाटणार नाही. काय मग ऋचा आज मस्त नाईटला जागरण करूयात!"
ऋचा काहीच बोलली नाही पण नकार ही दर्शवला नाही. तिने नैना ची शॉर्टस आणि टी शर्ट घातला तेवढ्या वेळात नैना ने तिच्या घरी फोन केला आणि कळवले की ऋचा आज तिच्या घरी राहणार आहे. 

नैना ची आई त्यांच्याशी बोलत एकीकडे काम करत होती आणि त्या दोघी जमेल तशी मदत करत होत्या.
मस्त पिठलं,भाकरी, कांदा टोमॅटो कोशिंबीर आणि कढी भात असा स्वयंपाकाचा बेत बनवला. 
तिघीच घरी होत्या त्यामुळे एकदम फ्री असेच वातावरण होत. जेवणापूर्वीच नैना बाहेर जाऊन मस्त अंजीर आईस्क्रीम घेऊन आली आणि फ्रीज मध्ये ठेवले.
तिघीही सोबत जेवायला बसल्या, ऋचा फार पुढाकार घेऊन बोलत नव्हती पण काकूंसमोर वेगळे काही दर्शवत पण नव्हती. 
"काकू मस्त बनवले आहे जेवण! तुमच्याकडून कढी शिकली पाहिजे." ती म्हणाली.
नैना मनातल्या मनात आभार मानत होती की आईपुढे ही नॉर्मल दाखवते आहे याचे..
जेवणे आटोपली मग छान बाहेर पोर्च मध्ये बसून मनसोक्त तिचे फेवरेट अंजीर आईस्क्रिम खाल्ले. त्या तिच्या आईला बाय करत नैना च्या रूम मध्ये गेल्या.

"ऋचा नक्की काय सुरू आहे तुझे? तू स्वतः इतकी सुंदर, सगळे तुझ्या मागेपुढे करतात आणि तू हे असे का वागत आहेस?"
"तेच तर ना, सगळे तसे वागतात हे मला आवडत नाही पण हा बघ ना मला अजिबात भाव देत नाही. 
मला साधे नाव सुदधा सांगितले नाही, मी बोलते तर दुर्लक्ष करतो. माझ्या सोबत आयुष्यात हे पहिल्यांदा होत आहे! मला हे सहनच होत नाही."
"नक्की त्याचाच त्रास होतो आहे की आणखी काही?"
"म्हणजे?"
"तुला तो भाव देत नाही मग तू दुर्लक्ष कर ना!"
"नाही ना जमत!"
"तेच म्हणतेय का नाही जमत!"
ऋचा गप्पच राहिली.
"आणि समज नाहीच दिला त्याने भाव तर मग?"
तरी ती गप्प!
"मला तर वेगळे काही वाटत आहे तुझ्या वागण्यावरून!"
"तुला काय म्हणायचे आहे?"
"तूच बघ! तुझ्या मनात त्याचा विचार! त्याच्याशी बोलायचे आहे! तो कोणासोबत दिसला तर तू अस्वस्थ! त्याच्याकडून या अपेक्षा का वाटत आहेत तुला? की तूच गुंतते आहेत त्याच्यात?"

ऋचा एकदम शॉक झाली! तिला हा अँगल लक्षात आला होता पण कळत नव्हते. 
ती स्तब्ध होऊन फक्त नैना कडे बघत होती.

"चिल! मी माझी शंका बोलले! तुला सांगितल्याप्रमाणे उद्या तुला त्याचे नाव कळेल हे नक्की! प्रॉमिस!" म्हणत नैना ने तिला हग केलं.

ती बरीच शांत झाली होती. थोडा वेळ ती गाणी ऐकत होती तर नैना तीच पेंटिंग पूर्ण करत होती. तिला ऋचा स्वतःच्या कल्पनेप्रमाणे सजेस्ट करत होती.

 नैना, तिला घेऊन तिच्या घराच्या गॅलरी कम टेरेसवर गेली. छान वाऱ्याची झुळूक आली आणि ऋचा चे केस वाऱ्यावर उडायला लागले... 
ते पाहून नैना परत म्हणाली, "ऋचा तुला माहिती आहे का की तू किती सुंदर दिसतेस...काय या निनाव्याच्या नादात स्वतःला त्रास करून घेतेस?
हे ऐकून तिने वैतागून आपले केस बांधून टाकले.
"अगं, हो हो ...किती हा राग!"
"नैना, आपण आज रात्रभर ज्या गप्पा मारतो आहे त्या कशासाठी?
"त्या निनाव्याला अद्दल शिकवण्यासाठी..."
"मग तू का माझ्या केसांबद्दल बोलत आहेस?"
"ओके मॅडम, राहिले...बोल काय करायचे...आपले ठरले तर आहे  मी त्याचे नाव सांगणार आहे....मग आता?"

"तू उद्या त्याचे नाव मला सांगशील... मग मी त्याला डायरेक्ट जाऊन त्याच्या नावाने बोलेन आणि मी कोण आहे हे पण दाखवेल."
"पुढे..."
"मग मी असे वागेन , असे वागेन ना कि तो माझ्या मागे पुढेच करायला लागेल"
"हम्मम"
"असे होणारच नाही की कॉलेज मधला एकही मुलगा मला दुर्लक्षित करेल..."
"तुझ्या डोक्यात काय आहे नक्की...?"
"तू बघच नैना, मी काय करते ते.."
रात्रीच्या वेळेला त्या अंधारात तिच्या डोक्यात खूप प्लॅनिंग शिजत होते. 

सकाळी दोघी तिथूनच एकत्र कॉलेज ला गेल्या. आज तो गायबच होता. ऋचा प्रचंड खट्टू झाली होती.
दुसऱ्या लेक्चर ला ती नैना ला घेऊन क्लासरूम च्या बाहेर पडली आणि ते तेवढ्यात तो आत शिरला.
त्याला पाहून ऋचा ने पण लगेच यु टर्न घेतला. 
ती त्याच्या मागोमाग चालत गेली आणि तो जिथे बसला त्याच्या शेजारी जाऊन बसली...
इकडे नैना ला ही कधी मागे वळली हे पण कळले नव्हते...
ती बोलत बोलत पॅसेज मधून बाहेर आली तर तिला दिसले की ऋचा बरोबर नाहीच आहे... तिला शोधत ती आली तर हिने पाहिले की ऋचा त्याच्या शेजारी जाऊन बसली आहे. 
ती गुपचूप पणे त्यांच्या मागे जाऊन बसली. तिला ऐकू आले की ऋचा त्याला विचारत होती , "तुझे नाव सांग ना.."
"का?"
"मला तुला त्या नावाने हाका मारायची आहे"
"बुलेट.."
"तुझे नाव बुलेट आहे?"
"तू त्या नावाने हाका मार"
"पण तुला नाव का नाही सांगायचे आहे..?"
"माझी मर्जी"

तेवढयात मागून नैना म्हणाली, "हे थँक्स फॉर समोसाज" 
"ओह हाय नैना...कशी आहेस?"
"मस्त...तुला माझे नाव कसे माहिती?"
"सगळ्या कॉलेज ला माहिती आहे तुझे नाव...तू स्कॉलर आहेस हे पण माहिती आहे"
त्याच्या या बोलण्यावर नैना अक्षरशः लाजली..
इकडे ऋचा तिला खुणावत होती की "अगं, त्याचे नाव विचार ना..."
नैना म्हणाली, "तुझे नाव काय?"
"हे तू विचारत आहेस की तुझी ही मैत्रीण?"
"अरे मीच विचारत आहे..मला नको का माहिती असायला..."
"मला वाटले तू मला ओळ्खतेस..."
"म्हणजे हो.. खरंतर नाही..."
"नक्की काय?"
"चेहऱ्याने हो, नावाने नाही..."
"आज कॉलेज झाल्यावर कॉफी ला भेट...माझे नाव काय जन्मकुंडली सांगतो"
ऋचा जळजळीत नजरेने त्याच्याकडे पाहत होती...
तेवढ्यात सर आत शिरले आणि त्याने पुढे लक्ष द्यायला सुरुवात केली.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all