त्याला आवडलेली ती भाग 4

Rucha follows him everywhere he goes and get astonished by his behavior all the time

त्याला आवडलेली ती भाग -4 

तिची नजर भिरभिरत त्याला शोधत होती पण पार्किंग मध्ये त्याची बुलेट पण नव्हती आणि तो कॅन्टीन ला पण आला नाही हे तिला नुकतेच कळले होते. 
तिची ही बेचैनी नैनाने पण नोटीस केली होती पण तिने गप्प राहणे यालाच प्राधान्य दिले.

शेवटी न राहवून ती नैनाला म्हणाली " आज आपलं लेक्चर तसेही गेलंच आहे तर चल, आपण मॅक-डी ला जाऊयात आणि मग नंतर शॉपिंग लेन ला जाउयात."

नैना फारसं काही बोलली नाही पण तिने नकार सुद्धा दर्शवला नाही. तिने तिची ज्युपिटर पार्किंग मधून काढली आणि ऋचा लगेच त्यावर बसली आणि त्या दोघी मॅकडोनाल्ड ला पोहचल्या.

पार्किंग करत असताना तिला त्याची बुलेट दिसली. पुन्हा वेड्यासारखी ती त्याला शोधायला लागली. 
बऱ्याच वेळ ती त्याला शोधत होती..तिची ती सैरभैर पाहून तिची नैना वैतागून तिला म्हणाली, 
"अगं काय सुरू आहे तुझं? आता तू म्हणालीस म्हणून आपण इथे आलो आणि तू आपली आपल्याच नादात! 

"हमम्म्मम, चल जाऊयात"  असे म्हणत ती चालायला लागली आणि मॅकडी मध्ये आली तर समोरच तो कोण्या मुलीसोबत बसलेला तिला दिसला. 
त्याचे लक्ष गेलं पण त्याने तिला इग्नोर करत तो त्या मुलीसोबतच बोलत राहिला.
तिथे बसायला जागा नसल्याने त्या दोघी वरच्या फ्लोर वर गेल्या, तिची प्रचंड चुळबुळ सुरू होती आणि तिला थोडं इन्सलटिंग फील होत होतं. 
" काय खाणार बोल!" नैना म्हणाली तरी ही गप्पच. शेवटी ती वैतागली आणि म्हणाली" तू बस मी निघाले! काय मूर्खपणा चालवला आहेस! इथे फुकट बसू देणार नाहीत आपल्याला!"

बाजू सावरून घेण्यासाठी ती म्हणाली,"तुला जे हवे ते ऑर्डर करू! सांग काय ते मी जाते खाली."
"ए तू बस इथेच! खाली गेलीस तर वरच येणार नाहीस! मीच जाते आणि हो जर शांत रहा! काल वेड्यासारखी वागलीस आता आज पुन्हा काही करू नकोस."

नैना खाली आली, आपल्याच नादात तिने 2 व्हेज मॅक  पफ, 2 कोक आणि 2 आलू टीक्की बर्गर ची ऑर्डर दिली.
पेमेंट करून तिने ट्रे घेतला आणि वर आली ऋचा चा चेहरा पडलेलाच होता.

"तुला तो दिसला का?"
"कोण?" 
"अग तो खालीच कोण्या मुलीसोबत बसला आहे. मला बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं त्याने!"
"ऋचा, तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही? तो जर लक्ष देत नाही तर तू का एवढे माईंड करतेस? आणि असं ही असू शकते की तो काही महत्वाचं बोलत असेल!
तुला काय वाटत आहे नक्की?"

तेव्हा ती गप्प झाली पण ती आतून खूप जेलस फील करत होती हे तिला बघून नैना मिश्कीलपणे हसत होती.

फारसं काही बोलणं झालं नाही पण तेवढे खाण्याचे संपवून त्या निघाल्या तर हा तिला बुलेट वर त्या मुलीला घेऊन जाताना दिसला. 
तीचे मन खूप खट्टू झालं होतं की आज पण याच्याशी बोलणं झालं नाही.

" चल मी घरी जाते" ती म्हणाली.
"अग आपण शॉपिंग ला जाणार होतो ना?"
"माझा मूड नाही आहे?"
"मूड गेला असेल ना! तो दुसऱ्या मुलीसोबत दिसला म्हणून तुझी जळते आहे बाकी काही नाही."
"असे काही नाही! मला काय फरक पडतो त्याने?"
"तुलाच माहीत!"
"चल मुव्ही ला जाऊयात! मस्त आणि मग शॉपिंग करू" ती म्हणाली तसं नैनाला वाटले की खरंच काय चालले आहे ह्या ऋचा चे! पण तिने काही व्यक्त न होता तिच्या प्लॅन ला सहमती दिली.

दोघी मल्टिप्लेक्स ला पोचल्या तर परत बुलेट तिथेच दिसली...
ऋचा परत कावरीबावरी झाली...नैनाने तिकीट काढले  तर ही आत जायला तयार नाही..
तिने खोदून खोदून विचारले वर ऋचा ने बुलेट कडे बोट दाखवले.
तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि ऋचा ला आत घेऊन ती आत गेली.
ऋचा आत शिरल्यावर तिची नजर त्याला शोधत होती आणि तो दिसला.
2 लेन सोडून त्याच मुलीबरोबर तो बसलेला...
त्याच्या हातात मोठा पॉपकॉर्न चा टब होता आणि त्यातून ते दोघे खात होते...
पिक्चर सुरू झाला आणि नैना ने पिक्चर पाहायला सुरुवात केली पण ऋचा मात्र फक्त त्या खुर्चीवर नजर ठेवून होती.

इंटरवल ला तो उठला तसे ऋचा पण उठली.  नैना ने तिच्याकडे पाहिले तर ही त्याच्या कडे पाहत रो मधून चालत होती...
तिने डोक्याला हात लावला आणि ऋचा च्या मागे धावली...

ती त्याच्यापर्यंत पोचली आणि त्याला म्हणाली, 
"ए हॅलो...."
त्याने तिच्याकडे पाहिले पण दुर्लक्ष केले...
"अरे ...तू...तुझे नाव....ओह काय बोलू मी याला..."

तेवढ्यात त्याने हात दाखवला...."हाय नैना!"
"हाय" मागून आलेल्या नैना च्या तोंडून एकदम निघून गेले...
"मस्त आहे ना पिक्चर...मी दुसऱ्यांदा पाहायला आलो आहे. तो नैनाला म्हणाला.
"हो मस्त आहे...मी लक्ष देऊन पाहत पण आहे..." ती ऋचा कडे पाहत म्हणाली...
"सामोसे?"
"श्यूअर"
त्याने सामोस्यांचेच 4 पॅकेट्स घेतले आणि 2 तिला दिले...
जस्ट 2 मिनिटे कॅस्युयल बोलून तिला बाय करून तो गेला....

हिचे ऋचा कडे लक्ष गेले तर ऋचा पूर्णपणे लालीलाल झाली होती..तिची नाकपुडी थरथरत होती. 
डोळ्यात पाणी होते.

नैना ने विचारले, "ऋचा काय होतंय तुला?"
ती धुसपुसत म्हणाली, "नैना, तुझी आणि त्याची ओळख आहे...तो तुला ओळखतो..."
"अगं, नाही..."
"नाही...? ती किंचाळत म्हणाली...माझ्यासमोर तो तुला नावाने हाका मारतो-तू त्याच्याशी बोलत होती आणि तू नाही म्हणतेस.."

"हे बघ ऋचा, त्याने मला हाका मारली आणि मी एकदम नकळत हाय बोलले...तो एवढ्या ओळखीने माझ्याशी बोलत होता आणि मी त्याला कसे सांगायचे की मला तुझे नाव पण नाही माहिती.."

"डोन्ट टेल मी नाऊ की यु डोन्ट नो हिम"

"ऋचा, मला तो चेहरा पाहिल्यावर आठवले की तो आपल्या कॉलेज मध्येच आहे पण त्याच्याशी मी पहिल्यांदाच बोलत होते...ट्रस्ट मी"

ऋचा डोळ्यातले पाणी टिपत तशीच थिएटर च्या बाहेर पडली...नैना सुद्धा तिच्या मागे धावत होती. पण ऋचा तावातावाने चालत बाहेरच्या रोड वर चालत होती..
शेवटी नैना ने तिला गाठले आणि थांबवले...

"ऋचा काय चालू आहे तुझे..? "
"नैना, मी एवढी धडपड करून मला त्याचे नाव सुद्धा माहिती नाही आणि तो मात्र तुझ्याशी पण नावासकट बिनधास्तपणे बोलतोय...मी काय करू?" असे म्हणून ती रडायला लागली..

"ऋचा, तुला त्याचे नाव हवे आहे का? मी देते काढुन तूला उद्या सकाळपर्यंत"
"मला नको आहे त्याचे नाव....!"
"मग..."
"मला तो असे का वागतो हे हवे आहे...त्याचे माझ्याशी नॉर्मल बोलणे हवे आहे...माझ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून हवी आहेत...." असे म्हणून ती नैना च्या गळ्यात पडून रडायला लागली.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all