त्याला आवडलेली ती भाग 3

She was amazed with his behavior and her curiosity was increasing to know him more

त्याला आवडलेली ती:- भाग 3

तिथून निघालेला तो सरळ घरी आला. त्याचा थोडा मिश्किल आणि थोडा विचारात असलेला चेहरा बघून बहीण बोलली " काय मग राजे, आज कोणती स्वारी जिंकून आलात?"
त्याने फक्त स्माईल दिली. तिला एक टपली मारली आणि रूमकडे निघाला.
आज हा आपल्याशी भांडला नाही किंवा ओरडला नाही! तिला नवलच वाटले थोडी खट्टू झाली करण त्या लुटुपूटूच्या भांडणात तर खरं प्रेम ना!
तो सरळ रूम मध्ये शिरला, बॅग आणि हेल्मेट आपापल्या जागेवर ठेवले आणि वॉश रुम मध्ये गेला.  
शॉवर घेत असताना त्यांच्या नजरेत आज दिवसभरात जे घडले ते सगळे क्षण एकापाठोपाठ तरळत होते.
मस्त शॉवर घेऊन फ्रेश होऊन तो बाहेर आला, स्वतःलाच आरशात बघून मिश्किल स्माईल देऊन डोळा मारला आणि गॅलरीत कठड्याला टेकून उभा राहिला.

त्याला फक्त ती आठवत होती. तिची ती धडपड, त्याच्याशी बोलायची ती तिची उत्सुकता! तिचे ते प्रयत्नं! अचानक त्याला तिचा तो बोल्ड स्पर्श  आठवला ज्यात तिने त्याला घट्ट धरून बसली होती... तो मुलायम स्पर्श त्याला पुनः एकदा सुखावून गेला. 
त्या क्षणी जरी त्याने दाखवले नाही तरी त्याला वेगळा सुखाचा क्षण स्पर्श करून गेला होताच. 
तो पुन्हा एकदा मनोमन हसला आणि बेड वर येऊन आडवा झाला.
तिची ती बडबड अजून त्याच्या कानात घुमत होती, तिची ती धडपड त्याला काही निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न  हे असे विचार करत अचानक त्याचा डोळा लागला.

इकडे बुलेट वरून उतरलेली ती त्याच्या अचानक त्या बोलण्याने आणि उतर म्हटल्याने स्तब्ध झालेली ती, काही क्षण तशीच उभी राहिली आणि त्याच्याकडे बघत होती. 
तो निर्विकारपणे तिच्याकडे न बघता पुढे निघून पण गेला, पुन्हा एकदा शॉक फीलिंग आलेली ती यंत्रवत चालू लागली. 
काही मिनिटे गेली आणि तिला लक्षात आले की आपण चुकीच्या दिशेने जात आहोत. 
तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि बाटली मधले पाणी पपिऊन बाजूच्या कट्ट्यावर काही क्षण बसली आणि कॅब बुक केली.

तिच्या नजरेसमोर सतत त्याचाच चेहरा येत होता. त्याचे ते रूबाबदार व्यक्तिमत्व, डॅशिंग लूक, सिम्पल पण तरीही मस्त अटायर त्यावर रे बॅन गॉगल, रॉयल एनफ्लिल्डचे  हेल्मेट आणि बुलेट! 
ती चालवत असताना तर तो जणू मॉडर्न राजकुमार भासत होता.

कॅब थांबली तशी तिच्या विचारांना ब्रेक लागला. तीचे घर म्हणजे छानसा बंगला होता.
गेट उघडून ती आत शिरली पण आपल्याच नादात बाहेर उभ्या असलेल्या आईकडे तिचे लक्षच गेलं नाही. 
ते बघून काहीतरी बिनसलंय हे आईच्या लगेच लक्षात आलं.
तीने घरात येताच बॅग फेकली, सँडल कोपऱ्यात वेड्यावाकड्या फेकल्या आणि धाडधाड पाऊल टाकत जिन्याने वर खोलीत गेली. 
तिला खरं तर मनातून खूप राग येत होता पण कोणाचा नक्की हेच कळत नव्हते...
त्याचा, त्याच्या वागण्याचा की स्वतःचा?
तिने हातपाय फक्त धुतले आणि ती धाडकन बेड वर स्वतःला लोटून दिले...!

आज कपडे बदलण्याचं भान सुद्धा तिला राहील नव्हतं. आपल्या मागे सगळे वेड्यासारख बोलायला फिरतात पण आपण त्यांना भाव देत नाही आणि तेच हा आपल्यासोबत करतोय! मी तरी का त्याला भाव देतेय? का त्याच्या मागे मागे करत त्याच्या बुलेट वर बसून बाहेर सुद्धा गेले? का आपण असे वागतोय? आणि त्याचे काय? तो तर अगदी निर्विकार! जणू मी त्याच्या खिजगीणतीत सुद्धा नाही! 
राहून राहून या सगळ्या विचारांनी ती चरफडत, आतल्या आत चिडत होती. तरीही त्याचा विचार काही बाजूला सारला जात नव्हता.

दारावर नॉक झालं आणि आई आत आली " काय ग तब्येत बरी आहे ना तुझी?"
"मला काय झालंय?" तोऱ्यात ती बोलली.
"काय झालं आहे हेच मी तुला विचारत आहे! उशिरा येते म्हणून कळवलं नाही, फोन करते तर लागत नाही आणि आलीस ती अशी तणतणत!"

आईने काहीतरी जोखलय लक्षात येताच सारवासारव करत " बॅटरी डाऊन झाली होती आणि कॉलेज नंतर एका  एक्सिबिशन ला गेले होते" इतकच ती बोलली.

"हो का? एक्सिबिशन मध्ये कपडे ओले होतात मला आजच कळलं" आई बोलली आणि निघून गेली.

तसं आपल्या मुर्खपणाकडे तीचे लक्ष गेले... जीन्स पाण्यात पाय टाकताना ओली झाली आणि घरी येऊन तिने बदलली सुद्धा नाही.
शांतपणे वॉश रूम मध्ये जाऊन तिने चेंज केले. आपण त्याला स्पर्श केला तो त्याने झिडकरला! तरीही का त्याला घट्ट धरून बसावेसे वाटले?
पण का आणि का? हेच विचार मनाला पोखरत होते.

दोघेही होते आपापल्या घरात... पण मन मात्र सैरावैरा फिरत होती ती एकमेकांच्या अवतीभवतीचं!
तो मुद्दाम करत होता तर तो असे का वागतोय हे  तिला एक कोडे पडत होते. 
दोघेही उद्याच्या प्रश्नचिन्हाखाली वावरत आपल्याला स्वप्नात रमले आणि आज खरच काय होणार या बेतात सकाळ उजाडली.

ऋचा ने क्लास रूम मध्ये प्रवेश केला तर तो आज एका वेगळ्याच बेंच वर होता..तर तिची मैत्रीण तिच्या बेंच वर तिची वाट पाहत होती...
त्याच्याकडे बघत ती तिच्या बेंच वर बसली तर तिच्या मैत्रिणीने तिला  हलवले..."काय ग, सकाळी सकाळी कशात हरवलीस?"
तिने मान डोलवत काही नाही असे सांगितले. 
सर आले आणि क्लास सुरु झाला तर आज पण तो लगेच उठुन बाहेर गेला..
तो बाहेर गेल्यावर ही अस्वस्थ झाली..तिची चुळबूळ सुरू झाली.
"नैना, प्लिज सरांना सांग मला बरे नाही वाटत आहे आणि मला बाहेर घेऊन चल..."
तिच्या मैत्रिणीने तिच्याकडे चकित होऊन बघितले आणि लगेच सरांना सांगितले. 

"ऋचा, काल पण तुला बरे नव्हते आज पण नाही...3 ते 4 दिवस सुट्टी घेऊन तू बरे होऊन का नाही येत?"

"येस सर.. राईट सर..ओके सर ...जाते सर...आपले येते सर...नाही नाही जातेच सर"
तिचे बोलणे ऐकून सगळा क्लास जोरजोराने हसायला लागला...
क्लासला तसेच हसत ठेऊन ती नैनाला घेऊन बाहेर पडली....

"ऋचा काय होतंय नक्की तुला?"
"नैना, मला काहीच होत नाही आहे...मला तुला काही सांगायचं आहे..."
"काय.."
"आपल्या क्लास मधील एका मुलाबद्दल"
"कोण? आणि त्याने काय त्रास दिला तुला?"
"त्याने काहीच त्रास नाही दिला...उलट मी दिला "
"काय सांगतेस..?"
आणि तिने काल घडलेले सगळे तिला सांगितले!

"काय सांगतेस ऋचा, तू त्याला पकडले आणि त्याने हात झिडकरला..."
"हो ना ग.."
"मला दाखव ना तो..."
"अग तोच तो जो आत्ता क्लास मधून उठून गेला, म्हणूनच  मी बरे नसल्याचे नाटक केले ना..."
"मला नाही आठवत आहे त्याचा चेहरा...दाखव तू"

त्या दोघी त्याला शोधत शोधत कॅन्टीन, पार्किंग आणि कॉलेज कट्ट्यावर जाऊन आल्या पण त्याचा काही पत्ता नव्हता!
ऋचा प्रचंड हिरमुसली झाली...
एकतर त्याचे नाव माहिती नाही, तो राहतो कुठेमाहिती नाही, त्याच्या बुलेट चा नंबर आठवत नाही...आता शोधायचे तरी कुठे हा प्रश्न तिला पडला...

शेवटी कंटाळून त्या दोघी कॅन्टीन ला आल्या...कालच्या पोराला पाहून तिने विचारले, "ते साहेब आज आले का इथे?"
"आज नाही आले.."
"असा कसा रे तू, तुला साहेबांचे नाव माहिती नाही..?"
" मॅडम, मला तुमचे तरी नाव कुठे माहिती आहे"
त्याच्या उत्तराने ती शांतच बसली.
दोघींनी कोका कोला मागवला आणि शांतपणे त्या एकेक  सिप करत बसल्या...!
आज तरी त्याच्याशी बोलता येईल का नाही या विचाराने ती झपाटली होती. 

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all